अकल्पित..सत्य कल्पनेपलीकडले (मराठी चित्रपट)

Submitted by छोटी on 2 March, 2014 - 21:14

एक चित्रपट नवीन धाटणीचा, नवीन कलाकारांचा, नवीन दिग्दर्शकचा. चित्रपटात काही चांगल्या गोष्टी आणि काही चुकाही असतात पण जेव्हा चांगल्या गोष्टींची संख्या जास्त असते तेव्हा काही चुका विसरतात येतात, तेव्हाच चित्रपट आवडला असं म्हणता येत, असच काहीसं “अकल्पित” च झालंय...
चांगल्या गोष्टी:
१) चित्रपटला चक्क कथा(जी आजकालच्या चित्रपटात बहुतेक वेळा नसते.)
२) दिग्दर्शक जरी नवीन असला तरी शॉट मध्ये काय हव ते माहिती होते.(संवाद नसलेले सगळेच शॉट खूप सुरेख आहेत तर काही संवाद असलेले शॉट अप्रतिम आहेत)
३) उगाच फालतू गाणे नाहीत.(एकच गाणं आहे)
४) चित्रपटाचा वेग बऱ्यापैकी सांभाळला आहे
५) थरार शेवटपर्यंत ठेवण्यात यशस्वी.
६) प्रत्येक गोष्टीला logical उत्तर द्यायचा प्रयत्न.
७) जुन्या कलाकारांची हजेरी.(मोहन आगाशे ह्याचं नुसतं असणच पण खूप छान वाटत,संदेश जाधव आपली जवाबदारी नीट निभावतात)
८) रेणुका शहाणे, निर्मिती सावंत ह्यांचा परत सुरेख अभिनय.
९) चित्रपटाचा कमीवेळा हाताळलेला प्रकार(psyco-थ्रील्लर), चकचकीत दृश्य, वेशभूषा आणि केशभूषासुद्धा(मराठी चित्रपट पण टकाटक झालाय).
१०) काही नवीन कलाकारांचा अभिनय छान झाला आहे, त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत(ऋतू पाटील, सुमेध गाईकवाड,आशुतोष पत्की)

चुका:
१) मुख्य कलाकाराला आपल्याला भूमिकेला न्याय देता आला नाही.(संवादांची देवाण-घेवाण फारच कंटाळवाणी, तरी काही प्रसंग ठीक आहेत त्यात संवाद नव्हते ना बोलायचे. नया है वह!!!)
२) काही प्रश्न अनुत्तरीत त्यामुळे शेवट थोडासा गडबडला.
३) संवाद थोडे अजून खुसखुशीत हवे होते.(तो आला,तो गेला ह्यासारखे संवाद , जुगार म्हणजे पत्त्यांचे खेळ त्यात बरेच प्रकार असतात, कोणी अस म्हणत नाही चला जुगाराला बसू. पत्यांचा बाबतीत केलेली हेळसांड सहन नाही होत... तिडीक जाते एकदम).

अनेक मूर्ख अश्या bollywood चित्रपटासाठी पैसे घालवतोच ना आपण... त्यापेक्षा आपल्या एका चांगल्या मराठी चित्रपटासाठी करा खर्च... होऊ द्या खर्च.. चर्चा तर होणारच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users