जाता जाता घरासमोरी जरा थबकले वादळ!

Submitted by profspd on 13 May, 2014 - 07:35

जाता जाता घरासमोरी जरा थबकले वादळ!
उभार माझा बघून वेडे किती दचकले वादळ!!

त्याची-माझी अशीच पडते गाठ नेहमी सहजी........
कसा बसा गाठला किनारा, तोच धडकले वादळ!

मी म्हटले की, क्षमा करी मज, प्रियाच माझी आली.......
आवर धर तू जरा म्हणालो, तोच सरकले वादळ!

वादळ होतो मी गझलांचे अहोरात्र भिरभिरते.........
माझ्या संगे नव्या पिढीचे खुद्द थिरकले वादळ!

मी असल्याने वळसे घालत त्याला जावे लागे........
मला पाहता वाटेमध्ये, किती भडकले वादळ!

मला वादळी वा-यांचा त्या सराव झाला इतका........
किती लीलया क्षणात मी ते काल झटकले वादळ!

श्वासांमध्ये श्वास मिसळले, प्रणय शिगेला गेला........
अशा गुलाबी मिठीत अलगद चक्क अडकले वादळ!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सर चक्क अडकले वादळ वा
सगळेच शेर शैलीदार सगळेच आवडले धडकले भडकले झटकले आणि मतला वाह
सरकले चा शेर मला जरा समजला नाही त्यातली शब्दांची माडणी मला समजली नाही जरा जास्तच झिगझॅग झाली असे वाटते

धन्यवाद

मी म्हटले की, क्षमा करी मज, प्रियाच माझी आली.......
आवर धर तू जरा म्हणालो, तोच सरकले वादळ!

धन्यवाद वैभवा!

वरील शेराचा गद्य अर्थ असा लिहिता यावा
वादळाला मी म्हटले की क्षमा कर(excuse me)
माझी प्रिया येत आहे,(तिला त्रास नको व्हायला तुझा....हे अव्यक्त आहे), तेव्हा थोडा आवर धर म्हणजे बेतात रहा, थोडी कळ काढ, ती इथे असोस्तोवर! असे म्हणतो ना म्हणतो तोच वादळ बाजूला झाले म्हणजेच बाजूस सरकले व प्रियेची वाट मोकळी करून दिली! तसे सरकणे म्हणजे जवळ येणे किंवा दूर जाणे दोन्हीही सरकणेच!
इथे सरकणे काफिया हा शेराचा कीवर्ड आहे!
सरकणे यात जरासे/जरावेळ बाजूला होणे हा अर्थ अभिव्यक्त होतो जो शेराची मौज वाढवतो!
तोच शब्द पण महत्वाचा जो हे सुचवतो की, माझे म्हणणे माझ्या प्रियेसाठी वादळाने लगेच ऐकले!

प्रोफेसर साहेब,

तुमच्या ह्या 'सरकले'(ल्या) शेरावरून (कृपया हलके घ्या) हे गाणे आठवले.

फुलोंसी नाजुक है वो
मोटरमे बैठी है जो
जरा आहिस्ता आहिस्ता चल
उसको न तकलीफ हो

क्या बात है भूषणराव! सरकल्याचा श्लेष भावला व पोचला!
इथे बूड सरकणे/सरकवणे हा भाव मनात सरकून गेला होता

प्रोफेसर >> आमच्या सर्व सामान्य माणसांच्या भाषेत अजुन एक गोष्ट सरकते ते म्हणजे माणसाचे डोके. तसे झाले की मग त्या माणसाचे काही सांगता येत नाही.

टोचा...

Biggrin