निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सरिवा, जागु अलमांडा मस्तच..
सरिवा, जागु अलमांडा मस्तच.. धन्यवाद.
मी १९ भागात ह्या फुलाचे फोटो टाकुन नाव सांगा लिहिणार होते.
अंजू, अभिनंदनाबद्दल खूप खूप
अंजू, अभिनंदनाबद्दल खूप खूप आभार.
हेमाताई मस्तच. खूप छान वाटलं
हेमाताई मस्तच. खूप छान वाटलं तुमचा लेख बघून. माझ्याकडे मटाच येतो.
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.>>>>>>>>>>>>> +१००
मीही मटातच वाचला. मग आठवलं इथेही चाळल्याचे. "चाळल्याचे" म्हणते कारण सध्या फार वेळ मिळत नाहीये माबोवर यायला. हो आणि घरी सगळ्यांना वाचायला दिला .
सुप्रभात!
सुप्रभात!
सुप्रभात!!!! दूर कोकणात
सुप्रभात!!!!
दूर कोकणात माझे, घर चिमुकले छान
मधे वाट पुळणीची, बाकी हिरवे रान!
जिप्स्या, नको रे असे फोटो
जिप्स्या, नको रे असे फोटो डकवू, मन अस्वस्थ होतं. कु.फे.हे पा.
सुदूपार.... मनिमोहर,
सुदूपार....
मनिमोहर, अभिनंदन...
जिप्सी खुप सुरेख फोटो.... नागपूर चे सध्याचे तापमान बघुन कोकणात पळुन जावेसे वाटते...
कालचे तापमान ४८ होते...
सुदुपार!! नविन भाग आला पण!
सुदुपार!!
नविन भाग आला पण! अभिनंदन निगकर्स!
जागु वरचा फोटो आणी लेखही सुंदर!
मानुषी, सायली, खूप खूप
मानुषी, सायली, खूप खूप धन्यवाद.
जिप्सी, परफेक्ट पिक्चर आणि यथार्थ काव्य.
जिप्सी, काल प्रदर्शनाला भेट
जिप्सी, काल प्रदर्शनाला भेट देऊन आले. मला तर ती क्युट, स्मार्ट, गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी (रिये वाचत्येसना हे वर्णन???) सापसुरळी आणि तो हिमालयन प्राणी हे दोनच फोटो दिसले.
आणि हो तो तारे तारका नी टेन्ट वाला पण फोटो होता दुसर्या फोटोग्राफरचा.
बाकीचे सगळ्यांचेच, सगळेच फोटो मस्त होते. मी निघाले तेव्हा तुमचा रानवाटाचा तो संतोष (??) जस्ट एन्ट्री करत होता.
वा जिप्सी क्या बात है.
वा जिप्सी क्या बात है. फोटोबरोबर कविता म्हणजे सुंदर मेजवानी असते, डोळे आणि मन दोन्ही सुखावतं.
शोभा आणि सायली मस्त फोटो.
मोना, अरेरे उद्या हे सगळं
मोना,
अरेरे
उद्या हे सगळं पालीबाबत पण म्हणशील
ती पण तर गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी असते. व्याक नकोच बुवा वर्णन सुद्ध्हा!!!!!!!!!!!!!!
सापसुरळी आणि तो हिमालयन
सापसुरळी आणि तो हिमालयन प्राणी हे दोनच फोटो दिसले.>>>>>हो मोनाली, मी दोनच फोटो पाठवलेले.
रानवाटाचा तो संतोष (??)>>>>स्वप्निल
क्युट, स्मार्ट, गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी>>>>>>:हहगलो:
तोच फोटो (हार्ड कॉपी) रियाला कुरीअर करणार आहे.
जिप्स्या, बरं झालं
जिप्स्या, बरं झालं सांगितलस!!!!
तुझ्याकडुन आलेलं कुरियर मी घेणारच नाही
बर तो छत्रीचा पिक दे की.
ईमेल नको करूस. माबो किंवा ब्लॉग वरुन दे कारण माझ्या क्लईंट मशिनवर मी कुठले इतर ईमेल्स फॉरवर्ड करून घेऊ शकत नाही
आणि वॉटरमार्कवाला असेल तरी चालेल
बाकी लोकहो, या जिप्स्याला परत पिडायला सुरुवात करा बरं.... तुम्ही जरा मोकळं काय सोडलं याला हा माझ्यामागेच लागलाय (सापसुरळी घेऊन)
माबो किंवा ब्लॉग वरुन
माबो किंवा ब्लॉग वरुन दे>>>रिया, मी पिकासावरून तो फोटो डिलीट केलाय त्यामुळे माबोवर दिसणार नाही. घरी गेल्यावर परत पिकासात अॅड करतो आणि तुला लिंक पाठवतो.
ती पण तर गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी असते>>>>>हिचा पण फोटो काढुन पाठवू का?
नकोsssssssssssssssssssss किती
नकोsssssssssssssssssssss
किती छळतोस रे मला? कु फे हे पा
फोटो कशाला ? सापसुरळीच दे
फोटो कशाला ? सापसुरळीच दे कि.... छान सुळसुळत राहते.
आमच्याकडे येणार्या बायका तिला जमिनीवरची पाल म्हणतात कारण ती सहसा भिंतीवर चढत नाही. त्यामूळे रियाच्या ऑफिसमधल्या सुळसुळीत जमिनीवरून ती फक्त सुळसूळत राहील,
सापसुरळीच दे कि.... छान
सापसुरळीच दे कि.... छान सुळसुळत राहते.>>>>>:फिदी:
रिया, तो सापसुरळीचा फोटो सिंहगडावरच काढलाय.
रिया, तो सापसुरळीचा फोटो
रिया, तो सापसुरळीचा फोटो सिंहगडावरच काढलाय. स्मित>>>>>>>>>>>>>>>>अजून हेच पुराण चालू आहे का?
सापसुरळीच दे कि.... छान
सापसुरळीच दे कि.... छान सुळसुळत राहते.>>>>>फिदीफिदी
रिया कठीण आहे बाई तुझं! पण नविन लग्न झालेले लोक सापसुरळीचे वगैरे फोटोज काय काढतायत?:अओ:
अच्छा, मला वाटले तु ४ फोटो
अच्छा, मला वाटले तु ४ फोटो दिले आहेस.
मी इमॅजीनल रियाला ऑफिसातल्या सुळसुळीत जमिनीवरुन, सापसुरळी आणि पालीच्या पुढे सुळसुळ करत, साऊंड करत सुळसुळताना. रिये तुला हवे तर एक सळसळ करणारा प्राणी पण जागू कडुन पाठवितो. ती चांगली आहे, देईल एखदा. तिच्याकडे भरपुर आहेत. वाटल्यास जास्त पण देऊ शकेल ती.
पण नविन लग्न झालेले लोक
पण नविन लग्न झालेले लोक सापसुरळीचे वगैरे फोटोज काय काढतायत?>>> अगं, थोड्या दिवसांनी फरक ओळखा असे कोडे सोडवायची वेळं येत्ते ना सर्वच जोडप्यांवर तर म्हणुन तयारीत असेल.
जिप्सीभौ (दिवे घेणेचे करावे.)
आता मी सळसळते, सॉरी पळते इथुन.. :डोमा:..........बाय
मोनालिप...
मोनालिप...
दिनेशदा, कमाल आहे. मी अपलोड
दिनेशदा, कमाल आहे. मी अपलोड केलेला फ़ोटो पाहून, एक महत्वाचा प्रतिसाद तुम्ही द्याल अशी आशा होती. पण अरेरे! तुमचही लक्ष नाही
काय योगायोग आहे, मी पोस्टताना
काय योगायोग आहे, मी पोस्टताना बाजुलाच भानग्रहची जाहिरात आहे. त्यात त्याबाई / बाप्याच्या एका डोळ्यातुन एक पाल आरपार गेलेली दाखवलिये. नी तिची शेपटी नाकातुन बाहेर पडलीये.
Witness the mystery of Bhangarh Fort in the exclusive trailer of Bhaangarh - 5th Sept 14
रिया स्क्रिनशॉट पाठवु का गं बाई?
अजून मुंबईत पाऊस नाही
अजून मुंबईत पाऊस नाही ?
रायलिंग पठार पण फारच रुक्ष वाटतेय.
क्युट, स्मार्ट, गुळगुळीत,
क्युट, स्मार्ट, गुळगुळीत, मउशार कांतीची, तुरुतुरु धावणारी>>>>>>हसून हसून गडबडा लोळण
तोच फोटो (हार्ड कॉपी) रियाला कुरीअर करणार आहे. >>>>>>>>>>
माझ्या लेकाने घरातल्याच एका पालीच्या मागे लागून लागून तिचा एक मस्त (!) क्लोजप घेतलाय. त्या फोटोचं नाव आहे: ...... "लाफिंग लिझार्ड"
मी म्हटलं हा फोटो वॉटरमार्कशिवाय टाकू नको. खरंच इतका अप्रतीम आलाय. मलाही खूप किळस/भीती वाटते पालीची. तरीही फोटो म्हणून इतका अप्रतीम आलाय!
रिये वत्से हे वाचू नको हं प्लीजच!
उन्हाळ्यात बहाव्याचा पिवळा,
उन्हाळ्यात बहाव्याचा पिवळा, नीलमोहराचा निळा, गुलमोहराचा लाल रंग यासोबतच अजुन एक "पांढरा" रंग बहरत असतो. उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला कि याचाही बहर ओसरतो.
कशाचा तो सांगु शकाल?
मोगरा???
मोगरा???
मोगरा???>>>>नाही. फुल नाही
मोगरा???>>>>नाही. फुल नाही आहे.
Pages