मी पोरीचा बाप झालो

Submitted by जयश्री देशकुलकर्णी on 30 April, 2014 - 06:17

मी पोरीचा बाप झालो

ती रेशमाची लड, ती झुळूक अल्लड
म्हणे धनाची पेटी ती, नाजूक सोनसळी ती
चंद्राचा मुखडा, माझ्या काळजाचा तुकडा
गोजिरी, तान्हुली घरी घेऊन आलो
मी पोरीचा बाप झालो

तिच निरागस हास्य खिळवून ठेवणार.
तिच बोबड बोलण गोष्टी करणार
तिच बागडण चांदण शिंपणार
छकुली बरोबर मी भातुकलीत रमलो.
मी पोरीचा बाप झालो.

तिच शिकण, पाकळ्यातून फुलत जाण
नृत्याच्या तालात पैंजणाच थिरकण
अस्तित्वाने साऱ्या घरात चैतन्य आण
माझ्या बबडीचा मी शिक्षक झालो
मी पोरीचा बाप झालो.

ती शिकली, ती मोठी झाली
स्वाभिमानाने जगात वावरू लागली
आकाशात उंच भराऱ्या घेऊ लागली.
तिच्या पंखातले बळ मी बनलो
मी पोरीचा बाप झालो.

मिटिंग मध्ये ती चर्चा घडवू लागली
निर्भयतेने आपली मते मांडू लागली
चिमुरडी एवढी मोठी झाली? लोक कौतुके बोलली
डोळे भरून सारे पहात आलो
मी पोरीचा आता मित्र झालो.

ती आई बापाची शान, तिला मर्यादांचे भान
घरट्यातला चिवचिवाट आज दूर गेला
पोरीने सासरचा उंबरा ओलांडला
तृप्तीच्या आसवांनी तिला निरोप देऊन आलो
गर्व आहे मला, मी पोरीचा बाप झालो.

सौ. जयश्री सुभाष देशकुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users