maji mulgi 10 mahinyachi zali pan tila ajun ak hi daat nahi ala kay karave?

Submitted by मेघा कोकितकर on 23 April, 2014 - 02:16

maji mulgi 10 mahinyachi zali pan tila ajun ak hi daat nahi ala kay karave?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही करू नये.. Happy काही मुलांना उशिरा दात येतात. एक-सव्वा वर्षाची होईपर्यंत यायला सुरवात होईलच.

काहीही करू नका. फारफारतर तुमची चिंता मुलीच्या डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. ते तुम्हाला या चिंतेतून बाहेर काढतील.

अनघा. + १०००.

दात आले नाहीत म्हणून खायला देताना जेवण मिक्सरमधून काढून देऊ नये. दूध / वरण/ भाजीचं पाणी/ सूप ह्यात भिजवून मऊ केलेली पोळी. मुरडून त्यानंतर वरण घातलेला भात द्यायला अजिबात हरकत नाही. हे खाण्याची एक्दा सवय लागली की महिन्याभरात, दात आलेले नसले तरी भाजी, ताजी मऊ पोळी (न भिजवता) द्यायलाही हरकत नाही. ह्याने हिरड्यांवर दाब पडून दात येण्यास मदत होते. बाळाला चावण्यासाठी टीदर्स द्या. आता बाळ मोठे झाले असल्याने ब्रश सारखा एक टीदर येतो तो दिल्यास उत्तम,

फार फार कमी मुलांच्या बाबतीत असे होते की त्यांना दात येत नाहीत. दीड वर्षापर्यंत दात आले नाहीत तर डेन्टिस्टचा सल्ला नक्की ध्यावा.

लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १ ---- http://www.maayboli.com/node/46367

माझी मुलगी २ वर्षाची झाली तरी अजून बोलत नाही. २ अक्षरी शब्द अडखळत बोलते. तेही फक्त ममी, पाप, काका,..

बाकी अजून काही बोलत नाही. कुणी सांगेल का.. लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी काय करता येईल.

धन्यवाद .

दीपक. मुलगी दोनच वर्षाची आहे. अजून तीन चार महिन्यात भरपूर बोलायला लागेल. तुम्ही बोलत राहा तिच्याशी. आणि स्पष्ट बोला. आपण मुलांशी लाडे लाडे बोबडं बोललं की मुलांच्या बोलण्यावर परिणाम होतो.

असामि - असामि - कॅल्शियम दिल्याने आत्ता येणार्‍या दातावर लवकर येणे किंवा बळकट होणे असे काही परिणाम होणार नाहीत. हो पण परमनंट दात स्ट्राँग व्हायला मदत नक्की होईल. दात येण्याचा पॅटर्न मोस्टली जेनेटिक असतो.

{{ काहीही करू नका. फारफारतर तुमची चिंता मुलीच्या डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. ते तुम्हाला या चिंतेतून बाहेर काढतील. }}

आणि दात पण

{{माझ्या मुलीलाही उशिरा दात आले होते.आता ती चाळिशीची आहे.}}

????????????????????????

{{ माझी मुलगी २ वर्षाची झाली तरी अजून बोलत नाही. २ अक्षरी शब्द अडखळत बोलते. तेही फक्त ममी, पाप, काका,..

बाकी अजून काही बोलत नाही. कुणी सांगेल का.. लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी काय करता येईल. }}

फक्त तुम्हि तिच्याशि बोबडे बोलु नका

चिनूक्स - मी डेन्टिस्टची फुल टाईम असिस्टण्ट आहे. (नवरा डेण्टिस्ट आहे, त्याला अनेकदा त्याच्या क्लिनिकमध्ये असिस्ट करते.) इथे विचारलेल्या प्रश्नांना त्याला विचारूनच मग उत्तर देते.

थँक्यु मेघा या प्रश्नासाठी.... माझा मुलगा पण १ वर्षाचा होईल परवा... त्यालाही नाही आलेत दात अजून... "काळजी करू नको" असंच सगळ्यांकडून ऐकून चुपचाप वाट बघत बसलेय... तरीही सारखं मनात येतच... ( एकदा तरी मला स्वप्न पडलं की अनघ ला ५-६ दात एकदम आलेत... सकाळी उठून चेक पण केलं.. Proud )

ईकडे वाचून थोडे petience वाढले.... थँक्यू वेल माहीती साठी..... Happy

डॉक्टरांना विचारायचे प्रश्न लोक मायबोलीसारख्या व्यासपीठावर कसे काय विचारतात? इथले प्रतिसाद डॉक्टरपेक्षा खात्रीशीर असतात असं कसं वाटतं? Uhoh

प्रभाव काय? एखाद्याच्या तब्येतीवर इथला कुठला सल्ला बेतला तर काय करणारेत हे प्रश्नकर्ते? का आता काय करू म्हणून आणखी एक धागा काढणार?

वरदा, सहमत. तसंही दात आले नाहीत म्हणून कुणीच काहीच करू शकत नाही. आपली काळजी डॉक्टरांशी बोलून दाखवून वाट बघणं एवढंच हातात असतं. इथेही लोकं वेगळं काही सांगणार नाहीत.

वरदाजी,
तुम्ही अजुन बाकिचे बरेच धागे बघितले नाहित वाटतं.... इथे तर फक्त साधा दाताचा प्रश्न आहे. लोक इथे अगदी डायबिटीस , ब्लडप्रेशर , हार्ट ट्रबल वगैरे वर घरगुती सल्ला विचारतात / देतात / घेतात.

काही करू नये.. >>>>+१००००
माझी मुलगी २ वर्षाची झाली तरी अजून बोलत नाही. २ अक्षरी शब्द अडखळत बोलते. तेही फक्त ममी, पाप, काका.........मग अजिबात काळजी करू नका.ती अल्फाबेटस बोलते .केवळ अं अं करीत नाही.म्हणजेच वाचादोष नाही.(हे डॉक्टरांचे मत आहे). ५-६ महिन्यांनी स्वत:ला कान बाजूला काढून ठेवावे लागतील.हा स्वानुभव.

५-६ महिन्यांनी स्वत:ला कान बाजूला काढून ठेवावे लागतील.
<<
तेच.
आधी एक दोन वर्षे बोलत नाही, बोलत नाही करायचं,
अन मग नंतर वर्षानुवर्षे गप्प बस! म्हणून त्याच्यावर ओरडायचं Wink

वरदा,
मेडिकल स्टोअरवाल्याला विचारून ट्रीटमेंट घेणारे लोक जोपर्यंत आहेत, तोपर्यंत इथलाच सल्ला जास्त खात्रीशीर.