Submitted by सुशांत खुरसाले on 26 May, 2014 - 03:11
घोषीत झाली माणसे निवडक तुझ्या ह्रदयातली
ठरलो न मी त्यांच्यासवे धकधक तुझ्या ह्रदयातली
दिसतील ही अंधारली दुःखे तुलाही कैकदा
तू एकदा विझवून बघ झकपक तुझ्या ह्रदयातली
या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?
मी अर्ज केला एकदा,अव्हेरला तू कैकदा
पडताळणी भलतीच गं,जाचक तुझ्या ह्रदयातली
येथून मी माझ्या घरी वद परतुनी जाऊ कसा..
आहे तरी सृष्टी किती भेदक तुझ्या ह्रदयातली?
कृत्रीमतेला शिंपडोनी गझल जर श्रुंगारली
मग ओळ कैसी व्हायची सार्थक तुझ्या ह्रदयातली
--सुशांत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेबु वर वाचलेले बहुतेक
फेबु वर वाचलेले बहुतेक
पुन्हा आवडली
झकपक जास्त आवडला (खालची ओळ जास्त )
प्राध्यापक साहेब बहुधा ही
प्राध्यापक साहेब बहुधा ही जमीन ढापतील असे वाटते
धन्यवाद वैवकु ... मकस वर
धन्यवाद वैवकु ...
मकस वर टाकली होती काही दिवसांपूर्वी .
प्राध्यापक साहेब बहुधा ही जमीन ढापतील असे
वाटते<< बघुया ..:हाहा:
एक दोन ठिकाणी वृत्त बदलत आहे.
एक दोन ठिकाणी वृत्त बदलत आहे. 'गं' मध्ये आणि कृत्रिमतेला हय शब्दांमध्ये!
चेहर्याला असे लिहायला हवे आहे. किरकोळ टायपो!
अव्हेरले ह्या शब्दाचा उच्चार काही ठिकाणी अव्व्हेरले असा तर काही ठिकाणी अव्हेरले असा केला जातो.
या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?<<< शेर फार आवडला
प्राध्यापक साहेब बहुधा ही जमीन ढापतील असे
वाटते<<<
जमीन आवडली पण मी ढापणार नाही
जमीन आवडली पण मी ढापणार नाही
कसेल त्याची जमीन!
कसेल त्याची जमीन!
छान गझल.
छान गझल.
घोषीत झाली माणसे निवडक तुझ्या
घोषीत झाली माणसे निवडक तुझ्या ह्रदयातली
ठरलो न मी त्यांच्यासवे धकधक तुझ्या ह्रदयातली
दिसतील ही अंधारली दुःखे तुलाही कैकदा
तू एकदा विझवून बघ झकपक तुझ्या ह्रदयातली
या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?
क्या बात है..........
छान गझल सुशांत, जरा हटके
छान गझल सुशांत, जरा हटके कवाफी आणि रदीफ आहेत ना .. मस्तच
आवडली
आवडली
या निर्विकारी चेहर्याच्या आत
या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?
छान शेर....
छान गझल. दिसतील ही अंधारली
छान गझल.
दिसतील ही अंधारली दु:खे तुलाही कैकदा ..
खास सुशांत टच.तिरकस , पण खोचक नाही.
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार .:)
बेफिजी , 'गं' जनरली दिर्घ पकडतात ना ? म्हणजे तसं ऐकलं होतं. त्यामुळे तसं लिहिलं गेलं .
'कृत्रीमतेला' असा बदल करतो आहे .धन्यवाद .