Submitted by profspd on 27 May, 2014 - 03:56
कोठून शेत सांगा देणार शेतसारा?
नाही गुरांस सुद्धा देण्यास आज चारा!
आहे जमीनजुमला पण, मी तसा भिकारी.......
माझ्याकडे न कुठला अद्याप सातबारा!
पायात भिंगरी या आहेच बांधलेली.........
मी जन्मजात वारा जो शोधतो निवारा!
आहे भिडस्त मी अन् दुर्बल जरा मुखाने......
चुपचाप सोसतो मी दररोज कोंडमारा!
शिष्यांस मी कधीही रागे भरीत नाही........
प्रेमामधून आला हा दबदबा, दरारा!
येतोच वास भपकन....दारू अखेर दारू!
प्यालो म्हणीत नाही केव्हाच रे, पिणारा!!
मी का उगाच येथे झंकारतो कळेना........
सारे इथे गवय्ये कोणी न ऐकणारा!
नाराज कोणत्याही लाटेवरी न मी रे.......
बुडलो अरे, जिथे मी होता तिथे किनारा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे शेर आवडले
सगळे शेर आवडले
धन्यवाद
धन्यवाद
पायात भिंगरी या आहेच
पायात भिंगरी या आहेच बांधलेली.........
मी जन्मजात वारा जो शोधतो निवारा!
मी का उगाच येथे झंकारतो कळेना........
सारे इथे गवय्ये कोणी न ऐकणारा!
नाराज कोणत्याही लाटेवरी न मी रे.......
बुडलो अरे, जिथे मी होता तिथे किनारा!
अप्रतिम शेर.
धन्यवाद
धन्यवाद
मुटेंची दाद आणि प्राचार्यांचे
मुटेंची दाद आणि प्राचार्यांचे धन्यवाद! दुधात साखर!
आणि बेफिकिरांची निष्णात
आणि बेफिकिरांची निष्णात उपस्थिती म्हणजे दुग्धशर्करा योग!