१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.pnghttps://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...

साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० Sad . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती

खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .

डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत Happy )

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल Happy आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल Wink
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ? Happy

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील Happy
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना Happy )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला Happy
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ ग्लास पाणी + आवळा रस.......केदार, आवळा कच्चा की उकडून घेऊन रस काढायचा?तसेच पल्पसकट पाण्यातून घ्यायचा? प्लीज सांगा.

निर्धाराने हे साध्य केल्याबद्दल कौतूक आहेच. आणि सगळ्यांचे प्रतिसाद बघता अनेकांना हे साध्य करायचेय, तेही नक्की.

मला एकच सांगायचे होते कि दोन्ही फोटोतल्या चेहर्‍यात फरक पडलाय. आधीच्या फोटोतला चेहरा आनंदी तर नंतरच्या फोटोतल्या किंचीत ओढलेला वाटतोय. वजन कमी केल्यावरही चेहरा तजेलदार राखणे शक्य नसते का ?
हे फक्त इथलेच नव्हे तर अनेक व्यक्तींच्या बाबतीतले माझे निरिक्षण आहे. झपाट्याने वजन कमी केल्यावर चेहर्‍यातला असा फरक करीना आणि दिपिका मधे पण जाणवला होता (मला तरी.) सोनाक्षीचा नवा चेहरा अजून बघितलेला नाही Happy

दिनेशदा, मस्तं निरीक्षण.
मलाही हेच वाटलं होतं.
पण शरीराला मिळाणार्या इतर फायद्यांपूढे हे विसरता येईल.
तसेच थोड्या दिवसांनी अ‍ॅक्यूट फेज गेल्यावर चेहरा तजेलदार होऊ शकतो.
जर एकूण सेल्फ परसिव्हड एनर्जी मध्ये पॉ़जिटीव फरक असेल तर हरकत नाही.

बाकी जब वी मेट मधली करीना रसरशीत सफरचंदासारखी दिसते तर रावनमधली दुष्काळग्रस्त हे खरेच!

देवकी , आवळारस वेगवेगळ्या ब्रँडचा रेडीमेड मिळतो.
उदा. योजक, पतंजली इ. जनरली १:३ पाणी घालून घ्यायचा.
योजकचा चवीला मस्तं असला तरी खूप सिरप बेस असतो - साखर जास्तं.
पतंजलीचा मस्तं आहे.
मलातरी ओरिजिनल वाटला.
साखर कमी.
सहा रुपयाला त्रिकोणी टेट्रा पॅकही मिळतो. रेडी टू ड्रिंक.
आवळा विटॅ सी आणी अँटी ऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे.
चयापचय सुधारते.

धन्यवाद गणेश , इंद्रधनुष्य Happy
धन्यवाद बेफिकीर Happy

दिनेश ,
पहिला फोटो थायलंड मधे फिरायला गेलेले असतानाचा आहे म्हणून असेल कदाचित Happy
पण मला तरी अस अजून कुणी अगदी घरातलेही म्हणाले नाहीत Happy

केदार जाधव,

>> पहिला फोटो थायलंड मधे फिरायला गेलेले असतानाचा आहे म्हणून असेल कदाचित

Rofl काय सांगताय! Biggrin Lol

आ.न.,
-गा.पै.

घरातल्या लोकांना फरक जाणवत नसेल तर चांगलेच आहे. >> तसे नाही हो दिनेशदा . घरच्यांच त्यातल्या त्यात आजीच उलट चालू आहे की किती वाळलायस , आता बास कर . पण तीही कधी चेहरा थकल्यासारखा वाटतोय म्हणाली नाही Happy

केदार, आता हे टिकवायची जबाबदारी पण आलीच ! तोच सर्वात कठीण भाग असतो. आम्ही सगळे नजर ठेवणार बरं.

मला नाही वाटला दुसरा फोटो थकल्यासारखा वगैरे.
आज्ज्यांचं ब्रीदवाक्यच असतं किती वाळलास/वाळलीस म्हणणं Happy
लगे रहो केदार!

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा, असा अनोखा फंडा औरंगाबादचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शोधून काढला आहे. विनासायास वजन कमी करा, असे सांगत ४० डॉक्टरांसह ५०० जणांवर यशस्वी प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले आहे.

'तीन महिन्यात माझे वजन ८ किलोंनी व पोटाचा घेर दोन इंचांनी कमी झाला,' असे सर्वप्रथम स्वत:वर केलेल्या प्रयोगाविषयी त्यांनी सांगितले. 'डाएट प्लॅनिंग' द्वारे केला जाणारा हा फंडा मधुमेहाच्या रूग्णांसाठी मात्र नाही असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दीक्षित म्हणाले, 'या संशोधनात एक महिन्यात १ ते ४ किलो, ३ महिन्यात ४ ते ९ किलो वजन कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो. चहा, पावडर, फलाहार, नैसर्गिक आहार अशा विविध पद्धतीच्या खर्चिक बाबींसारखा हा वेटलॉसचा कार्यक्रम नाही. जीवनशैलीचा भाग म्हणून ताण-तणाव, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार ह्या सर्व बाबतीत सगळेजण आज सजग झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी सातत्याने काही ना उपाययोजना करणाऱ्यांना हा एक रामबाण उपायच आहे.'

डॉ. श्रीकांत‌ जिचकार यांचे पहिले कॅम्पेन

'दोन वेळा खा आणि वजन कमी करा' ह्या संकल्पनेवर सर्वप्रथम नागपूरचे डॉ. श्रीकांत जिचकार यांनी १९९७ ते २००४ पर्यंत मोठी मोहीम राबवली होती. केवळ दोन वेळ जेवण्याचे तत्व आपण सहज पाळू शकतो. मनाच्या निर्धारातून त्यात कुठलीही अडचणही येऊ शकत नाही.

कार्बोइन्स्युलिन कनेक्शन म्हणजे काय?

रक्तातील इन्स्युलिनचे प्रमाण वाढले की, शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. इन्स्युलिनमुळे वजन वाढते. अथेरोस्कलेरॉसीससला चालना मिळते. रक्तातील लिपीड्स वाढतात. कायम वाढलेल्या इनस्युलिनच्या पातळीला तोंड देण्यासाठी शरीराच्या पेशी त्याविरुद्ध कवच निर्माण करतात. तांत्र‌िक भाषेत याला इन्स्युलिन रेसिस्टन्स, असे म्हणतात. याची परिणाम कालांतराने मधुमेह होतो. इन्स्युलिन सिक्रीशन दोन प्रकारे होत असते. चोवीस तासात छोट्याप्रमाणात स्वादूपिंड इन्स्युलिन सिक्रीट करतच असतो. त्याला बेसल सिक्रीशन, असे म्हणतात. आपण अन्न खाल्यानंतर इन्स्युलिन सिक्रीट होतच असते. आपण हे सिक्रीशन दिवसभरात कमी वेळा खाऊन मर्यादित करू शकतो. सर्वसाधारणपणे मनुष्याला भूक लागली, असे दोन वेळा होते. सकाळी ९ वाजता संध्याकाळी ६ वाजता किंवा दुपारी १ वाजता आणि रात्री नऊ वाजता अशा त्या वेळा असतात. आपण जर कटाक्षाने दोनच वेळा पाळल्या तर इन्स्युलिन सिक्रीशन कमी करू शकतो अर्थात ह्यापैकी कोणत्याही दोन वेळा खाण्यासाठी पाळल्या तर त्या दोन वेळातच इन्स्युलिन सिक्रीट होऊ शकतो. जेवण झाल्यावर हे इन्स्युलिन अन्नपचनाची पुरेशी काळजी घेऊ शकते, असे दीक्षित म्हणाले. हेच ते कार्बोइन्स्युलिन कनेक्शन असल्याचे ते म्हणाले. रक्तातील इन्स्युलिन लेव्हल कमी झाली की लिव्हरमधील ग्यालकोजेनमधून ग्लुकोज रिलीज होत जाते, नंतर फॅटी अॅसिड फॅट्सपासून निघते व त्यापासून ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने शरीरातील फॅट्स नैसर्गिकपणे कमी होऊ लागतात व मनुष्याचे वजन आपोआप कमी होत जाते. मुख्य म्हणजे आधी पोटातील चरबी कमी होते. ही थिअरी मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. दिवासातून दोनच वेळा जेवायचे म्हटल्यावर मधेच भूक लागली तर काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. भूक ही बऱ्याचदा मान‌सिक असते. त्यामुळे शक्यतो दोन जेवणांच्या मधे काही खाऊ नये. अगदी सहन न झाल्यास ताक पिता येईल, काकडी वा टोमॅटोच्या दोन-तीन फोडी खाता येतील. एखादे अंजीर (सुके नाही) खाता येईल. शहाळ्याचे पाणी किंवा संत्र्यांचा रस देखील घेता, येईल असे ते म्हणाले.

मधुमेहपूर्व स्थितीतील रुग्णांना आवाहन

मधुमेह होण्यापूर्वीच्या या अवस्थेत रूग्णाची रक्तातील इन्स्युलिन पातळी वाढलेली असते. ग्लायकेटेड हिमोग्लोबिनचे प्रमाण ५.७ ते ६.३ पर्यंत असते. आई-वडील वा जवळच्या नातेवाईकाला मधुमेह असेल तर अशा व्यक्तिंमध्ये मधुमेह होण्याची शक्यता वाढते. अशा व्यक्तिंमध्ये मधुमेहपूर्व स्थिती आढळून येते. डॉ. दीक्षित व मधुमेह तज्ज्ञ डॉ. संजीव इंदूरकर यांनी अशा रूग्णांवरही संशोधन सुरू केले आहे. दोन वेळा जेवल्याने अशा रूग्णांच्या इन्स्युलिनची पातळी व ग्लायकेटेड हिमोग्लोबीन यावर होणारे परिणाम यात अभ्यासण्यात येणार आहेत. अशा रूग्णांनी इंदूरकर हॉस्पिटल रेल्वेस्टेशन रोड, रचनाकार कॉलनी औरंगाबाद येथे किंवा डॉ.दीक्षित ९९२२९९४७७७ डॉ. इंदूरकर ९८२३११०४९८ या नंबरवर संपर्क साधावा.

पण आजपाअसूनच सुरु कअणार होते. पण् कन्टाळा केला. Thanks kedar. पण आजपाअसूनच सुरु कअणार होते. पण् कन्टाळा केला. Thanks kedar. ऊद्यपासून नक्कि करेन.

very nice me pan weight kami karnayat success zale pan maza asa exprience ahe ki te constant thevanayt sucess hoat nahi, me try karte ani ya veli success pan honar pan tarihi, pl. kahi upay ashel tar nakki sanga, ani mala vaat ki baitha job asel tar barach vela as hoat . tumchi story realy nice ani khari ahe.sory maza marathi typing fast nahi tayamule as mix language madhe lite.

केदार, खूप सुंदर माहिति दिलि आहेस. मी दुपारी १ वाजता १-१.५ पोळी खावून २वाजता एरोबिक्स क्लास करवा आणि संध्याकाळी ६ वाजता वाकिंग करावे म्ह्ण्!ते आहे. हे चालेल का मला प्लइइइइइइइइज सांग ना

खाल्ल्यावर किमान तीन तास जड काम करु नये.

१ वाजता पोळी खाऊन दोन वाजता चाला आणि सहा वाजता एरोबिक करा.

Pages