महिंद्रा हॉलिडेज क्लब मेंबरशिप - क्लब महिंद्रा

Submitted by केदार on 23 April, 2014 - 00:01

मी XUV घेतल्यापासून महिन्यातून एकदा मला त्यांचा फोन येतो आहे, शेवटी काल जाऊन आलो, पण बरेच लुप होल्स दिसत आहेत. इथे कोणी घेतली आहे का ही मेंबरंशिप. काय अनुभव आहेत?

त्यांची माहिती.

फिचर्स
- एकुण ४० रिसॉर्ट आहेत व ५ अजून निर्मान होत आहेत.
- काही लोकेशन खूपच चांगले तर काही बेकार. उदा बँकॉक हे रेडलाईट एरिया मध्ये आहे. त्याची क्वालिटी २.५ स्टार तर कुर्ग, गीर अतिशय सुंदर. ४ + स्टार.

४ मेंबरशिप टाईप्स - २५ वर्षांकरता

पर्पल - नो ब्लॅक आउट डेट्स साधारण १० लाख रू मेंबरशिप फी
रेड - १ महिना ब्लॅक आउट ( उदा ख्रिसमस व्हेकेशन, मे शेवटचा महिना इत्यादी) - ४९९०००
व्हाईट - मिड सिझन - रु ३३२०००
ब्लू - लो / नो सिझन (म्हणजे भर पावसाळ्यात महाबळेश्वर इत्यादी)

दर वर्षी ७ दिवस व्हेकेशन

जर मेंबरशिप व्हाईट असेल आणि पिक सिझन मध्ये जायचे असेल (रेड) तर ७ ऐवजी ५ दिवसच व्हेकेशन घेऊ शकाल.

म्हणजे जर तुम्ही रेड मध्ये असला तरच तुम्हाला थोडी तरी फ्लेक्झिबिलिटी आहे.

३ टाईपचे अकोमोडेशन

१. स्टुडिओ (म्हणजे वन बेड + लिव्हिंग) - मेंटेनंस फि दरवर्षी १२६००
२. वन बेड (म्हणजे २ बेड + लिव्हिंग) - मेंटेनंस फि दरवर्षी १७०००
२. टू बेड (म्हणजे ३ बेड + लिव्हिंग - मेंटेनंस फि दरवर्षी २५०००

थोडक्यात फि शिवाय दरवर्षी तुम्हाला हे पैसे द्यावेच लागतील. एक मुद्दा ते सांगत नाहीत तो म्हणजे ही जी मेंटेनंस फि आहे ती CLI म्हणजे कॉस्ट ऑफ लिंव्हिग इंडेक्स वर (RBI च्या) अवलंबून आहे, म्हणजे ती दरवर्षी वाढणार.

- एक्स्चेंज व्हेकेशन - त्यांचे RCI चे टाय अप आहे, म्हणजे तुम्ही तुमचे व्हेकेशन फक्त मंहिद्रा मध्येच घेतले पाहिजे असे नाही. पण त्यात मेख अशी की RCI तुम्हाला ९५०० रू प्रत्येक एक्झेंज ला चार्ज करेल. म्हणजे हे वेगळेच पैसे. शिवाय RCI ची मेंबंरशिप पण हवी. १० वर्षासाठी २०,००० वा एका वेळी (असे प्रत्येकवेळी ) ३५०० म्हणजे ३५००+९५०० दरवेळी तुम्हाला अतिरिक्त द्यावे लागतील.

- तुम्ही तुमचे व्हेकशन त्या वर्षी घेतले नाही तर ते पुढच्या वर्षे कॅरी फॉरवर्ड होते. असे एकुण ३ वर्ष. म्हणजे २१ दिवस. नंतर लॅप्स होणार.

- मेंबरशिप वा मेंटेनन्स मध्ये जेवण नाही, प्रतिदिवशी प्रतिमाणशी ८०० ते ९०० रू वेगळे. पण तिथे जेवण न घेण्याच्या पर्याय उपलब्ध आहे.

- मेंबरशिप मुलांना कॅरी फॉरवर्ड करता येते तसे मध्येच विकताही येते.

त्यांच्या विषयीच्या तक्रारी

१. मेंबर नेहमी कम्प्लेन करत आहेत की त्यांना हवे तेंव्हा (म्हणजे त्यांच्या वेळेनुसार) हवे ते रिसॉर्ट मिळत नाही. अर्धे रिसॉर्ट हे मेकमायट्रिप वगैरे टाईप लोकांन विकलेले असते. पण सांगताना मात्र फक्त मेंबर्स करता असे सांगीतले जाते.
२. मेंटेनन्स फि ही वाढत जाते ते पुढच्या वर्षीच लक्षात येते.
३. मेंबरशिप टाईप प्रमाणे व्हेकेशन कधी घ्यायचे हे आधिच ठरल्याप्रमाणे जर व्हाईट ने रेड मध्ये घेतले (मिळाले तर) त्याला २ दिवस सरेंडर करावे लागतील म्हणजे एकुण ५ दिवसच. आणि मिळत नाही ह्याची खात्री.

आता एक केस स्टडी.

असं समजू की दर वर्षी ५ टक्यांनी ती मेंटेनंस फि वाढेल. (खरेतर इन्फ्लेशन १० टक्के आहे, पण अ‍ॅव्हरेज)

पर्पल मेंबर - १०००००० + मेंटेनन्सचे ( स्टुडिओ ) ६०१००० = सोळा लाख
एकुण रात्री १७५
प्रत्येक रात्र = ९१५०

आणि
रेड ४९९००० + ६०१००० = ११०१०००
एकुण रात्री १७५
प्रत्येक रात्र = ६३००

थोडक्यात सध्याही तुम्हाला ९१५० नी ६३०० नी रुम्स हव्या त्या ठिकाणी मिळत आहेतच. इनफॅक्ट ह्यापेक्षा कमी. पण तुम्ही २५ वर्षासाठी लॉक करून ठेवत आहात हा मोठा फायदा.

तर ते पण पाहू.

समजा तुम्ही सध्या १०००० रू च्या रूम मध्ये राहता, आणि २५ वर्षानंतर हीच रूम तुम्हाला ३२५०० ला मिळेल. पण मोठा फायदा म्हणजे कुठलाही रिसॉर्ट असणार.

आणि समजा सध्या ६००० ते ७००० रू प्रति दिवशी देता तर २५ वर्षानंतर हीच रूम तुम्हाला ११५०० ला मिळेल.

(इथे सगळीकडे ५ टक्के प्रत्येक वर्षी हाच रेट वापारला आहे,त्यामुळे अ‍ॅपल टू अ‍ॅपल)

तर रेट लॉक मध्ये सगळंच चांगल वाटत आहे, पण प्रत्यक्ष अनुभव खूप लोकांचा वेगळाच आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रस्ट मी केदार, अजिबात घेऊ नका ही मेंबरशिप!

मी नाही नाही म्हणत असताना माझ्याकडे दुर्लक्ष करून माझ्या चुलत भावाने घेतली होती.

जाणे तर एकदाही कुठेही होऊ शकले नाही, पण ते त्याच्या बिझी शेड्यूलमुळे! पण त्यांच्या नंतर सांगितल्या जाणार्‍या अटी वगैरे अश्या असतात आणि ते सगळे इतके लाँग टर्म असते की आपण फसलो आहोत हेही सांगायची लाज वाटू लागते.

आमच्या एका नातेवाईकांची होती मेंबरशिप, ते जायचे दरवर्षी. आता एवढ्यात काही कल्पना नाही. त्यांना जवळपास सहा महिने आधीच बुकिंग करावे लागायचे, कारण खूप लवकर हे रिझॉर्ट्स बुक होऊन जातात. अटी आहेतच, कधीकधी ऑफ सीझन ला जावे लागते वगैरे, पण तरीही या फॅमिलीने भरपूर एंजॉय केले होते. ही रिसॉर्ट्स चांगल्या लोकेशन्स ला असतात, स्टाफ एकदम चांगला असतो, एशो आरामात ३-४ दिवस रहाता येते असा त्यांचा अनुभव होता. त्यांची कुठल्याच वर्षीची ट्रीप वाया गेली नाही. उलट त्यांचे म्हणणे होते की दरवर्‍षी कुठे जायचे, कुठे रहायचे यावर डोकेफोड करायला लागत नाही, वर्षाची एक ट्रीप तरी फिक्स होऊन जाते. बाकी मग अजून दुसरी हवी असेल तर आपल्या वेळे-मर्जीप्रमाणे आखता येते.

दर वर्षी कुठेतरी जायचेच आराम करायला असा प्लॅन असेल तर ही मेंबरशीप चांगली आहे. मी आधी महिंद्रातच असल्याने आमच्या कंपनीतुन आम्हाला जायला मिळायचे. रिसॉर्ट्स चांगल्या ठिकाणि आहेत. नीट प्लॅन करुन ठेवले तर बुकिंगही मिळते.

पण खुप फिरायचे वगैरे असल्यास मात्र ही आयडीया खास नाही. कारण यांचे रिसॉर्ट्स अगदी रिमोट जागी आहेत, तिथुन बाहेर पडुन फिरायचे असेल तर हाल होतात. पण फक्त आराम हा हेतु असेल तर मग बेस्ट. रिसॉर्टमध्येच खुप रमायला होते. बाहेर जायची गरज पडत नाही.

मूळात एकदा पैसे भरल्यावरही दरवर्षी मेंटॅनन्स चार्जेस आहेतच.
त्यात मुलाबाळांच्या परीक्षा संपल्यावरच्या काळात किंवा दिवाळीत यांचा मेन सीझन.
रिसॉर्ट खूप गावाबाहेर असल्याने येण्याजाण्यात पैसे जातात.
आपण जेव्हा कुठलीही टूर प्लॅन करतो तेव्हा फिरणे, खाणे पिणे, त्या ठिकाणापर्यंत जाऊन येणे यात पैसे जास्त जातात आणि तिथे रहाणे या गोष्टीवर फार कमी.
भारतात कुठेही चांगली हॉटेल रूम ४०००-५००० पर्यंत मिळते.
साधी / स्टँडर्ड २००० पर्यंत.
परदेशातही ट्रीप अ‍ॅडवायजर सारख्या साईटवर लक्ष ठेऊन बसले तर खूप स्वस्त डील्स मिळतात.
पुन्हा त्यात स्टे बरोबर ब्रेकफस्ट असतो.
त्यामुळे नुसत्या स्टेवर इतका पैसा का गुंतवा?

'वेकेशन विकत घेणे' हा कन्सेप्ट आपल्या इथे अजून रुजलेला नाही. भविष्यातल्या सुट्ट्यांसाठी (हॉलिडे) आत्ताच गुंतवणूक करा हे ज्यांच्या पचनी पडतं आणि तशी गुंतवणूक ज्यांना फायदेशीर वाटते त्यांनी जरूर पैसे गुंतवावेत.

तिकडे जेवणखाणाचे वेगळे पैसे भरावे लागतात. म्हणजे फक्त अ‍ॅकोमोडेशन चार्जेसमधे तुम्ही सो कॉल्ड बचत करता (गेलात तर).

आमच्या एका ओळखीतल्या कुटुंबाने घेतलेली आहे ही मेम्बरशिप. गेल्या २-३ वर्षांत १-२ वेळा ते जाऊन आलेले आहेत. जास्तीत जास्त ४-५ दिवसांची(च) टूर असते बहुतेक..
आणि ही फॅमिली ऑड सीझनलाच जाते.. (मुलांची इथे-तिथे सोय लावून)
सुट्ट्यांच्या सीझनमधे आपल्या हव्या त्या तारखांना त्यांची रिसॉर्टस मिळत नाहीत
साधना +१.
त्यांची रिसॉर्टस मुख्य पिकनिक स्पॉटस पासून दूर असतात असं मी पण ऐकलंय. 'एकदा त्या दिशेला जातोय तर सगळं फिरून येऊ' हा मोटो नसेल तरच आवडतील टूर्स. 'भटकंती' हा मुद्दा टूर प्रोग्राममधून गाळावा लागेल.
(ही सारी ऐकीव माहिती.)

आम्ही घेतली ही मेंबरशिप, कां कोण जाणे. Sad कारण आम्ही अजिबात फिरत नाही खरंतर Sad

पैसे पाण्यात गेले असं धरून चाललेय मी, कारण मेंबरशिप घेतल्यानंतरच सगळी निगेटीव्ह ओपिनियन्स कानावर आली माझ्या.

साधनाला अनुमोदन.

महिंद्राची काही रिसॉर्ट चांगली आहेत.. शहरापासून दूर असल्याने अगदी निवांत वाटतं. महिंद्राने त्यांच प्रेझेंन्टेशन अटेंण्ड केल्या बद्दल फ्री गिफ्ट व्हॉवचर दिलं होतं... त्यात मी कुर्गच्या रिसॉर्टला जाऊन आलो... A1 रिसॉर्ट.. खुप आवडलं.

तुला ऑफ सिजन मधे जाता येण शक्य असेल तरच मेंबरशिप घे...

केदार, 'रिटर्न ऑफ इन्वेस्टमेंट'च्या दृष्टीने मला तुझ्याकडून या मेंबरशिपविषयी सविस्तर मुद्दे अपेक्षित आहेत.

चिक्कार म्हणजे चिक्कार म्हणजे चिक्कार मागे लागतात. त्यामुळे आपल्या सहलीच्या कल्पना, किती वेळा सहलीला जाणार, मुलांची वयं याचा सगळा विचार करून मग निर्णय घ्यावा हे उत्तम!

साधनाला अनुमोदन. रिसॉर्ट रिमोट जागी असतात पण परीपूर्ण असतात. लहान मुलांकरता आत सगळे यशस्वी प्रकार बहुधा असतातच. जेवण वगैरे ओके ओकेच असतं. पण पूर्ण आरामाची गॅरंटी! वर्षातून एकदा रिज्युविनेट होण्याच्या दृष्टिकोनातून वाईट नाही.

पण....

इतके पैसे देऊन वर्षाकाठी फक्त ८ दिवसांकरता लिमिटेड चॉईसमधील जागी जाणे मला तरी झेपणार नाही. खरंतर आता त्यांची भरपूर ठिकाणी रिसॉर्ट्स झाली आहेत पण तरीही लिमिटेड अशासाठी की सगळे मेंबर आधीपासून बुकिंग करत असल्याने बर्‍याच ठिकाणी फुल्ल झालेले असते. मग आपले जागांचे चॉईस कमी होतात. शिवाय खूप आधी बुकिंग करावे लागते. इतक्या दूरदृष्टीने ट्रिप प्लॅन करण्याची कला प्रत्येकाला साध्य असेलच असे नाही. आयत्यावेळी कामं / आजारपणं निघाली की गेली ती वार्षिक ट्रिप बाराच्या भावात!

दुसरं म्हणजे दर वेळी महिंद्रालाच जाऊन मला तरी बोअर होईल. राहण्याचे ठिकाण निवडण्याच्या बाबतीत चॉईस असणे मला तरी आवडेल. अशावेळी दुसरी एखादी प्रॉपर्टी आवडली पण मेंबरशिप घेतल्याने (आर्थिकदृष्या विचार करता) महिंद्रामध्येच जाऊन रहावे लागले असे झाले तर वैताग येईल.

कधी भरपूर साईटसिइंग करण्यासाठी छोट्या हॉटेलामध्ये, पण त्या स्थळांच्याजवळ राहणे सोईचे असते. अशावेळी जर क्लबची प्रॉपर्टी दूर असेल तर आली ना पंचाईत. 'शिंगरू मेलं येरझार्‍यानं 'अशी परिस्थिती ओढवेल.

जवळजवळ सर्व महिंद्रा प्रॉपर्टीज आधीच अस्तित्वात असलेल्या हॉटेलांकडून विकत घेऊन मग डेव्हलप केल्या आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी सारखाच कंफर्ट असेल असं नाही. उदा. पाँडिचेरीच्या महिंद्रा क्लबमध्ये दगडी फरशांचे रस्ते. दोन फरशांमध्ये जागा. लहान मुलं आणि म्हातारी माणसं हमखास धडपडण्याची गॅरंटी. नशिबाने त्यांच्याकडे व्हिलचेअर होती. त्यामुळे अपंग, म्हातारे, वळवळी पोरं असणारे यांच्या काही खास गरजा पुरवणारी प्रॉपर्टी आपण निवडलेल्या ठिकाणच्या क्लब महिंद्रामध्ये असेलच असे नाही.

सारांश : आम्ही त्यामुळेच महिंद्रा क्लबची मेंबरशीप घेतली नाहीये.

पण कधीमधी मनात आलं तर बुकिंग करून / आयत्यावेळी धडकून तिथे राहतो. मुन्नारला एका ट्रि-हाऊसवर राहण्याचा अनुभव घ्यावा म्हणून बुकिंग केलं होतं पण तिथे जाऊन बघितल्यावर राहण्याची इच्छा होईना. मग मुन्नारच्या क्लब महिंद्रामध्ये जाऊन राहिलो. त्यांनीही आम्हाला अपग्रेड करून एक मस्त भलामोठा स्युईट देऊन आमचा 'आनंद' दुणावण्यास मदत केली.

हे असलच प्रकरण ए एस क्लबच पण आहे. त्यांच तर हॉलीडे होम ओनरशिप असाही ऑप्शन होता. तेवढे पैसे तेव्हा गुंतवायचे नव्हते त्यामुळे आम्ही नाद सोडून दिला.

नव-याच्या मित्राची फॅमिली खूश आहे बरच फिरुन झालय त्यांच.

माझे निरिक्षण -

१. अचानक सिझनमध्ये पाहिजे तिकडे जायला मिळत नाही.. म्हणजे उन्हाळामध्ये हिमाचल प्रदेशात.
२. दोन/ तीन प्रकार असतात (प्रीमीयम, लक्झरी, इकॉनामी) मिक्स नसतात.. म्हणजे एक ट्रीप प्रीमीयम आणी एक ट्रिप नंतरची लक्झरी वगैरे
३. बुकीग अगोदर करु शकतात आणि नंतर इतरांबरोबर बदलून घेउ शकतात पण यामुळेच लोक खूप अगोदर बुक करुन ठेवतात त्यामुळे आपली गैरसोय होते.. शेअर मॉर्केटसारखे लक्ष ठेवावे लागते..

म्हणून घेतले नाही.. पण ऑफ सिझन (हा पण वेगळा आणी चांगला अनुभव असतो), आराम घेउन फिरणे (मुले/ आईवडील असतील तर खूप चांगले) आणी अंदाज लावता येत असेल/ योजना करता येत असेल तर खूप चांगली योजना आहे. कधी कधी त्यांची चांगली डील मिळते... Negotition करा..

व्हेकेशनवर कसली आली आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट केदार. प्रवासाची पूर्वतयारी करणार्‍यातला असशील तर मग तुला उपयोगाची नाही ही मेंबरशिप.
थोड्या आळशी कॅटेगरीतला असशील तर झकास आहे. रिसॉर्टस खरोखर फार सुरेख असतात. पण टुरिस्टी टिकमार्क लावायला फारसे उपयोगाचे नाहीत कारण साधनाने दिलेय तेच.
आमची आहे मेंबरशिप. आतापर्यंत गोवा, कुर्ग, मुन्नार, केरळ, मलेशिया इथे गेलो आहोत. आमच्या काही अविस्मरणीय आठवणी आहेत कुटुंबाबरोबर.
मला सारखी सारखी पूर्वतयारी करायचा कंटाळ येतो. त्यामुळे मला आवडते त्यांची मेंबरशिप.

रैना, खूप आधी प्लॅन कराव्या लागतात नां ट्रीप्स ह्यांच्याकडे बुक करताना? आळशीपणा करून हातात बुकिंग लागतं?

आडो- नाही खूप आधी नाही. आम्ही साधारण दोनेक महिने आधी केलेली आहेत बुकिंग्स.
आडो- शेवटी whatever works for you चा निर्णय आहे तो. म्हणजे सतत माहिती काढणे, मग डील्स पाहणे वगैरेचा कंटाळ येतो. इथे म्हणजे डोळे झाकुन जाता येते.
पण वर्षातली एखादी ट्रीप टुरिस्टी करायची असते तेव्हा मात्र हे वापरत नाही. मुलांसोबत, पालकांसोबत जाताना मस्त आहे तो ऑप्शन.

इतके पैसे देऊन वर्षाकाठी फक्त ८ दिवसांकरता लिमिटेड चॉईसमधील जागी जाणे मला तरी झेपणार नाही. >>

सातच. राईट ऑन. मलाही त्यांच्या तिथेच व्हेकेशन करायचा कंटाळा येईल.

रैना अगदी, मी स्वतःच सगळी प्लानिंग करून चांगले व्हेकेशन केले आहेत त्यामूले मलाही तेच ते स्पॉट करायचा कंटाळा येईल.

व्हेकेशनवर कसली आली आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट केदार. >. +1 पण असे बघ, आपण त्या नादात ऊगाच जास्त पैसे गरज नसताना का द्यायचे. म्हणून मंजूडी तसे म्हणाली असणार. मह्णजे शेजारचे तसेच रिसॉर्ट १०००० ला असताना आपण २०००० का द्यावेत?

केदार, छान अ‍ॅनालिसिस केलायस.

हे जे रेटस आहेत ते कितीजणांकरता आहेत? दोघांचेच असतील ना? मुलांचे वेगळे पैसे भरावे लागत असतील ना?

हे जे रेटस आहेत ते कितीजणांकरता आहेत? दोघांचेच असतील ना? मुलांचे वेगळे पैसे भरावे लागत असतील ना? >>

२ अ‍ॅडल्ट + १ किड. आणखी एक किड असेल कि खिशाला किड लागलीच. Happy पण तो सेल्समन म्हणतोय की दोन किडसही राहतील. देव जाणे काय खरं आहे ते. अगदी २ +२ असे म्हणून काही केस मध्ये, काही मध्ये नाही असे दिसते कारण काही लोकांना त्यांनी चार्ज केले आहेत.

मामी, मस्त कव्हर केलेस सगळे मुद्दे...
मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसल्यामुळे हे लिहू शकले नाही. पण त्या ओळखीच्या फॅमिलीकडून वर्णन ऐकल्यावर माझ्या डोक्यात हेच सगळं आलं होतं.
(मुन्नारला जायचं आणि त्याच्या आसपासची, बर्‍यापैकी जवळ असलेली केरळमधली इतर प्रसिध्द ठिकाणं न पाहताच परत यायचं हे मला जरा न झेपणारं आहे.)

धन्यवाद, लली.

भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबात सरासरी काढली तर २.५ मुलं निघतील. अशावेळी 'आपण दोघं, आपलं एक' अशी चिनी पॉलिसी गृहित धरून क्लबवाले लबाडीच करत आहेत असं वाटतं.

केदार, वरच्या स्टॅटिस्टिक्समध्ये क्लबच्या मेंबर्सची एकूण संख्या किती आहे हे ही लिही प्लीज.
समजा ५००० मेंबर्स आहेत असं गृहित धरलं तर ५००० मेंबर्स ४० रिसॉर्टस किंबहुना महत्त्वाच्या ठिकाणचे असे साधारण २५ रिसॉर्टस बुक करू इच्छित असतात हे लक्षात घ्यायला हवं. जर या २५ रिसॉर्टसमागे ४००० (धरून चालू) मेंबर्स असतील तर आपल्याला किती आधी बुकिंग करावं लागेल हे बघा. शिवाय यात त्या त्या रिसॉर्टचे डायरेक्ट बुकिंग करणारे वगैरे असेलच.

केदार, बेस्ट अ‍ॅनालिसीस.

मामी, दोघांचे नाही, मला वाटतं २+२ अश्या फॅमिलीचे असतात, आणि मेंबरशिप पुढे मुलांपर्यंत कॅरी फॉरवर्ड होते. याचे तपशील चेक करायला पाहिजेत.

आम्ही ज्या ब्लॉकमध्ये पैसे गुंतवण्यास रस दाखवला तो ब्लॉक दुर्दैवाने (त्यांच्या की आमच्या? Proud ) उपलब्ध नव्हता. काहीतरी १० लाखाचा ब्लॉकच त्यावेळी उपलब्ध होता, तेवढे पैसे आमच्याकडे त्यावेळी नव्हते (आजही नाहीत. असले तरी यात गुंतवण्यापेक्षा दुसरीकडे गुंतवणे स्वीकारू.)
मह्णजे शेजारचे तसेच रिसॉर्ट १०००० ला असताना आपण २०००० का द्यावेत?>>> किंवा, भविष्यात २५०००/- दर असणारी रूम आज ५०००/- रुपयांना बूक करून ठेवावी हे आम्हाला पटण्यासारखे नाहीच.

मेंबरशिप पुढे मुलांपर्यंत कॅरी फॉरवर्ड होते. याचे तपशील चेक करायला पाहिजेत. >>. हो करता येते. शिवाय मध्येच विकताही येते.

केदार मस्त अ‍नॅलिसिस..

कुठे तरी लांब रिसॉर्ट्स हाच महत्त्वाचा तोटा आहे ह्यांचा... जेवण बाहेर घेतले तर चालेल असे जरी म्हणत असले तरी त्यांच्या रिसॉर्टच्या जवळ रेस्तराँ नसेल तर त्यांच्याकडे जेवणाशिवाय पर्याय नाही.. आणि असे कुठेतरी लांब असल्यामुळे तिथले रेट्स जास्तच असतात..

तो प्रश्न मी विचारला होता. सध्या एकुण १६०००० मेंबर्स आहेत आणि एकुण रूम संख्या २२५०००

असे असले तर वॉक इन पण सोय हवी असे मी विचारले. तर रेप ने उत्तर दिले की १ दिवस आधी करता येईल. मह्णजे मी जे म्हणतो ते तो म्हणाला.

पण जेंव्हा मी म्हणालो की लोकांना रूम्स का भेटत नसाव्यात? तर त्याचे उत्तर टिपिकल टाईप ऑफ मेम्बरशिप असे आले. म्हणजे सिझन / ऑफ सिझन मला तो घोळ वाटला.

मी नेट वर इतरत्र शोध घेतला तर रूम ह्या दोन दोन महिने आधी बुक कराव्या लागतात असे कळाले. म्हणजे ते लोकं इतरांना (नॉन मेम्बर्सना ) विकतात. (मामी पण राहून आल्या) पण सांगताना मात्र केवळ मेम्बर्स साठी आहेत असे खोटे सांगतात.

दोनेक महिने आधी बुक केले तर रुम्स मिळतात पण माझे व्हेकेशन दोन दोन महिने आधी नाही ठरत, बरेचसे माझे व्हेकशन हे आदल्या दिवशी पण ठरले आहेत. उदा ह्या शनिवारी सकाळी उठल्यावर मी महाबळेश्वरला जाऊन यायचे ठरवले आणि आम्ही जाऊन राहून आलो.

महाराष्ट्रात केवळ दोन तीन रिसॉर्ट आहेत.

मामी पण राहून आल्या >>>> दोनवेळा. मुन्नारला आयत्यावेळी आणि पाँडिचेरीला व्यवस्थित आधी बुकिंग करून. पण दोन महिने आधी नक्कीच केलं नाही. फारतर ३ आठवडे आधी केलं होतं. पाँडिचेरीचं रिझॉर्ट फुल्ल होतं. म्हणजे डिमांड असूनही नॉन-मेंबरला ३ आठवडे आधी बुकिंग करून रुम (२ रुम्स. माझे आईबाबाही होते.) मिळते तर मेंबरला २ महिने आधी बुक करावे लागते.

कूर्गचं महिंद्रा रिसॉर्ट बघितलं नाहीये. छान आहे असं खूप ऐकून आहे. पण कूर्गला जायचं तर ऑरेंज काउंटी हा सर्वोत्तम पर्याय आहे असं वाटतं.

आमच्या एका ओळखीच्याची आहे मेंबरशिप. तो क्वचित प्रवासाला जातो. एरवी मित्रमंडळींमधे विचारतो आणि ज्यांना इंटरेस्ट असेल ते जातात. जवळचे मित्र असतील तर त्याला पैसे देत नसावेत त्याला. लांबचे असतील तर देत असतील. आम्हाला त्याने एकदा विचारले होते तुम्हाला जायचंय का म्हणून पण तेव्हा आम्हाला शक्य नव्हते त्यामुळे तपशीलात शिरलो नाही. पण लोक्स असेही करतात.

माझ्या मैत्रिणीने घेतलेय त्याची मेम्बर्शीप अडीच लाखाची ( तीन/चार वर्षांपूर्वी ). तिची फ्यामिली दरवर्षी २-३ वेळा जाते ट्रीप ला पण कुठे तर महाबळेश्वर आणि लोणावळा . ते सात दिवस वापरायचे असतात म्हणून. दोन- तीन वर्षांपूर्वी फक्त एकदा लांब म्हणजे कुर्ग ला गेली होत अस मी ऐकलय. आम्हा इतर मैत्रिणींना अजिबातच इंटरेस्ट नसल्याने आम्ही जास्तीची माहिती कधीच विचारली नाही.

आम्ही आपले आयत्यावेळी अचानक ठरवून रजा वगैर म्यानेज करून जाणारी माणस.आत्ता मेबर्शिप घेतलेय म्हणजे जाण आलंच अशा पद्धतीचा ताप कोण घेणार ?. त्याच्यापेक्षा फिक्स डीपोझीट मध्ये गुंतवावेत . दर तीन महीन्याच व्याज घ्याव आणि जाव महाबळेश्वर आणि लोणावळ्याला Happy

केदार, त्यात इंटरेस्ट पण धरा ना >>
आयडियली यस. कारण ते पैस तुमच्या खिशातून जातात. ४९९००० कॅश नी देणारे खूप कमी असतात, बरेच जण लोन घेतात. तर तो ही ऑपश्न विचारला होता. एका वर्षाला शून्य इंट्रेस्ट पण जर दोन वर्ष लोन घ्याल तर ७.५ टक्के, चार घ्याल तर ८

म्हणजे ते १ लाखाच्या आसपास वेगळेच. त्यालाही अ‍ॅड केले की मग रुम ची परडे किंमत जास्तच होणार.

आणि १० लाखावर तर खूप व्याज जाणार. (जर कोणी १० लाख देऊन व्याजाने मेंबरशिप घेतली तर) अर्थात मी रेडचा विचार करत होतो.

१० लाखाचे एका वर्षाचे व्याज ८०००० जरी घरले तरी तेवध्या पैशात मला वाटते ७ दिवसाची फॅमिली ट्रीप होउन जाइल.... आणि वेगवेगळ्या ठिकाणी. थोडे फार जास्त लागले तर मग त्या १० लाखातले वापरायचे Wink

तसं तुम्ही वाचलत असेल, तरी ही लि़ंक पहा

Club Mahindra Membership is my biggest Financial Mistake
http://www.tflguide.com/2012/07/club-mahindra-membership-fees-review.html

आणि हो, घ्यायचीच असेल तर, olx/quikr वर सेकंड-हँड घ्या ४०-५० % डिस्काउंट.

केदार,

तुमची लदाख मोहीम आणि सायकलिंग वगैरे छंद पाहता तुम्ही 'उडते पंछी' दिसताय! Happy एका ठराविक गोटात मोडणारी सहल करणे तुम्हाला २-३ वर्षांत कंटाळवाणे वाटू शकेल. तसेच २५ वर्षे हा खूप म्हणजे खूपच प्रदीर्घ कालावधी आहे. म्हणून या प्रस्तावाकडे केवळ गुंतवणूक म्हणूनच बघावे असं सुचवेन.

मात्र मला या प्रकाराबाबत काहीच माहिती नाही. ना मी कोणाचे अनुभव ऐकले आहेत. ही बाब स्पष्ट व्हावी. Happy

आ.न.,
-गा.पै.

अगदी!
१-२ वर्षांनंतरची टूर प्लॅन अवश्य करा, पण त्यासाठीचे पैसे स्वत:च गुंतवा (म्हणजे स्वतःजवळच ठेवा) हे काय वाईट आहे? Wink

गामा खरं आहे. माझे व्हेकेशन एका ठिकाणी पडून राहून नसते, बायकोचे तसे असते Happy

धन्यवाद कोल्डकॉफी.

त्याल लिंक मध्ये 9,681 हा २०११/१२ चा रेट होता. आणि २०१४ चा म्हणजे केवळ दोन वर्षात ३००० रू वाढून तो १२६०० झाला आहे, म्हणजे दोन वर्षात व्हूपिंग ३० टक्के वाढ. आणि मी ५ टक्के घेतोय !! म्हणजे मार्केट रेट पेक्षा प्रचंड जास्त !

गेली १० वर्षे मी ऑन रोड आहे. प्रचंड ट्रॅव्हल केले आहे.. पण कुठेही मी दोन वर्षात ३० टक्के वाढ अजून बघितली नाही.

आता आणखी एक गणित करू !

चक्रवाढ व्याज

मी ५ लाख बँकेत ठेवणार आहे. पूर्ण २५ वर्षांसाठी आणि + मेंटेंनस असा विचार करू.

मी जर ५ लाख रू ८ % नी २५ वर्षांसाठी चक्रवाढ व्याजाने ठेवले तर शेवटी मला २७१८००० मिळतील. शिवाय दरवेळचे मेंटेनंस अगदी आपण फक्त ते पहिले ६ लाखच घेतले तर एकुण रक्कम ३३ लाख / १७५ = १८९०० परडे मी देऊ शकेन.

आता हा १८९०० परडे अ‍ॅव्हरेज पकडू. म्हणजे पहिले काही वर्षे तुम्ही ती रूम ७-८००० परडे ने घेऊ शकता, ती सेव्हिंग आणि नंतरचे से १५ वर्ष तुम्हाला १९००० पेक्षा जास्त पर डे द्यावे लागतील, तो ओव्हरड्राफ्ट आता हे तुम्ही त्यांच्याकडे भरलेल्या पूर्ण रक्कमेसोबत टॅली करू. अ‍ॅव्हरेज येईल ७००० च्या आसपास. (खरे तर वरचा दरवर्षीचा रेट पाहता, ते ७ ऐवजी १२-१३००० हजार येणार कारण ३००० ची वाढ २ वर्षात) आणि तरी तुमच्याकडे उरलेले ४-५००० अ‍ॅव्हरेज परडे असतील. Happy

म्हणजे पहिले १०-१२ वर्ष तुम्ही ब्रेक इव्हन होणारच नाही. शेवटचे काही वर्ष तुम्ही ब्रेक इव्हन + मध्ये असणार. आणि ट्रेंड असा आहे की लोकं चुकीच्या वेळी मेंबरशिप (काही वर्षानी ) विकत आहेत.

थोडक्यात ही मेंबरशिप कोणी घ्यावी
- तुम्हाला एका ठिकाणी राहून मस्त आरामदायी व्हेकेशन करणे आवडत असेल तर.
- तुम्ही पूर्ण २५ वर्ष उपभोगणार असाल तर
- तुम्ही तुमचे व्हेकेशन बरेचदा त्यांच्या वेळेनुसार / लोकेशन नुसार अ‍ॅडजस्ट करणार असाल तर.
- व्हेकेशन कुठे घ्यावे ह्याची झंझट आउटसोर्स करणे आवडत असेल तर.

आणि कोणी घेऊ नये.
- उरलेले सर्व Happy

Timeshare holidays concept works better in developed countries. RCI is a major player in this field. I had written the brochure for launching their scheme in India Hyd with Country Club. It all seems governed by too many rules. It is so structured. I dont like anyone to tell me where to go at work! forget about personal time and vacations. I do it on my own time and money.

besides the costing will have hidden margins for the seller. It is never for the pure benefit of customer. It is an illusion.
you can check RCI website. if you buy RCI time share in US you will get some properties in India also. That will work out to be a better deal than going for this.

रैना ,पेटथेरपी+ .
गामा पै चे विश्लेषण बरोबर .तुम्हाला क्लब महिंद्राचे रेट परवडणारे आहेत हे त्यांनी ओळखले आहे .बाकी राहिले वैल्यु फॉर मनी .तुम्ही हॉलिडेआईक्यु वरचे हॉटेल रिव्यु वाचले असणार हे गृहीत धरतो .कितीजणांना त्यांच्या ऑफिसकडून फुकट (=पर्कस) मिळत असेल तर त्यांचे अनुभव फक्त हॉटेलविषयीच असतील रिटर्न म्हणून नाही .

हम्म. वाचतेय. एक्सयुवी बरोबर २ वर्षाची महिंद्रा परपल क्लब मेंबरशीप मिळाली आहे. त्याच्या टर्म्स अजुन नीट वाचल्या नाहीत. आता कुठेतरी व्हॅकेशन प्लॅन करुन पहायला हवे.

केदार, मस्त सविस्तर लिहीलंयस.

मेंबरशीप परत कशी करता येते? काही चार्जेस भरावे लागतात कां? (लागत असतीलच म्हणा). भरलेले पैसे परत वगैरे मिळतात कां? Wink

फिरणारी व्यक्ती त्याच्या एक महिन्याइतके उत्पन्न सहज उडवू शकते (चिमटा न बसता ).>>> हे जरा जास्त होतय असं नाही वाटत?

थोडे अवांतरः
केदार, आयडली आणि अ‍ॅप्रॉक्सिमेटली, एका महिण्याचे उत्पन्न हे किती महिण्याचे सेव्हिंग्ज असावे....

मामींचा प्रतिसाद पटला Happy
इतके पैसे देउन आपण बांधील होणे आणि त्यांच्या टर्म्स वर सर्व काही मिळणे हे काही फार उत्तम वाटत नाही.
ऑप्शन्स हातात हवेत.

Srd | 23 April, 2014 - 17:40 नवीन>>> तस नाहिय हो.... साधारणपणे ३० ते ४० % जरी नेट सेव्ह केले तर एका महिण्याचे उत्पन्न उडवायचे म्हणजे २.५ ते ३.३ महिण्याचे सेव्हिंग्ज उडवावे लागतील ना आणि जर २० ते २५ % सेव्हिंग होत असेल तर ४ ते ५ महिण्याचे सेव्हिंग असतील... म्हणुन एका महिन्याचे उत्पन्न म्हटल्यावर मला जरा ते जास्त वाटले Happy

Pages