नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्सला, ते क्रश वापरून मी मिल्कशेक केले आहे, त्यामुळे दूध नासण्याची भिती नाही. >>मंजूडी तु थोडस करुन बघ ... मला तरि वाटत ,, चांगल होइल..

शनिवारी रात्री मी तीन फ्लेवरचे आईसक्रिम केले. आंबा, चिकु आणि ताडगोळा. त्यातले ताडगोळाचे मिश्रण काय सही लागत होते पण आईसक्रिम थोडी चिकट वाटली म्हणुन ती हिट, तर चिकुची सुपरहिट आणि आंबा ब्लॉकबास्टर. धन्यवाद मुग्धा.

मागे पण सिताफळची केली होती सगळे अजुन नाव काढतात काय टेस्टी झालेली. आता सिताफळच्या सिझनची वाट बघतेय.

पुन्हा एकदा धन्स

सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन अंगावर मुठभर नाही चांगल किलोभर मांस चढल आहे.

या आक्रीच्या रेसिपीच सगळ श्रेय माझ्या नणंदेला आहे. तिच्या सांगण्यावरुन मी घरी आंब्याच करुन पाहील, मग एक दिवस साबांसाठी दोन शहाळी आणली होती त्यात मिळालेल्या मलईच एकटीने करुन पाहील तेव्हा नवर्‍याकडुन कधी नव्हे ती पहिल्या घासाला "ऑस्सम सेम नॅअचरल्स" अशी प्रतिक्रीया आल्यावर विचार केला इथे टाकाव आणि आजपर्यंत चक्क ११ पान प्रतिसाद आलेत...

ताडगोळा kay asat? :ao:

mugdha, mi 1 may la banavanarch he ice cream. kahihihihihihihihihi hovo.

ashirvad asu dya mate Wink

मुग्धटली नामक मुलगी भलतीच पॉप्युलर झालेली दिसत्ये....ह्या आईस्क्रिमच्या करामतीमुळे.

डॉक्टर्सनी मला आईस्क्रिम खाण्यास मना केल्यामुळे चवीचा थेट आनंद लुटता येत नसला तरी या विषयावरील चर्चा वाचून समाधान वाटते.

रिया ताडगोळा माहीत नाही???? चल माझ्या गावी....सॉरी विषयांतर....

पण मुग्धे मला आवडली रेसिपी.....उद्या नवर्याचा वा दि आहे....त्याला सर्प्राईज देइन म्हणते

ashirvad asu dya mate >>>> यशस्वी भव! Proud

मुग्धटली नामक मुलगी भलतीच पॉप्युलर झालेली दिसत्ये....ह्या आईस्क्रिमच्या करामतीमुळे.
डॉक्टर्सनी मला आईस्क्रिम खाण्यास मना केल्यामुळे चवीचा थेट आनंद लुटता येत नसला तरी या विषयावरील चर्चा वाचून समाधान वाटते.>>>>> आइशप्पथ मामा, तुम्ही आणि चक्क इथे Happy व्हेरी हॅपी टु सी युअर कमेंट

आता तुझी रेसिपी मायबोली home page नाहीतर मायबोली facebook page वर येणार लवकरच !>>>>> खरच अन्विता?? ओह्ह! दॅट्स ग्रेट Happy

थॅंक्स ऑल.

पण मुग्धे मला आवडली रेसिपी.....उद्या नवर्याचा वा दि आहे....त्याला सर्प्राईज देइन म्हणते>>>> नक्की दे, खरच आश्चर्यचकीत होईल नवरा आणि हो फोटोच तेवढ लक्षात राहुद्या.

oh! mala navhat mahit he :ao:
shahalyasarakhi chav mhanje mala avadel as watatay Happy

Thanks zakoba!

ya pasun tadi banavatat ka? :ao:
nira banavatat ka?

मुग्धा, तू केलेल्या आईसक्रीम चा फोटो वरती रेसिपी मध्ये टाक ना.
admin , ह्यांना विनंती आहे कि एवढी छान रेसिपी मायबोली home page नाहीतर facebook page वर टाका . लोकानी अगदी भरभरून प्रतिसाद दिले आहेत आणि फोटो पण टाकले आहेत.

अरे ताडगोळा हे मलाही माहिती नव्हतं.
मुम्बै ट्रिप मध्ये कळाल.
त्याआधी जिप्स्याने / यो रॉक्सने काढलेले फोटो पाहिले होते फक्त.

निल्सन, मस्त गं!
ताडगोळ्याचे आइस्क्रीम बनवण्याचा कोणी विचार पण केला नसेल. पण आता हे "केलेच पाहिजे" च्या यादीत समाविष्ट झाले आहे.
धन्स फॉर युअर आयडिया!
आमच्या बोरिवलीत नॅशनल पार्क किंवा गोराई खाडी कुठेही जा भरपूर ताडगोळे खायला मिळतील.

मोनाली, आशिता,
ताडगोळ्याचे आईसक्रिमपेक्षा त्याचा जो शेक तयार करतो ना आधी तो जास्त यम्मी लागतो.
आइसक्रिम थोडी चिकट लागते कारण ताडगोळाच थोडा चिकटसर असतो. तरीही थोडी करुन बघा कदाचित तुम्हाला आवडेल कारण प्रत्येकाची पसंद वेगवेगळी असते.

Hi....mi mango ice cream Karun baghitale......apratim zale....
mazya maitrini pan Karun baghitale....mast jamale ahe......
khup khup thanks.....

मी बनवले आंबयाचे आईस्क्रीम. म्स्त झाले आहे. मुग्धा आणि बाकि प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे खुप धन्यवाद :). ईथे आता ईतके प्रतिसाद झाले आहेत कि, हवे त्या flavor chya icecream बद्दल माहिती मिळणे कठिण झाले आहे. खरचं खुप छान रेसिपी.

Pages