अमेरिकेतील (Boston javal)१ महिना वास्तव्यात आपले आपण हिंडू-फिरु शकू अश्या जागा कोणत्या?

Submitted by मेधावि on 27 May, 2014 - 22:14

मी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहे. बोस्टनच्या जवळ नातेवाईकांचे घर आहे. तिथे गेल्यावर तिथे फिरण्यासाठी अमेरिकेतील नातेवाईक आहेत परंतु ते फक्त विकांतालाच बरोबर येउ शकतील. अमेरिकेतील १ महिन्याच्या वास्तव्यात विकांताख्रेरिजच्या दिवसांत मी व माझी २० वर्षाची मुलगी आपले आपण हिंडू-फिरु शकू अश्या जागा कोणत्या आहेत त्याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एअर ईंडियाच्या मुंबई नुवर्क नॉनस्टॉप फ्लाईटला जी खरंतर अहमदाबादवरून मुंबईला येते भरपूर गुज्जू मंडळी असतात आणि ते हे ठेपले/बिपले लोणची वगैरे डब्बे भरभरून कॅरी ऑन लगेजमध्ये घेऊन येतात आणि प्रवासाच्या सुरूवातीलाच दिल्या जाणार्‍या पहिल्या डिनर बरोबर ते डब्बे ऊघडले जातात. त्यांच्या पदार्थांचा तो टिपिकल वास पूर्ण १५-१६ तास विमानात भरून राहतो आणि जीव नको नकोसा करून टाकतो. एअर ईंडियाच्या सीट्सनाही तसलाच वास येतो. ह्या प्रकरणामुळेच मला ठेपले/बिपले लोणची वगैरे पदार्थांचा प्रचंड नॉशिया आला आहे.

माझा प्रतिसाद थोडा टोकाचा वाटेल पण

जेनुं त्रास तेनुं थाय, बीजा मजामां थेपला खाय Proud

चमन, विमानात उघडून खाल्ल तर वास येणारच. फॉइलमध्ये गुंडाळून ती गुंडाळी झिपलॉकमध्ये घालून आणल्यास तसा वास येत नाही. आपल्या बॅगला सुद्धा लागत नाही वास.

रच्याकने, तू विमानातल्या सीट्सचा वास घेणं बंद कर त्रास कमी होइल Proud

फ्रँकफर्ट विमानतळावर फ्री WiFi आहे. रेस्टॉरंटस बरेच आहेत. जनरली पिझ्झा प्लेसेस मधे तुम्हाला मार्गारिटा (चीज) आणी व्हेजि पिझ्झा मिळेलच.

मोबाइलचा भारतातला नेट पॅक तिथं रोमिंग नसेल तर चालणार नाही. रोमिंग चार्जेस साठी तुमच्या मोबाइल सेवा कंपनीला विचारा. माझ्या माहितीप्रमाणे युरोपात तरी रोमिंग खूप महाग आहे (८०+ रूपये प्रती मिनीट)

विमानतळांवर कम्प्युटर्सचा अ‍ॅक्सेस असतो. फक्त खुशाली कळवायची असेल तर इमेल करून कळवता येते. मी तेच करते.
फाउंटनचे पाणी पिण्यात काहीही हरकत नाहीये. उडते पाणी पिणे ही कसरत असते जरा. पण मला मजा येते.
टूर्स गोटूबसच्या चांगल्या असतात. फक्त चायनिज लोकं बडबड्बड व प्रत्येक वाक्याला हां... इत्यादी करून वैताग आणू शकतात. पण अदरवाइज चांगले आहे प्रकरण.

ठेपले वगैरे ठेवा बरोबर. हॉल्टला खाता येईल. विमानतळावर वेळ फार मस्त जातो. लोकं, विमानं इत्यादी बघत बसायचे.
ज्या गेटला नेक्स्ट कनेक्टिंग फ्लाईट येणार आहे तिथे जाऊन बसा आधीच. बर्याचदा अंतरे जास्त असतात. तसेच स्क्रिनवर तुमच्या फ्लाइटबद्दलचे अपडेट्स बघत राहा. मी भारतातून परत येताना गेट्नंबर अचानक बदलला होता व माझ्या आधीच्यागेट्पाशी दुबईची फ्लाईट भरायला लागले होती. मग चौकशी, धावपळ इत्यादी. यात घाबरवायचा हेतू नाही, परंतो असे होऊ शकते कधीकधी.

शक्य झाल्यास जवळ फार जास्त सामान ठेऊ नका. ( अर्थात केबिन बॅगमध्ये एकतरी एक्स्ट्रा कपड्यांचा व आवश्यक बाबींचा सेट ठेवा- बॅगा इनकेस उशीरा आल्या तर) पण अवजड सामान घेऊन प्रवास करणे अगदी तापदायक होते.

पोचल्यावर काही मदत लागल्यास मी फोनवरून करू शकेन. तसेच लॉस एंजलिसला येणार असलात तर माझ्याकडेच उतरा. Happy सगळी अ‍ॅट्रॅक्शन्स विदिन १-२ माईल्सवर आहेत माझ्या घरापासून.

चमन, विमानात उघडून खाल्ल तर वास येणारच. फॉइलमध्ये गुंडाळून ती गुंडाळी झिपलॉकमध्ये घालून आणल्यास तसा वास येत नाही. आपल्या बॅगला सुद्धा लागत नाही वास. >> एअर ईंडियाच्या मुंबई नुवर्क नॉनस्टॉप फ्लाईट मधे चमन लोकांच्या ठेपल्यांना फॉईल लावत मधे मधे सीट्चा वास घेत फिरतोय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले Lol

तू विमानातल्या सीट्सचा वास घेणं बंद कर त्रास कमी होइल >> Lol

सुमेधा तुम्ही बॉस्टनमधे कुठेशा आहात नक्कि ? north ,south ?

चमन, विमानात उघडून खाल्ल तर वास येणारच. फॉइलमध्ये गुंडाळून ती गुंडाळी झिपलॉकमध्ये घालून आणल्यास तसा वास येत नाही. आपल्या बॅगला सुद्धा लागत नाही वास. >> हो ते मलाही माहित आहे Happy मी नाही नेत कधीच ठेपले वगैरे! मी बाकी प्रवाश्यांबद्दल बोलत होतो.

रच्याकने, तू विमानातल्या सीट्सचा वास घेणं बंद कर त्रास कमी होइल >> होहो!! मी योगा प्रॅक्टीस करतो आहे नुवर्क ते मुंबई श्वास रोखून विमान प्रवास Lol

वॉशिंग्टन डीसी बघायला येणार असाल तर माझ्याकडेच नक्की या. मी डीसीच्या अगदी जवळ रहाते. तुम्हाला संपर्कातून नंबर कळवते.

khuup changali mahiti milali sagalyankadun. dhanyavaad sagalyanna....pravasalaa ajun 2 mahine ahet pan achank thode dadapan ale hote mhanun vicharale. sagalyannich agadi chan mahiti dili aahe. Mabo jay ho.

एक मजेशीर अनुभव सांगते. माझ्या पासपोर्टवर गिव्हन नेम असे आहे तिथे माझे फर्स्ट नेम व लगेच समोर नवर्‍याचे फर्स्ट नेम आहे व दुसर्‍या ओळीवर सरनेमच्या इथे आमचे आडनाव आहे.
विसा इंटरव्ह्युला गेले असताना जो फॉर्म भरलेला असतो तिथे मी पहिले नाव सुमेधा आणि सरनेमच्या जागी आडनाव लिहिले होते. म्हणजे माझ्या नावाच्या बरोबर नवर्‍याचे नाव नव्हते तर त्यांनी मला माझे नाव चुकले आहे असे सांगून लाईनीबाहेर काढले. आता मुंबईची फारशी माहीती नाही. ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बरेच आत आहे व तिथे फार काही दुकाने वगैरे नव्हती. आता ते कंन्फर्मेशन पेज चे पहिले पान कसे आणि कुठे दुरुस्त करून आणायचे? मग शोधाशोध केली असता अगदीच शेजारच्या एका चिंचोळ्या गल्लीतून आत गेल्यावर एक कोपर्‍यातल्या अंधार्‍या खोपच्यात एक अगदीच फाटकासा दिसणारा मुलगा एक लॅपटॉप व एक प्रिंटर घेऊन बसतो व अक्षरशः ५ मिनिटात डी १६० फॉर्म भरून, व आवश्यक त्या दुरुस्त्या करून, प्रिंट काढून देतो. व ७व्या मिनिटाला तुम्ही परत रांगेत उभे. २०० रु. घेतो तो त्याचे. परंतु त्या वेळी ही सोय व तो माणूस देवदुतासारखा भासला.

सुमेधाव्ही, आम्हाला सेम अनुभव आला होता! पण आम्हाला अतिशय बकाल भागातील एका सायबर कॅफेमध्ये पाठवले. सगळं वातावरण इतकं गलिच्छ होते तिथे.. :रागः

pravasalaa ajun 2 mahine ahet <<< छे.. सांगितलेली माहिती फुकट गेली... ::फिदी:

आम्हाला दोघींनाही विमानात बसायची फार जास्त भिती वाटते. विमान लागते सुद्धा फार. जमिनीला पाय टेकेपर्यंत अस्वस्थ वाटते. ह्या खेपेचे विमान लहान आहे त्यामुळे जास्त भिती वाटेल बहुतेक. २४ तास प्रवास करायचाय आता. खूप दडपण आले आहे. विमानात्/गाडीत कुठेही प्रवास करताना व्हर्टीन नावाची गोळी घ्यावी लागते. २४ तासाच्या प्रवासासाठी ह्या गोळ्या रीपिट करतात का? (हे डॉ. ला विचारणार आहेच पण अनुभवाचे बोलही ऐकायलेले बरेच) ह्या झोपेच्या गोळ्यांनी आणि त्यात जेट लॅग ने नेमके दुसरे विमान पकडायच्य वेळेस झोप तर नाही ना लागणार ह्याची भिती वाटून आत्ताच खरी खरी झोप उडालीये.

अरे गुड. आसपासच्या लोकांना हळूच सांगून ठेवा मला कधी कधी विमान लागते. त्यांना सीट वरून हुसकवण्याचा राजमार्ग आहे की तुमच्याकडे. मग मस्त पैकी आडवे व्हा आणि उतरताना त्या व्यक्तीला सॉरी/धन्यावाद काय आठवेल ते द्या.
तुम्ही युरोप मधून येणारात सो फार काही छोट नसेल विमान. डोमेस्टिक एक हॉप असेल तर मग अगदी छोटं असू शकेल.
त्या गोळ्यांचा काही अनुभव नाही, आधीच इतकी जास्त झोप येते की सुंदरी खायला घेऊन येईल आणि मी मिसेन (खाणं) या भीतीने झोप उडवायचा प्रयत्न करतो मी. टर्मिनल वर इकडे तिकडे टिवल्या-बावल्या, विमानं बघण, दुकानात चक्कर मध्ये वेळ जातो, तुमची आताच झोप उडालेय सो फिकीर नॉट. आणि लागलीच झोप तर गेटेजवळ झोपा, आणि आपल्या नावाची अनौंसमेंट मोबाईल वर रेकोर्ड करायचं भाग्य मिळावा. फेस्बुकात लगेच टाकायला मट्रीयल. Light 1

सुमेधाव्ही, मी केलाय २४ तास प्रवास. ३ फ्लाइट्स चेंज करता करता झोप गेली उडून Happy मात्र डेस्टीनेशनच्या शेवटच्या फ्लाईटमध्ये मात्र खूप झोप आली.
तुमच्या pre-conditions (गोळ्या, विमान लागणे ई.) हवाईसुंदर्‍यांना सांगून ठेवा. तुमच्या airlines ला/agent ला फोन करून सल्ला मागता येइल. काळजी करू नका. क्रु आवश्यक ती काळजी घेतात. तरी तुम्हाला doubts असतील तर airlines कडे inflight/flight change करतांना assistance मिळत असेल तर घ्या. बेस्ट लक!

ट्रीटमेंट चालू असलेली आयुर्वेदीक औषधे नेता येतात का अमेरिकेला? कुठल्या बॅगेत भरायची?

हे वै.म. आहे, यावरून तुमच्या सारासार बुद्धीला जागून निर्णय घ्या.
आयुर्वेदिक औषधांचे प्रिस्क्रिप्शन मिळणे शक्य असेल आणि औषध pack बंद शक्य असेल तर ते न्या. चूर्ण टाईप असेल तरी फार्मसी pack मिळणे शक्य असेल तर बघा. त्यात कुठलाही अंमली पदार्थ नाही याची सुद्धा खात्री करून घ्या. (नसेलच पण मी आयुर्वेदिक वापरत नाही म्हणून लिहितोय) XYZची पावडर, प्रोसेस्ड फूड/ किंवा औषधं आहेत सांगा.
जे काही न्याल ते चेक-इनच करा, विमानात बरोबर नकोच. उतरताना फॉर्म मध्ये बिया/ झाडे/ प्राणी इ. प्रश्न असतात. त्यामुळे त्याला नाही म्हणायाला हरकत नाही. bag उघडायला नेलं तर नेणारी व्यक्ती चेक करेल आणि नंतर बंद करेल त्याने विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे द्या. त्याला समान उघडायला अजिबात मदत करू नका. थोड्या दूर अंतरावर उभे रहा. मुळात तुम्ही कुठलाही गुन्हा करत नाहीयात हे मनाशी पक्क ठेवा आणि शांतपणे उत्तरे द्या. त्याने काही शंका घेतलीच तर तो चेक करेल. फार पुढे जातस वाटलं तर मी चव बघू शकते इ. सांगा. अन्यथा फेकून द्या म्हणून सांगा.

शेवटी: फळं, बिया न्यायला बंदी नाही, फक्त सांगून सवरून न्या. मी डिक्लेअर करून आंबे अनेक वेळा आणले आहेत. कोणी उघडून सुद्धा पहिले नाहीत. एकदा डिक्लेअर केलं न्हवत आणि पोलिसाने सामान चेक केलं त्यात काहीच न्हवत पण अगदी निघताना आत्याने खजूर दिलेले ते वर टाकलेले. ते दिसले त्याला, विचारलं तर म्हंटलं खजूर आहेत, तर म्हणाला यात सीड आहेत. हसून माफी मागितली तर ठीके म्हणाला.
आणि टेन्शन येणार असेल आणि त्याविना राहणे शक्य असेल तर न आणणे श्रेयस्कर.

असामी.... तुम्ही एकदम 'उघडले स्वर्गाचे दार' श्टाईल सल्ला दिलेला आहे...

लोक येताना 'घरामागच्या मंडईत मिळणार्‍या शेवग्याच्या शेंगा', 'आमच्या गल्लीत असलेल्या किराणा दुकानात मिळणारे गव्हाचे पीठ', 'गोव्याच्या समुद्रातून पकडून वाळवलेला सुका बांगडा', 'शाळेच्या समोर मिळणारी चिंच-बोरे', शेजार्‍यांच्या झाडाला लागलेले आणि न सांगता काढून आणलेले पेरू', 'घरच्या दुधवाल्याने आणलेले चिकाचे दुध', 'घरी भाजून तयार केलेला अमुक/तमुक मसाला' अस पदार्थ भेटवस्तू म्हणून घेऊन येतात मग....

(मला यातले काही पदार्थ आलेले आहेत म्हणून सांगतो...)

Light 1 (हे विनोद म्हणुन लिहीलेले आहे)...

गो गा अहो सल्ला अमितने दिलाय, मी अनुमोदन दिलय फक्त Wink (फळे नाही आणली त्यामूळे त्याबद्दल माहित नाही हे राहिलेच)

अमितव, तुम्ही कॅनडात असता ना? तिथले कस्टमचे नियम/कायदे अमेरिकेपेक्षा वेगळे आहेत. तुमच्या पोस्टमधे तुम्ही कोणत्या देशातल्या नियमांविषयी बोलताय ते लिहीणार का?

कारण अमेरिकेत फळे आणायला बंदी आहे. पर्सला फळांचा वास होता तरी एअर पोर्टवर कुत्रे मागावर आल्याचा स्वानुभव आहे.

असाम्या<<<< 'बॉस्टनमधे बहुतेक वेळा अजिबात बघत नाही हा माझा अनुभव आहे' << Happy
Light 1

पर्सला फळांचा वास होता तरी एअर पोर्टवर कुत्रे मागावर आल्याचा <<< हे माझ्या बर्‍याच मित्रांबरोबर झाले आहे...

या सगळ्या गोष्टी तिथे असलेल्या ऑफिसरच्या मर्जीप्रमाणे असतात.... (माझा अनुभव).

रच्याकने: बायको परत येत होती भारतातून. नेहमी घरी येणारा एक मराठी मुलगा कस्टम ड्युटीवर होता ( तो कस्टम मधे लागलाय हेच माहित नव्हते).. 'योगिनीमावशी तुला तिकडून जावं लागेल ' (फॉर्म बघून म्हणाला).. आणि मग दुसर्‍या ऑफिसरला सांगतो.... 'She is my aunt, makes awesome food man' Happy

फळे, जीरे, बिया, झाडे, मांस हे आणले आहे का असे यावेळी अमेरिकेत येताना विचारले गेले.
मेंदी झाडापासुनच बनलेली असते असे मागीलवेळी ऐकवले गेले पण पॅकबंद पावडर होती म्हणुन आणु दिली.
औषधे पण पॅकबंद असावीत व डाँ.च्या लेटरपॅडवर त्याबद्दल माहिती लिहिलेला कागद ठेवणे. 'अबक ह्यांना या आजारासाठी हे औषध आहे'. साधारण अशा स्वरुपात आम्ही पत्र लिहुन घेतो. औषधे चेकइन मधे ठेवणे, बाटल्यात असेल तर फुटु नयेत म्हणुन फारच नीट पॅक करावे लागेल हे सांगणे न लगे. Happy

अहो गोगा फळे आणली नसल्यामूळे माहित नाही पण औषधांबाबत अजिबात विचारलेले नाही असे सांगत होतो. newark मधे मात्र हुंगणारे कुत्रे बघितले होते. आमचे सुके उघडावे लागएल कि काय अशी भिती वाटली होती पण तशी वेळ आली नाही.

Pages