खेड्यामधले घर कौलारु

Submitted by मनीमोहोर on 18 April, 2014 - 13:05

नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे तर चला मी तुम्हाला आमच्या गावी/घरी घेऊन जाते. नाडण हे गाव आहे हापुससाठी प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यात. हे एक अगदि छोटसं गाव आहे, ज्याची वस्ती असेल दोन अडीच हजारापर्यंत. कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन पासून ५० /६० कि. मी. दूर आहे. मुंबई गोवा हायवे तळेरे येथे सोडुन पाटगाव फणसगाव मार्गे ही जाता येतं. हे माझ्या सासरचे गाव आहे. दोन छोट्या टेकड्यांच्या मधे हे वसले आहे आणि मधुन जातो एक ओढा ज्याला आम्ही वहाळ म्हणतो. घरं सगळी थोडी उंचावर आहेत त्यामुळे पाय-याना ( कोकणच्या भाषेत पावठण्या) पर्याय नाही. चला, आता घर दाखवते. हे घर माझ्या आजे सास-यानी स्वतः बांधले आहे. त्यांना बांधकामाची जाण होती कोणतेही शिक्षण न होता सुध्दा.

हा आहे रस्ता आमच्या घराकडे जाणारा.

From mayboli

आता ह्या पाय-या उतरून आलो आपण खळ्यात म्हणजे अंगणात. घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.

From mayboli

हे आहे तुळशी वृंदावन. तो जो दगडी कोनाडा दिसतो आहे, त्यात संध्याकाळी निरांजन ठेवले की वारा न लागता तेवत राहते शांतपणे तुळशीपाशी.

From mayboli

मुख्य घराला जोडून माडी बांधलेली आहे. दोघांना जोडणारा छोटासा पूल

From mayboli

हे आहे परसदार ज्याला कोकणात आगर म्हणतात.

From mayboli

पोफळी अशा चव-या ढाळताहेत. पोफळीना वेढून मिरीवेल, आणि नागवेली उभ्या आहेत.

From mayboli

एका हौदात ही निळी कमळं डुलताहेत.

From mayboli

हे जवळून
From mayboli

पूजेसाठी लागणारी फुलं आगरात असतातच. ही डबल तगर.

From mayboli

हा चाफा

From mayboli

आणि ह्या जास्वंदी

From mayboli

From mayboli

हा कवठी चाफा
From mayboli

आमच्या आगरात बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनिया अशी विलायती झाडे ही आहेत बरं का

From mayboli

From mayboli

हे आहे वडाचे बोन्साय. अगदी पारंब्या आल्या आहेत.

From mayboli
कोकण प्रसिध्द आहे आंब्यांसाठी, पण इथले चिकू लाजवाब. असतात जरासे लांबट. साल असते बाहेरून खरखरीत आणि जाड. पण चवीला साखर फि़की पडेल इतके गोड आणि रसाळ.
From mayboli

हे आहे पेरवीणीचे फुलं. आमच्याकडे पेरूच्या झाडाला पेरवीण, चिकूच्या चिकवीण, लिंबाच्या लिंबीण असं म्हणतात. जसं शेजारच्या जोशी बाईना आपण जोशीण म्हणु तसं.
From mayboli

हे काय आहे ते सांगण्याची गरजच नाही.
From mayboli

वाळत टाकलेल्या सुपा-या आणि कोकमं

From mayboli

From mayboli

हा आमचा जॉनी. सदा लक्ष ठेउन असतो घरावर. जरा खुट्ट वाजलं की धावून जाणारा, मुलांनी मात्र कितीही त्रास दिला तरी शांत असतो. ह्याची शेपटी म्हणजे कडबोळं जणु.

From mayboli

आणि अंगाच मुटकुळं करुन गुरगुटुन झोपलेली आमची मनी. कुत्रा आणि मांजर हवीतच घरात.

From mayboli

घरं उतारावर असल्याने टेकडी चढून वर सड्यावर जाण्यासाठी अश्या पाय-या बांधलेल्या आहेत. ह्याच कोकणातल्या घाट्या. ही आमची घाटी माझ्या आजे सास-यांनी स्वतःच्या हातानी स्वतः कष्ट करुन बांधलेली आहे. त्यामुळे तिचे जास्त कौतुक आम्हाला. घाटीच्या दोन्हि बाजुला आंब्याच्या बागा आहेत.

From mayboli

आमराईचा दूरून व्ह्यु.
From mayboli
आमराई जवळून
From mayboli

From mayboli

From mayboli

लेकुरवाळा फणस. मे महिन्यात फणसाची भाजी, तळलेले गरे, फणसाची साट म्हणजे फणसपोळी, फणसाच सांद्णं असे विविध प्रकार बनत असत्तात.
From mayboli

करवंदाची जाळी
From mayboli

सड्यावरुन दिसणारा सूर्यास्त.

From mayboli

असं हे आमचं घर. आम्हाला सगळ्यांना अति प्रिय असणार. आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात, एकत्र, मजेत, आनंदात, रहात आहेत. आज तिथे पंधरा जण रहात आहेत. काही जण नोकरी निमित्ताने मुंबईला पुण्याला किंवा अगदी परदेशी ही गेले आहेत पण त्यांची घराबद्दलची, कुटुंबाबद्द्लची ओढ तिळमात्र ही कमी झालेली नाही. माझे सासरे त्यांच्या माणसांशी पत्राद्वारे संपर्कात रहात आता पुढची पिढी फोन, फेसबुक, वॉट्सअ‍ॅप, इमेल ने संपर्कात असते एवढाच काय तो फरक. बाँडिंग तसूभरही कमी नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मस्त घर आहे! तुम्ही खुप भाग्यवान आहात . सुंदर ,शांत, आणि स्वच्छ परिसर, फळ, फुले पण मस्त. सर्व सर्वच छान. अगदी सगळ्यांप्रमाणे मलाही वाटते कि ४ दिवसतरी राहायला मिळावेत.

सुर्रेख !! दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण भरपूर उपभोगलं आहे. त्याचीच उजळणी झाली Happy

घर, बाग, आमराई सगळं फारच मस्त!! फोटो पण खूप छान आलेत, आणि तुम्ही ह्या सगळ्याची ओळख पण खूप मस्त करून दिलीयेत!

अप्रतिम !!! व्हाळाचाही [ओढ्याचा] फोटो हवा होता यांत.
[ वांयच तीट लावा ह्या धाग्याक ! माझीच दृष्ट लागात असां भय वाटता. Wink ]

अनेक पिढ्या एकत्र नांदणारे कुटुंब म्हणून हेमाताई तुमचे कुटुंब फेमस आहे आपल्या पंचक्रोशीत, हे मी पहिल्यांदा लग्न होऊन गेले होते गावाला तेव्हा सासूबाई म्हणाल्या मला.

अंजू , खरं आहे. एवढी एकत्र कुटुंब रहिली नाहीत आता. एवढ्या पिढ्या एकत्र एका स्वयंपाकघरात, खूप आनंदात रहात आहेत ही गोष्ट आता परिकथेतल्या सारखी वाटेल. पण आहे हे खरं आमच्याकडे. तुम्ही घरी आलात तर कोण कोणाची आई आहे आणि कोण का़कू तेच कळणार नाही तुम्हाला संगितल्याशिवाय. चेहरेपट्टीतल्या साम्यावरुनच अंदाज बांधावा लागेल.

आमच्या घरी पण तुमच कुटुंब माहीत आहे माझ्या जाऊबाईना.

तु यंदा जाणार नाहीयेस ना फणशाला, हे फोटो बघून दुधाची तहान ताकावरच भागव.

व्हाळाचाही >> हाच खरा उच्चार आहे.

supper Happy

अप्रतिम आहे घर, फोटोही.
<<आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात<< __/|\__ हे खुप आवडलं.+१००

मनीमोहोर,
मी या मे महिन्यात कोकणात फिरावयास येतोय . घर राहण्यासाठी नाही दिले तरी चालेल पण पहावयास तरी द्या. मला कोंकणातील अश्या गावात रहाण्याची खूप इच्छा आहे बाकी तुमचे घर म्हणजे सु ...रे...ख..........

कोकणचे वैभव दाखविणारे सर्व फोटो अगदी सुरेख.डबल तगर,अननस फारच छान.कवठी चाफा ऐकून माहित होता,पहिला प्रथमच!

आपणा सर्वांनी माझं हे चित्रण वाचलतं आणि भरभरुन प्रतिसाद दिलेत त्या बद्द्ल मनापासून धन्यवाद.

मनीमोहोर कित्ती सुरेख फोटो आणि माहिती. माझ आजोळ गुहागर तिथे पण असच घर आहे . घराच्या पाठी माडाची वाडी आणि लगेच समुद्र . वाळत टाकलेल्या सुपार्या/ कोकम/ फणस./आंबा .काहीहि फरक नाही . आंब्याची साट/फणसाच सांदण/ मेतकुट भात/मस्त तूप/ खाराची मिरची आहाहा .मस्त आठवणी आहेत

<<घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.>> कोकणातल्या सगळ्या घरांची रचना हि अशीच. आमच्या घराची रचना पण अशीच सेम .
पण आत्ता आमच्या घरात कोणीच राहत नाही.बंद असत घर Sad
पण माझी मामी सारखी जात असते..तीच माहेर गुहागरच म्हणून. आत्ता पण ती गेलीच आहे. ती उघडेल घर Happy

ममो हो ग Sad आत्ता मामी चालली आहे पुढच्या आठवड्यात.
मी मैत्रीणीना विचारते आणि सगळ्यांना जमत असेल तर एक ट्रीप काढू छोटीशी.
एकदम मला उत्साह आला बघ Happy

Pages