तक्रार

Submitted by रमा. on 31 March, 2014 - 23:38

आटपाटनगरात फिरून फिरून पेंगलेला
निंबोणीच्या झाडामागे चांदोबा भागलेला
पेज भरवत आई दाखवते बाळाला
हळूच एक टिचकी मारते गालाला
त्या तिथे कोपर्‍यात रुसून बसली ताई
सगळं फक्त बाळाला, मला काई नाई??
टपोर्‍या डोळ्यातून येतं टपटप पाणी
ऐकव तू फक्त त्यालाच ती गाणी
येऊच दे बाबाला मी सांगते त्याला नाव,
आमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्युट!
यावरुन एक आठवलं :

माझ्या बहिणीकडे एक वॉकर होतं आणि त्याला आम्ही गंमतगाडी म्हणायचो! माझी बहिणे मोठी झाले, चालायला शिकली तरी बरेच वर्ष त्या वॉकर सोबत खेळायची. आमच्याकडे तेंव्हा स्कुटर होती आणि कुठेही बाहेर फिरायला जायचं झालं की मग आई बाबा आणि तीच जायचे. मग माझं रडणं, गोंधळ सुरू होईचा!
तेंव्हा मी एक कविता केलेली (इयत्ता साडे पाचवी Wink ). ती ही अशी :

गंमतगाडीतुन जाणार जाणार
तुला नाही सोबत नेणार नेणार
कित्ती कित्ती रडशील, ने ने म्हणशील
मामा नि मी तुझं नाहीच ऐकणार
बागेत जाणार आईस्क्रिम खाणार
मागशील तरीही तुला नाही देणार
झोक्यात बसणार, गोल गोल फिरणार
घरी आल्यावर तुला ठेंगा देणार (म्हणजे काय कुणास ठाऊक Uhoh )

आणि ही असली कविता मला आईने मस्त मस्त म्हणून ४ वेळा ऐकवायला लावलेली Proud
आणि या असल्या कवितेच्या बदल्यात मामने मला खरच बागेत नेऊन आणलेलं Proud

रमा....

अगदी तुझ्या गंमतीशीर स्वभावाचे प्रतीक म्हणजे ही तक्रार कविता झाली आहे. त्यातही

"..आमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव..." हा ठसका खूपच भावला.