वेदनेत किती असावे नीर..?

Submitted by विज्ञानदासू on 17 May, 2014 - 06:00

वेदनेत किती असावे नीर..?
त्यातले किती डोळ्यामध्ये,
किती यावे ओठांवर...

गणिताचा ताळा याला नाही रे पुरेसा
कुणी घालावा हात काळजा,
तर मनाच्या उघडाव्यात वेसा..
वेदनेच्या व्यत्ययाला हसूचा गुणाकार...वेदनेत किती असावे नीर..?

ओसाडही नको ,नको फार गर्दीचा...
नको निष्ठूर श्रोता;तसा नसो फार दर्दीचा.
मैफीलीच्या तारणाला फार लागे धीर...वेदनेत किती असावे नीर..?

ह्र्दया या जाळताना जळले किती?
वाघुळ-घुबडात नसे द्वंद्व-नसे प्रिती
स्पंदनात हुंकाराने बघ ताणली शीर...वेदनेत किती असावे नीर..?

बासरी प्रिय कृष्णाला की राधेला..?
माझी हमी प्रेमाची बाकी कोण कोणाला?
मध्यरात्री यमुनेचाही सुनासुना तीर...वेदनेत किती असावे नीर..?

माझ्या कवितेला नाही चिंता माझीयाची
आयुष्याचा डाव पहाटे तर रात्र अवलीयांची...
मी सखा कवितेचा नाही रंक वा अमीर..! वेदनेत किती असावे नीर..?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users