निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय ऑल! आत्ता इथे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण झालंय.
बरं आता हे पहा. हे चित्र मी आत्ताच काढलं. ही कसली फुलं/कळ्या/ तुरा आहे कुणी सांगू शकेल का?
जिजामाता उद्यानातल्या यंदाच्या फळाफुलांच्या प्रदर्शनात मी हे पाहिलं होतं.

णावतो आंबा..
नका तोडू पावणं जरा थांबा >>>
जिप्सी भौ ________/\_______ कसा पटापट सुचत तुम्हास्नी??? गाण्या - बजावण्यात त्ये पीयचडी का केलयसा जनु.

आत्ता इथे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण झालंय.>>>>>>>>>>हो. माझ्याकडेसुद्धा. Uhoh
वर्षू, तू काढलस? मस्तच आलय. Happy

ही कसली फुलं/कळ्या/ तुरा आहे कुणी सांगू शकेल का?>>>>>>>>ते जाणकार सांगतीलच. Happy

आत्ता इथे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण झालंय.>>>>>>>>>>हो. माझ्याकडेसुद्धा. >>> वाशीत पण. नेट स्पीड बहुदा वातावरणाचा आनंद घेतय. हळुहळु येतय Wink

वसंत रागात किंवा या ऋतूसंबंधी फार कमी रचना आहेत मराठीत. आणखी कुणाला आठवतील तर लिहा ना.

आला वसंत ऋतू आला ( आशा / सुभद्राहरण / जयश्री गडकर )
वसंत हो आला ( आशा / स्त्री / राजश्री )
अंगणी पारीजात फुलला, बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ( जयमाला शिलेदार )
ऋतूराज आज वनी आला ( बकुल पंडीत )
कोकीळा गा, भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृतसंगीत गा ( आशा )
कोकीळ कुहू कुहू बोले, तू माझा तूझी मी झाले ( लता )
मूर्तीमंत भगवंत भेटला, दे कंठ कोकिळे मला, ( आशा )

घुमला हृदयी निनाद हा ( अनुराधा ), जिवलगा कधी रे येशील तू ( आशा ) मधे काही ओळी, बसंत रागात आहेत.

मंदारमाला नाटकात.. बसंत की बहार आयी असे एक छान युगुल गीत आहे. पण ते हिंदीत आहे.
मृच्छकटीक नाटकात पण एक गाणे आहे असे वाटतेय.

रॉ रुद्राक्ष?>>>>>>>>>>>>..अग, केवढी रुखरुख लागली मला. Uhoh
घरी असतील तर नीट बघतेच आता.

शोभे मी नै गा काढले चित्र..माझ्या हमनाम ने काढलेय ते.. Happy

तुझ्या हातात काय आहे>?? वाळकुडलेली जायफळं????

वाह..इथे मस्त मस्त गाण्यांचा सपाटा चाललाय.. दिनेश ला आवरायला पाहिजे कुणी.. Lol

शोभे मी नै गा काढले चित्र..माझ्या हमनाम ने काढलेय ते.>>>>>>>>>>म्या तिलेच बोलले व्हते. Happy (किती त्या(ती) वर्षा ’निग’वर? तरीच निग फ़ुलतोय. :डोमा:)

आपल्या सई ( दक्षिणाची ताई ) ला फेसबूक वर कोणीतरी सत्यसाईबाबा म्हणाले. पण मला शोभाला तसे म्हणावेसे वाटतेय... सारखे हातातून काहीतरी काढत असते.

वर्षू, आशाचा " दे कंठ कोकिळे मला " अल्बम ऐकच.. फार सुंदर गाणी आहेत त्यात.

सुप्रभात नि.ग. करांनो....मस्त गप्प चालु आहेत कि सगळ्यांचा.
जिप्सी,फोटो एकदम भारी.वर्षा,तुझ चित्र खूप आवडल....

अरे हो...सुप्रभाताचा सदिच्छे सोबत्,हि फुलं विसरलेच...हे घ्या ट्युलीप्स
Fotor050791045.jpg

Pages