सकाळ (नर्मदाकाठची कविता )

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 March, 2014 - 14:20

हिरवळी पानावर
काळसर मातीवर
इवलाले दवबिंदू
कोळीयांच्या जाळीवर

ओल साऱ्या झाडावर
किनारी दगडावर
जलपऱ्याची पावुले
उमटली फुलावर

पाण्यामधून धूसर
धुके जात होते वर
श्वासातील उष्ण बाष्प
थंडगार वाऱ्यावर

झोतामध्ये तीक्ष्ण शीत
होती पण उबदार
माईची सोबत अन
हात सुन्न हातावर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks भारती ताई ,शशांक .

,<<<<<<<"हात सुन्न हातावर" हे नाही कळले >>>>>sorry दुर्बोधता आल्या बद्दल .माझ्या थंडीने सुन्न पडलेल्या हाताला माईने हातात धरले असा अर्थ इथे आहे ,