उन्हाळा आला कूsssल पेय 'पियुष'

Submitted by प्रमोद् ताम्बे on 16 April, 2014 - 00:27

पियूष
Piyush xxx.jpg

साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.

कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकाका, वादासाठी वाद घालत असाल तर काय बोलणार! पण जनसेवा हे दुसरा काही ऑप्शन नव्हता म्हणून चालू होतं केवळ असं मला तरी वाटत नाही.

जनसेवा कच्चा चिव्डा अप्रतिम. मी दर पुणा ट्रिप मध्ये जरूर घेउन जात असे. सांजा खाल्ला आहे तिथेच.
हिंदुस्तान बेकरीचे पॅटिस. ?! काही गोष्टीना तोडच नाही.

बाकी नटराज टॉकिजच्या मागे घैसास शोरूम जवळ एक जण मिक्स फ्रूट मिल्क शेक विकायचा तसा खरेच परत कुठे कुठ्ठेच मिळालेला नाही. इब्लिस काय आठवण करून दिलीत. क्यांपातले एक चुंग हुवा कि काहीतरी होते तिथल्यासारखे सूप कधीच कुठे परत मिळाले नाही. मार्झो रिन चे चिकन सँड्विच पण.

पियुष मी कधीच नाही प्यायले. मला खारी लस्सी किंवा ताक आव्डते. स्वीट लस्सी नाही आव्डत. परत ह्यात फूड कलर का घातला आहे. तो ही शक्यतो वापरू नये. हेमावैम. केशराच्या दोन काड्या टाकाव्या हव्या तर.

पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं विसळून देतात असं इथे बरेच म्हणत आहेत. ते म्हणणं एक विनोद म्हणून ठीक आहे. पण लोकप्रिय हॉटेलात रोजचे किमान १०० ग्लास पियुष श्रीखंडाचं भांडं विसळून तयार होत असेल का? तसं असेल तर ते भांडं विसळून घेण्यासाठी केवढं श्रीखंड तयार करावं लागत असेल? तयार केलेलं श्रीखंड रोजच्या रोज खपत असेल का?

पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं विसळून देतात असं इथे बरेच म्हणत आहेत. ते म्हणणं एक विनोद म्हणून ठीक आहे. >>> एक्झॅक्टली, मंजूडी. पुलंच्या कोणत्यातरी पुस्तकात विनोद म्हणून केलेला उल्लेख आहे तो.

अहो,
श्रीखंड एका भांड्यातून दुसर्‍यात काढायचे. रिकामे झालेले भांडे विसळायचे.
पियुष तयार.
ते खपले, की श्रीखंड परत पहिल्या भांड्यात काढायचे.
आता पुन्हा एक भांडे विसळायला तयार!
हाकानाका.
दरम्यानच्या काळात श्रीखंड अन पियुष दोन आयटम विक्रीसाठी तयार!

-: आमचे येथे दुकान चालविण्याचे शिकवणी वर्ग घेण्यात येतील :-

पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं विसळून देतात असं इथे बरेच म्हणत आहेत. ते म्हणणं एक विनोद म्हणून ठीक आहे.

एक्झक्टली. जे कुठल्यातरी रस्त्यावरच्या कुठल्यातरी खोपटातले पियुष प्यायलेत ते असेच म्हणणार. ज्यांनी पणशीकराचे दाट पियुष प्यायलेय त्यांना माहिताय पियुष कशाला म्हणतात ते. पियुष आणि लस्सी यांची तुलना होऊच शकत नाही. पियुष पियुष आहे आणि लस्सी लस्सी. दोन्ही आपापल्या जागी ग्रेट आहेत पण म्हणुन पियुषला लस्सी म्हणणा-याने अस्सल पियुष कधी प्यायलेच नाही असे म्हणता येईल.

एकदा या दादरला आणि घ्या आस्वाद पणशीकराच्या पियुषचा.

आमचे येथे दुकान चालविण्याचे शिकवणी वर्ग घेण्यात येतील :->> दुकान बंद करण्याचे वर्ग आहेत हे अशा युक्त्या असतील तुमच्या तर! Proud

पियुष आवडतं मला. मस्त लागतं Happy

गिरगावात पणशीकर, सांडू आणि प्रकाशकडलं पियुष लहानपणापासून प्यायले आहे. पियुष म्हणजे अमृत हे खरंच आहे Happy

मोठ्या माणसांचे विनोद कधी कधीसिरियसली घेऊ नयेत....त्यातलाच हा एक श्रीखंडाचे भांडे विसळून पियुष करण्याचा.

लस्सी वेगळी लागते आणि पियुष वेगळं लागतं. ज्यांनी पिवून पाहिलं नाही त्यांनी नक्की पिवून पहा Happy

होय पियुष चांगले लागते, ते दादरच्या पणशीकरांचे पियुष मस्तच असते. लस्सी आणि पियुषची तुलना नाही.

पियुष उन्हाळ्यातच प्रामुख्याने प्यावे असेही काही नाही पण!

पियुष म्हणजे श्रीखंडाचे विसळलेले पातेलं म्हणजे कहर आहे. काहिहि.

पियुष म्हणजे अमृताचा प्याला त्या झळझळीत उन्हात फिरताना,
पियुष म्हणजे सुखाची धार शॉपिंगने कावले असताना...

बस्स, इतकाच माझा काहिच्या काही कवितेचा प्रयत्न.

पण पियुष मला सुद्धा आवडते.

मंजुडी तो विनोदच आहे, हे तेव्हाही कळत होतेच. पण पियुष प्यायची इच्छा नाही झाली हेही खरेच. तू का सिरिअस झालीस इतकी.. :))

पुण्यातलं प्रसिद्ध पियुष गणू शिंदेकडलं.

स्पष्टच बोलायचं तर जनसेवा जुन्या पेठी पुणेरी चवीला 'केटर' करणारं दुकान होतं. तेव्हा पेठी पुणेरी चवी नसलेल्यांना नाही आवडलं तरी आमची काही हरकत नाही. Wink

कुमठेकर रोडलाच प्राचीन काळी सुजाता नामक हॉटेल होतं. ते बंद झाल्यावरही असंच वाईट वाटलेलं.

पियुष नाही प्यायले कधी... आता तर खुप उत्सुकता लागलीये. दादरचे दुकान कुठेशी आहे? कधी गेलो तिथे तर नक्की जाऊ.
वरचा फोटो छान. कृतीपण छान आहे.

पण लिंबू पिळतात हे माहीत नव्हते. (अर्थात लिंबू आणि वाचक ह्यांचा दुसरा उपयोग काय म्हणा) >>> ह्याला म्हणतात कमेंट!! Rofl

<<<पियुष पियुष आहे आणि लस्सी लस्सी>>> अगदी Happy
<<गिरगावात पणशीकर, सांडू आणि प्रकाशकडलं पियुष >>>> ह्या यादीत अजून एक नाव ठाण्यातील गोखले उपहारगृहमध्ये मिळणारे पियुषही उत्तम आहे. Happy

प्रमोद काका धन्यवाद Happy रेसिपी दिल्याबद्दल.

बरं Happy

बस्के, मी सिरीयस झाले असं तुला का वाटलं? Happy

सुनिधी, दादरला रानडे रोडवर पणशीकर, तिथूनच मोजून वीस पावलांवर प्रकाश आणि सेनाभवनसमोरचं आस्वाद यापैकी कुठल्याही ठिकाणी अत्युत्तम पियुष मिळेल.

सुनिधी, दादरला रानडे रोडवर पणशीकर, तिथूनच मोजून वीस पावलांवर प्रकाश आणि सेनाभवनसमोरचं आस्वाद यापैकी कुठल्याही ठिकाणी अत्युत्तम पियुष मिळेल

आणि जातेसह आहेस तर प्रकाशमधले अत्युत्तम साबुदाणावडे अजिबात चुकवु नकोस. तसे वडे आणि सोबतची बहारदार चटणी फक्त तिथेच मिळते.

Pages