Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2014 - 12:53
पुरेशी येत नाही कल्पना त्याच्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची
बरे केलेस माझे कापले तू पंख आयुष्या
भरारी मारली होती खुल्या-ताज्या विचारांची
मजेने झोपला आहे नका जागे करू त्याला
जगाला वाट्ते धास्ती ख-या त्याच्या विचारांची
सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची !
जगामध्ये तिच्या भोळ्या मनाच्या चिंधड्या झाल्या
हवेमध्ये विखुरली लक्तरे साध्या विचारांची
नकाराने छुप्या त्याच्या पुरी विच्छिन्ऩ झालेली
मनाने बांधली मोळी खुळ्या-सा-या विचारांची
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरळ रस्ता पुढे होता
सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची ! << व्वा ! >>
मतला पण सुरेख...
आवडली
वा मस्त ! एकंदर सगळेच शेर
वा मस्त !
एकंदर सगळेच शेर छानच . अधिक आवडलेल्या शेराबाबत अरविंदजी +१
तरही सहभागासाठी मनःपूर्वक आभार तै यंदाची ओळ माझी आहे
हो वैवकु, अभिनंदन अन धन्यवाद
हो वैवकु, अभिनंदन अन धन्यवाद आपले
वाह
वाह
मजेने झोपला आहे नका जागे करू
मजेने झोपला आहे नका जागे करू त्याला
जगाला वाट्ते धास्ती ख-या त्याच्या विचारांची
सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची !
मस्त..!