चान्स!!!

Submitted by sas on 28 June, 2009 - 12:01

सकाळी जाग आली तस डोक जड जाणवत होत, डोक्यावरुन हात फीरवत आणी बोटांनी डोक दाबत मानसीने डोळे उघडले, क्षणार्धात आपण कुठे आहोत ह्या धक्क्याने ती पुरती जागी झाली. आपण इथे कसे ह्या विचारात असतांना तीची नजर बाजुला गेली आणी ती ढासळली.... तीच्या त्या रुम मध्ये असण्यावर तीचा विश्वास होत नव्हता... हे काय नी कस झाल... आपण इथे कसे आलो... हा माणुस कोण जो आपल्या बाजुला रात्रभर... हे काय करुन बसलो आपण!!! शेकडो- हजारो विचार, प्रश्न तीच्या मना मध्ये गोंधळ घालत होते.... सुन्न मनाने ती बेड वरुन उतरली... त्या सुन्न अवस्थेत भराभरा पर्स, सेल घेऊन तीने सँडल्स घातले आणी ती दाराच्या दिशेने धावली... हळुच दार उघडुन ती बाहेर पडली आणी झपाझप हॉटेलच्या कॉरीडॉर मधुन जाऊ लागली अचानक थबकुन ती मागे वळाली...

...काल रात्रभर आपण कोणा सोबत होतो हे पहायला हव की नको!!! ह्या दुविधेत ती परत रुमवर पोहचली... रुम च दार उघडुन ती आत गेली.... कोण हा .... हातांच्या घडीत तोंड टाकुन पाठमोरा झोपलेल्या त्याच्या चेहरा हि निटसा दिसत नव्हता पण हा आपल्या ओळखीतला नक्कीच नाही... मग कोण हा....ह्याला उठवुन त्याला विचाराव की... काय करु ,काय नको.... गोंधळलेल्या अवस्थेत कावरी बावरी होऊन मानसी त्याच पाकीट शोधु लागली.... पाकीटात ड्राईव्हिंग लायसन्स असेल तर निदान कळेल तरी हा कोण .... ड्रॉवर मध्ये त्याच पाकीट होत... त्यातल्या पासपोर्ट वरुन त्याच नाव समजल "हर्षवर्धन डिसुजा"....

... लगबगीने मानसी रुम च्या आणि हॉटेलच्या बाहेर पडली... कारच दार उघडुन आत बसली... चावी लावली पण कार सुरु करण्याचा तीचा धीर होत नव्हता... ड्रायव्हिंग व्हिलवर डोक टाकुन ती बराच वेळ पडुन होती... कसाबसा धीर गोळा करुन ती निघाली... फ्लॅटवर पोहचली... दार उघडुन आत गेली आणी सोफ्यावर बसुन ढसाढसा रडु लागली.... रडता रडता तीला झोप लागली... तीन-चार तासांनी मानसी जागी झाली... आपण काय करुन बसलोय ह्याची बोच तीला खात होती... हे काय झाल... कस झाल... ह्या प्रश्नांनी तीला वेड लागत होत.... हे अस का नी कस झाल ह्याची उत्तर शोधण्यास मानसीच मन विचारात गढुन गेल...

... काल रात्री ड्रिंक जरा जास्तच झाली होती... ईतकी जास्त की नशा पुरता चढला... भानच उरल नाही कसल.... गेल्या २-४ दिवसांपासुन वाटत होत झोकुन द्याव स्वःताला नशेत... विसराव सार दु:ख, सार्‍या वेदना, यातना आणी याही पेक्षा जास्त वाटत होत कराव स्वःताला मुक्त आणी भागवावी तहान... हो असच वाटत होत गेले २-४ दिवस आणी काल झाल ही तसच.... मानसी च मन कालच्या आठवणीत घुटमळत होत...

...काल नसीम आणी नितीन ची ३ री डेट अ‍ॅनिव्हर्सरी आणी एंगेजमेन्ट पार्टि होती... पार्टित मी, प्रिया, सलीम, मॅथ्यु आणी नसीम चा NRI मीत्र ही येणार होता... सारे गप्पा, गेम्स, ड्रिंक, मस्ती यात रमले होते मला मात्र खुप एकट जाणवत होत... आज निशांतची खुप आठवण येत होती...

...आमच ब्रेक-अप होऊन चार महिने झाले होते पण तरीही... आजही पर्स मध्ये त्याचा फोटो मी तसाच ठेवला होता... किती खुश होतो आम्ही... सार कस सुरळीत जात होत... गेल वर्षभर सोबत रहातांना जणु संसार थाटला होता आम्ही... किती जीव लावला होता मी त्याला... किती विश्वास होता मला त्याच्या वर... पण माझ्या विश्वासाला तडा दिला त्याने.... का, का अस झाल?... माझ्या कडे उत्तर नव्हत आणी तोहि फक्त 'सॉरी' म्हणुन क्षणात माझा संसार, माझी स्वप्न मोडुन निघुन गेला...

रात्र रात्र ऑफीसात बसुन स्वःताला कामात गुरफटुन घेतल ... सुट्टी घेवुन बाहेर जावुन आले, नव्या जागी शीफ्ट झाले पण मन मात्र निशांतच्या आठवणीत कायम झुरत होत, रडत होत.... मन दु:खातुन बाहेर यायला तयार नव्हत.... कधी तरी गुड फॉर हेल्थ म्हणुन रेड वाईन घेणारी मी कलीगज बरोबर ऑफीस नंतर ड्रिंक करु लागले... एकटे पणा ची तहान मी ड्रिंक वर भागवु लागले... नसीम, नितीन, मॅथ्यु सगळे सांगायचे कंट्रोल ठेव म्हणुन पण मला ते समजत असुन उमजत नव्हत.... अश्यातच ....

अश्यातच काल पार्टित खुप चढली... नसीम ने तीच्या NRI मीत्राशी 'एचडी' शी ओळख करुन दिली ...आम्ही दोघे गप्पा करत बसलो.... तो उद्या परत निघणार होता... तो उतरला होता त्याच हॉटेल मध्ये पार्टि होती... नसीम साठी गीफ्ट आणायला तो बाहेर गेला होता त्यामुळे पार्टित यायला त्याला उशीरा आला....तो येई पर्यंत माझ बरच घेवुन झाल होत पण मी स्टेबल होते....पार्टि नंतर सारे गेले मला आग्रह हि केला सगळ्यांनी चल म्हनुन पण मी नकार दिला... मला ड्रिंक मध्ये स्वःताला विसरायच होत...मी आणी नसीम चा मीत्र बराच वेळ बोलत बसलो....... सकाळी ऊठले तर मी....

मानसी विचारातुन बाहेर आली ... हर्षवर्धन डिसुजा... एच. डी.... हा नसीम चा फ्रेंन्ड तर नाही... तीने नसीम ला फोन लावला.... दुपारच्या फ्लाईट ने तो निघणार होता... मानसी नसीम बरोबर विमानतळावर गेली पण नसीम समोर त्याला काय आणी कस विचारायच तीला सुचत नव्हत... तो त्यानेच नसीम ला माझ्या साठी कॉफी आणशील का म्हणुन कॉफी आणण्यास पाठवल...

त्याच्याशी नजरा मीळवायची मानसी ची हिंमत नव्हती... तो काहि न विचारताच बोलु लागला", तुला चढली होती, आणी मी हि तसा ड्रन्क होतो म्हणुन तुला घरी सोडण्या पेक्षा माझ्या रुम वर घेवुन गेलो... डोन्ट वरी काल काही झाल नाही ... बट नेहमीच तुला अस स्वःताच स्वःताला खड्ड्यात पाडुन सहिसलामत बाहेर येण्याचा चान्स मीळेल अस नाही सो बी केअरफुल "

... मानसीच्या मना वरच ओझ जरा कमी झाल पण तरीही ती त्याच्याशी नजर मीळवु शकली नाही.... त्याला थँक्स म्हणुन मानसी हि नसीम च्या मागे कॉफी आणायला गेली

तो गेला पण त्याचे शब्द तीच्या मनातुन जात नव्हते... 'चान्स'.... हो! नेहमीच आपल्याला असा चान्स नाही मीळणार आणी आज जो चान्स मला मीळालाय तो मी स्वःताला अजुन पाडण्या पेक्षा... स्वःताला खंबीरपणे उभ करण्यास घेतला पाहिजे... दु:खाला कवटाळुन बसण्यापेक्षा, दु:ख आपल्या वर हावी होऊन आपल्याला नष्ट करेल या पेक्षा दु:खाला सामोरी जाऊन, सत्य स्वीकारुन, दु:ख भुलवुन दु:खाला हरवलच पाहिजे... मानसी ने पर्स मधुन निशांत फोटो काढला आणी गारबेज कॅन मध्ये टाकला....... शांत मनाने, उत्साहाने आणी हसत मुखाने मानसीने एक नवी सुरवात केली...

गुलमोहर: 

विस्कळीत वाटली कथा, नायिकेच्या मनस्थिती सारखी.

कथा आवडली, शेवट जास्त आवडला.

आपल्याला अजुन एक चान्स मिळालाय हेही ओळखता यायला हवे. नाहीतर जे गेलंय त्याचे दु:ख करताना त्या जाण्यामुळॅ जे मिळालंय तिकडे दुर्लक्ष होते.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

आवडली कथा!

अ‍ॅशबेबी ला अनुमोदन!

========================
बस एवढंच!!

शुद्धलेखनाच्या सारख्या ठेचा लागत होत्या. बाकी ठीक !

काय गमावलं यापेक्षा काय मिळालं हे पाहता आलं पाहिजे. सहमत.

nshelke, अ‍ॅशबेबी, अक्षरी, AnDy_1, bhanasa ... आभार Happy .... अशुद्धलेखना मुळे झालेल्या त्रासा बदद्ल क्षमा Happy ... तुमच्या सगळ्यांच्या सुचना लक्षात ठेवुन सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन Happy

असे क्षण येतात. the only way out of a problem is through it.

मस्तच आहे कथा.............."एचडी" चं character छान आहे!

भाग्यश्री, अश्विनीमामी, वर्षा, मीरची खुप खुप आभार Happy

सास, घणी सरस स्टोरी Happy

तू पुन्हा एकदा एडिटिंग करत जा.. म्हणजे जरा सफाईदारपणा येईल.

जाईजुई, प्रीती आभार Happy

जाई 'आभार' ला गुजराथीत काय शब्द आहे? ... हुं अगला वेळस पासुन बे दा एडिटिंग करीस :).. माझ गुजराथी म्हणजे गुजराथीची वाट Happy