एक डेरेदार होतो झाड मी!

Submitted by profspd on 19 May, 2014 - 10:18

एक डेरेदार होतो झाड मी!
छाटले मजलाच येता आड मी!!

सांगती मातीतली माझी मुळे.....
बहर आहे आत, ना ओसाड मी!

माझिया सोशीकतेने वाटले.....
दम नसे माझ्यात, आहे भ्याड मी!

मी जरी साठीस आहे टेकलो.....
आतुनी अद्याप मुलगा द्वाड मी!

वेदनांनो शांत झोपा ना अता.....
केवढे केलेत तुमचे लाड मी!

का पळापळ शायरांची जाहली?
वाटलो साक्षात त्यांना धाड मी!

ज्ञान, वय, अधिकारही ना मोजती....
वाटलो नाही कुणाला चाड मी!

या करंट्यांच्या कपाळावर अठ्या....
काय गझलांचेच वाटे बाड मी?

गझल लिहिताना समाधी लागते....
पाहणा-याला दिसे मुर्दाड मी!

लाभले घरपोच आमंत्राण मला....
अन् उडालो त्याक्षणी तिनताड मी!

सोसवेना एकटेपण हे मला....
गझलक्षेत्रातील झालो ताड मी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जरी साठीस आहे टेकलो.....
आतुनी अद्याप मुलगा द्वाड मी!

अगदी.

सोसवेना एकटेपण हे मला....
गझलक्षेत्रातील झालो ताड मी!

भावना पोहोचल्या. आपले अनुभवातून आलेले शेर छान असतात.

माझिया सोशिकतेने वाटले.....
दम नसे माझ्यात, आहे भ्याड मी!<<< सोशीकतेने, असे करायला हवे आहे.

अभिणंदण प्रोफेश्वर,
जमिण,रदीफ,कवाफी शेमच,पण खयाळ तुमचेच आहेत.

शुष्क वठलेले बिचारे झाड मी
बहरल्या रानामधे ओसाड मी

दु:ख दुनियेला कसे समजायचे
लपविलेले पापण्यांच्या आड मी

सांग दहशतवाद संपावा कसा?
वृत्त वाचुन हळहळे तो भ्याड मी

आवरत आहे गुपित ओठांवरी
लोक म्हणती सभ्य .....आहे द्वाड मी

ना कुणी आंजारले,गोंजारले
पुरवितो हल्ली स्वतःचे लाड मी

आज तोंडातून बरसाव्या शिव्या
का? कितिंदा बाळगावी चाड मी

कचकड्याच्या मोहमय दुनियेमधे
टाकतो माझ्या मनावर धाड मी

रक्त सळसळते पुन्हा थंडावते
भावना शाबूत पण मुर्दाड मी

दाखवू आश्चर्य अजुनी केवढे
लाखदा उडलोय की तिनताड मी

काव्य ''कचरा'' मानते दुनिया तिथे
खपविण्या आलो गझलचे बाड मी

मी न गालिब्,भट्,इलाही,रणपिसे
फालतू ''कैलास गायकवाड'' मी

--डॉ.कैलास गायकवाड

हायला सहा जमीनी झाल्या की आत्तापर्यंत?

सगळ्यांनी आपापल्या जमीनींचे सातबारा जपून ठेवा रे! एक गुंठामंत्री बेभानपणे स्वतःच्या नावाच्या पाट्या ठोकत चाललाय प्रत्येक एकरावर!

सगळ्यांनी आपापल्या जमीनींचे सातबारा जपून ठेवा रे! एक गुंठामंत्री बेभानपणे स्वतःच्या नावाच्या पाट्या ठोकत चाललाय प्रत्येक एकरावर!<<<<<<<<<<<<

इतकेच म्हणावेसे वाटते ................

आहे जमीनजुमला पण, मी तसा भिकारी.......
माझ्याकडे न कुठला अद्याप सातबारा!

......................प्रा.सतीश देवपूरकर