निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना ते पुस्तक तुम्हा दोघींना खुप आवडेल..

शॅडोज ऑफ फर्गोटन अ‍ॅनसेस्टर्स.. मूळ लेखक कार्ल सगान.. अनुवाद रमेश लऊळ.. मॅ़जेस्टीक प्रकाशन.

आज बघितले तर त्या झाडाने आणखीनच गुलाबी रंग फासून घेतला आहे. फोटो टाकतो.. ते पुस्तक वाचून याकडे लक्ष गेले कि त्या पुस्तकातले कह्रे करून दाखवण्यासाठी त्या झाडाने हे करून दाखवले ?

दिनेशदा, मला अधून मधून ह्या नि.ग.वर यायला मिळते, आणि वरिल फोटो, माहिती ह्याबद्दल काहिच लिहिता येत नाहि. आणि मग एकदम ३०० वर पोस्ट एकदम वाचायला लागतात. Happy

अवलची बहिण शुभदा ही दापोलीला गेली होती. तिथले काही फुलांचे फोटो तिने अवलला पाठवले. अवलने ते आम्हाला शेअर केले. फुले इतकी सुंदर आहेत की लगेच त्यांची नावे जाणून घ्यायचा मोह झाला. मला आणि साधनालाही. शांकलीलाही तिने फोटो शेअर केले आहेत. म्हटल नि.ग. वरचे एक्पर्टच नावे शोधून काढतील म्हणून इथे शेअर करायला आम्ही तिची परवानगी घेतली आहे. तर खालील फोटोंची नावे माहीत असतील तर सांगा किंवा शोधूया.

हे खास फुल मला व साधनाला आवडलेल.
हे बहुतेक जमीनीपासून लागत.
१)

२)

३)

४)

५)

गावठी बदाम
लहानपणी आमच्या शेजारच्या वाडीत ह्याचे झाड होते. आमच्या वाडीत लहान होते त्यामुळे मी शेजारच्या वाडीतून त्यांच्या झाडाखाली पडलेली बदामे गोळा करून आणायचे. चांगली लाल झालेली आणि आख्खी असतील तर त्याचा वरचा गर खायला मजा यायची. थोडा घास बसायचा पण चव अजून रेंगाळतेय जीभेवर. हे बदाम पिकलेले काय कच्चे असताना सुद्धा पोपट ह्याचा फडशा पाडत असतात. झाडाखली नुसता खाल्लेल्या बदामाचा कचरा पडलेला असतो. घरी आणून किंवा तिथेच मैत्रीणींबरोबर खेळताना दगडावर बदाम फोडून त्यातील आतला गर खायला गंमत यायची. आतला बदामाचा गर आख्खा काठण्यासाठी कसोटी करावी लागे. पण तुटला तरी त्याची चव आणि त्यातला एक एक कण टिपून खाताना तो अधीक चविष्ट लागे. घरी पाट्यावर फोडले की पाटाही लालेलाल होऊन जात असे. आता झाडाखाली खच पडलेले असतात. पण त्याकडे पहायला वेळ नसतो. पण सुट्टीत मुलींना त्याची गंमत घेऊन दाखवायची आहे. Happy

गेल्या १५-२० दिवसापासुन १ झाड जाता येता बघत होते. फुलांच्या रंगावरुन वाटत होत की गिरीपुष्प असाव पण फुलांचा आकार वेगळा वाटत होता. आणि झाड नेमक फ्लायओव्हरच्या उतारा जवळ आहे त्यामुळे रस्त्यात थांबून बघायला नको असही वाटलं पण आज थोडी रहदारी कमी आहे अस लक्षात आल आणि शेवटी झाड पाहीलच. अगदी हाताच्या अंतरावरचा तो गुलाबी बहावा मला रोज खुणावत होता आणि आज आमची भेट झाली. त्याच्या भेटीमुळे दिवसाची सुरवातही मस्त झाली Happy
Bahava - Pink.jpg
फोटो - गुगलवरुन साभार

जागूतै, हे बदाम आमच्या ऑफिसातल्या प्रत्येक झाडाला आहेत
आणि झाडांची उंची इतकी लहान आहे की तोडुन खाता येतात.
मी पण पुर्वी तो लाल गर खायचे. आत्ता मध्ये ऑफिसातल्या झाडावरच्या तोडलेल्या बदामाचा गर खायचा ट्राय केला तर इतका बेक्कार कसा लागला देव जाणे Sad
बहुदा त्यात काहीतरी दोष असावा Uhoh

शांकली, मस्त पोस्ट Happy वाचुन मला हे गाणं आठवलं Happy

ये दिन क्या आये लगे फूल हसने
देखो बसंती बसंती होने लगे मेरे सपने

अजुनही देवनागरी टाईप करता येत नाहिये. दुसरीकडे टाईपुन येथे डकवत आहे.>>>>सुमंगल, कूकीज डिलीट करून बघणार का? मलासुद्धा सेम प्रॉब्लेम येत होता. Happy

जागू, अवल मस्त फोटोज Happy

स्निग्धा, तो गुलाबी कॅशिया आहे का?

संकरीत असतील कारण मी आमच्याइथल्या झाडांवर ती उंच झाल्यावरच बदाम लागलेले पाहीलेत.

आई गं, जिप्सी मला Confuse केलस. कॅशिया आणि बहावा एकच का? कारण मी 'इंडीयन पिंक बहावा' असच गुगलुन पाहील आणि मला मी सकाळी पाहीलेलीच फुल सापडली.

ये दिन क्या आये लगे फूल हसने
देखो बसंती बसंती होने लगे मेरे सपने

हाय हाय.. अगदी बसंती रंगात न्हाउन निघालायस रे..... Wink

मी पण पुर्वी तो लाल गर खायचे. आत्ता मध्ये ऑफिसातल्या झाडावरच्या तोडलेल्या बदामाचा गर खायचा ट्राय केला तर इतका बेक्कार कसा लागला देव जाणे

लहानपणीच्या जाणिवा आणि मोठेपणीच्या जाणिवा यात फरक असणार.. Happy

ते पहिले फुल भुईचाफ्याचे असावे असे माझे मन मला सांगत होते. पण इथे शशांकनेच टाकलेले भु.चा. चे फोटो दिसले. हा तो नाही Sad Sad मी लहानप्णी पाहिलेय पण आता काही आठवत नाही.

कॅशिया आणि बहावा एकच का?>>>>बहुतेक हो Happy शशांक, शांकली, दिनेशदा, साधना, जागू धावा. Proud

ते पहिले फुल भुईचाफ्याचे असावे असे माझे मन मला सांगत होते.>>>>>>>>>>.अगदी साधने. मला तसचं वाटल पण नंतर आठवल ती फुले जांभळ्या रंगाची आणि पा़कळ्या बहुतेक लहान असतात. Happy

पण इथे शशांकनेच टाकलेले भु.चा. चे फोटो दिसले.>>>>>>.कुठे आहेत. मलाही पहायचे आहेत. Happy

जिप्स्या गुगलून पाहीले तर बहाव्याला आणि कॅशियालाही cassia fistula असे नाव येते म्हणजे बहुधा एकाच जातीतले असावेत. जाणकार अजुन सांगतीलच.

http://www.maayboli.com/node/34014?page=5

शोभा इथे बघ ग..

आणि माझी ती कमेंट मी एडिटली. Happy बहावा कॅशीया फॅमिलीतला दिसतोय, फक्त सगळ्याच कॅशियांना झुंबरे लागत नाहीत. पण त्यांची फुले मात्र सारखीच दिसतात,

साधना मलाही तसेच वाटतेय. मी कधीपासून हा फरक पहायसाठी मी काढलेले फोटो शोधतेय. मिळताच टाकते. कारण मी गुलाबी कॅशिया पाहिलाय त्याला बहाव्यासारखी झुंबरे नव्हती आणि फुलेही लहान होती.

Common name: Burmese Pink Cassia
Botanical name: Cassia javanica subsp. renigera Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)
Synonyms: Cassia renigera >>>>> हाच तो गुलाबी बहावा जो वर स्निग्धाने फोटो टाकलाय तोच ...

आणि http://www.maayboli.com/node/11742 हा आपला Cassia fistula म्हणजेच बहावा किंवा अमलताश

हे दोघेही एकाच कुळातले - Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)

धन्यवाद शशांक, मी पिवळा बहावा खुप वेळा पाहिलाय पण गुलाबी या आधी कधी पाहिल्याच आठवत नाही.

मुंबईत गुलाबी कॅशिया मी दोन ठिकाणी पाहिला आहे. एक राणीबागेत तर दुसरा डोमेस्टिक एअरपोर्टहुन विलेपार्लेसाईडला जाताना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर.

गुलाबी कॅशिया बहरण्याचा हाच सीझन आहे का?

सायली Uhoh

मी पण इतक्यातच २ ठिकाणी पाहीला. आज पाहील तो बी टी कवडे रोडवर आणि दुसरा आमच्या बिबवेवाडीतच. खर म्हणजे 'सारख्याच प्रकारच्या फुलांची २ झाड' इतकच लक्षात आलं होत आणि आज नावाचा उलगडा झाला.

Pages