उच्च रक्तदाब - लक्षणे आणि घरगुती उपाय

Submitted by nikitasurve on 22 April, 2014 - 02:26

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.
या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे.

१) तीन ग्रॅम मेथीदाणा. पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे.

२) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

३) टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.

४) जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.

५) उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

६) 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.

७) गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज सकाळी उपाशीपोटी चार पाकळ्या लसूण नियमितपणे खाल्ल्यास बॅड कॉलेस्ट्रॉल व ट्राय्ग्लिसरॉइड्स चे प्रमाण वाढत नाही ,असे ऐकले आहे...>>>>व लगेच दात घासावे अन्यथा इतरजनांचे बीपी वाढेल असे पण ना?

बीपी सिनेमा पहावा असे नाही का कुठे उपचारांत?

(अर्ध्या पेप्सिकोलाने गारेगार पडलेला आइडी) .
लसणीच्या पाकळ्या तुपात तळतात आणि नंतर दह्याच्या पाण्यात भिजवून खातात .किती परिणामकारक आहे माहित नाही .

निकिता सुर्वे:
तुमच्या धाग्यावर आगावपणा केल्याबद्दल सॉरी.
पण एक विचार करुन बघा कि

<<<<<औषधे बंद करून हे घरगुती उपाय करावे असे माझे म्हणणे नाही.... औषध्दांबरोबर तुम्ही हेही उपाय करावे एवढेच सांगणे होते. त्याने कोणते नुकसान तर नाहीच होणार पण फायदे मात्र नकीच होतील......तरीसुद्धा ज्यांना हे पटले नाही त्यांनी माफ करावे हा छोटासा प्रयन्न होता जनजागृतीसाठी.>>>> या हेतुमधील वाक्यांनीच किती गोंधळ होतो ते. औषधे बंद करुन हे उपाय करावे असे तुमचे म्हणणे नाही. मग औषधे सुरु असताना या उपायांची गरज काय? समजा या उपायांनी पण फरक पडत असेल (असे समजुया) तर औषधाबरोबर हे उपायही करणे म्हणजे औषधाचा डब्बल डोस घेतल्यासारखा नाही का?,म्हणुन तुमचा नुकसान तर होणार नाही पण फायदे मात्र नक्किच होतील हे वाक्य सपसेल चुकिचे आहे. ते नेमके 'फायदे मात्र नक्किच होणार नाहीत नुकसान मात्र होउ शकेल असे हवे.'

जगात बरेच लोक आहेत जे चमत्काराची वाट पहात असतात. जे रोगांनी पिडीत आहेत त्याम्च्या क्रम फार वरचा आहे. अमुक अमुक केल्याने अमुक अमुक फरक पडतो असे कानावर जरी आले तर त्यांना वाटते कि ते आपल्याला १०० % उपगोगी पडॅल.

माझ्या एका रीलेटेव्ह ने हा गोंधळ घालुन पाहिला आहे. ड्ब्बल ग्रॅज्युएट प्रोफेसर माणुस त्यांना डायबिटीस डीटेक्ट झाला. पण औषध सुरु करणे ऐवजी त्यांच्या सो कॉल्ड गुरुने सांगितले कि परत रक्त तपासु नकोस. रक्त तपासले कि साखर वाढते. (हे शेंबड्या पोराला तर पटेल का बघा, पण यांना पटले). जेवताना फक्त जे पदार्थ कडु आहेत ते कच्चे खात जा. असा सल्ला दिला. हे महाशय रोज मेथी आणि कारले कच्चे खात होते. महिनाभरात वजन २५ किलोने कमी झाले. चेहरा विचित्र दिसु लागला. जेंव्हा सहन होइना तेंव्हा डॉ कडे गेले. साखर तपासली तर ४०० वगैरे होती. मग रीतसर उपचार सुरु झाले.

तर सांगायचा मुद्दा असा कि म्हातारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकावतो. आपल्या लेखातील एखाद्या वाक्याचा सिलेक्टीव्ह (विदाउट रेफर्न्स) अर्थ काढुन इथे वाचणार्‍या किंवा इथुन वाचुन दुसर्‍याला सांगणार्‍यांकडुन हलगर्जीपणा व्हायला आपण कशाला कारणीभुत ठरायचे.

शेवटी तुमचेच वाक्य टाकतो.
पटले नाही त्यांनी माफ करावे.

चमत्कारांवर आणि गुरुवर विश्वास एकदम बरोबर .त्यानंतर सुधारणा नाही झाली तर गुरू पुन्हा यांच्याच तंगड्या यांच्या गळ्यात शिताफिने बांधतात .
अगदी डॉक्टरकडे जाऊन काटेकोरपणे उपचार घेणारेही नंतर कंटाळतात गोळ्या ( बहुधा स्टिरिऑड प्रकारचा फास .एकदा गळयात घालून घेतला की जेवढे दूर जावे तेवढा आवळत जातो ) घेऊन .

माझे मत असे आहे की रोग डिटेक्ट झाला की या गोळ्या सुरू करण्या अगोदरच काय ते घरगुती /आयुर्वेदिक उपचार करा आणि महिन्या दोन महिन्यांनी साखर /रक्तदाब मोजून पाहात राहा . काय शंभरेक रुपये जातील .गुण येत असेल तर तुमची ॐची कैसेट /योगासने/लसूणादिपाक/मेथीपाक/कार्ले सैनविज/जांभूळार्क/दुधीचा रस/अर्जुनारिष्ट/गोखरू काढा/पुननर्वादि काढा इत्यादी चालू ठेवा .

माझे मत असे आहे की रोग डिटेक्ट झाला की या गोळ्या सुरू करण्या अगोदरच काय ते घरगुती /आयुर्वेदिक उपचार करा आणि महिन्या दोन महिन्यांनी साखर /रक्तदाब मोजून पाहात राहा . काय शंभरेक रुपये जातील .गुण येत असेल तर तुमची ॐची कैसेट /योगासने/लसूणादिपाक/मेथीपाक/कार्ले सैनविज/जांभूळार्क/दुधीचा रस/अर्जुनारिष्ट/गोखरू काढा/पुननर्वादि काढा इत्यादी चालू ठेवा .>>>>>>>>>>

____________________/\___________________________ आणि त्यात मेलात तर उपाय सांगणार्‍याच्या मानगुटीवर बसा.

कळाल का निकिताजी काय काय होत ते?

एसार्डी तुमच्याच बाजूने बोलत आहेत. << मला कोण कोणाच्या बाजुने बोलतय आणि फायनली कायकाय खायचं काय नाही खायचं कळलंच नाही! ब्लड प्रेशर वाढायच्या आधी काय ते ठरवा Happy
निकीता,
३ आणि ६ मधे जरा कॉन्फिक्ट होतोय.
# १ मधील बीन नागा काय आहे?
# २ ची पाकृ टाकणार का??
#५ मधे पपीता काय आहे?

मुळात मधुमेह झाला आहे म्हणजे काय हे न सांगता साखर वाढली आहे हे मोघम सांगणे चुकीचे आहे. मी असे अनेक डॉ पाहिलेत जे एखाद्याला काय झालएय हे नीट सांगतच नाहीत, त्यांनी खोदून खोदून विचारावे लागते. आणि त्यातल्या अनेकांना खोदून खोदून विचारले की राग येतो. (दोन दिवसापूर्वीच एका पेडी.चा एका मैत्रिणीने असा अनुभव घेतला.)

तसेच मधुमेह / रक्तदाब वाढल्यावर फॅमिली डॉ कडून एक गोळी घेऊन ती वर्षानु वर्षे (पुन्हा चेकप न करता) घेत राहाणे हेही चुकीचेच. रक्तदाब कशामुळे वाढला आहे. तो शक्य तितका नॉर्मल ठेवायला काय काय करायचे, इमर्जन्सी मध्ये काय होऊ शकते तेव्हा काय करायचे हे स्पेशालिस्ट डॉ.कडून समजून घेणे, डॉ.ने सांगितला आहे त्याप्रमाणे फॉलोअप करणे खूप महत्त्वाचे आहे
घरगुती उपाय करतोय ना म्हणजे सगळं नीटच होणार असा लोकांचा समज होतो आणि त्याहून महत्त्वाचं ज्यांना डॉक्टरांचा राग असतो ते हा समज मुद्दाम करून देतात.

रक्तदाब किंवा मधुमेह किंवा अगदी सर्दी खोकला जरी असला तरी औषधे घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यासोबत फॉलोअप करत त्यांच्याकडून आपल्याला झालेल्या आजाराची पूर्ण माहिती घेऊन त्यांना त्याबद्दलचे पथ्य कुपथ्य हे विचारूनच मगच काय खावे काय खाऊ नये हे ठरवावे. जमल्यास तज्ञ डायेटिशियनचा सल्लाही घ्यावा. ( आणि अशा वेळी डॉ किती फी घेतात, किती लुटतात अशी तक्रार करू नये. तुम्ही स्वतः स्वतःच्या निरोगी शरिराची काय वाट लावली आहे ते प्रथम पाहावे. डॉ तुम्हाला मदत करायला असतात तुम्हाला लुटायला नव्हे. ह्याला अपवाद असले तरी जास्त फी घेणारा जास्त टेस्टस सांगणारा आणि जास्त औषधे घेणारा डॉ तुमचे पैसे लुटयला बसलाय असे नाही)

(मस्करी करता करता मला हे सिरियस होऊन लिहावेसे वाटले कारण की आमच्या बिल्डिंगमधल्या एका काकांनी असेच घरगुती उपाय केले आणि फॅमिलीने त्याकडे दुर्लक्ष केले म्हणजे डॉ कदे जायचा आग्रह केला नाही. काल रात्री ते काका - वय ७५ अ‍ॅक्युट कोरोनरी ....... ने गेले. मग त्यांची बायको मुलगी मुलगा आणि सून बोलू लागले की डॉ कडे आधी वेळच्या वेळी नेलं असतं तर कदाचित हे असं इतक्या लवकर झालं नसतं)

कोणताही आजार बरे होण्याचे शॉर्टकट उपाय नसतात.. शॉर्टकट उपाय अवलंबताना आयुष्याचा मार्गच शॉर्ट होऊन जाण्याचे पूर्ण चान्सेस असतात.

वेबदुनिया, मनोहर कहानीया, गृहशोभिका अशा प्रकाशनात असले अनेक उपाय सूचवणारे लेख येत असतात. मूळ पोस्ट मला असाच कुठूनतरी कॉपी पेस्ट केल्यासारखा वाटतोय. भाषांतराचा दर्जाही तोच आहे.

उपाययोजना कोणी आणि काय सांगितली त्यानंतर रुग्णाने त्याला दोष देण्यापेक्षा सावधतेने करावी .या हट्टी रोगांपुढे डॉक्टरही हतबल होतात ."सर्व औषधे दिली आहेत बाकी तुमची विलपॉवर{माझ्याकडेच येण्याची} आणि 'त्या'च्या हातात ".
काहीवेळा ७५वयाचा माणूस म्हटतो आता माझे सगळे झाले आहे मी आज ना उद्या जाणारच आहे पटकन गेलो तर बरे .खितपत लोळत पडायला नको .माझ्या मते रुग्णाला दुषण कशाला द्यायचे ?
तरुणपणी शारिरिक कष्टांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नये .पुढे रोग झाल्यावर तरातरा चालून साखर जिरवण्यापेक्षा आताच ऑटोरिक्षा शक्यतो टाळा .

Pages