निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चॉकलेटी रंगाची आवळ्याएवढी फळे असतात>>> मी नाही बॉ पाहिली / खाल्ली Sad
अन्जू फोटो टाक मग आईला सांगते मिळाली की घ्यायला.
सायली भर दुपारी हे असे फोटो टाकतेस. कुफेहेपा? Wink

नलिनी ..हा!!! जांभळं.......... मेरा वीक पॉइंट...
खूप वर्षात खाल्लीच नव्हती.. या सीझन मधे मात्र खाऊन घेतेय रोज.. आंब्यांपेक्षा मला जांभळं जास्त आवडतात.. Happy

दिनेश तू दिलेल्या लिंक मधे पुष्कळ आहे पाहायला.. वेळ लागेल..

धन्यवाद अन्जु...

शशाक जी... सहमत आहे तुमच्याशी....
आज नक्की पाहिन तार्‍यांची वृश्चिक रास...
नलिनी जांभुळं/ रान जांभुळं मस्तच...

वर्षू.. या चवी आपल्या मनावर लहानपणीच कोरल्या गेलेल्या आहेत. नुसती चवच नाही तर त्या बरोबर बालपण, शाळा, मित्र असे बरेच कायकाय आठवते. कपड्यावर पाडून घेतलेले डाग. जांभळ्या जिभा.. अन काय काय ! नवख्या माणसाला हि चव कदाचित आवडणारही नाही.
आता बहुतेक सर्व फळे गोड, आकर्षक रंगाची अशी घडवली जातात. पण आपल्या या फळांचा तुरटपणाच आपल्याला जास्त भावतो.

दिनेशदा, मी अगदी पहिल्यापासून पाहिलेली नाही. मध्येच कधीतरी सुरू केली. आणि सिरीज बरीच मोठी आहे. मी पाहिलेल्या भागात स्पेन, पोर्तुगल, इंग्लंड दाखवलं होतं. पण साधारण साचा असाच आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या लिंक मधले भागही त्याच सिरीजमधील असतील.

आता बहुतेक सर्व फळे गोड, आकर्षक रंगाची अशी घडवली जातात. पण आपल्या या फळांचा तुरटपणाच आपल्याला जास्त भावतो.>>> + अगदी खरय...

मला सगळ्यात जास्त पेरु आवडतात....:) Happy

मामी, बरेच भाग दिसताहेत. दुबईला सिडी मिळाली तर बघतो.

सायली, लहानपणी पिकलेला गोड पेरू कधी खाल्याचे आठवतच नाही. झाडावरचा जरा कुठे पोपटी झाक आलेला पेरू तोडायचा आणि मग तो चिमणीच्या दातांनी तोडून सगळ्यांनी वाटून खायचा.

फळेच काय पेरू, जांभळे आणि आंबा यांची कोवळी पाने पण अगदी आवडीने खायचो आम्ही.

दिनेशदा मी हेच लिहायला आले की मला तुरट पेरू फार आवडतात आणि कोकणात, मुद्दामून मी झाडावरून ती आकडी असलेली काठी असते ना (त्याला काहीतरी विशीष्ट नाव आहे) त्याने झाडावरचे तुरट पेरू काढून खायचे. साधारण शाळेत शिकत होते तेव्हाची गोष्ट.

अग मला नाव अजिबात आठवत नाहिये. पण माझा नवरा 'गडखी' म्हणतो. तुझं बरोबर असणार प्रज्ञा, थँक्यु.

हो गं प्रज्ञा मी आले,हौज यू?
>>>>>>>>>>>>>
ते गुलमोहोराचे झाड बघून माझ्या मनात म्हंटला तर क्रूर विचार आला... अशी जोरदार सर यावी आणि गुलमोहोराची फुले, कळ्या सर्व रस्त्यावर पडावे.. प्रत्येक सात जूनला भारतात मी हे अनुभवले आहे !>>>>>>>>>>>>>>
दिनेश....... आत्ता डीसीत चेरी ब्लॉसम पहायला गेलो होतो तर एका मोठ्ठ्या चेब्लॉच्या झाडाखाली मी असताना अश्शीच झुळुक आली आणि माझ्यावर चेब्लॉ चा गुलाबी वर्षाव ...खरं म्हणजे पाऊसच म्हणावा इतकी फुलं पडली. मस्त वाटलं.

नलिनी जांभळं मस्त.

सुप्र निगकर्स!
काल ५/६ महिन्यांनी बागेसाठी माळी आला होता. गेटकडेच्या कॉर्नरचं(खरं म्हणजे सगळ्या बागेचच) अगदी जंगलच झालं होतं. जासवंदी, जाई, तगर(हा तर वृक्षच झाला मी परतेपर्यन्त), कर्दळ या सगळ्यांचं मिळून.आम्ही नुस्तं जवळ जाण्याचा अवकाश एक शिंजिरांचा थवा भुर्र्कन त्या जंगलातून उडून गेला. पण हे शिंजीर फारच टायनी वाटले. अगदी अंगठ्याएवढे आणि हिरवटसर खाकी पोटाचे. मग माळ्याला म्हटलं .... बघ बाबा त्यांची कुठे घरटी अस्तील...........
पण खूप कटिंग करूनही घरटी नाही मिळाली.
आता पावसाळा प्रोजेक्ट्स .. हापूस आणि दशहरा अशी आंब्यांची २ रोपं ३/४ फुटी झाली आहेत. त्यांचं कलम.
आणि कुंड्यात रोपं लावायची. कोणती लावावीत?....
आणि खाली बागेत पुन्हा एकदा कारलं, दुधी, टोमॅटो, काकडी आणि दोडका लावायचाय. गेल्या वर्षीच्या बीया आहेत.
पण यातलं दुधी नाहीच आला. छोटी रोपं यायची आणि मरायची. या वेळी बघू. दुधी यावा असं काहीतरी केलं पाहिजे.

हा कोणता पक्षी असेल?

काल सकाळपासून ३ - ४ तास आमच्या घराजवळच्या जांभळाच्या झाडावर बसून होता .
आकाराने कावळ्या एवढाच होता आणि डोळे मैने सारखे पिवळसर नारिंगी होते .

नंतर त्याची आणि साध्या कावळ्यांची जोरात मारामारी झाली आणि तो उडून गेला.

Crow.JPGcrow1.JPG

फोटो चांगले नाही आले आहेत. :-/

मानुषी, तूमच्याकडच्या हवामानात अंजीरे चांगली येतील असे वाटतेय. लावली आहेत का ?
दुधीची पण एक नवीन जात आलीय.. राहुरी ला बियाणे मिळू शकेल. खरं तर तिथेच नवीन काय संशोधन चाललेय ते कळेल. मी चिकूची लागवड पण बघितलीय त्या भागात.

सुदुपार...
अशी मैत्रीण सगळ्यांना मीळो.....मी ऑफीस मधे यायच्या आधी, केबीन मधे वेगवेगळी फुलं सजवुन ठेवते...
आणि रोज मझ्या साठी गजरा पण आणते.....MOGRA.jpg

दिनेश दा, अन्जु मला पण पेरु कच्चाच आवडतो...

व्वा मनुषी, पावसाळी प्रोजे़क्ट छानच आहे.....

मी पण ऑफिसमध्ये मैत्रीणींना घरची अबोली आणून वाटून आनंद घेतेय सध्या. आता अनंत फुलला की मैत्रीणी तर वाटच पहात असतात.

मानुषी, भा़ज्यांच्या भावी लागवडीसाठी शुभेच्छा. बघु या आवंदा पीक पाणी कसं आहे ते.
सायली, जागू मजा आहे.
नीर, मला पण तो कोकिळच वाटला.

छान जागु... ज्यांच्या कडे भरपुर जागा आहे ते असा आंनद लुटु शकतात... आणि आमच्या सारखे ज्यांच्या कडे
बालकनीत बाग आहे, त्यांना असं कोणी आवडीनी आणुन दिलं की खुप आनंद होतो...

मनिमोहर.. Happy

निरज, मला पण तो कोकीळच वाटतोय....

काल उल्लेख केलेला हा फोटो. तेथील लहानग्याने हा "अळू" आहे असं सांगितल. झाडाची उंची साधारण ५ फूटापर्यंत असेल.

फळः
पाने

वर्षूदी, मलासुद्धा आंबा/फणसापेक्षा जांभळ आणि पिकलेली करवंद खूप आवडतात. Happy
नलिनी, जांभळाचा फोटो तोंपासु. Happy

होय निरज, मलासुद्धा कोकिळच वाटतोय. (का डोमकावळा आहे? :अओ:)

हॅलो जिप्सी,
हा अळू नसून 'गेळा' आहे. (Catunaregam spinosa). याची फुले उमलल्यावर पांढरी असतात आणि नंतर पिवळी होतात. फळाचा आकार गेळ्यासारखा (माठासारखा) असतो म्हणुन 'गेळा' असे नाव.
अधिक माहिती:
http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=articl...

जिप्स्या, अळूचं झाड फक्त ५ फुट नसतं. माझ्या आजोळी जे अळूचं झाड होतं ते अंदाजे २० फुटाचं असावं. आम्ही शिडीवरुन लाकूडफाटा साठवणीच्या खोल्यांच्या छपरावर चढून अळू काढत असू. त्याच्याही वर ५ फुट तरी ते झाड असेल.

अदीजो, गेळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. मी अळू आणि गेळा कधीच पाहिलेलं नाही, सो ओळखता नसते आले. Happy

जिप्स्या, अळूचं झाड फक्त ५ फुट नसतं. माझ्या आजोळी जे अळूचं झाड होतं ते अंदाजे २० फुटाचं असावं.>>>>अके, म्हणजे त्या लहानग्याने उल्लु बनवलं. Proud

अळूच झाड पळसाच्या झाडासारख मोठ असत. ह्याच्या छोट्या झाडांना पण अळू लागलेले पाहीले आहेत मी लहानपणी.

लहानपणी एकदा आई आणि मी आईच्या शाळेतील बाईंच्या (आई शिक्षिका आहे माझी आता रिटायर्ट झालेय) बहिनीच्या घरी रत्नागिरीला गेलो होतो. मांदीवली गाव होत बहुतेक. तिथून येताना घाटात बस बंद पडली होती. आम्ही जिथे बस बंद पडली तिथे आंब्याच्या झाडाला कैर्‍या लगडल्या होत्या. करवंद पिकलेली भरपूर करवंदाची जाळी होती. आम्ही डब्यात काळी काळी आणि गोड करवंद गोळा केली होती. त्या बाईंच्या मुलांनी कैर्‍या पाडल्या होत्या. तितक्यात त्या बाईंना कच्चे अळू झाडावर दिसले. ते हाताने काढता येण्यासारखेच होते. तिथून आम्ही बाईंच्या भावाच्या घरी रहायला गेलो. तिथे बाईंनी ते अळू मिठ लावून अंबोशी प्रमाणे वाळवले. ते आम्ही नुसते खाल्ले त्याच्या आठवणीने अजुन तोपासु होते. एक विशिष्ट स्वाद असतो त्या अळूला.

त्यानंतर ३-४ वर्षापुर्वी मी मिस्टरांच्या मित्राकडे नेर्‍याला एका फार्महाऊसवर गेले होते तिथे हे अळू मला पळसाएवढ्या उंच झाडावर लागलेले दिसले. तेंव्हाचे फोटो गायब झालेत.

वटपौर्णिमेला हे अळू बाजारात येतात बघ जिप्स्या. साधारण चिकुसारखे दिसतात. माझ्याकडे फोटो आहे पण शोधावा लागेल. वटपौर्णिमेला पानात भरून जे वाण देतात त्यात हा अळू देण्याची प्रथा आहे. पिकलेला अळूही छान लागतो. पण बाजारात येतात ते निट कच्चे नसतात नी निट पिकलेले नसतात. त्या दिवसासाठी मारुनमुकटून चॉकलेटी रंगात आणलेले असतात.

जागू बरोबर बोल्लात. जांभळे, करवंदांपेक्षा मला अळू खूपच आवडतात. शाळेच्या सुट्टीत गावी गेल्यावर आजी धनगरणीला हमखास माझ्यासाठी अळू आणायला सांगायची. किती वर्ष झालीत अळू खाल्ले नाहीत, पण त्याची ती वेगळीच चव अजुनही जिभेवर रेंगाळतेय. खरच काय त्या आठवणी... गेले यार ते दिन गेले...

बादवे, जागू मीही नवी मुंबईला (कोपरखैरणे) राहते. मला ह्या साईटला अळू मिळू शकतील का???

snehanil vatpaurnimecha don divas aadhi pasun market madhe laksh thev. tevha yetat vikayala.

Pages