नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे तर चला मी तुम्हाला आमच्या गावी/घरी घेऊन जाते. नाडण हे गाव आहे हापुससाठी प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यात. हे एक अगदि छोटसं गाव आहे, ज्याची वस्ती असेल दोन अडीच हजारापर्यंत. कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन पासून ५० /६० कि. मी. दूर आहे. मुंबई गोवा हायवे तळेरे येथे सोडुन पाटगाव फणसगाव मार्गे ही जाता येतं. हे माझ्या सासरचे गाव आहे. दोन छोट्या टेकड्यांच्या मधे हे वसले आहे आणि मधुन जातो एक ओढा ज्याला आम्ही वहाळ म्हणतो. घरं सगळी थोडी उंचावर आहेत त्यामुळे पाय-याना ( कोकणच्या भाषेत पावठण्या) पर्याय नाही. चला, आता घर दाखवते. हे घर माझ्या आजे सास-यानी स्वतः बांधले आहे. त्यांना बांधकामाची जाण होती कोणतेही शिक्षण न होता सुध्दा.
हा आहे रस्ता आमच्या घराकडे जाणारा.
From mayboli
आता ह्या पाय-या उतरून आलो आपण खळ्यात म्हणजे अंगणात. घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.
From mayboli
हे आहे तुळशी वृंदावन. तो जो दगडी कोनाडा दिसतो आहे, त्यात संध्याकाळी निरांजन ठेवले की वारा न लागता तेवत राहते शांतपणे तुळशीपाशी.
From mayboli
मुख्य घराला जोडून माडी बांधलेली आहे. दोघांना जोडणारा छोटासा पूल
From mayboli
हे आहे परसदार ज्याला कोकणात आगर म्हणतात.
From mayboli
पोफळी अशा चव-या ढाळताहेत. पोफळीना वेढून मिरीवेल, आणि नागवेली उभ्या आहेत.
From mayboli
एका हौदात ही निळी कमळं डुलताहेत.
From mayboli
हे जवळून
From mayboli
पूजेसाठी लागणारी फुलं आगरात असतातच. ही डबल तगर.
From mayboli
हा चाफा
From mayboli
आणि ह्या जास्वंदी
From mayboli
From mayboli
हा कवठी चाफा
From mayboli
आमच्या आगरात बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनिया अशी विलायती झाडे ही आहेत बरं का
From mayboli
From mayboli
हे आहे वडाचे बोन्साय. अगदी पारंब्या आल्या आहेत.
From mayboli
कोकण प्रसिध्द आहे आंब्यांसाठी, पण इथले चिकू लाजवाब. असतात जरासे लांबट. साल असते बाहेरून खरखरीत आणि जाड. पण चवीला साखर फि़की पडेल इतके गोड आणि रसाळ.
From mayboli
हे आहे पेरवीणीचे फुलं. आमच्याकडे पेरूच्या झाडाला पेरवीण, चिकूच्या चिकवीण, लिंबाच्या लिंबीण असं म्हणतात. जसं शेजारच्या जोशी बाईना आपण जोशीण म्हणु तसं.
From mayboli
हे काय आहे ते सांगण्याची गरजच नाही.
From mayboli
वाळत टाकलेल्या सुपा-या आणि कोकमं
From mayboli
From mayboli
हा आमचा जॉनी. सदा लक्ष ठेउन असतो घरावर. जरा खुट्ट वाजलं की धावून जाणारा, मुलांनी मात्र कितीही त्रास दिला तरी शांत असतो. ह्याची शेपटी म्हणजे कडबोळं जणु.
From mayboli
आणि अंगाच मुटकुळं करुन गुरगुटुन झोपलेली आमची मनी. कुत्रा आणि मांजर हवीतच घरात.
From mayboli
घरं उतारावर असल्याने टेकडी चढून वर सड्यावर जाण्यासाठी अश्या पाय-या बांधलेल्या आहेत. ह्याच कोकणातल्या घाट्या. ही आमची घाटी माझ्या आजे सास-यांनी स्वतःच्या हातानी स्वतः कष्ट करुन बांधलेली आहे. त्यामुळे तिचे जास्त कौतुक आम्हाला. घाटीच्या दोन्हि बाजुला आंब्याच्या बागा आहेत.
From mayboli
आमराईचा दूरून व्ह्यु.
From mayboli
आमराई जवळून
From mayboli
From mayboli
From mayboli
लेकुरवाळा फणस. मे महिन्यात फणसाची भाजी, तळलेले गरे, फणसाची साट म्हणजे फणसपोळी, फणसाच सांद्णं असे विविध प्रकार बनत असत्तात.
From mayboli
करवंदाची जाळी
From mayboli
सड्यावरुन दिसणारा सूर्यास्त.
From mayboli
असं हे आमचं घर. आम्हाला सगळ्यांना अति प्रिय असणार. आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात, एकत्र, मजेत, आनंदात, रहात आहेत. आज तिथे पंधरा जण रहात आहेत. काही जण नोकरी निमित्ताने मुंबईला पुण्याला किंवा अगदी परदेशी ही गेले आहेत पण त्यांची घराबद्दलची, कुटुंबाबद्द्लची ओढ तिळमात्र ही कमी झालेली नाही. माझे सासरे त्यांच्या माणसांशी पत्राद्वारे संपर्कात रहात आता पुढची पिढी फोन, फेसबुक, वॉट्सअॅप, इमेल ने संपर्कात असते एवढाच काय तो फरक. बाँडिंग तसूभरही कमी नाही.
काय मस्त घर आहे! तुम्ही खुप
काय मस्त घर आहे! तुम्ही खुप भाग्यवान आहात . सुंदर ,शांत, आणि स्वच्छ परिसर, फळ, फुले पण मस्त. सर्व सर्वच छान. अगदी सगळ्यांप्रमाणे मलाही वाटते कि ४ दिवसतरी राहायला मिळावेत.
सुर्रेख !! दरवर्षी
सुर्रेख !! दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण भरपूर उपभोगलं आहे. त्याचीच उजळणी झाली
सुरेख.... किती शांत आणि रम्य
सुरेख.... किती शांत आणि रम्य परिसर आहे! सुंदर!!
घर, बाग, आमराई सगळं फारच
घर, बाग, आमराई सगळं फारच मस्त!! फोटो पण खूप छान आलेत, आणि तुम्ही ह्या सगळ्याची ओळख पण खूप मस्त करून दिलीयेत!
मस्तच लकी यु.
मस्तच
लकी यु.
किती सुरेख! कोकणातल्या
किती सुरेख! कोकणातल्या आजोळाची आठवण झाली.............. अगदी अगदी!
अप्रतिम !!! व्हाळाचाही
अप्रतिम !!! व्हाळाचाही [ओढ्याचा] फोटो हवा होता यांत.
[ वांयच तीट लावा ह्या धाग्याक ! माझीच दृष्ट लागात असां भय वाटता. ]
अनेक पिढ्या एकत्र नांदणारे
अनेक पिढ्या एकत्र नांदणारे कुटुंब म्हणून हेमाताई तुमचे कुटुंब फेमस आहे आपल्या पंचक्रोशीत, हे मी पहिल्यांदा लग्न होऊन गेले होते गावाला तेव्हा सासूबाई म्हणाल्या मला.
कोकण आमचं सुंदर मस्त घर मस्त
कोकण आमचं सुंदर मस्त घर मस्त परिसर मस्त मस्त फोटो ! मे महिन्यात आता जाउक व्हया !
अंजू , खरं आहे. एवढी एकत्र
अंजू , खरं आहे. एवढी एकत्र कुटुंब रहिली नाहीत आता. एवढ्या पिढ्या एकत्र एका स्वयंपाकघरात, खूप आनंदात रहात आहेत ही गोष्ट आता परिकथेतल्या सारखी वाटेल. पण आहे हे खरं आमच्याकडे. तुम्ही घरी आलात तर कोण कोणाची आई आहे आणि कोण का़कू तेच कळणार नाही तुम्हाला संगितल्याशिवाय. चेहरेपट्टीतल्या साम्यावरुनच अंदाज बांधावा लागेल.
आमच्या घरी पण तुमच कुटुंब माहीत आहे माझ्या जाऊबाईना.
तु यंदा जाणार नाहीयेस ना फणशाला, हे फोटो बघून दुधाची तहान ताकावरच भागव.
व्हाळाचाही >> हाच खरा उच्चार आहे.
supper
supper
beautiful!
beautiful!
कोकण सय... अप्रतिम!!!
कोकण सय... अप्रतिम!!!
काय सुरेख आहे गावची आठवण आली
काय सुरेख आहे
गावची आठवण आली हे सर्व पाहून
सही!!
सही!!
सुंदर फोटो. आणि घर फार आवडलं.
सुंदर फोटो. आणि घर फार आवडलं.
खुप खुप आवडल !!! सगळ कस मस्त
खुप खुप आवडल !!! सगळ कस मस्त रेखिव , एखाद्या कथे सारख ! अप्रतिम !
कमाल फोटो !! एकत्र कुटुंब मी
कमाल फोटो !! एकत्र कुटुंब मी स्वतः अनुभवलं आहे आणि कोकणातलं घरसुद्धा!! Thanks a Bunch for letting me revive all those memories.
नशिबवान आहात!
नशिबवान आहात!
अप्रतिम आहे घर,
अप्रतिम आहे घर, फोटोही.
<<आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात<< __/|\__ हे खुप आवडलं.+१००
आहाहा..... सुंदर घर, सुंदर
आहाहा..... सुंदर घर, सुंदर परिसर, सुंदर फोटोज.
आहाहा फार शांत वाटल. लिखाणही
आहाहा फार शांत वाटल.
लिखाणही छान.
एकदा भेट द्यायलाच हवी तुमच्या गावाला.
अप्रतिम ! नशिबवान आहात! >+१
अप्रतिम !
नशिबवान आहात! >+१
मनीमोहोर, मी या मे महिन्यात
मनीमोहोर,
मी या मे महिन्यात कोकणात फिरावयास येतोय . घर राहण्यासाठी नाही दिले तरी चालेल पण पहावयास तरी द्या. मला कोंकणातील अश्या गावात रहाण्याची खूप इच्छा आहे बाकी तुमचे घर म्हणजे सु ...रे...ख..........
कोकणचे वैभव दाखविणारे सर्व
कोकणचे वैभव दाखविणारे सर्व फोटो अगदी सुरेख.डबल तगर,अननस फारच छान.कवठी चाफा ऐकून माहित होता,पहिला प्रथमच!
आपणा सर्वांनी माझं हे
आपणा सर्वांनी माझं हे चित्रण वाचलतं आणि भरभरुन प्रतिसाद दिलेत त्या बद्द्ल मनापासून धन्यवाद.
मनीमोहोर कित्ती सुरेख फोटो
मनीमोहोर कित्ती सुरेख फोटो आणि माहिती. माझ आजोळ गुहागर तिथे पण असच घर आहे . घराच्या पाठी माडाची वाडी आणि लगेच समुद्र . वाळत टाकलेल्या सुपार्या/ कोकम/ फणस./आंबा .काहीहि फरक नाही . आंब्याची साट/फणसाच सांदण/ मेतकुट भात/मस्त तूप/ खाराची मिरची आहाहा .मस्त आठवणी आहेत
<<घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.>> कोकणातल्या सगळ्या घरांची रचना हि अशीच. आमच्या घराची रचना पण अशीच सेम .
पण आत्ता आमच्या घरात कोणीच राहत नाही.बंद असत घर
पण माझी मामी सारखी जात असते..तीच माहेर गुहागरच म्हणून. आत्ता पण ती गेलीच आहे. ती उघडेल घर
पण आत्ता आमच्या घरात कोणीच
पण आत्ता आमच्या घरात कोणीच राहत नाही.बंद असत घर अरेरे >> खूप मिस करत असाल ना?
ममो हो ग आत्ता मामी चालली
ममो हो ग आत्ता मामी चालली आहे पुढच्या आठवड्यात.
मी मैत्रीणीना विचारते आणि सगळ्यांना जमत असेल तर एक ट्रीप काढू छोटीशी.
एकदम मला उत्साह आला बघ
खुप खुप आवडल !!! सगळ कस मस्त
खुप खुप आवडल !!! सगळ कस मस्त रेखिव , एखाद्या कथे सारख ! अप्रतिम ! >>>>> येस्स येस्स ......
Pages