क्विक रवा डोसा/दोसा(फोटो सहित)

Submitted by सीमा on 16 December, 2013 - 14:33
rava dosa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदळाचे पीठ
१ कप रवा
१/२ कप मैदा
कोथिंबीर
मीठ
तेल
हिरवी मिरची बारीक चिरून
जीरे
आल (बारीक चिरुन. optional)

क्रमवार पाककृती: 

रवा+मैदा+तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात पाणि घालून घ्यावे. कन्सिस्टन्सी अगदी मठ्ठ्या प्रमाणे पातळ असायला पाहिजे. त्यात आता हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि इतर जे हवे असतील ते घटक घालून घ्यावेत.
नॉनस्टीक तव्यावर थोड जास्त तेल घालून , नेहमी घालतो त्यापेक्षा थोड उंचावरून डोसे घालावेत. वरून तेल घालावे.
मोठा गॅस करून क्रिस्पी होईपर्यंत ठेवावे. उलटु नये. डोसा बाजूने सुटु लागला कि लाक्डी उलथण्याने काढून गरम गरम सर्व्ह (चटणी किंवा मेतकुट सोबत )करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

जस जसे डोसे घालू तस तस मिश्रन घट्ट होत जाते. पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी पातळच असण गरजेच आहे.
ओनिअन रवा डोसा करताना कांदा बारीक कापून डोसा घालून झाल्यावर पसरायचा. अगदी रेस्टॉरंट प्रमाणे डोसा तयार होतो. रवा डोसा क्रिस्पीच पाहिजे. त्यामूळ गॅस मोठाच असावा.
ही रेसीपी खूप versatile आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या चविप्रमाणे बदल करु शकता.

बरेचजणींनी लिहिलय वेडावेकडा डोसा होतो, त्यांच्यासाठी . डोसा पुर्ण तवा भरून घालायचा. वरती मी पुर्ण चौकोनी तवा भरून घातलाय तसा.

माहितीचा स्रोत: 
असंख्य साउथ इंडिअन मैत्रिणी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही केले एकदाचे आणि चक्क जमले (आकार काही जाईने दिलेल्या फोटो इतका सुरेख नाही जमला. कधी नकाशा, कधी गोलाजवळपास जाणारा आकार असं झालं होतं) मी थोडं दही घातलं होतं त्यामुले आलेला आंबटपणाने चव अधीक चांगली लागली. धन्यवाद सीमा आणि बाकीही टिपा देणार्‍यांना

हायला, हा फोटो कधी टाकला ? ... कसला भारी आलाय फोटो ! म्हणजे रवाडोसा तर तोंपासु दिसतोच आहे पण फोटो सॉलिड काढला आहेस. नेहेमीप्रमाणेच Happy

हा डोसा दाखवल्याबद्दल मंजूडीचे स्पेशल आभार Wink

असं झालं का ? Lol
पाहिला, पाहिला आत्ताच. मस्त आहे तुझाही रवाडोसा Happy

तू ते हे आहेत त्यांच्यासारख्या डायरेक्ट कमेंट्स टॅग करायला शिक बघू Proud

युट्युब लिंकमध्ये दाखवल्याप्रमाणे मी यापूर्वी डोसे केले होते.पण हात पीठात बुचकळून डोसे करायला कंटाळा आला होता.आता वरच्या पध्दतीने करून पाहीन. चटणीची कृती मस्त वाटतेय.

तोपासु... मस्त. डोस्या चा हट्ट पोरं कधी पण करतात.. दर वेळेला पीठ असतच अस नाही...
नक्की करुन पाहिन..

मस्त रेसिपी आहे. खरोखर अगदी कमी वेळात होणारी.
इथली चर्चा वाचून मी कणीक घातली मैदा न घालता. चवीला छान झाला डोसा.

धन्यवाद सीमा!

काल हा धागा वर आला म्हणून मग रात्री जेवणाला हे केले होते. पहिले १-२ दोसे लवकर काढायच्या प्रयत्नात फसले. नंतर छान झाले. मात्र "उंचावरून" चे बरेच वेगवेगळे प्रयोग झाल्याने जो काय राडा झाला तो आवरायलाच फार कष्ट पडले. ते आवरेपर्यंत मला परत भूक लागली होती. Lol

आत्ता ब्रेकफास्टला हे दोसे केले. अप्रतिम झाले. सुंदर जाळी पडली. तवा भरपूर तापवल्यावर जाळी पडायला उंचीची अट उरत नाही असं लक्षात आलंय. Proud

मैद्याऐवजी सुजाता मल्टीग्रेन आटा वापरला.

थँक्यू सीमा!

मी आधी इथे लिहील्याप्रमाणे ३ कप रवा आणि १ कप तांदळाची पिठी घेऊन करायचे. आज २ कप रवा, १ कप तांदळाची पिठी, अर्धा कप मैदा, २ टेबलस्पून आंबट दही, एक मोठा कांदा, ६ कप पाणी घालून केलं. टेक्सचर मस्त आलंय.

मस्त फोटो अंजु. दही घालून बघते कसा लागतो ते.

अलिकडे मी हे कोरडे पीठ तयार करुन ठेवते घरात. मैत्रिणींना पण दिल. खुश झाल्या एकदम. आयत्यावेळी माल मसाला आनि पाणि घातले कि झाले.

Pages