निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमाताई मस्तच. खूप छान वाटलं तुमचा लेख बघून. माझ्याकडे मटाच येतो.

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.>>>>>>>>>>>>> +१००
मीही मटातच वाचला. मग आठवलं इथेही चाळल्याचे. "चाळल्याचे" म्हणते कारण सध्या फार वेळ मिळत नाहीये माबोवर यायला. हो आणि घरी सगळ्यांना वाचायला दिला .

सुदूपार....Photo-0329.jpg

मनिमोहर, अभिनंदन...

जिप्सी खुप सुरेख फोटो.... नागपूर चे सध्याचे तापमान बघुन कोकणात पळुन जावेसे वाटते...
कालचे तापमान ४८ होते... Uhoh

जिप्सी, काल प्रदर्शनाला भेट देऊन आले. मला तर ती क्युट, स्मार्ट, गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी (रिये वाचत्येसना हे वर्णन???) सापसुरळी आणि तो हिमालयन प्राणी हे दोनच फोटो दिसले.

आणि हो तो तारे तारका नी टेन्ट वाला पण फोटो होता दुसर्‍या फोटोग्राफरचा. Happy

बाकीचे सगळ्यांचेच, सगळेच फोटो मस्त होते. मी निघाले तेव्हा तुमचा रानवाटाचा तो संतोष (??) जस्ट एन्ट्री करत होता.

वा जिप्सी क्या बात है. फोटोबरोबर कविता म्हणजे सुंदर मेजवानी असते, डोळे आणि मन दोन्ही सुखावतं.

शोभा आणि सायली मस्त फोटो.

मोना,
अरेरे
उद्या हे सगळं पालीबाबत पण म्हणशील Angry

ती पण तर गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी असते. व्याक नकोच बुवा वर्णन सुद्ध्हा!!!!!!!!!!!!!! Sad

सापसुरळी आणि तो हिमालयन प्राणी हे दोनच फोटो दिसले.>>>>>हो मोनाली, मी दोनच फोटो पाठवलेले. Happy
रानवाटाचा तो संतोष (??)>>>>स्वप्निल Happy

क्युट, स्मार्ट, गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी>>>>>>:हहगलो:

तोच फोटो (हार्ड कॉपी) रियाला कुरीअर करणार आहे. Wink

जिप्स्या, बरं झालं सांगितलस!!!!
तुझ्याकडुन आलेलं कुरियर मी घेणारच नाही Proud

बर तो छत्रीचा पिक दे की.
ईमेल नको करूस. माबो किंवा ब्लॉग वरुन दे कारण माझ्या क्लईंट मशिनवर मी कुठले इतर ईमेल्स फॉरवर्ड करून घेऊ शकत नाही Happy
आणि वॉटरमार्कवाला असेल तरी चालेल Happy

बाकी लोकहो, या जिप्स्याला परत पिडायला सुरुवात करा बरं.... तुम्ही जरा मोकळं काय सोडलं याला हा माझ्यामागेच लागलाय (सापसुरळी घेऊन) Proud

माबो किंवा ब्लॉग वरुन दे>>>रिया, मी पिकासावरून तो फोटो डिलीट केलाय त्यामुळे माबोवर दिसणार नाही. घरी गेल्यावर परत पिकासात अ‍ॅड करतो आणि तुला लिंक पाठवतो. Happy

ती पण तर गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी असते>>>>>हिचा पण फोटो काढुन पाठवू का?

फोटो कशाला ? सापसुरळीच दे कि.... छान सुळसुळत राहते.
आमच्याकडे येणार्‍या बायका तिला जमिनीवरची पाल म्हणतात कारण ती सहसा भिंतीवर चढत नाही. त्यामूळे रियाच्या ऑफिसमधल्या सुळसुळीत जमिनीवरून ती फक्त सुळसूळत राहील,

सापसुरळीच दे कि.... छान सुळसुळत राहते.>>>>>:फिदी:

रिया, तो सापसुरळीचा फोटो सिंहगडावरच काढलाय. Happy

सापसुरळीच दे कि.... छान सुळसुळत राहते.>>>>>फिदीफिदी

रिया कठीण आहे बाई तुझं! पण नविन लग्न झालेले लोक सापसुरळीचे वगैरे फोटोज काय काढतायत?:अओ:

अच्छा, मला वाटले तु ४ फोटो दिले आहेस. Happy

मी इमॅजीनल रियाला ऑफिसातल्या सुळसुळीत जमिनीवरुन, सापसुरळी आणि पालीच्या पुढे सुळसुळ करत, साऊंड करत सुळसुळताना. रिये तुला हवे तर एक सळसळ करणारा प्राणी पण जागू कडुन पाठवितो. ती चांगली आहे, देईल एखदा. तिच्याकडे भरपुर आहेत. वाटल्यास जास्त पण देऊ शकेल ती. Proud

पण नविन लग्न झालेले लोक सापसुरळीचे वगैरे फोटोज काय काढतायत?>>> अगं, थोड्या दिवसांनी फरक ओळखा असे कोडे सोडवायची वेळं येत्ते ना सर्वच जोडप्यांवर तर म्हणुन तयारीत असेल.
जिप्सीभौ (दिवे घेणेचे करावे.)

आता मी सळसळते, सॉरी पळते इथुन.. :डोमा:..........बाय

दिनेशदा, कमाल आहे. मी अपलोड केलेला फ़ोटो पाहून, एक महत्वाचा प्रतिसाद तुम्ही द्याल अशी आशा होती. पण अरेरे! तुमचही लक्ष नाही Sad Sad Sad

काय योगायोग आहे, मी पोस्टताना बाजुलाच भानग्रहची जाहिरात आहे. त्यात त्याबाई / बाप्याच्या एका डोळ्यातुन एक पाल आरपार गेलेली दाखवलिये. नी तिची शेपटी नाकातुन बाहेर पडलीये.
Witness the mystery of Bhangarh Fort in the exclusive trailer of Bhaangarh - 5th Sept 14

रिया स्क्रिनशॉट पाठवु का गं बाई?

क्युट, स्मार्ट, गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी>>>>>>हसून हसून गडबडा लोळण

तोच फोटो (हार्ड कॉपी) रियाला कुरीअर करणार आहे. >>>>>>>>>> Rofl
माझ्या लेकाने घरातल्याच एका पालीच्या मागे लागून लागून तिचा एक मस्त (!) क्लोजप घेतलाय. त्या फोटोचं नाव आहे: ...... "लाफिंग लिझार्ड"
मी म्हटलं हा फोटो वॉटरमार्कशिवाय टाकू नको. खरंच इतका अप्रतीम आलाय. मलाही खूप किळस/भीती वाटते पालीची. तरीही फोटो म्हणून इतका अप्रतीम आलाय!
रिये वत्से हे वाचू नको हं प्लीजच! Proud

उन्हाळ्यात बहाव्याचा पिवळा, नीलमोहराचा निळा, गुलमोहराचा लाल रंग यासोबतच अजुन एक "पांढरा" रंग बहरत असतो. उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला कि याचाही बहर ओसरतो.
कशाचा तो सांगु शकाल?

Pages