लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.

Submitted by पाटील on 22 February, 2014 - 04:43

आतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.
यालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.

वेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्‍या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.
w1.jpg

आधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्या वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.
w2.jpg

कित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.

ड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.

dry brushing.jpg

आत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु
प्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.

s1_1.jpg
हा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.
s2.jpg
त्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा
sky effects.jpg

झाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही?
sky final.jpg

असाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.
वेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले
त्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.
sky lift.jpg

प्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते
त्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले
या शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.
colorful sky.jpg
याशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रंगवता येते.
rainy sky.jpg

आता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू
झाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा
जवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.

झाड रंगवताना झाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.
हा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अ‍ॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अ‍ॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.
t1.jpgt2.jpgt3.jpg

खालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.
tt1.jpgtt2.jpg

हे आहे सुचिपर्णी झाड.
talltree.jpg
नारळीचे झाडं असे काढता येइल.
cnut1.jpgcnut2.jpg

ड्राय ब्रशींग ने केलेले झाड.
dr1.jpgdr2.jpg

या शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.

झाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत
१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.

wrng tree.jpg

२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील Happy
३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.

आता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.
हाच या लेखा साठी एक्सर्साईज.
येउद्या चित्र , होउदे धमाल Happy
अधिचे तीन लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sunstreaks in watercolor are bit tricky . You need to work wet in wet leaving out some bright paper as is and then lift the colors from the sunsterak areas. It is dificult to begin with.

पाटिल सर,
माझ्या पेपर मधे तर काही गडबड नाही ना? मी काल रात्री अजुन एक प्रयत्न केला. कितीही सॉफ्ट केल्या कडा तरी थोड्या डार्क राहतातच. दिलेल्या चित्रात क्शितिज्याची जागा चुकलिय असे वाटत आहे. अजून थोदे खाली घ्यायला हवे होते. बाकी तुम्ही सान्गा.
water_colors3.JPG

विद्या.

विद्या भुतकर- पहिल्या चित्रापेक्षा चांगला आहे हा प्रयत्न. क्षितीज थोडे वर आहे . कडा डार्क राहणे हा पेपर चा प्रोब्लेम नसावा , रंग पुर्ण सुकायच्या आधी सॉफ्ट करायचा प्रयत्न करा.

काल तुमचे उत्तर यायच्या आधीच माझा हैन्डमेड पेपर आणला गेला होता. काल रात्री त्यावर प्रयत्न केला आणि बराच फरक पडला असे वाटले. आधीचा माझा पेपर खूपच लवकर सुकत होता त्यामुले कदाचित. हे कालचे चित्र. तुमच्या सूचना नक्की सान्गा.

water_colors4.JPG
आता पुढच्या लेखाकडे वळेन आजपासून. Happy

विद्या.

खूप दिवसांच्या गॅपनंतर आज थोडा वेळ मिळाला रंग बाजूला काढायला. पण रंग काढल्यावर काहीच सुचेना. Happy
शेवटी नुसते रंग एकमेकांमध्ये मिसळून बघू असं ठरवून अगदीच अ‍ॅबस्ट्रॅक्ट २-३ रंग एकमेकांमध्ये मिसळले वेट & वेट टेक्निकनी.
ते वाळल्यावर काही तरी करायचं म्हणून ड्राय ब्रशने २-३ झाडांची खोडं /बुंधे रंगवले.

हे फायनल प्रॉडक्ट. IMG_20140411_163306.jpg

चांगला ड्रीमी इफेक्ट आलाय. मधुन चालणार्‍या दोन फिगर्स टाकल्या तर चित्र मस्त होइल
IMG_20140411_163306.jpg MS paint मधे मी फिगर्स टाकून पाहिल्या Happy

धन्यवाद पाटील.

तुम्ही त्या फिगर्स टाकल्यानंतर एकदम मस्त दिसायला लागलंय चित्रं. Happy मला रिकामं रिकामं वाटत होतं, पण अजून काही करायची भिती पण वाटत होती. आता हिम्मत करुन रंगवते तुम्ही दाखवल्यासारख्या ह्युमन फिगर्स.

केश्विनी, शैलजा, थँक्स. Happy

अल्पना, मस्त आलंय.

अजय, फिगर्स काढल्यानंतरच्या चित्रात लगेच किती बदल जाणवतोय. जमीन, पुढची मोकळी जागा, आकाश असा फील आलाय. Happy

मला आज वेळ मिळयाल्यावर तयारिपासुन सुर्वात करुन १ली २ चित्रे रंगवली.तुमच्या सूचना नक्की सान्गा.ड्राउइंग पेपर वापरला आहे.

Optimized-DSC_0973.jpgOptimized-DSC_0974.jpg

Pages