सुरू होतील आता वादळे (तरही....वैवकु)

Submitted by Prashant Pore on 7 March, 2014 - 07:43

करावी वाटते होळी जुन्या कोत्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

कळाया लागले मग हळहळाया लागलो होतो
उगा केलीस थट्टा तू गरीबाच्या विचारांची

जमान्याने जमान्याला जमान्यासारखे छळले
नसे जाणीव त्याला का स्वतः अपुल्या विचारांची

बदल आहे अढळ जगती अटळ दुसरे न काहीही
स्विकाराया हवी दुनिया बदलणा-या विचारांची

बरा तो इंग्रजांचा काळ होता वाटते आता
उरावरती भुते बसली किती पुढच्या विचारांची

तुझ्या नगरीत वाहे चंद्रभागा कोरडी देवा
तशी काही अवस्था जाहली अवघ्या विचारांची

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्विकाराया हवी दुनिया बदलणा-या विचारांची<<< सूट नाही आवडली, पण ओळ आवडली.

बरा तो इंग्रजांचा काळ होता वाटते आता
उरावरती भुते बसली किती पुढच्या विचारांची<<< दुसरी ओळ समजली नाही, पण वेगळा विचार!

तुझ्या नगरीत वाहे चंद्रभागा कोरडी देवा
तशी काही अवस्था जाहली अवघ्या विचारांची<<< वा वा

धन्यवाद बेफीजी

सूट सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे

"भुतांचा" विषय सद्याच्या राजकारणावर आहे

शेवटचे तीन जास्त आवडले

बदलणार्‍या विचारांची बाबत बेफीजी+१

पुढच्या विचारांची भुते म्हणजे "पुढारी"... वा छान ! शब्दाला-अर्थाला नव्या नजरेतून पाहणे जमले आहे छान ..चांगल्या कवीची निशानी आहे ही !

चंद्रभागेच्या शेरात अवघ्या ऐवजी माझ्या जास्त गझलिश ठरेल -वै.म.

असो

तरहीतील सहभागासाठी धन्यवाद
शुभेच्छा

छान

thanks

छान आहे गझल….

बदल आहे अढळ जगती अटळ दुसरे न काहीही
स्विकाराया हवी दुनिया बदलणा-या विचारांची

मस्तच.