एगलेस कोकोनट मफिन्स

Submitted by गायू on 8 June, 2014 - 02:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी मैदा
एक वाटी साय
पाव वाटी दूध (नारळाचे किंवा साधे)
एक वाटी (खवलेले) ओले खोबरे
दीड वाटी पिठीसाखर
अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर
चिमुटभर बेकिंग सोडा
४ चमचे लोणी/साजूक तूप
चवीनुसार व्हॅनीला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

गरज ही शोधाची जननी आहे हे आज अगदी मनोमन पटलं आणि केक यशस्वी झाल्यावर लगेच पाकृ लिहायला घेतली! मला एगलेस कोकोनट केक करायचा होता पण परफेक्ट रेसिपी कुठेच नव्हती! हि एक रेसिपी मिळाली http://www.maayboli.com/node/9493 पण अंडे नको म्हणून माबो वरच्या सर्व एगलेस आणि बटरलेस (केक साठी लागणारं तेवढं एकच साहित्य घरात नव्हतं) रेसिप्या शोधून मनाच्या काही अॅडीशन्स करून हा केक केला. आता क्रमवार पाकृ
नेहमीप्रमाणे मैदा,पिठीसाखर,बेपा,बेसो चाळून बाजूला ठेवले. एक वाटी साय हाताने फेटून घेतली (मिक्सर दुरुस्तीला गेला आणि मला आत्ताच केक करायचा होता नं) आणि का कोण जाणे अचानक लोणी घातलं!:अओ: हाताने मिक्स केलं पण शक्यच नव्हतं मग ते मिश्रण काचेच्या बोल मध्ये घालून मावेतून १ मिनिट फिरवून घेतलं. अश्यातऱ्हेने साय पण पातळ झाली आणि लोणी पण मिक्स झालं(हुश्श) मग खोबरं आणि इसेन्स घातला. मग मैदा आणि इतर घालून एकत्र केलं तर ते घट्ट वाटलं मग केक च्या बॅटर च्या कन्सीस्टन्सी ला योग्य एवढं दूध घातलं आणि मफीन मोल्ड्स ला तूप लावून त्यात मिश्रण घातलं.मावे १८० ला प्रीहिट केला होता त्यात २० मिनिटांवर बेक केलं आणि वॉव! तय्यार!
20140608_114757.jpg20140608_114717.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ६ मफिन्स झाले!
अधिक टिपा: 

माझ्या दृष्टीनेसगळ्यात महत्वाची टीप- आत्मविश्वास ठेवा! जरा उन्नीस बीस झाले तरी तुम्हाला येणार! नियमित स्वयपाक करत असाल तर नक्कीच येणार!आणि जरा स्वतःचं डोकं चालवलं कि पदार्थ हमखास होणार!

माहितीचा स्रोत: 
माबो,इंटरनेट आणि स्वतःचा मेंदू
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफव्हाईट/क्रिमी रंग आला होता,मोबाईलच्या कॅमेऱ्यातून काढल्याने तसा नाही आला फोटो. आणि केक ब्राऊन होण्याची वाट बघू नका.करपेल.

खोब्राकेक! व्वा! मुहुर्त कधी लागेल माहीत नाही, पण मला सुक्या खोबर्‍याचे गोड पदार्थ ( बिस्किटे वगैरे) खूप आवडतात. ओल्या खोबर्‍याचा केक पहिल्यान्दा बघीतला.

गायु मस्त दिसतायत मफिन्स.:स्मित: खोबर्‍याची नानकटाई पण मस्त लागेल बघ. कृतीबद्दल धन्यवाद.

धन्यवाद कामिनी८, प्रभा, रश्मी!
कामिनी ८, कुकरमध्ये पण करता येईल कदाचित. माबो वर एगलेस कॅरामेल केक ची रेसिपी शोधा!
प्रभा, नक्की करा आणि फोटो पण शेअर करा!
रश्मी- मी पण घाबरत होते,खोबरं करपेल ह्या भीतीने पण चांगला झाला..आणि हो, नानकटाई पण करून बघेन नक्की!