कूकिज् एन् क्रिम आईसक्रिम

Submitted by मंजूडी on 12 May, 2014 - 01:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप दूध
२ कप मिल्क पावडर
१ कप अमूल फ्रेश क्रिम
ओरीओ बिस्किटांचा व्हॅनिला फ्लेवरचा मोठा पुडा (२० रुपयेवाला)
चवीप्रमाणे साखर
२-३ थेंब व्हॅनिला एसेन्स

क्रमवार पाककृती: 

दूध आणि मिल्कपावडर एकत्र करून एकदम गुळगुळीत ब्लेंड करून घ्या. ओरीओ बिस्किटं एकेक उघडून त्याचं क्रिम काढून या मिश्रणात घाला. ब्लेंड करा. आता अमूलचं फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेन्स घालून मस्तपैकी पाच-सहा मिनिटं ब्लेंड करा. मिक्सरपेक्षा ब्लेंडरने केलं तर आईसक्रिमचा पोत जास्त छान येईल. मिश्रणाची चव बघून आवडीप्रमाणे साखर मिसळा. ओरिओ बिस्किटांचा ओबडधोबड चुरा यात घालून चमच्याने ढवळून डीप फ्रिजमधे सेट व्हायला ठेवा. थोडा चुरा वरून टॉपिंगसाठी घाला.

सेट झाल्यावर गारेगार क्रिमी आईसक्रिम चाटूनपुसून खा. हा फ्लेवर अगदी अमूलच्या कूकिज् एन् क्रिम फ्लेवरसारखा लागतो.

cookies n creme.jpg
वाढणी/प्रमाण: 
अमूलचा एक लिटर आईसक्रिमचा टब भरून आईसक्रिम होते.
अधिक टिपा: 

मुग्धटलीच्या लोकप्रिय धाग्यावर प्रतिसादांनी ४०० चा टप्पा ओलांडलेला आहे. तिथे प्रतिसादात ही पाककृती लिहिली तर पुढच्या प्रतिसादांमधे हरवून जाईल. आणि मग मागची पानं शोधत बसावी लागतात. म्हणून हा वेगळा धागा. बाकीचेही मायबोलीकर जे असा वेगळा फ्लेवर करून पाहतील त्यांनी स्वतंत्र धाग्यावर त्याची पाककृती लिहावी ही विनंती.

मी पहिली बॅच केली तेव्हा त्यात फ्रेश क्रिम घातलं नव्हतं. त्यामुळे ते सेट व्हायला खूपच (२४ तास) वेळ लागला. मग पुढची बॅच केली तेव्हा कविन, मेधा२००२ सावलीने सुचवल्याप्रमाणे फ्रेश क्रिम घालून केली आणि ती फारच छान झाली.

माहितीचा स्रोत: 
मुग्धटली - http://www.maayboli.com/node/45309
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast Happy

कविता, चॉकलेट स्लाईस केक मावेमध्ये किंचीत गरम करून त्यावर पहिल्या बॅचमधलं लिक्विड आईसक्रिम आणि चॉकलेट सॉस घालून खाल्ला... सॉलिड मस्त डेझर्ट झालं Happy

कविता, चॉकलेट स्लाईस केक मावेमध्ये किंचीत गरम करून त्यावर पहिल्या बॅचमधलं लिक्विड आईसक्रिम आणि चॉकलेट सॉस घालून खाल्ला... सॉलिड मस्त डेझर्ट झालं>> सहीच आयडीया Happy आम्ही मिसली म्हणायची Wink

छान.. अमूल फ्रेश क्रीमचे डीटेल्स ( फॅट कंटेंट ) काय आहेत, म्हणजे सिमिलर प्रॉडक्ट शोधता येईल. बिस्किटे मात्र मिळतात.

ऑस्समेस्ट!! नवीन फ्लेवरचं आईसक्रीम मिळालं. उन्हाळा संपायच्या आत बहुतेक ५० - ६० प्रकारचे आईस्क्रीम्स तरी होतील मुग्धटलीच्या या रेसीपीने Happy

सही मंजूडी. - ब्रिटानियाच्या संत्र्याच्या बिक्कीटाचं आक्कीम पन काय मश्त होईल... कोनी तली बनवा ना फोटो टाका मी समाधान मानेन त्यात..

राहुलतेज, मिश्रणाची चव बघून साखर घाला. मी पाककृतीत अपडेट करते. मी वापरलेल्या मिल्कपावडरमधे साखर असल्याने मी आईसक्रिममध्ये घातली नव्हती.

फोटोतलं आईस्क्रीम एकदम मस्त दिसतंय. अगदी बाहेर मिळतं तसं Happy
हा फ्लेवर अगदी नावडता आहे पण त्यामुळे आता वेगळ्या फ्लेवरमध्ये करावी लागेल ही रेसिपी.

मस्त दिसतंय. मुलांचा आवडता फ्लेवर आहे. त्यामुळे ट्राय करेन. बिस्किटांमधलं क्रिम काढून ते ब्लेंड करायचं काही खास कारण आहे का?

Pages