मन घन होऊन....

Submitted by ह.बा. on 10 June, 2014 - 08:15

मन घन होऊन....

मन घन होऊन दाटुन येते वेणी अलगद सुटते
सवलत असते पावसास अन वादळ येऊन लुटते

उपासमारीने मेलेल्या भिकार्‍यास पाहताना
सुटलेल्या पोटाची जनता पहा किती चूटपुटते

बरेच जाहले विजयाच्या नौकेस भोक पडले ते
पराभवाने आपले परके सारी कोंडी फुटते

पापणीतले पाणी सुकते, जरा कुठे हासतो तो...
पंचम लाउनी बसणारी ही गझल अशी पुटपुटते

शब्दांचा, संसाराचा, जगण्याचा कैदी जाहला?
प्रेमाने चुंबीताच बेड्या, अलगद बंधन तुटते!

- हबा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.

नॉर्मली गझलांच्या वाटेला जात नाही, पण हबांचे नाव वाचून वाचली आणि निर्णय योग्य ठरला. पु.ले.शु.

अनेक शेर आवडले
अनेक शेरात एक मात्रा जास्त झाली आहे का ? मला तसे वाटले
की वृत्तच तसे योजले गेले आहे न कळे .
ती मात्रा नसती तरी चालले असते असेही वाटले

बाकी विचारवंत यांच्याशी सहमत

छान

शब्दांचा, संसाराचा, जगण्याचा कैदी जाहला?
प्रेमाने चुंबीताच बेड्या, अलगद बंधन तुटते! >>>> क्या बात है ....

सवलत असते पावसास अन वादळ येऊन लुटते <<फार मस्त ओळ .

बरेच जाहले विजयाच्या नौकेस भोक पडले ते
पराभवाने आपले परके सारी कोंडी फुटते << व्वा .

> अनेक शेरात एक मात्रा जास्त झाली आहे का ?
मला तसे वाटले
की वृत्तच तसे योजले गेले आहे न कळे .
ती मात्रा नसती तरी चालले असते असेही वाटल> > सहमत वैवकुंशी .

अजय, शरद,
आभारी आहे!!!

मात्रांविषयी > जी बेरीज लोकांच्या कानाला बरी वाटते ती करायलाच हवी या व्यवहारी विचाराच्या **वर लाथ घालतो मी. मी मला सुचलेलं मला पटलेल्या पधतीने मांडतो. ते लेखन रसिकांसाठी असते. सन्माननिय समिक्षकानी मनगटावर कितीही घासलेट लाउन शिमगा केला तरी लिहीले त्यात बदल नाही.

टाईपिंग किंवा मात्रा चुकल्या आहेत का?

नसतील तर त्या २८ असताना कशी वाचता आली असती व ३२ कश्या करायच्या याचे ज्ञान थोड्याश्या अनुभवाने आले आहे.

माझ्याच गझलेतील एक शेर :

लुटतो गाभा रसिक खरा अन होतो मालामाल
ज्ञानी आत्मा गांभिर्याने चघळीत बसतो साल

नसतील तर त्या २८ असताना कशी वाचता आली असती व ३२ कश्या करायच्या याचे ज्ञान थोड्याश्या अनुभवाने आले आहे. <<<<
धन्यवाद
मला बोलण्यापूर्वी अजून अभ्यास करायला हवा आहे ह्याची जाणीव झाली
प्रश्न विचारल्याबद्दल क्षमस्व

हबा , तुमची लेखनशैली , तुमच्या गझला नेहमीच आवडतात आणि attitudeही मस्त वाटला आता :), नुसतेच पांडित्य दाखवण्याऱ्या लोकांसाठी कधीच लिहू नये,त्यांचा विचारही करू नये , पण स्वत:च्याच समाधानासाठी तरी रचना परिपूर्ण करण्याचा आग्रह असावा असं माझं मत.

व्वा…. मस्तच….!

लुटतो गाभा रसिक खरा अन होतो मालामाल
ज्ञानी आत्मा गांभिर्याने चघळीत बसतो साल>>> +१

.

क्रांतिकारी, बहुतही क्रांतिकारी !>>> प्रतिक्रियेचा गझलेशी संबंध आहे का? अशा प्रतिसादासारखे गझलेत खाहिच नाही. गझलेवर गप्पा, चर्चा, सामुहिक चर्वण, सुचक प्रतिसाद, प्रतिसादावर सुचक प्रतिसाद इ. प्रकारच्या संसर्गजन्य आजारापासून आम्हाला वाचुद्या हि विनंती.

रसप, चेतन,
आपला आभारी आहे!