नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनन, अंजीराच्या बिया क्रश होउन कडू लागतील का अशी शंका निर्माण झाल्याने मी ट्राय केल नाही ते अजुन. इथे कोणी केल असेल तर उत्तर द्या रे...

मैत्रीणींनो,आईसक्रिम मस्त झालय. प्लास्टीकच्या मोल्ड मधील कुल्फी पण मस्त झाली आहे. पण मला फोटो कसे
अपलोड करायचे माहीत नाही. Sad आय फोन वरुन फोटो कसे टाकता येतात? मदत करा.
रच्यकने, अंजीर आईसक्रीम आईस्क्रीम मस्त होते. सुके अंजीर दुधात भिजवुन वाटायचे.

ऑर्कीड इथल्या बर्‍याच मंडळींच अस झालय... आइस्क्रीम फ्रिजमधुन बाहेर आल की कधी एकदा पोटात जातय अस होउन कोणी फोटो काढायच्या भानगडीत पडतच नाही ...............
१ मेला आइस्क्रीम फ्रीजरमधे ठेवलंय ते अजून बॅटरस्वरूपातच आहे. फ्रीजर हायवर ठेवला आहे. फ्रीजरमधल्या आजूबाजूच्या गोष्टी दगड झाल्यात.बर्फही आहे.पण आइस्क्रीमचा पत्ता नाही.नशीब आंब्याचे आइस्क्रीम करायला ठेवले नाही. Sad

ए शहाणे... फोटो टाक म्हटल होत तुला. टाकले नाहीस म्हणजे आक्री चांगल झालय आणि ते तु लग्गेच हादडलस फोटो बिटो विसरलीस

>> सॉरी मुग्धु.. मी शहाळ्याचं केलं होतं. चांगलं झालं होतं. पण साखर कमी होती. म्हणजे तू टाकायची गरज नाही असं म्हणालीस म्हणुन मी १च चमचा साखर घातली. पण घरच्या सगळ्यांचं मत पडलं कि अज्जिबात गोड नाहीये. त्यामुळे नो काँप्लीमेंट्स. अजुन फ्रीझरमध्ये पडून आहे. खुप फोटो टाकु शकते हवं तर. पण आता मी काय करु? Sad

मी आज कॅन्ड आमरसाचं घालून केलं हे आईस्क्रिम. एकदम मस्त झालं चवीला. वरून साखर घालावी लागली.
सोप्या रेसिपीबद्दल थॅन्स मुग्धा.

कुल्फीचा मोल्ड नसेल किंवा मोठ्या प्रमाणावर कुल्फी करायची असेल तर एक ट्रिक इंटरनेटवर बघितली होती.कुल्फीचे बॅटर छोट्या डिस्पोजेबल कप्स मध्ये भरायचे.वरुन छोटा चौकोनी अल्युमिनियम रॅपचा तुकडा गुंडाळायचा आणि मध्यभागी एक आईस्क्रिमची काडी घालायची.असे छोटे छोटे कप सेट करायला ठेवायचे.

१ मेच्या सुट्टित आ.क्री. चा बेत होता.
स्टॅबिलायझर वग्रैरे घालून कर्णार होते
पण नेमकी रेसिपी लिहलेली डायरी सापडली नाही .
मग शुक्रवारी रात्री घरी जाताना मिल्क पावडर घेतली
कुठला फ्लेवर करावा असा विचार चलू होता आणि फ्रिजमध्ये गुलक.न्दाची बरणी दिसली
२ मोठे चमचे गुल्कन्द आणि थोडासा गुलाबी फूड कलर Happy

नवरा म्हणाला साखर कमी आहे म्हणून काल साखर घालून परत मिक्सर् मधून काढल
साबा नी मिक्सर साफ करताना थोडस चाखल तर त्याना वाटल मी रोझ इसेन्स टाकला आहे
मीही काही सा.न्गण्याचा भानगडीत पडले नाही .

आज रात्री खाणे होइल , तेन्व्हा फोटो काढेन .

मी पन बनवले mango ice cream ,चव सुंदर झाली,मुलगा अन नवरा खुष अगदी …Thanks a lot मुग्धाजी.

प्रीती, मी काय सोनिया गांधी किंवा सुषमा स्वराज नाही हो.. नावापुढे जी नका बै लावु...

मला वाटतय की आता इथे पाटी लिहावी पुणेरी स्टाईल. आइस्क्रीमवर प्रतिक्रीया देताना कृपया अहो-जाहो, मुग्धाजी यासारखे अपमानास्पद शब्द वापरु नये. अन्यथा धागा मर्यादीत केला जाईल.

सगळे आईसक्रीम खाताहेत. मी मात्र बॅटर खाणार>> सेट करायला ठेवलेलं पण अति उत्साहापोटी एवढ्यांदा उघडून पाहीलं की सेट होईनाच. मग तसंच मँगो मिल्कशेक म्हणून पिऊन टाकलं. भन्नाट टेस्टी!!! स्लर्प स्लर्प .... सॉरी मुग्धे फोटू आता दुसरे आईस्क्रीम तयार झाल्यानंतरचाच पोस्टेन Happy

मी काल बनवले mango ice cream , mango ची चव थोडी कमी लागली. व थोडी साखर पण कमी झाली थोड प्रमाण वाढवाव लागेल........ mango चे प्रमाण १ कप एवजी किति घेउ????

कनन थोडा इसेन्स वापरू शकतेस जर चव हवी असेल तर. मी देवगड हापूसचा पूर्ण पिकलेल्या आंब्याचा गर्द केशरी घट्ट गर १ मोठी वाटी वापरलेला. गोडासाठी थोडी साखर आणि साय अर्धीच वाटी वापरली. खूप जास्त नाही पण आंब्याची मस्त क्रिमी चव आलेली.

dreamgirl,

इसेन्स ice cream shop मधे मिळे ल का? व त्यात काही flavour येत का? व किति वापरा चे..... मी साय जास्त

वापरली याचा अर्थ. पुर्न एक कप घेतली हो ती म्हनुन mango ची चव कमी आली............... तुम्ही बनवलेल प्रमाण

सान्गाना.... please

इसेंस किराणा सामान, जनरल स्टोअर, सुपर मार्केट मध्येही मिळू शकेल. तीन चार थेंबांपेक्षा जास्त इसेंसची गरज नसते. मँगो मिळेल. त्याऐवजी मँगो जॅम (वर वापरलाय बहुदा सृष्टीने) वापरला तरी चालेल.
मला इसेंसची गरज वाटली नाही. नॅचरल हापूस आंब्याची चव मिळालेली.
मी वापरलेलं प्रमाण एक ते सव्वा वाटी मँगो पल्प (डब्याचा नाही), पाऊण वाटी मिल्क पावडर, पाव ते अर्धी वाटी साय (दुधावरचीच कारण मी अमुल गोल्ड वापरते. भाकरीसारखी घट्ट साय येते.), एक वाटी दूध. मिक्सरला दोन तीन वेळा फिरवले. चव थोडी अगोड होती म्हणून चार छोटे चमचे साखर. पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घेतलं. घट्ट स्मूद क्रीमी मिश्रण तयार झाल्म ते सेट करत ठेवलं. साधारण अर्धे सेट असतानाच गट्ट केलं Happy

dreamgirl ,

धन्यवाद ..........आता या प्रमाणाने उद्या करुन पहाते ...................

सेट करायला ठेवलेलं पण अति उत्साहापोटी एवढ्यांदा उघडून पाहीलंसेट करायला ठेवलेलं पाहीलं की सेट होईनाच .....................नssssssही! १ मे को बॅटर रखी मैं.कल ,४ मे तक बॅटर वैसेके वैसा फ्रीजरमे. बाकी
बरफ वगैरे ट्रेमे जमा हुआ है. पण ठीक आहे. परत करेनच.

जाई प्रतिसाद द्यायला उशिर झाला त्याबाद्द्ल सॉरी...... मी बाहेर गावी गेले होते.....
मी आयस्क्रीम च्या मिश्रणात थोडा व्हॅनीला इसेन्स टाकला व मिल्क्पावडर व दुधाचे प्रमाण दिड कप केले बस मस्त होते....
आजपण व्हॅनीलाच सेट करुन आले आहे...
आज थोडा वेगळा प्रयोग करणार आहे जमला तर फोटो टाकेन....

ओह थँक्स
तेजस्विनी

म्हणजे तुम्ही फ़ळाच्या गराऐवजी vanilaa इस्सेंस वापरलात तर
!!
बरोबर ना

आणि प्लीज फोटो टाका
मला आईडिया येईल

व्हेनीला फ्लेवर आणि खस फ्लेवर>>>> यासाठी काय घालत तेजस्विनी? व्हॅनिला इसेन्स आणि खस सरबत का?
मुग्धा व्हेनीला फ्लेवर आणि खस फ्लेवर साठी दोन्हीं फ्लेवरचे इसेन्सच वापरले आणि मिल्क पावडर व दुध दिड कप घेतले .......... प्रतिसादाला उशिर झाल्याबद्द्ल सॉरी ....... आउट ऑफ टऊन होते..

Pages