"अस्तित्व"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 May, 2014 - 12:47

कुठे लपवू तुझ्या आठवणी?
वहीतील पानांत
शेवटच्या पानावर खरडलेल्या ह्रुदयांत
तुझ्या नावातील अक्षरांच्या कलाबुतीत
कुठे?
आता तर प्रत्येक वही मोरपंखी दिसते
प्रत्येक पेन तुझे नाव लिहितो
प्रत्येक अक्षरास तुझ्या नावाचे वळण येते
.
.
मी काय करु?
कसा विसरु?
या नावात गुरफटलेलं
आणि
आठवणींत हरवलेलं
माझं अस्तित्व...??

--कैलास

Group content visibility: 
Public - accessible to all site users