२) "शब्दकोडे" - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 05:56

शोधा म्हणजे सापडेल.............

चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?

रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.

चला तर मग ही वैविध्यपूर्ण अशी कोडी डोकं चालवून पटापट सोडवा बरं!

नियम :-

. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
. या खेळात ठराविक वेळेच्या अंतराने वेगवेगळी कोडी दिली जातील. दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पूर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरील प्रतिसादात अपलोड करायचा.
दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
कागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
एक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या

ज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.
परंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.

. काही वेळेस कोडे सोडवण्याबरोबरच अधिकची माहितीही विचारली जाईल. कोड्यासोबत ती माहितीही देणे अनिवार्य आहे.
५. नविन कोडी इथेच मुख्य धाग्यावरती दिली जातील.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दकोडे क्रमांक - ५ . नियती

यात आपल्याला १५ पात्रांची नावे शोधायची आहेत. आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या कथा/कादंबरींचे नाव यांचा देखील उल्लेख करायचा आहे.

---------------------------------------------------------

"शब्दकोडे क्रमांक ८"... उदयन

यात आपल्याला २४ पुस्तकांची नावे शोधायची आहेत आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख सुध्दा करायचा आहे.

उभी, आडवी, तिरकी, खालुन वर... सगळ्या प्रकारची आहे ... शोधा शोधा..
-----------------------------------------------------------------------------------------------

उत्तरे प्रतिसादात लिहिली तरी चालतील परंतु पुर्ण कोडे कृपया मुळ कोड्यावरुनच सोडवुन इथे देण्याचा प्रयत्न करावा इतरांना देखील उत्तरे कळायला हवीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे वळून पाहताना असेही एक पुस्तक आहे डॉ. दीपा यांचे. मी ते मार्क केलेले आहे. संयोजकांना कुठले अपेक्षित आहे ते ठाऊक नाही.

शब्दकोडे ३ आणि शब्दकोडे ४ यांचे काही थोडेच उत्तरे बाकी आहे

मायबोलीकर्स लवकर करा....

जमेल ना ????

शब्दकोडे ४चे उत्तर.

बरेच जण जवळपास गेलेले होते परंतु पूर्ण कोडे सोडवले गेले नाही...

प्रयत्न करणार्‍या सर्व मायबोली करांचे अभिनंदन....!!!!

बदल केलेला आहे

त्याच बरोबर पुस्तके किती शोधायची आहे याचा देखील उल्लेख केलेला आहे

प्राजक्ता कोड्यांची साईझ कमी केलेली आहे.

1393578735_tmp_mabo.jpg

संयोजक,
आधीची कोडी काढून का टाकली ? ज्यांना वेळ नाही झाला ते नंतर प्रयत्न करू शकतात.

मी बहुदा फक्त सरळ सरळ शब्द शोधत गेले, माहीत नाही त्यातली किती पुस्तकांची नावे आहेत Sad

अल्बम - मंगला गोडबोले

अनर्थ - भारत सासणे

यज्ञ - भा.द.खेर व शैलजा राजे

वलय - व.पु,काळे

नटरंग - आनंद यादव

कमळ - हेमा साने

अघळपघळ - पु.ल.देशपांडे

जलपर्व - रेखा बैजल

पर्व - डॉ.एस.एल.भैरप्पा

धग - भावेश गुरव

चक्र - जयवंत दळवी

ब्र - कविता महाजन

रक्त - पु.के.चितळे

चंदन - आशा बगे

जंतरमंतर - डॉ.बाळ फोंडके

रक्तचंदन - जी ए कुलकर्णी

१.सन्मीत्र - विशाल कुलकर्णी - द्वार

२.सम्राट - पारिजाता -प्रारब्ध

३.अखिलेश -कवठीचाफा -सावली

४.साहिल - नंदिनी - समुद्रकिनारा

५.रेहान - नंदिनी =मोरपीसे

६. पख्तुनी -विशाल कुलकर्णी - राँग नंबर

७.राघवन-सिमन्तिनी - पंधराशे हॅरीसन -हफ बेक्ड
८. रफिक -वेल- आधुनिक सीता
९. मेघना-विनिता.झक्कस- लार्जर गेम

sk niyati 1 ans..jpg

पख्तुनी -विशाल कुलकर्णी - राँग नंबर
सन्मित्र - विशाल कुलकर्णी - द्वार
राठी - विशाल कुलकर्णी - झोका
अखिलेश - कवठीचाफा - सावली
साहिल - नंदिनी - समुद्रकिनारा
रेहान - नंदिनी - मोरपीसे
राघवन - सिमन्तिनी - पंधराशे हॅरीसन-हाफ बेक्ड
रफिक - वेल - आधुनिक सीता
अनुराग आणि मेघना - बागेश्री - पत्रकथा
नचिकेत - विनीता देशपांडे - आठवणींचे कपाट
सम्राट - पारिजाता -प्रारब्ध
प्रसन्न -

Pages