बारावीतील मुलांसाठी पालक, शिक्षकांचे मार्गदर्शन

Submitted by डीविनिता on 12 April, 2014 - 06:19

माझा मुलगा आता बारावीला आहे. सायन्स ला आहे. मी अभ्यासात कधी लक्ष घातले नाही असे नाही. पण दहावीनंतर जसे स्ट्रीम्स बदलले तसे मलाच टेन्शन आले. मी सायन्स साईड ची नाही की त्याचा बाबा पण नाही. पण मुलाला एका विशिष्ट प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स कसे मिळतिल याचे मार्गदर्शन करू इच्छिते. कॉलेज, ट्युशन्स आहेत, मेरिटनेशन चे सबस्क्रिप्शन देखिल आहे पण तरीही प्रश्न भेडसावतात ते असे की
१. अभ्यास कसा करायचा?
२. डेफिनेशन पुस्तकात दिले नसतील तर ते कसे बनवायचे? उदा. फिजिक्स मधे wavefront, wavespace and wavenormal यात वेव्हस्पेसचे डेफिनेशन कुठेच नाही पण प्रश्न मात्र आहे.
३.१२वी ची सुरुवात म्हणून कसा कसा अभ्यास करत जायचे? आता तर प्रश्नपत्रिका नाही सोडविता येत, पण आधी तयारी रिविजन कशी करायची?

शिक्षणक्षेत्रातील ज्येष्ठ लोकानी जागृत पालकाना मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी सल्ला द्यावा ही विनंती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा एक उपयुक्त धागा ठरेल.

हा प्रश्न अनेकांना भेडसावत असू शकेल.

चांगला धागा!

धन्यवाद! चर्चा वाचावीशी वाटत आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व, त्याची दहावी / बारावी पर्यंत झालेली शैक्षणिक जडणघडण वेगवेगळी असते. त्याच्या विषयवार आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे येथे येणारे सगळे सल्ले तुम्ही वाचा पण तुम्हाला आवडला म्हणुन त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असा प्लिज अट्टाहास करु नका.

एक छोटं उदाहरण देतो. ( प्लिज टेक इट पॉझिटीव्हली).

खुप ढोबळमानाने मी यात २ प्रकार पाहिले आहेत. एक म्हणजे सगळ्या गोष्टी समजुन घेउन शिकणारे विद्यार्थी (किंबहुना समजल्याशिवाय पुढे न जाणारे) भले मार्क कितीही कमी पडोत. आणि दुसरा प्रकार म्हणजे हा प्रश्न आणि त्याचे हे उत्तर. समजो न समजो. तो प्रश्न परीक्षेत आला कि ते उत्तर लिहायच. काहिही होवो कुठे मार्क कमी होता कामा नयेत. आणि ते मार्क मिळवतातच. इन्फॅक्ट तेच मेन ऑबजेक्टीव्ह असते. यातील दुसर्‍या कॅटेगरीतुन पहिल्या कॅटेगरीत येणे ही प्रोसेस म्हणजे रेल्वेने रुळ बदलल्यासारखी असते. खुप खडखडाट आणि धक्के. बर्‍याच वेळा आधी होते तेच बरे होते असे वाटु शकते. १० वर्षाची रिजिडीटी बदलणे थोडे अवघड अस्ते.

(गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षा (प्रवेश परीक्षा) खुपच महत्वाच्या झाल्या आहेत. त्यांचा पॅटर्न खुपच वेगळा आहे. या परीक्षा जेंव्हा सुरु झाल्या तेंव्हा १२ वी ला ९० % आणि वर मार्क मिळवणारे बरेच विद्यार्थी ५० % ते ७० % मार्क मिळवायचे.)

----------
थोडस अवांतर वाटेल पण मला हेपण महत्वाच वाटतं.
१२ नं. इंजिनियरींगला आलेल्या मुलाचा पहिल्या वर्षाचा निकाल ३०% च्या आसपास असतो, (एकदा तर १६ % बघितला आहे). अक्षरशः मुलांना अभ्यास काय आहे, कसा केला पाहिजे नेमके काय करणे अपेक्षित आहे हेच कळत नाही. म्हणजे बारावी पर्यंत फॉलो केलेली पद्धत तेथे उपयोगी पडत नाही असे दिसते.
----------

थोडक्यात माझा सल्ला: विषय समजुन घेउन, बेसिक क्न्सेप्ट समजुन घेउन जर अभ्यास केला तर त्याचा फायदा प्रश्न-उत्तर पद्धती पेक्षा जास्त आणि दिर्घकाळ होतो. विचार क्षमता वाढवणे व विकसित करणे हा अभ्यासाचा उद्देश ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला अभ्यास करताना हे का? कसे? असे प्रश्न पडणे गरचेचे आहे आणि त्याची समर्पक / समाधान होइ पर्यंत उत्तरे मिळतात कि नाही हे पहाणे पालकांचे काम आहे.
----------

धन्यवा बेफिजी, अन्विता आणि निवांत,
मलाही असे वाटते की अनेकाना अशा मार्गदर्शनाची गरज असेल.
कारण मुले जी दिशा निवडतात त्यात आई वडील माहिर असतीलच असे नाहीच.
शिवाय, मुले घरातून एका मूलभूत मार्गदर्शनाची अपेक्षा करतातच... आपण ठरवायला हवे की ते जास्तीत जास्त समाधानकारक मुलाना कसे ठरू शकेल.

विनिता, तुमच्या मुलाला कशा प्रकारे अभ्यास करायची सवय आहे? अभ्यास आपणहून आवडीने करतो की पालकांना सतत सांगावे लागते? माझ्या मते केवळ १०वी-१२वीचाच नाही तर इतरही वेळी रोजचा रोज अभ्यास होणे महत्वाचे आहे. पाया पक्का असेल तर मग कठीण संकल्पना समजून घेऊन अभ्यास करणे सोपे जाते आणि आनंदाचेही असते.
मुलाची अभ्यासाची आत्तापर्यंतची अशी एक पद्धत बसली असेल तर ती आता १२वीला आयत्यावेळी बदलणे कदाचित त्याल त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे यावर्षी मुलगा अभ्यास कसा करणार आहे त्याबद्दल त्याच्याशीच चर्चा करा. मार्गदर्शन केले तरी शेवटी कमिटमेंट त्याचीच असायला हवी.
सध्या प्रश्नपत्रीका सोडवता येत नसल्या तरी प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट देता येइल. कुठे कमी पडत आहे ते लक्षात येऊन सुधारणा करता येइल. जसा जसा अभ्या पूर्ण होत जाईल तसे ३-४ भागांवर एक टेस्ट असे करता येइल.
ज्या डेफिनेशन्स वगैरे पुस्तकात नाहीत त्यासाठी शिक्षक, इंटरनेट, सिनियर मित्रमंडळी या सगळ्यांची मदत घ्यावी. इंटरनेटवर भरपूर रिसोर्सेस उपल्ब्ध आहेत.
तुम्हाला आणि तुमच्या मुलाला शुभेच्छा!

एखादा चांगला शिक्षक कुठलाही कठीण विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचा बनवू शकतो. मुद्दाम माझे उदाहरण देतो. आम्ही कॉमर्सवले असूनही आमच्या प्राध्यापिका सुनंदा नाथन यांनी कमर्शियल जिओग्राफी हा विषय आमच्यासाठी अत्यंत आवडीचा बनवला होता. पाठीमागे लावलेल्या जगाच्या नकाशातील कुठलाही बारीकसा देश, त्या न्काशाकडे पाठ करूनही दाखवू शकत. ( हे सगळे ३२ वर्षांपूर्वी बरं ) त्यानंतरही १८/ २० वर्षे तोच विषय त्या शिकवत्त होत्या आणि मी मुद्दाम त्यांना जाऊन भेटलो होतो.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ८ वर्षांनी मी इलेक्ट्रॉनिक्स चा अभ्यास करायला सुरवात केली त्यावेळीदेखील मला मिस. राव याच्यासारख्या उतम शिक्षिका लाभल्या. थोडक्यात उत्तम गुरुला पर्याय नाही. सुदैवाने आता नेटवरदेखील उत्तम मार्गदर्शक उपलब्ध आहेत. खान अकॅडेमी असे सर्च करून ब घा.

स्वाती, माझा मुलगा समजून घेऊन अभ्यास करतो पण परिक्षेत उत्तम उत्तर द्यायला त्याला जमत नाही. विशेष करून physics व chemistry मधे, बाकी गणित, इतर विषय ९० च्या वर असतात, पण या दोन विषयांत गाडी भलतीच घसरते...आणि या विषयांसाठीच आपण सायन्सला गेलो आहोत हे जाणवून अधिकच आत्मविश्वास कमी होतो
रोज अभ्यासाची त्याची पद्धत आहेच पण ऐन उत्तरांमध्ये आयडियल मार्क देणारे उत्तर काय असेल याचा त्याला नेहमी बाऊ वाटतो.
मॅथ्स मध्ये हे होत नाही कारण उत्तर बरोबरच यावे लागते...
पण इतर सायन्स मध्ये हे नेहमी घडते...
प्रश्नपत्रिका सोडविण्या आधी उत्तरांची तयारी हवी की नाही, ती कशी करायची?

"सध्या प्रश्नपत्रिका सोडवता येत नसल्या तरी प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट देता येइल. कुठे कमी पडत आहे ते लक्षात येऊन सुधारणा करता येइल. जसा जसा अभ्या पूर्ण होत जाईल तसे ३-४ भागांवर एक टेस्ट असे करता येइल.
ज्या डेफिनेशन्स वगैरे पुस्तकात नाहीत त्यासाठी शिक्षक, इंटरनेट, सिनियर मित्रमंडळी या सगळ्यांची मदत घ्यावी. "
हे मला खूपच पटले, पण कधी कधी उत्तरे मिळाली तरी ती तशीच अपेक्षित आहेत की नाही हे पण कळत नाही.

दिनेशजी, सध्या परिक्षार्थी परिक्षकाच्या शोधात असतात, गुरू राहिलेत कुठे? पोटार्थीच जास्त असतात.... आम्हाला शाळेत रुद्रे म्हणून एक बाई होत्या. विषय गणित होता त्यांचा पण हमखास संस्कृतचे तास घ्यायच्या. उत्तमोत्तम सुभाषिते शिकवायच्या.. आजन्म ऋणी आहे मी त्यांची, आता ना शाळा तसे स्वातंत्र्य देते ना कुणाला ते हवे असते.