आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७०च्या दरम्यान जरा उशीराच - वयाच्या २८व्या - वर्षी हैदराबाद रणजी संघात 'ऑफ्-स्पीनर' म्हणून संधी मिळालेल्या रामनारायण यांनी प्रविण तांबे यांच्याबद्दल लिहीलेलं हें खूप भावलं -
For a long time, my late debut was my badge of pride, something I loved to show off - until I was humbled by Tambe's extraordinary arrival from nowhere after his 40th birthday. By grabbing his chances and performing on the big stage as if to the manner born, he has earned the respect and admiration of his celebrity team-mates as well as his world-class opponents. That he obviously never gave up his pursuit of cricketing excellence throughout his years in club cricket speaks of amazing self-belief. And of the capacity, I suspect, to dream big and chase those dreams regardless of reward.

काल प्रवासात असल्यामुळे, लिहायला जमलं नाही. पण फॉकनर, स्मिथ, नायर made my day yesterday! what a win for RR!! जबरदस्त खेळले राजस्थान. मस्त!!

अरेच्च्या!.... कालच्या एव्हढ्या भारी मॅचबद्दल कुणीच कसे लिहले नाही?...... का आरसीबीचे फॅन आहेत इथे सगळे?..... अजुन धक्क्यातुन सावरतायत का?

द्रवीडने उभारलेल्या टीमने मल्ल्याच्या टीमला हरवलेले बघणे यात काय अप्रतिम आनंद आहे Happy

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हे जात्याच स्ट्रीट स्मार्ट असतात हे स्मिथ आणि फॉल्कनरने परत एकदा दाखवून दिले.... त्यांनी संधीची वाट पाहिली आणि मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उठवला पण स्टार्क, दिंडा आणि वरुण अ‍ॅरॉनने फारच बिनडोक गोलंदाजी केली.... आणि याचा फार मोठा दोष कॅप्टन म्हणून कोहलीकडे जातो

रोहित शर्मा, धवन, कोहली आणि गंभीरचा तणावाखाली ढळणारा तोल बघितल्यावर धोनी एक कॅप्टन म्हणून किती संतुलित आणि परिपक्व आहे ते अधिकच जाणवते.

पण राजस्थानने पण या सामन्यातुन काहीतरी शिकले पाहिजे.... रिचर्डसन च्या जागी हॉज किंवा कूपरला खेळवून फलंदाजीतली डेप्थ वाढवली पाहिजे

वॉटसन, फॉल्कनर, तांबे, भाटीया, बिन्नी, स्मिथ आणि कूपर मिळून २० ओव्हर्स व्यवस्थित टाकू शकतात की!

आजच्या मॅच मध्ये आपण हैद्राबादच्या बाजूने..... मुंबईला वानखेडे बाहेर जिंकायला फार प्रयत्न करावे लागतील

कालच्या खांद्याच्या दुखापतीनंतर गेल उरलेल्या स्पर्धेतुन बाहेर Sad
आरसीबी आवडत नसली तरी गेल आवडतो आपल्याला Happy

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हे जात्याच स्ट्रीट स्मार्ट असतात >>>>

स्टार्क, दिंडा आणि वरुण अ‍ॅरॉनने फारच बिनडोक गोलंदाजी केली....>>>>>

स्टार्क ऑस्ट्रेलियन नाही का ? Uhoh Wink

एक तर ती बॅटींग खेळपट्टी होती द्रविड ने सांगितलेले की १८० ची धावसंख्या मनात धरुनच चाललेलो आम्ही..

दोघांच्याही टीम ने सुरुवातीला कच खाल्ली... जसे विराट ला जमले नाही त्याच्या गोलंदाजांवर कंट्रोल करणे तसे वॉट्सन ला देखील जमले नाही म्हणायचे कारण त्याच्या डावपेचांना फार्मात नसणार्या फलंदाजाने युवराज ने उध्वस्थ केले..डिव्हिलेअर्स तर धोनीच्या डावपेचांना देखील पुरुन उरतो त्यामुळे त्याच्या बद्दल लिहिणे म्हणजे ........

दिंडा हा एकहाती सामना हरवणारा गोलंदाज म्हणुन ख्याती आहे.. जी त्याने याही मॅच मधे दाखवुन दिले .

खर तर त्याने गोलंदाजी २०-२० सामन्यात करुच नये.. कसोटी मधेच करावे.. तिथे पण आता गेम चेंज होउ राहिला.. त्यामुळे कसोटी मधे देखील त्याला ७-८ च्या सरासरीने मार पडला तरी नवल वाटणार नाही

आणि याचा फार मोठा दोष कॅप्टन म्हणून कोहलीकडे जातो >> ह्याच लॉजिकने स्मिथ आणि फॉल्कनर पेक्षा विजयाचे श्रेय वॉटसनकडे जाते (भले त्याने काहीच केले नसेल कालच्या मॅचमधे ) Lol जेंव्हा तुमच्या तीन तीन मेन बॉलर्स चा एकाच वेळी कोअर डंप होतो तेंव्हा कॅप्टन कडून अजू काय दिव लावणार ? कोहलीचा दोषच असेल तर हा कि युवराजवर एव्हढे emphasis करून त्यांच्या थिंक टँक ला भयंकर अवाजवी बिडींग करण्यापर्यंत नेणे जेणेकरून इतर भारतीय बॉलर्स उचलता न येणे. (अर्थात ही थिंक टँक पण जबरदस्तच म्हणायला हवी कि जी inury layback मधून बाहेर येणार्‍या प्लेयरवर असे बिडींग करते, but again Mallya is part of it so Wink )

MI think tank चे विचार ऐकायला खरच आवडतील कि 'कशा लॉजिकने ते कोणाला घ्यायचे ते ठरवतात' नि'बॅटींग ऑर्डर ठरवतात'. मग ते विचार "How not to pick a team and not to decide your batting order ?" ह्या नावाखाली प्रसिद्ध करावेत. सगळ्या मूर्खपणाचा एकच reference तयार होईल. Lol

>>स्टार्क ऑस्ट्रेलियन नाही का ?
अरे मित्रा अपवाद असतात काही काही Happy

>>असा ही तो फार्मात नव्हताच
अरे झोपलेल्या राक्षसाची टक्क जाग्या माणसांपेक्षा जास्त भिती वाटते ना?.... तसेच आहे हे Happy

>>ह्याच लॉजिकने स्मिथ आणि फॉल्कनर पेक्षा विजयाचे श्रेय वॉटसनकडे जाते (भले त्याने काहीच केले नसेल कालच्या मॅचमधे )

नाही.....आणि फरक हा की ते दोघे खेळताना वॉटसन डगआउटमध्ये होता आणि कोहली मैदानावर होता.... मॅच डोळ्यासमोरुन हातातुन निसटत असताना शुंभ्यासारखा बघत बसला होता!

. मॅच डोळ्यासमोरुन हातातुन निसटत असताना शुंभ्यासारखा बघत बसला होता! >> अरे त्याने एकदा दोनदा सांगितले कि बॉलर्सना. मधे field change करायलाही वेळ लावलेला कि. त्यांच्याकडून बॉल्स काढून घेण्यापेक्षा अजून काय करणे अपेक्षित असणार ? कॅप्टन लाख सांगो नि fielding लावो, शेवटी बॉलर काय टाकणार हे त्याच्यावरच आहे ना. दिंडा कडून फारशा अपेक्षा नाहित. पण स्टार्क नि अ‍ॅरन एकदम दिंडासारखे टाकायला लागले ह्यात कोहली अजून काय करणार ? मागच्या IPL मधे हेच काम विनय कुमार ने केले होते आठवते का ?

"का आरसीबीचे फॅन आहेत इथे सगळे?..... अजुन धक्क्यातुन सावरतायत का?

द्रवीडने उभारलेल्या टीमने मल्ल्याच्या टीमला हरवलेले बघणे यात काय अप्रतिम आनंद आहे" - एकदम सहमत!! आपण तर बाबा द्रविड फॅन क्लब चे आजीवन सभासद आहोत.

"दिंडा हा एकहाती सामना हरवणारा गोलंदाज म्हणुन ख्याती आहे.. जी त्याने याही मॅच मधे दाखवुन दिले .

खर तर त्याने गोलंदाजी २०-२० सामन्यात करुच नये.. कसोटी मधेच करावे.. तिथे पण आता गेम चेंज होउ राहिला.. त्यामुळे कसोटी मधे देखील त्याला ७-८ च्या सरासरीने मार पडला तरी नवल वाटणार नाही" - त्याने काहीतरी स्किल्स शिकून घ्यायला हवीत.. उदा. सुतारकाम, प्लंबिंग, माळीकाम ई.

अरे बंगलोरच्या चेंडू बॅटवर येणार्‍या खेळपट्टीवर आणि चिन्नास्वामीसारख्या छोट्या मैदानावर अ‍ॅल्बी, दिंडा, स्टार्क आणि अ‍ॅरॉनला घेउन खेळणार्‍या कॅप्टनला अजुन काय म्हणणार? स्लोअर वन कोण टाकणार?

हि RCB ची team बघ. http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2014/content/squad/735.... तू कोणाला घेऊन खेळला असतास ? स्टार्क आत्तापर्यंत चांगला खेळत आलाय कि रे. त्या ओव्हरच्या आधी पर्यंत नीट sensible टाकत होता. त्या तीन ओव्हर्सनी मॅच फिरली. आज बुमराह स्लोअर वन टाकतोय त्याची काय दशा होतेय पाहतोयस ना ? कोहलीच्या जागी द्रविड, धोनी, माईक ब्रेअर्ली, गावस्कर, इम्रान खान कोणीही असता तरी RCB हरलेच असते अशा तीन ओव्हर्स नंतर.

>>कोणीही असता तरी RCB हरलेच असते अशा तीन ओव्हर्स नंतर
कदाचित अजुन कुणी असते तर त्या तीन ओव्हर्स वेगळ्याच असत्या.... निदान तीनच्या चार तरी झाल्या असत्या.... असो.... जर तर ला अर्थ नाही.... पण कोहलीला धोनीची जागा घ्यायला अजुन बरेच आत्मपरीक्षण करुन स्वतामध्ये बदल करावा लागेल हे नक्की!
किंवा सचिनसारखे कॅप्टन्सी इज नॉट माय कप ऑफ टी म्हणून बॅटींगवर लक्ष केंद्रीत करावे हे उत्तम Happy

अजुन एक.... अ‍ॅग्रेशन आणि एरोगंसमधला फरक त्याला जेवढ्या लवकर कळेल तितके बरे!

<< अ‍ॅग्रेशन आणि एरोगंसमधला फरक त्याला जेवढ्या लवकर कळेल तितके बरे! >> 'अ‍ॅरोगन्स' हा खतरनाक गोलंदाज आहे, विशेषतः जागतिक दर्जांच्या सामन्यात; भारतातच कांबळी ते गंभीर असे अनेक फलंदाज नामशेष झालेत त्याच्यापुढे ! कोहली , सावधान !!!
मुंबई आपण फक्त 'अपने गलीमें शेर ' नाही हें दाखवणार आज असं दिसतंय; ५०-१ !

आत्ता रेडिओ वर न्युमरॉलॉजीस्ट श्वेता जुम्मानींचं (रोज असतं तेच) सेशन चालू आहे. त्या म्हणाल्या की मागच्या वर्षापासून KKR टीम त्यांची क्लायंट आहे. त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर KKR नी स्पर्धा जिंकली. ह्या वर्षी पण गंभीर सुरुवातीला खेळत नव्हता ०-०-१-१ असे रन्स होते. मग ह्यांनी सांगितलेल्या २३ की कोणत्या तरी नंबरचा टीशर्ट घातला त्यानी आणि मॅन ऑफ द मॅच झाला. Happy उत्थप्पा आणि युसुफ नी पण त्यांचा सल्ला घेतलाय असं सांगत होत्या.

युसुफ नी पण त्यांचा सल्ला घेतलाय असं सांगत होत्या.>>>>>>>> युसुफ ला ब्रह्मदेवाने सल्ला दिला तरी तो चालत नाही Happy

हा हा...

त्या म्हणाल्या की सांगितलेल्या नंबर चा टीशर्ट घातलेला त्यानी पण त्याला बॅटिंग च मिळाली नाही. :ड

<< २३ की कोणत्या तरी नंबरचा टीशर्ट घातला त्यानी आणि मॅन ऑफ द मॅच झाला. >> तिथंहि 'फिक्सींग' सुरूं नाही झालं मग मिळवलं; विरुद्ध संघाच्या खेळाडूना बाधतील असे टी-शर्टचे नंबर सुचवण्यासाठीं !!! Wink

युसुफ ला ब्रह्मदेवाने सल्ला दिला तरी तो चालत नाही स्मित >> Lol

अत्यंत खडतर परिश्रमानंतर जेंव्हा यश हाती लागत नाही तेंव्हा मग सगळेच न्युरॉलॉजीस्ट ते जोतिष्य ते बुवा ते यज्ञ असे सर्व करतात. म्हणून मग वल्डकप जिंकला त्यादिवशी धोणी टक्कल करतो पासून सेहवागची बॅटीचा यज्ञ हे सर्व चालत असते. मे बी खूप कॉम्पिटिशन असली की परिश्रमाशिवाय "इन गॉड वि ट्रस्ट" ही भावना खूप मोठी वाटत असेल.

मी देव मानत नाही Biggrin

आज तांबे ला धोनी समोर स्वतःची गोलंदाजी दाखवण्यासाठी चांगली संधी होती स्पेशली जाडेजा आणि अश्विन च्या कामगिरी ला तरी टक्कर दिली असती तरी पुरेसे होते.. परंतु सपशेल अपयशी ठरला.. पीसं पिस पिसांनी निघालीत ..
३४ धावा निघाल्या.. त्याच्या बरोबरीने जाडेजाने ४ ओव्हर मधे अवघे १८ रन्स दिले . आणि बर्यापैकी अंकुश लावला म्हणुन राजस्थान जी आधी १६०-१७० च्या वर जात होती ती १५० च्या आत निपटली गेली ...

राजस्थानने प्लेऑफ मधले स्थान निश्चित होण्याआधीच आज बरेच प्रयोग केले.... तेही चेन्नईसमोर!
कूपरला स्थान द्यायला हवेच होते आणि त्यानेही बर्‍यापैकी किफायतशीर गोलंदाजी केली पण फलंदाजांच्या क्रमवारीत इतके प्रयोग करायची गरज नव्हती

धोनी ने तो किती भारी फिनिशर आहे हे आज परत एकदा दाखवून दिले.... खरच कॅप्टन कूल!

राजस्थानने आता प्रत्येक मॅच सिरीअसली घेतली पाहिजे.... उगा शेवटच्या मॅचपर्यंत धाकधूक नको!

अरेच्चा.... गेल आहे की.... काल तर न्यूज होती की तो उरलेल्या स्पर्धेतुन बाहेर म्हणून Sad

भारी सुरुवात केलेली पण परत एकदा लवकर परतला!

Pages