लाल झुंबर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

परवाची वसंत पंचमी पार पडली आणि मला परत गुलाबी स्वप्नं पडू लागली. खरे तर हि मालिका एवढ्यात संपवायची नव्हतीच. अजुन बरीच फ़ुलांची आणि झाडांची ओळख करुन द्यायची आहे.

laal_zumbar.jpg

वरच्या फोटोतली फ़ुले बघितलीत ? गर्द गुलाबी रंगाच्या या गुच्छाचे मराठीत नाव आहे लाल झुंबर.
पण असे मराठमोळे नाव असले तरी झाड मात्र अजिबात मराठमोळे नाही. हे आलेय आपल्याकडे जमैकामधून. Brownea coccinea असे याचे शास्त्रीय नाव. याची फ़ुलेच नव्हे तर पानेदेखील, अतिशय तलम पोताची आणि ओल्या हिरव्या रंगाची असतात. अगदी कोवळी पाने इतकी तलम असतात कि ती पारदर्षक आहेत कि काय असेच वाटत राहते. तसे याला स्कारलेट फ़्लेम बीन असेही नाव आहे. हा साधारणपणे गियाना, त्रिनिनाद, टोबॅगो, ब्राज़िल या देशात नैसर्गिकरित्या वाढतो. मॉरिशियस, सेशल्स आणि झाइरे सारख्या देशात मुद्दाम लावली आहेत याची झाडे. याला लांबट शेंगाही लागतात.
झाडाची वाढ अगदी मंद असते. याचे बाकि काही उपयोग मला आढळले नाहीत.

फ़ुलांचे सौंदर्य बघता आहातच. याचे सौंदर्य आहे ते रंगात आणि संख्येतही. हा गुच्छ सहज दहा ते पंधरा सेमी व्यासाचा. हि फ़ुले झाडावर असतानादेखील पर्णसंभार शाबूत असतो. त्यामुळे या दोन रंगाचे एकत्र असणे, ड्ल्यांचे पारणे फ़ेडते.

पण असे हे देखणे झाड मुंबईत मात्र माझा बघण्यात एकमेव आहे आणि तेही राणीच्या बागेतच.

विषय: 
प्रकार: 

मला चटकन जास्वंदच वाटले, पण असे बाहेर पराग येत नाहीत. ( माझ्याकडे एक जास्वंदिचे झाड होते त्याला एक फुलातच ५-६ फुले असायची.)

वरिल फुल मात्र खुप सुन्दर आहे. अगदी मखमली वाटतेय. (एकदा एक किडा पाहिलेला त्याचे नावच मखमली किडा, वरील फुलातील मधला गोल भाग आहे ना तो सेम त्या किड्यासारखा आहे, आकार आणि रंग दोन्हीहि एकदम जुळतात.)

याला बहर कधी येतो? राणीबागेत जाऊन पाहता येईल मग..

मला वाटले तुमची झाडे संपली. नशिब परत सुरु केलीत मालिका. (आंबोलीच्या बीबीला कृपया भेट द्या)

साधना

साधना,
साधारण दोन महिन्यापुर्वी या झाडाला असा बहर आला होता. मध्यंतरी एकदम तपमान वाढले होते ना त्या काळात, पण मला वाटतय कि आता परत मार्चमधे बहर येईल. या विदेशी झाडांचे काहि सांगता येत नाही.

साधारण डाळिंबाचे फूल दिसते ना, तसे आणि तेवढे हे फुल होते.
मखमली किडा पण पावसाळ्याची आधी दिसतो आपल्याकडे.

झाडे अजुन बरिच आहेत, मधे मनाजोगते नेट कनेक्शन नव्हते म्हणुन.