Submitted by profspd on 13 May, 2014 - 07:35
जाता जाता घरासमोरी जरा थबकले वादळ!
उभार माझा बघून वेडे किती दचकले वादळ!!
त्याची-माझी अशीच पडते गाठ नेहमी सहजी........
कसा बसा गाठला किनारा, तोच धडकले वादळ!
मी म्हटले की, क्षमा करी मज, प्रियाच माझी आली.......
आवर धर तू जरा म्हणालो, तोच सरकले वादळ!
वादळ होतो मी गझलांचे अहोरात्र भिरभिरते.........
माझ्या संगे नव्या पिढीचे खुद्द थिरकले वादळ!
मी असल्याने वळसे घालत त्याला जावे लागे........
मला पाहता वाटेमध्ये, किती भडकले वादळ!
मला वादळी वा-यांचा त्या सराव झाला इतका........
किती लीलया क्षणात मी ते काल झटकले वादळ!
श्वासांमध्ये श्वास मिसळले, प्रणय शिगेला गेला........
अशा गुलाबी मिठीत अलगद चक्क अडकले वादळ!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्वासांमध्ये श्वास मिसळले,
श्वासांमध्ये श्वास मिसळले, प्रणय शिगेला गेला........
अशा गुलाबी मिठीत अलगद चक्क अडकले वादळ!<<< वा वा
सुंदरच
सुंदरच
धन्यवाद!
धन्यवाद!
वा सर चक्क अडकले वादळ
वा सर चक्क अडकले वादळ वा
सगळेच शेर शैलीदार सगळेच आवडले धडकले भडकले झटकले आणि मतला वाह
सरकले चा शेर मला जरा समजला नाही त्यातली शब्दांची माडणी मला समजली नाही जरा जास्तच झिगझॅग झाली असे वाटते
धन्यवाद
मी म्हटले की, क्षमा करी मज,
मी म्हटले की, क्षमा करी मज, प्रियाच माझी आली.......
आवर धर तू जरा म्हणालो, तोच सरकले वादळ!
धन्यवाद वैभवा!
वरील शेराचा गद्य अर्थ असा लिहिता यावा
वादळाला मी म्हटले की क्षमा कर(excuse me)
माझी प्रिया येत आहे,(तिला त्रास नको व्हायला तुझा....हे अव्यक्त आहे), तेव्हा थोडा आवर धर म्हणजे बेतात रहा, थोडी कळ काढ, ती इथे असोस्तोवर! असे म्हणतो ना म्हणतो तोच वादळ बाजूला झाले म्हणजेच बाजूस सरकले व प्रियेची वाट मोकळी करून दिली! तसे सरकणे म्हणजे जवळ येणे किंवा दूर जाणे दोन्हीही सरकणेच!
इथे सरकणे काफिया हा शेराचा कीवर्ड आहे!
सरकणे यात जरासे/जरावेळ बाजूला होणे हा अर्थ अभिव्यक्त होतो जो शेराची मौज वाढवतो!
तोच शब्द पण महत्वाचा जो हे सुचवतो की, माझे म्हणणे माझ्या प्रियेसाठी वादळाने लगेच ऐकले!
प्रोफेसर साहेब, तुमच्या ह्या
प्रोफेसर साहेब,
तुमच्या ह्या 'सरकले'(ल्या) शेरावरून (कृपया हलके घ्या) हे गाणे आठवले.
फुलोंसी नाजुक है वो
मोटरमे बैठी है जो
जरा आहिस्ता आहिस्ता चल
उसको न तकलीफ हो
क्या बात है भूषणराव!
क्या बात है भूषणराव! सरकल्याचा श्लेष भावला व पोचला!
इथे बूड सरकणे/सरकवणे हा भाव मनात सरकून गेला होता
वा सर छानच धन्यवाद सर ,
वा सर छानच
धन्यवाद सर ,
सर, धडकले आणि अडकले सर्वात
सर, धडकले आणि अडकले सर्वात जास्त आवडले
धन्यवाद सर
धन्य्वाद जयदीप, वैभवा!
धन्य्वाद जयदीप, वैभवा!
वैभवा 'सरकले' चा शेर पोचला
वैभवा 'सरकले' चा शेर पोचला का?
येस सर !!
येस सर !!
गुड!
गुड!
प्रोफेसर >> आमच्या सर्व
प्रोफेसर >> आमच्या सर्व सामान्य माणसांच्या भाषेत अजुन एक गोष्ट सरकते ते म्हणजे माणसाचे डोके. तसे झाले की मग त्या माणसाचे काही सांगता येत नाही.
म्हणून तर सरकण्याचा शेर
म्हणून तर सरकण्याचा शेर संबोधले!
टोचा...
टोचा...
आपल्या मनातला अर्थ देखिल वरील
आपल्या मनातला अर्थ देखिल वरील शेरात आहे! ज्याची जशी अभिरुची तसा अर्थ त्याने घ्यावा ही तजवीज शेरात आहे!
शेवट्चा खास!
शेवट्चा खास!
धन्यवाद
धन्यवाद