निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
चला सुरु करा रे! (बेडशीट
चला सुरु करा रे! (बेडशीट टाकून, सरसावून बसले मी, आता होऊदे सुरु. :फिदी:)
हाय ऑल! आत्ता इथे कुठल्याही
हाय ऑल! आत्ता इथे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण झालंय.
बरं आता हे पहा. हे चित्र मी आत्ताच काढलं. ही कसली फुलं/कळ्या/ तुरा आहे कुणी सांगू शकेल का?
जिजामाता उद्यानातल्या यंदाच्या फळाफुलांच्या प्रदर्शनात मी हे पाहिलं होतं.
णावतो आंबा.. नका तोडू पावणं
णावतो आंबा..
नका तोडू पावणं जरा थांबा >>>
जिप्सी भौ ________/\_______ कसा पटापट सुचत तुम्हास्नी??? गाण्या - बजावण्यात त्ये पीयचडी का केलयसा जनु.
आत्ता इथे कुठल्याही क्षणी
आत्ता इथे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण झालंय.>>>>>>>>>>हो. माझ्याकडेसुद्धा.
वर्षू, तू काढलस? मस्तच आलय.
ही कसली फुलं/कळ्या/ तुरा आहे कुणी सांगू शकेल का?>>>>>>>>ते जाणकार सांगतीलच.
वर्षा, कोरफडीची फुले अशी
वर्षा, कोरफडीची फुले अशी असतात. पण यात खुप प्रकार आणि रंगदेखील असतात.
आत्ता इथे कुठल्याही क्षणी
आत्ता इथे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण झालंय.>>>>>>>>>>हो. माझ्याकडेसुद्धा. >>> वाशीत पण. नेट स्पीड बहुदा वातावरणाचा आनंद घेतय. हळुहळु येतय
दिनेशदा तुम्ही पोस्ट डॉक
दिनेशदा तुम्ही पोस्ट डॉक बहुदा
दिनेशदा, जिप्स्या, तुम्हाला
दिनेशदा, जिप्स्या, तुम्हाला बक्षीस म्हणून मी अजून एक फोटो आधीच्या पानावर डकवलाय.
वसंत रागात किंवा या
वसंत रागात किंवा या ऋतूसंबंधी फार कमी रचना आहेत मराठीत. आणखी कुणाला आठवतील तर लिहा ना.
आला वसंत ऋतू आला ( आशा / सुभद्राहरण / जयश्री गडकर )
वसंत हो आला ( आशा / स्त्री / राजश्री )
अंगणी पारीजात फुलला, बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ( जयमाला शिलेदार )
ऋतूराज आज वनी आला ( बकुल पंडीत )
कोकीळा गा, भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृतसंगीत गा ( आशा )
कोकीळ कुहू कुहू बोले, तू माझा तूझी मी झाले ( लता )
मूर्तीमंत भगवंत भेटला, दे कंठ कोकिळे मला, ( आशा )
घुमला हृदयी निनाद हा ( अनुराधा ), जिवलगा कधी रे येशील तू ( आशा ) मधे काही ओळी, बसंत रागात आहेत.
मंदारमाला नाटकात.. बसंत की बहार आयी असे एक छान युगुल गीत आहे. पण ते हिंदीत आहे.
मृच्छकटीक नाटकात पण एक गाणे आहे असे वाटतेय.
वा वा वा.
वा वा वा.
हे काय?
हे काय?
रिठे ?
रिठे ?
नाही. दिनेशदा?
नाही. दिनेशदा?
दिनेशदा, तुमच्या मालवणच्या
दिनेशदा, तुमच्या मालवणच्या फ़ोटोंचा एक अल्बम मी थोपुवर ठेवलाय.
मझ्या फेबु वर आत्ताच मी मॅन
मझ्या फेबु वर आत्ताच मी मॅन नावाची क्लीप शेअर केलीये. नक्की पहा.
रॉ रुद्राक्ष?
रॉ रुद्राक्ष?
फेकलय हा मी
फेकलय हा मी
रॉ
रॉ रुद्राक्ष?>>>>>>>>>>>>..अग, केवढी रुखरुख लागली मला.
घरी असतील तर नीट बघतेच आता.
केवढी रुखरुख लागली मला.>>>>
केवढी रुखरुख लागली मला.>>>> दगड आहेत की काय? आम्हाला फसवायला फोटुन मग फेकुन दिलेले दिसताहेत.
दगड आहेत की काय? आम्हाला
दगड आहेत की काय? आम्हाला फसवायला फोटुन मग फेकुन दिलेले दिसताहेत.>>>>>>>>>>>>>नाही ग.
शोभे मी नै गा काढले
शोभे मी नै गा काढले चित्र..माझ्या हमनाम ने काढलेय ते..
तुझ्या हातात काय आहे>?? वाळकुडलेली जायफळं????
वाह..इथे मस्त मस्त गाण्यांचा सपाटा चाललाय.. दिनेश ला आवरायला पाहिजे कुणी..
वाळकुडलेली
वाळकुडलेली जायफळं????>>>>>>>>>>>>>नाही.
श्या... एक उत्तर बरोबर येईल
श्या... एक उत्तर बरोबर येईल तर शपथ..
शोभे मी नै गा काढले
शोभे मी नै गा काढले चित्र..माझ्या हमनाम ने काढलेय ते.>>>>>>>>>>म्या तिलेच बोलले व्हते. (किती त्या(ती) वर्षा ’निग’वर? तरीच निग फ़ुलतोय. :डोमा:)
ऐ वर्षू फक्त मीच...
ऐ वर्षू फक्त मीच...
ऐ वर्षू फक्त मीच... डोळा
ऐ वर्षू फक्त मीच... डोळा मारा>>>>>>>>>बरं! बरं!
आपल्या सई ( दक्षिणाची ताई )
आपल्या सई ( दक्षिणाची ताई ) ला फेसबूक वर कोणीतरी सत्यसाईबाबा म्हणाले. पण मला शोभाला तसे म्हणावेसे वाटतेय... सारखे हातातून काहीतरी काढत असते.
वर्षू, आशाचा " दे कंठ कोकिळे मला " अल्बम ऐकच.. फार सुंदर गाणी आहेत त्यात.
,' सारखे हातातून काहीतरी काढत
,' सारखे हातातून काहीतरी काढत असते.;
वोक्के दिनेश नक्की ऐकेन
सईच्या सुंदर कुरळ्या
सईच्या सुंदर कुरळ्या केसांमुळे तिला म्हटलं असेल सत्यसाईबाबा.
सुप्रभात नि.ग. करांनो....मस्त
सुप्रभात नि.ग. करांनो....मस्त गप्प चालु आहेत कि सगळ्यांचा.
जिप्सी,फोटो एकदम भारी.वर्षा,तुझ चित्र खूप आवडल....
अरे हो...सुप्रभाताचा सदिच्छे सोबत्,हि फुलं विसरलेच...हे घ्या ट्युलीप्स
Pages