शिवा-एक संक्षिप्त कथा

Submitted by विज्ञानदासू on 28 May, 2014 - 08:39

(काळ साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीचा.)

खरं तर शिव्या चिडलेला.रंगपंचमी होती,कॉलनीतली मुलं रंग खेळत होती.तेवढ्यातच शिव्या उपटला.त्यानं घराला लावायचा निळसर रंग्,माती मिसळलेला आणला होता.एकदम रानट्यासारखा अंगावर येऊन तो रंग त्याने कित्येकांना लावला.ज्यांना ज्यांना लावला त्यातल्या कुणाला खरवडलं गेलं.कुणाच्या नाका-तोंडात जाऊन आग होऊ लागली.पोरं खवळली.सगळ्यांनी मिळून त्याला उचललं आणि बुड्वलं पाण्याच्या हौदात,उलटं. कुणीतरी मोठ्या माणसाने ते पाहीलं आणि त्याला सोडवला.बाहेर काढून बसतं केलं.तेव्हा झालेला अपमान सहन न होऊन तो शिव्या देऊ लागला. पराकोटीच्या अर्वाच्य कन्नड हेलीतल्या शिव्यांची अखंड बरसात. त्याचवेळी त्याच्या नाकातून शेंबूडपण वहात होता आणि तो उग्र वाटण्याऐवजी जास्तच विनोदी दिसत होता.

जरा वेळ सगळ्यांनी ऐकून घेतलं.आता मात्र विन्या कुलकर्णी वैतागला.ढुंगणावर,चड्डीला लागलेली माती झटकत तो उठला.

"ब्लडी सन ऑप बी****....अॅस ****.. मद....कारे साल्या कळतात कां इंग्रजी शिव्या?" कुलकर्णीने असं म्हणताच शिव्यानं भोकाड पसरलं.बांधकामावरचा बांबू घेऊन तो दिसेल त्याच्या मागं लागला.
"ए शिव्या काळ्या...ये शेंबड्या..."
" ए चड्डीफाट्या..ए इकडं ...ए हे बघ..."
"शिव्या इकडं ये ना"

असा गलका चाललेला.त्याला अजूनच डिवचलं जात होतं.शिव्याच्या पाठीमागे जाऊन अकीवाट्यांच्या सुशांतने त्याची पँट पकडली आणि उचलून,धुणं फिरवावा तसा दोनदा फिरवला आणि सोडून दिला.वाळूत जाऊन पडल्याने त्याच्या नाका-तोंडात वाळू गेली.तसा तो तिथेच तोंड खुपसून मुसमुसू लागला.

हमसून रडताना ऐकून त्याची अव्वा म्हणजे आई झोपडीतून बाहेर आली.तिला बघताच कॉलनीतली पोरं धूम्म. अव्वा अस्सल कन्नड बाई.काळ्याकुळकुळीत चमकदार चेहर्यावर्,तेवढ्याच उन्मत्तपणे चमचमणारी नाकातली चमकी.तोंडाचा दीर्घ पट्टा.जशी ५० मिमि ची स्टेनगन.गोळ्या आणि शब्दांचा फरक सोडता,एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं.

शिव्या बांधकामावरच्या वॉचमनचा मुलगा.त्याला अखंड कॉलनी शिव्या किंवा शिवा संबोधायची.शक्यतो शिव्याच.झोपडी चटईची.विंचवाचं बिर्‍हाड.जिथं नवीन काम तिथे मुक्काम.काम संपलं,बांधकाम संपलं की नवीन शोधा.पण कॉलनीतल्या जवळपास सगळ्या घरांची कामं शिव्याच्या बापानेच केलेली.तो त्याला अण्णा म्हणायचा आणि आख्खी कॉलनीही.

शिव्या कानांत कडबोळ्याच्या आकाराची बाळी घालायचा.चोरीची होती काय कोण जाणे?जोतो तेच बोलायचा. अशावेळी लोकं बरोब्बर संशयाने पाहणार होते.शिव्याची लायकीच होती ना चोरी करायची,असं सगळ्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं आणि शिव्याच्या जागी तत्सम कोणीही असता तरी या लोकांनी तेच म्हटलं असतं.नंतर कळलं की ती पितळेची तार होती.तिला त्याने गारगोटीचा मणी कोरून ओवला होता.हे कळलं ते तिच्या वरचा मुलामा जाऊन आतलं तांबं उघडं पडलं तेव्हा.तिला तो बराच जपायचा.त्याच्या त्या भणंगपणात तेवढाच एक अलंकार आणि 'शिवा' नाव असूनही तेव्हढी एकच विलासी वृत्तीची खूण.

"मि बी असाच बंगला बांधणार बग...सोडतो का काय...?"

असं तो बोलला की समजायचं त्याने 'घेतलीये'.मोठी पोरं महेश्,पूर्णव,अकीवाटेला तो कधी-कधी रेल्वेपूलाखाली गांजा ओढताना दिसायचा.या बाबतीत मात्र तो खरच शंकरोबाचा गण होता.

"शिव्या लेका थुका आवर.नायतर वाळू टाकीन तोंडात!"हरप्पा त्याला म्हणायचा.हे हरप्पाचं त्याच्यासाठी नेहमीचं वाक्य आणि शिव्याचं हे नेहमीचं वागणं.हा हरप्पा म्हणजे त्याचा वडील.त्याच्या ओठांच्या दोन्ही कोपर्‍यात थूंकी साठायची.बांधकामाची लाकडं वरखाली नेताना तो शिडीवरून लडबडायचा. तसं झालं आणि लाकडं पडली की आण्णा त्याला लाथ घालायचा. पण बोलणार काय? बापाच्याच बाटलीला तोंड लावणारा,म्हणून हरप्पा पण गप्प बसे.

"तेरा-चौदा वय असेल रे त्याचं..."
सम्यानं बोली टाकली.सगळ्यांनी दुजोरा दिला.रंगपंचमीच्या दिवशी बैठक बसलेली.दाणीगौडाच्या वाळूत.

"ही वाळू नाय काय.वाळवंट ए आख्खं.."

इती पर्शा गोंधळी.मुंबईहून बाबांची बदली झाल्याने आलेला.दाणीगौड इन्स्पेक्टर होता.वरपैसा बक्कळ असणार्‍या त्यानं टोलेजंग बांधकाम केलं.चार डॉबरमन भोवती सोडून आरामात आत राहायला आलेला.तीन एनफील्ड. किरमि़जी,राखाडी आणि काळी.

"हप्ता किती घेत असेल रे?" केशाने विचारलं.
"केशा,तुझ्या महिन्याला मिळणार्‍या पॉकेट्मनीवर चार-पाच पूज्य ठेव.केशाने मनात हिशोब केला आणि गप्प बसला.

दाणीगौडाने आणलेली वाळू म्हणजे यांची भेटण्याची ठरलेली जागा.तीनएक गूंठ्याच्या प्लॉटवरती पडलेली ती वाळू.तिथं हे चर्चासत्र रोज संध्याकाळी भरायचं.

"पण काय शिव्याला लागलं का रे काल?"
"वाटत तर नाय.नाटकी साला...रोज येतो मला खेळायला घ्या म्हणतो.आणि भोकाड काढतो...हरप्पामुळं आपण घेतो यार त्याला..त्याचा बाप एवढा चांगला म्हणूनच रे..."
"त्याला कालच टाकीत बुडवलेला.काय मेला-बिला नसता.जरा गटांगळ्या लावल्या असत्या खायला...आणि काढला असता आ...रा...मा...त...तेवढ्या अभ्याच्या वडलांनी काढलं...सुट्यो.."

सगळी बडबड चालू असतानाच...त्यांना शिव्या येताना दिसला.

"शेंबडा आला बघ.कुलकर्णी कुठे रे? काल काय भडकला होता...बाकी शिव्याची फाटलेली बाबा...इंग्रजी ऐकून."
केशा म्हणाला.
शिव्या जवळ आला पण तसाच चालत रेल्वे ट्रॅककडे निघाला.अजून गूर्मीत होता ते त्याच्या चालीवरून जाणवत होतं.मध्येच पत्र्याचा एक प्लास्टीकचा डब्बा त्याने लाथेनं उडवला आणि तसाच उडवत उडवत चाललेला.

"शिव्या डबड्यात पाणी भरून घे मग जा की...झाल्यावर काय शर्टाला पुसणार कारे,गां**? कुणीतर म्हटलं आणि आख्खी वाळू हसण्यानं विस्कटली.शिव्यानं परत शिव्यांची फैर झाडली आणि सरळ पुढे गेला.गांजाची तलफ त्याला काट्यामध्ये घेऊन गेली.तिकडे तो काय करणार सगळ्यांना ठाऊक झालं होतं.

एक दिवस शनिवारी देसाईंचा प्रवीण शाळेतून लवकर घरी आला होता.शाळेला दांडकं मारलेलं, निम्म्यातून.तो आणि त्याची आई घरी होते.आईचा मार खाऊन रुसुन तो दारात बसला होता.तेवढ्यात्,भर उन्हात शिव्याचा आवाज आदळला.

" काय परविन..?घरी का?"शिव्या दात विचकत डुलत म्हणाला.
"शिवप्पा काय म्हणतोस?" जरा संशय आल्याने त्याने अदबीने शिवप्पा वगैरे म्हटलं.पण परिणाम उलटाच झाला.

शिव्याला वाटलं तो मुद्दामच तसा म्ह्णतोय.त्याने एका हातात प्रव्याची कॉलर पकडली आणि दुसर्‍या हाताने त्याच्या तोंडाजवळ हातातली वाटी नेली,जी प्रविणला आत्तापर्यंत दिसली नव्हती.त्याला उग्र भपका आला आणि तिरमिरीने प्रव्या ओरडला.

"कारे घे ना थोडी..अरे घे...प्रव्या मस्ती चढलं काय?" शिव्या विचकट हसत होता. दोघांच्या दंग्याने देसाईकाकू बाहेर आल्या.तर त्याच्या पोराला शिव्या दारू पाजायचा यत्न करत होता.तसं काकूंनी शिव्याला ढकललं.

"चल शिवाप्पा,चालता हो घाणेरड्या..." प्रव्याने त्याला जोर लावून बाहेर ढकललं.तसा शिव्या झोकांडी जात मातीत पडला.वाटी पलीकडे घरंगळली.
संध्याकाळी वाळूवर कंपनीला त्याने सांगीतलं तसं केशा आणि विन्याच्या घरी येऊन दंगा केल्याचं त्यांनी सांगितलं.
"जाऊ द्या रे कुठं लागता नादी..येड्चॅप ए तो...!"एकानं असं म्हटल्यावर बाकीचे शांत बसले.

महिन्याभरात परीक्षा झाल्या.त्या काळात शिवा प्रकरणांचा निचरा झाला.सुट्टी लागली तशी मैदानावर कॉलनी फूटबॉल खेळताना दिसू लागली.कुणी पोहायचे क्लासेस लावले.कुणी शिबीरात नावं नोंदवली.पण वाळूवरची बैठक संध्याकाळी निर्विघ्न चालू होती.

त्यादिवशी शिव्यानं एक नवीन खेळणं बनवलेलं.एक लांब बांबू.त्याला क्रॉससारखा आडवा छोटा बांबू.ते हँडल.विरूद्ध बाजूला एक सळी आणि तिला विशिष्ट आकार देऊन केलेली चा़कं.चाकांना तारा जोडून केलेलेल ब्रेक आणि त्यांचं नियंत्रण समोरच्या हॅड्लला.आडव्या बांबूचं हँडल धरून गाडी पळवत न्यायची.तोंडाने घुईईईई...घुईईईई....असा आवाज काढायचा.दुसर्‍या दिवशी दोन पोरांनी तशीच गाडी त्याच्याकडून बनवून घेतली. आठवड्याच्या आत "शिवा बाईक" कॉलनीत प्रसिध्दीला आली.पोरांनीही त्यांच्या त्यांच्या गाड्या सजवल्या.कुणी सायकलची घंटी जोडली.कुणी खेळण्यातली टर्र्र्रर्र..टर्र्र्रर्र..आवाज करणारी बंदूक हँड्लला जोडली...कुणी देवघरातली घंटा.कुणी काय आणि काय्?पूर्ण सुट्टी ही गाडी कॉलनीतल्या रस्त्यांवरून धावत होती.काय मामूली गोष्ट होती?

एक दिवस अकिवाटेनं बातमी आणली.
"अरे गँग,माहीत्ये का? बाबा सांगत होते...शिवाप्पा आणि हराप्पाबद्द्ल...कसली शॉलीड बातमी आहे यार..."
"अक्या ओक ना लवकर...सत्यनारायणाची पूजा सांगून झाली असती एवढ्यात" जोशांचा मिहीर वदला.
"अरे डाफरतोस कशाला?...सांगतो...अरे बाबा सांगत होते शिवा लग्न करतोय म्हणे.वय वर्षे पंधरा."
एवढं सांगेपर्यंत सगळी वाळू हस्यस्फोट होऊन हादरली.लोट्पोट होऊन पोरं हसत होती.
"अरे काय बातमी सांगीतली यार...मला वाटलं शिव्या गचकला की काय....ह्याS ह्याS ह्याSS...की गांजा पिऊन गेला ढगात यार.." करमरकरला जीभ वाटेल तशी सोडायची सवयच होती,पण तो खरं बोलला होता.

पुढे एक-दीड महीना उलटला.शिव्या,हरप्पा,अव्वा ती जागा सोडून तिथेच कॉलनीमध्ये दुसर्‍या बांधकामावर गेले. तिकडे नवं शेड बांधलं.पण तिघांच्या सोबत एक नवीन व्यक्तीसुद्धा सोबत दिसून लागली.एक तेरा-चौदा वयाची पोर.बहुदा शिव्याची बायको.दोन दिवसात शिक्कामोर्तब झालं.ती शिवाची बायकोच होती.सावळ्या वर्णाची.हनुवटीवर तिकोनी ठिपक्यात गोंदवलेलं.नाकात चमकी.गुलाबी चोळीत.साडी नेसे.कुंकवाची आडवी चिरी.हातात चुडा...

"बालविवाह नाही कां रे?" एकजण म्हटला.
"तुला कशाला काय करायचंय...?"केशा वदला.
"रात्री पाहीलं पाहीजे यार..शिव्या काय हात-बीत लावतो की नाय? की नुसता ढोसून पडतो"मोठी पोरं टाळ्या देऊन हसली.

पाच सहा महीन्यात शिव्याच्या छोट्याशा बायकोचं पोट दिसू लागलं.एवढूशी पोर.पोटूशी.

त्यानंतर जरा काळ लोटला असेल.

गँग वाळूवर जमली होती.कुणी बोलत नव्हतं.सारे चिडीचूप.शांतता तोडत विन्या कुलकर्णी म्हणाला," वाईट्च झालं नै?...बाबा म्हणाले की तिला दवाखान्यात नेलेलं.कमी वय...प्रिमॅच्यूअर मूल झालं...पण सिव्हील हॉस्पिटलं आपली...इन्फेक्शन झालं तिथे...नाही वाचले दोघेही..."

नंतर बरेच दिवस सन्नाटा होता.खेळ व्हायचे पण एक प्रकारची शांतता होती.मग शिव्या थोडे दिवस दिसला.बहुदा झोकांंड्या खात जायचा...मग पुन्हा कधी दिसलाच नाही.हरप्पा कामं करायचा,व्यवस्थित.पण तेही खोपटं ते बांधकाम इतकच.मग एक दिवस तेही काम संपलं.ते गेले कर्नाटकात कुठे गांव होतं त्यांचं.

केशानं हरप्पाला एकदा विचारलं होतं."शिवप्पा?"म्हणून.तेव्हा हरप्पानं तो गावी गेल्याचं सांगीतलेलं.

जाता जाता राहीलं तरी काय होतं?त्यांचं रिकामं खोपटं.तेही बंगल्याचा मालक काढणार होता लवकरच. शिवाप्पाच्या आठवणी,त्याची कोवळी बायको,दारु आणि गांजाचा आठववास्,शिव्याच्या कन्नडहेली शिव्या.. आणि ती खोपटाच्या वळचणीखाली पडलेला 'शिवा बाईक'चा उरला-सुरला सांगाडा.

वर एक वाक्य,'मी बी असाच एक बंगला बांधणार!सोडतो का काय?'

शेवटी शिवा होता तो,पितळेची मोडकी बाळीही जपणारा.

(सत्यपात्रांवरून प्रेरीत.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

गंधा,विचारवंत,वेल्,इंद्रधनु,रविकान्त...खूप आभारी आहे... Happy

वाचक माझ्या लिखाणात बदल सुचवू शकतात.स्वागत असेल.
ध.
-----------------------------------------
Read every reading by removing your prejudices or disappointments occurs suddenly at the end.

हे विचारवंतांसाठी होतं.

विज्ञानदास, कुठलेही prejudices घेऊन मी हे वाचन केलेले नाही. कथा नेहमी वाचतो तसेच हे वाचले. ती मला बोअर वाटली व त्यातून काहीही घेण्यासारखे दिसले नाही असे प्रांजळ मत नोंदवले.

इथे हल्ली फार बोकाळले आहे. कलाकृती आवडली नाही तर वाचकांची अक्कल काढण्यापासून तो पूर्वग्रहदूषित असल्याचे आरोप करण्याच्या थराला गोष्टी जातात. तस्मात्, आपल्याला माझे हे मत न आवडून आपण माझ्यावर prejudices ठेऊन वाचण्याचा आरोप केल्याने यापुढे मात्र आपले लेखन न वाचण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्याला सहन झालेलं दिसत नाही माझं म्हणणं...
आणि वाचकांची अक्कल काढण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नसतो.तसे असते तर मी म्हटलेच नसते वरती,की लिखाणात काय चूक होतेय ते सांगा.तसेच मी कोणताही डुआय नाहीए हे ध्यानात घ्या.त्यामुळे उगाच समज नकोत.तेवढं सामंजस्य आहे माझ्याकडे.

विचारवंत आपण याआधीही अशाच अवांतर (इतर ठिकाणी)गोष्टी केलेल्या आहेत.हा प्रतिसाद वाचून जर आपण परत देणार नाहीत याची खात्री आहे.नाहीतरी तुम्हीच तसे कबूलही केले आहे. मला वाद घालायचा नाहिये.

विपु बघा रुपाली.

>>विचारवंत आपण याआधीही अशाच अवांतर गोष्टी केलेल्या आहेत.>>
माझा प्रतिसाद अवांतर कसा काय? लेखन बोअर आहे असे म्हणजे अवांतर कसे काय? वाट्टेल ते फालतू बोलता का?

>>हा प्रतिसाद वाचून जर आपण परत प्रतिसाद देणार नाहीत याची खात्री आहे.नाहीतरी तुम्हीच तसे कबूलही केले आहे.>>

मी यापुढे आपले लेखन वाचणार नाही असे म्हटले आहे. इथे तुमच्या बालीश बडबडीला उत्तर देणार नाही असे कबूल केलेले नाही Proud

>>तसेच मी कोणताही डुआय नाहीए हे ध्यानात घ्या साहेब.>>
मी असे काही न म्हणताच आपण हे स्वतःहून बोलत आहात यातच सारे आले Wink

गेट वेल सून.

विचारवंत यांच्याशी सहमत. विज्ञानदास बी अ स्पोर्ट. लर्न टू टेक क्रिटिसिझम ऑन युवर रायटींग कन्स्ट्रक्टिव्हली.

मी असे काही न म्हणताच आपण हे स्वतःहून बोलत आहात यातच सारे आले
>>>
विचारवंत Lol

बारा वर्षाच्या बायका नी चौदा वर्षांच्या आया खरंच कर्नाटकात तेही आमच्या नॉर्थ कर्नाटकात फार कॉमन आहे.
माझ्या घरात अश्या दोन बायका रहातात.
पैकी एकीचं वय आत्ता २६-२७ वर्षे आहे.
तिचा दहा वर्षांचा मुलगा असाच कुठेतरी परागंदा आणि मुलगी आता आमच्याबरोबर आहे.

हॉस्पिटलात १६-१७ वर्षांच्या मुली डिलीवरीकरिता येणे अगदी कॉमन.
कागदोपत्री वय १९ वर्षे!

सातीताई मला हेच तर सांगायचंय...
तो मुलगा शिकू शकला नाही-का?-शिकला असता की. त्याच्या त्या बाईकचं उदाहरण. आमच्या़कडे सोर्सेस आहेत म्हणून आम्ही शिकतो.त्या मुलांचं काय?ते फक्त शिव्या देण्याचे विषय?
तो झोपडीत राहणारा म्हणून ती बाळी चोरीची?-त्याने ती स्वतः तयार केली होती.
ती मुलगी एवढी लहान होती,लग्नाचं वय होतं का ते? -तरी झालं लग्न.
त्या सिव्हिल हॉस्पीटलात असणार्‍या स्वच्छतेच्या अभावाने संसर्ग होणे-
आजही सांगली-मिरजेच्या सिव्हिल हॉ. जाऊन पहायला हवं.एवढं प्रसिद्ध मेडीकल कॉलेज पण दवाखान्यांची अवस्था काय आहे ते?
आणि ही पात्र खरी आहेत.असं खरं घडलं आहे आणि दुर्दैवाने असे अजूनही घडते आहे.

जरा कमी 'चटपटीत' लिहीलं गेलंय खरं.तिच चूक झाली.

साती,

>> बारा वर्षाच्या बायका नी चौदा वर्षांच्या आया खरंच कर्नाटकात तेही आमच्या नॉर्थ कर्नाटकात फार कॉमन आहे.

बारा वर्षाच्या बायका नाही, पण सोळा वर्षाखालच्या आया इथे इंग्लंडमध्ये खूप आहेत.

आ.न.,
-गा.पै.

गापै, हो वाचलं आहे याबद्दल.
पण बायका होऊन आया होणं आणि बायका न होता आया होणं यात फार मोठा फरक आहे.
तो सांगत बसायची ही जागा नाही म्हणून असो.

साती,

>> बायका होऊन आया होणं आणि बायका न होता आया होणं यात फार मोठा फरक आहे.

तेही खरंच! Sad

आ.न.,
-गा.पै.

ह्या लेखाला कथा म्हणावं का नाही ह्या विचारात आहे. कथा/व्यक्तीचित्रण असं अजब मिश्रण आहे असं माझं मत.
कथेत खरतर काय सांगायचय ते कळलं नाही. कदाचित अगदिच संदिग्धं झालय अथव मलाच कळलं नाही.
एक गोष्टं मात्रं नक्कि...
आवडलं नाही तर एका विशिष्टं पद्धतीने सांगण्याची किंवा काय चुकलय आणी कसं सुधारता येईल इत्यादी सह प्रतिसाद देण्याची अपेक्षा...
पुढल्यावेळी वाचल्यावर प्रतिसाद देताना फार विचार करावा लागेल असं दिसतय.

आवडलंच...
कुठे तरी आतल्या कोपर्‍यात, थोड्या फार प्रमाणात का होइना प्र. ना. संतांची आणि पर्यायाने लंपनच्या विश्वाची आठवण करून गेलं. अजून लिहा..

पुलेशु Happy

ह्या लेखाला कथा म्हणावं का नाही ह्या विचारात आहे. कथा/व्यक्तीचित्रण असं अजब मिश्रण आहे असं माझं मत.<<<

याचीच वाट बघत होतो.असे अभ्यासू वाचक असतील आणखी उत्साह येतो.आपल्या सारखीच मनस्थिती झाली होती.व्यक्तीचित्रण किंवा कथा....मग व्यक्तीचित्रणापेक्षा कथास्वरूप देऊ म्हटलं.अदरवाईज,ते वैयक्तीक विचार मांडल्यासारखं झालं असतं म्हणून कथास्वरूप. मध्ये थोडे मुद्दे झटकन आल्यासारखे वाटतायत.त्यांना थोडे सहज करण्याची काळजी पुढल्या लेखनात घेईनच.

विकु,तुम्ही जी नावे घेताय ती लेखक विश्वातील प्रचंड गतीची नावे आहेत.तुमचा हा प्रतिसाद माझ्यासाठी संग्राह्य असेल.

दोघांचेही शतशः आभार.
ध.

मला साहितिक चिरफाड करता येत नाही, त्यामुळे नेमकं काय म्हणावं कळत नाही आहे. पण एक मात्र नक्की की या कथेवरुन शिवाची व्यक्तीरेखा डोळ्यापुढे आली.

पुलेशु.

छान व्यक्तिरेखा साकारली आहे , असच कधीतरी वेगळ लिहाव आपल्या नाण्याच्या दुसर्या बाजू पण दाखवाव्या.

एखादी अमानवीय कथा पण लिहून टाका आता !
शेवट फक्त विज्ञानाने करू नका !
Happy

कठिन तर नाही ना? Wink

धन्यवाद!
शेवट फक्त विज्ञानाने करू नका !<<< जशी इच्छा..पण सुरूवात विज्ञानाने केली तर चालेल असे गृहीत धरतो... Wink
बाकी एखाद्याने अमानविय किस्सा लिहीला की मी त्याचा इचका करून टाकतो असे आपल्याला म्हणायचे आहे दिसते.. Biggrin
नक्कीच एखाद्या कथेचा मी विचार करेन... आभार! :स्मितः

दादशी सहमत
नक्की काय सांगायच आहे ते कळल नाही
एकाच वेळी व्यक्तिचित्रण , ललित कथा अश्या पातळीवर गेलेल वाटल
थोडक्यात सांगायचे तर कथाबीज उत्तम असून मांडणी मात्र गंडली आहे

असो
पुढील लेखनाला शुभेच्छा !

किस्सा लिहीला की मी त्याचा इचका करून टाकतो असे
आपल्याला म्हणायचे आहे दिसते..>>>>>>

अजिबात नाही , पण तुमची लेखन शैली छान आहे , म्हणून म्हटल या विज्ञाना च्या ब्राह्मणाला अमानवीय बिर्याणी बनवायला सांगावी !
Wink

@जाई
बरोबर्,प्रयत्न करेन्,मराठी साहीत्य वैज्ञानिक लिहिण्यापेक्षा अवघड नक्की..
आभारी आहे. Happy

@ब्रो,
धन्यवाद...
म्हणून म्हटल या विज्ञाना च्या ब्राह्मणाला <<<माणुस हो मी माणूस फक्त...

बाकी बिर्याणीप्रकार तुमच्या वाक्यात आवडला... Happy आजचा रविवार सार्थकी लागणार असे दिसते... काल वर्‍हाडी चिकन वाचलं आणि आ़ज बिर्याणी... भलताच योगायोग नाही का? synchronicity वगैरे की काय?? Wink Happy

Pages