निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा वा, काय एकसेएक फोटो टाकलेत. खूप सुंदर, प्रसन्न वाटलं.

मधु, खूप सुरेख लिहिलंय.

जिप्सी, खूप खूप अभिनंदन.

सर्वांचे फोटो उत्तमच ....

जिप्सीभौ पण परत त्यांच्या मूळ स्वरुपात प्रकट झालेत हे चांगलेच ....

मानुषी तर उडत्या पाखरांचे पर मोजू लागलीये ....

१९८६-८७ ला माझ्या हातात "असाई पेंटॅक्स" कॅमेरा आला (एस एल आर) - तो रोल भरणे - ३६ फोटुंच्या ऐवजी खूप खटाटोप करुन करुन ३९ फोटु मिळवणे - असले भरपूर उद्योग करुन झाले - (एकदा फोटो काढून झाले की ते डेव्हलपिंग -प्रिंटिंग होऊन फोटो हातात येईपर्यंत इतकी धागधूग व्हायची की कुठल्या शालेय परीक्षेलापण कधी झाली नसेल इतकी ... Happy ) - ते अ‍ॅपर्चर सेटिंग किंवा इतर सेटिंग करताना इतकी तंद्री लागायची की बस्स ... मस्त वेळ जायचा, शिकायलाही खूप मिळायचे.....पण त्या कॅमेर्‍याची मजाच वेगळी - फार अप्रतिम फोटो यायचे - माझ्या दोन्ही मुलींचे लहानपणचे फोटो त्यावरच काढले - अजूनही ते फोटो पहाताना एक वेगळेच समाधान मिळते ......

"शुद्ध प्रतिपदा चैत्रामधली बहर घेवुनी आली,
ॠतुराजाच्या आगमनाने फुलली झाडे-वेली....
नववर्षाचे पाउल पडले अंगणात सोन्याचे
नव्या नवेल्या संकल्पांना रूप मिळे सत्याचे,
गुढया-तोरणे घराघरांवर उत्साहाने सजली,
शुद्ध प्रतिपदा चैत्रामधली बहर घेवुनी आली......
माणुसकीची सुगी पिकतसे मनोमनी अंगणी
हिरवी स्वप्ने पाहत हसली सस्यशामला धरणी,
सुखसमृद्धी येईल आता ज्याच्या त्याच्या भाळी
शुद्ध प्रतिपदा चैत्रामधली बहर घेवुनी आली......"

नववर्षाच्या शुभेच्छा !!!

जिप्सि, अभिनंदन!!!!!!! चला आता आम्ही तुझ्या सुंदर फोटोंचा आनंद परत घेउ शकणार आहोत. धन्यवाद. काल तुला फोन लागत नव्हता, तीन--चार वेळा ट्राय केला होता.
लाल जाम उचलून तोंडात टाकावेसे वाटतायेत. मानुषी, उडत्या पक्षाचा फोटो अप्रतिम.
सगळ्यांचेच फोटो मस्त.हो आणि रोलच्या कॅमेर्‍यातले फोटो धुवून येईपर्यंत काय टेंशन असायचे ना..

काल तुला फोन लागत नव्हता, तीन--चार वेळा ट्राय केला होता.

चुकीच्या वेळेस कशाला फोन करता त्याला.????.. काल पहिला सण वर्षाचा. जावईबापुंची खास बडदास्त राखली जात होती काल. अशा वेळी माबोकर्स फोन करुन रसभंग करायला लागले तर फोन स्विच ऑफ ठेवावा लागेल Wink

मला डॅफोडिल्स खुप आवडतात. कधी बघायला मिळणार?????? राणी बागेत एका बुकेत होते बहुतेक. आठवत नाही आता. पण मला जिथे फुलतात तिथलेच पाहायचेत. Happy

रच्याकने, मला काही लिहिता येत नाही त्यामुळे रिक्षा फिरवायचा प्रसंग येत नाही. पण घरात उत्साही लेखिका निर्माण झालीय. तिने जे काही लिहिलेय त्याची रिक्षा फिरवच असा आदेश आलाय. त्यामुळे अडगळीत पडलेली रिक्षा बाहेर काढतेय. बघा जमले तर रिक्षात बसा....

http://www.maayboli.com/node/48319

मदत ...माझ्या टोमॅटोच्या झाडावर खुप सारे पांढरे धेकुन झाले आहेत.. जमेल तितकी पान काढुन टाकली..पण काहितरी उपाय करायलाच हवाय्..आत्ताशा ७ टोमॅटो लागलेत.. झाड चांगल आहे. कुणीतरी मागे म्हणाल टो. ना तंबाखु चालत नाही म्हणुन...:-(

काय करु

काय धावताय राव सगळे.

जागू पान मस्त, तोंपासु.

मधे कोणी बरे ते मेलन टाकलेय. त्याचे नाव सन मेलन असे स्टार बाझार मधे कळाले. घेतले व चाखले होते. अगदी खरबुज. रंग पण तळपत्या सूर्यासारखा पिवळा धम्मक. नंतर गोखले रोडवर पण मिळालेले. गोड लागते. Happy

खेकड्यांचि रांगोळी व मागचे रहस्य मस्त.

लाल जाम स्स्स्स्स्स्स्स.

दिनेशदा, वेलची खासच दिसतेय.

चाफ्याच्या सुगंध दरवळला, नी मामे चाफ्याची रांगोळी वाह क्या बात Happy

मानुषीचे पक्षी

चैत्रांगण

जिप्सीचा ब्लॉग , सगळे सगळे मस्त................

आणि हो सर्वांना नववर्षाच्या भरभरुन शुभेच्छा.

वैशाली >>> हळदीच्या पाण्याचा फवारा मारुन पहा बरे. पटकन आलेय हे डोक्यात. ती पण जंतुनाशक म्हणुन. उपाय नसला तरी अपाय नसावा.

अंजू, ग्रेट वगैरे काही नाही गं Happy
मला बर्‍या रांगोळ्या काढता येतात आणि लहानपनापासुन चैत्रांगणची सवय आहे Happy

रच्याकने आठवलं, आमच्या बिल्डींगमधल्या बायांना माझ्या लहानपणी वाटायचं मला रांगोळी काढता येत नाही म्हणून मी उगाच हे बदक, कमळ, शंख वगैरे काढतेय. आणि त्या हसल्या की मला सांगावं लागायचं के एहे चैत्रांगण आहे. त्या बाया माझ्या बॅड बूकातच गेल्या एकदम Wink
नंतर नंतर मीच त्यांना ' तुम्हाला नाही माहीत हे?' असा लूक देऊन हसायला सुरुवात केली Proud
मग वैतागुन की मी मोठी झाले म्हणून कुणास ठाऊक पण त्यांनी मला हसणं बंद केलं Wink

जिप्सीभौ पण परत त्यांच्या मूळ स्वरुपात प्रकट झालेत हे चांगलेच ....
>>>>अगदी अगदी! काय ब्लॉग आहे गुर्जींचा! भारी!
मानुषी तर उडत्या पाखरांचे पर मोजू लागलीये ....>>>>>>>>>
शशांक ... :इश्शः
साधने .....लेखिका उत्साही आणि क्रिएटिव्ह आहे... आईच्यातलं काही तरी घेतलं असेलंच ना! तिची रिक्षा फिरवलीच पाहिजे!

बाप्रे, काय पळतोय हा धागा...:स्मित:
सगळेच फोटो अप्रतिम!
साधना, लेक अगदी सुगरण आहे हं! Happy
उजू, काय सुरेख कविता आहे गं! तू केलियेस का?

वैशाली, कडुनिंबाच्या पाण्याचा फवारा मारुन बघ. किंवा कुणाकडे गांडुळ खताची बादली असेल तर गांडुळ खत बनताना त्यातून झिरपणारं पाणी (व्हर्मीवॉश) देखिल डायल्यूट करुन फवारु शकतेस.

मानुषी 'नया है वो' स्टेजपासुन 'प्रो" स्टेजपर्यंत झपाट्याने पोचली.. >>>>>
मग इतक्या लहान वयात माबोवर बागडायला लागली....आणि निग पासून् थेट रेसिपीज पर्यंत! खरंच लेक अगदी मल्टी टॅलन्टेड आहे!

जाम चे फुल व पाकळ्या गळल्यानंतरचे धरणारे फळ

आमच्या झाडावरचे जाम घ्या.

Pages