फक्त प्राणायामाने वजन कमी होते का?

Submitted by सख्या on 26 February, 2014 - 02:44

फक्त प्राणायामाने वजन कमी होते का? बाकी कुठले फिजिकल व्यायाम करण्यास डॉक्टरने मनाई केली आहे. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज दहा मिनिटे कपालभाती केली तर वजन १ आठवड्यात १ किलोने कमी होऊ शकते असे माझ्या ट्रेनरने सांगितलेले. पण ती हेही म्हणाली की आधी एखद्या जाणकाराकडुन कपालभाती कशी करायची ते नीट शिकुन घ्या. टिवीवर पाहुन वगैरे शिकु नका. तुम्ही जर चुकीचे करत असाल तुमचा गाईड तुम्ही करताना तुम्हाला पाहुन मार्गदर्शन करु शकतो.

सख्या, वजन कमी करण्यासाठी ही एक मुद्रा आहे..ती करून पाहा...एका वेळी ४५ मिनिटे करावी किंवा दिवसभरात मिळून ४५ मिनिटे करावी...जसे जमेल तसे...अर्थात खा तूप की दाखव रूप असा हा प्रकार नाहीये...पण नियमित केलीत तर जरूर उपयोग होईल अशी खात्री आहे...दोन्ही हातांनी ही मुद्रा करायचीआहे...बसून, उभे राहून किंवा फिरतांना..कोणत्याही अवस्थेत ही मुद्रा आपण करू शकतो....मात्र जेवण झाल्यावर लगेच करू नये....तीन-चार तास मध्ये जाऊ द्यावेत.
20140226203315.jpg सूर्यमुद्रा
अनामिकेचे अग्र अंगठ्याच्या मुळाशी लावून अंगठ्याने अनामिकेवर हळूवार दाब देणे..इतर तिन्ही बोटे सरळ

शरीराचे वजन समीकरण असे आहे,

उष्मांक सेवन - उष्मांक खर्च = परिणामी वजन

उष्मांक सेवन ( आहार ) - उष्मांक खर्च ( शरीर चयापचय + दैनंदिन हालचाल + व्यायाम ) = परिणामी वजन

'परिणामी वजन' जर '+' असेल तर वजन वाढेल.
'परिणामी वजन' जर '-' असेल तर वजन घटेल.

तुम्हाला व्यायामाला परवानगी नसेल तर आहार कमी ( Calorie Restriction ) करण्याशिवाय सोपा दुसरा मार्ग नाही.

उपवास करणे उत्तम. 'चतकोर भाकरीचे व्रत' घ्या. रोज दोन वेळा फक्त चतकोर भाकर आणि भाजी खा, वजन नक्की उतरेल.

"तोंडाचे कुलूप उत्तम कुलूप, नाहीतर bariatric सर्जरी करून पोटाला कुलूप लावावे लागते !

आहारामध्ये ४०% कपात(Calorie Restriction) केल्याने आणि व्यायाम केल्याने आयुष्य वाढते, वृद्धत्त्व पुढे ढकलता येते असे संशोधन आहे.

पहा पटतंय का ? अर्थात प्राणायाम अवश्य करा, त्यात निश्चितच फायदा आहे.

शिंदे सर,
माफ करा, तुम्ही इमानदारीत योग्य सल्ला लिहिलात. पण,
>>बाकी कुठले फिजिकल व्यायाम करण्यास डॉक्टरने मनाई केली आहे<<
त्यांनी लिहिलेलं ^*हे वाचलं नाही का?
त्यांच्या "डॉक्टरने" व्यायाम वर्ज्य केलेत. आता त्याच डॉक्टरने वजन कमी करायचे उपाय पैसे घेऊन सांगितले नसतील असं वाटतंय का तुम्हाला, सर? सांगितले नसतील तर त्या डॉक्टरची लायकी काय, याबद्दल इथे बोलायलाच हवं का?
थोडा बरा डॉक्टर असेल, तर, यांना "तोंडाला कुलुप" हा इलाज त्यांच्या 'डॉक्टरने' नक्कीच सांगितलाय. ते काही यांना जमणार नाहिये, असं दिसतंय. अन्यथा माबोवर क्लाऊड सोर्सिंग करत ज्ञानकण शोधले नसते यांनी.

फिजिकल व्यायाम बंद म्हणजे हार्ट प्रॉब्लेम असेल Wink किं.वा त्या पंडू राजाला दिला होता तसा काही शाप असेल.. जे असेल ते असो. पण बंद पडलेली स्कूटी रिप्येर करण्यासाठी ५० ठिकाणी चौकसपणे एक्स्पर्ट मेक्यानिक शोधणारे शोधणारे लोक, स्वतःच्या करोडो मोलाच्या तब्येतीबाबत हौशी वैद्यांना, किंवा रँडम स्ट्रेंजर्सना सल्ले का विचारत फिरतात कुणास ठाऊक..

ईब्लिसराव,
सध्या 'प्राणायाम' खूपच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे. ( श्री रामदेवबाबान्मुळे !) प्राणायामाचे फायदे अनेक आणि अतर्क्य असू शकतील पण त्यालाही काही मर्यादा आहेत याची जाणीव असणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी हजारो उपाय नेटवर सापडतील. chronic calorie surplus हा स्थुलपणाचा स्थायीभाव असतो.

माझे एक परिचित खूप दिवसांनी भेटले तेंव्हाचे संभाषण,
"सर, नमस्कार !"
"नमस्कार, माफ करा, मी आपल्याला ओळखले नाही."मी
"मी सोलापूरकर !"
"अरे, तुझ्यात फारच बदल झाला आहे."मी
या गृहस्थाला वजन कमी करण्यासाठी मी अनेक वेळा सल्ला दिला होता.
"माझे वजन पन्नास किलो कमी झाले आहे."
"कसे बुवा"मी
"मी पोटाचे ऑपरेशन करून घेतले."
"खर्च?"मी
"पाच लाख गेले जवळजवळ !"
"मग आत्ता काय जेवतोस?"मी
हाताचा अंगठा वाकवून चार बोटांच्या बुंध्याला लावून म्हणाला,"एव्हडी भाजी दोन वेळा खातो. जास्त खावूच शकत नाही."
"अरे मग त्यासाठी ओपरेशनची काय गरज होती ? एव्हडेच तसेही खाल्ले असते तरी वजन कमी झाले असते!"मी
"हो ना ! पण माझा माईंडसेट तयार नव्हता तेंव्हा ! एव्हाद्याशा खाण्यावर मी जगू शकतो याची खात्री नव्हती."

पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लाखमोलाच्या शरीराची काळजी घेण्यासाठी कवडीमोलाच्या सल्ल्याला किंम्मत नसते.

छान सल्ला शिंदे सर !
मी सल्ला देईन जेवताना पुर्णवेळ , प्रमोद देव यांनी सांगितलेली मुद्रा करायची ,आपोआप वजन कमी होईल. Proud Light 1

शिंदे सर, उपवासाने ब्लड शुगर वाढण्याचा धोका नसतो का?
शिवाय आजकाल दर दोन- तीन तासांनी मोजकं खाण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात तो सल्ला तुमच्या सल्ल्याशी विसंगत वाटला म्हणून विचारलं.

मला वजन कमी करायची अजून एक मुद्रा माहित्येय.
दोन्ही हात पालथे करून तळहात बरोब्बर ताटाला समांतर आणि ताट झाकले जाईल असे ठेवायचे.
ही मुद्रा आपण जेवायला बसल्यावर कुणी दुसर्यांदा कोणताही पदार्थ वाढायला आल्यास करायची.

अजून एक मुद्रा मान एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवायची.
कमीत कमी एका सेटमध्ये तीन वेळा.
प्रत्येक सेट 'अमुक एक पदार्थ अजू वाढू का?' असा प्रश्न जेवताना कुणी विचारल्यास करावा.

अजून एक मुद्रा..
कर्बोदकविपरीतमुद्रा.. भरपूर कार्ब्ज असलेले काहीही समोर आले की त्याच्या उलट दिशेला मान फिरवायची. आणि निघून जायचे. Happy

@शुगोल:<<<इतकं कमी खाऊन अ‍ॅनिमिया उद्भवणार नाही का?>>>निश्चितच उद्भवेल. bariatric सर्जरीनंतर असे अनेक प्रोब्लेम्स उद्भवले होते. म्हणून आत्ता micronutrient supplements, प्लास्टिक सर्जरी असे सर्जरीपश्चात उपाय करावे लागतात. आणखी काही परिणाम समजण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. Calorie Restriction फॉलो करताना optimal nutrition ची काळजी घ्यावी लागते. अमेरिकेतील आणि जगातील अनेक CR करणारे लोकांना म्हणूनच CRONIES असे म्हणतात. गूगल करा : calorie restriction society of america ! जपानमधील ओकिनावा बेटावरील बहुतेक जण शंभरीच्या पुढे जगतात याचे कारण देखील CR !

@बोबडे बोल :<<<उपवासाने ब्लड शुगर वाढण्याचा धोका नसतो का?>>> जर तुम्हाला insulin dependant type १ डायबीटीस नसेल तर धोका नाही उलट फायदा जरूर आहे. newCastle येथे mark Tailor यांनी नुकताच एक प्रयोग प्रकाशित केला आहे ज्यात CR मुळे डायबीटीस reverse करता येतो असे दाखविले आहे. type २ डायबीटीस हा जास्त calories जास्त दिवस खाल्ल्यामुळे निर्माण होतो अर्थात त्याला अनुवंशिकतादेखील जबाबदार असते. पण आपल्याला हा प्रयोग आपल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली करावा लागेल.

<<<<आजकाल दर दोन- तीन तासांनी मोजकं खाण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात तो सल्ला तुमच्या सल्ल्याशी विसंगत वाटला>>>> मी ही हा सल्ला वाचला आहे. उदा. ऋतुजा दिवेकर देखील असे सांगतात. पण आहारातील योग्य बदल, वाढीव व्यायाम आणि नकळत होणारा effective CR हे त्यातील शास्त्रीय कारण असावे. High GI असलेले कार्ब कमी करून प्रथिने वाढविणे (ॲटकिन यांनी सुचवलेली आहार पद्धत ) आणि असे अनेक 'diets' चा उद्देश शेवटी वजन कमी करणे हाच असतो. कोणाच्या कोंबड्याने सूर्य उगवला हे महत्वाचे नाही ….! एक गणित सोडविण्याच्या अनेक पद्धती असू शकतात.

अजून एक मुद्रा..
कर्बोदकविपरीतमुद्रा.. भरपूर कार्ब्ज असलेले काहीही समोर आले की त्याच्या उलट दिशेला मान फिरवायची. आणि निघून जायचे.<<< Lol

मी काही बदल केलेत व मला फरक जाणवला.

नुसता प्राणायाम करून वजन नाही कमी होणार, त्याबरोबर काही योगासने मदत करतील योग्य आहाराबरोबरच. Proud
(आहे की नाही गंमत, गाडी शेवटी खाण्यावरच आली की नाही)
श्वसन सुधारल्याने मदत होते ओवरॉल तब्येतीवर.

माझा अनुभवः
मी कार्ब्स काढून जगु शकत नाही असे समजले. (सवय हो), तेव्हा कमी प्रमाणात व कोणत्या वेळी खातेय हे बघते.
सकाळी प्राणायाम, काही आसने करते. जिम बंद केलाय; नुसते पैसे जात होते दर महिन्याला, मी सोप्यावर बसून असायचे आता निघेन, नंतर जाईन करत.
सख्या,
बघा तुम्ही करून पटलं तर...

(काय हि आयडी..मला आपलं उगाच, ' सख्या रे घायाळ मी हरणी' आठवतेय...) Proud

मी आणखी एक मुद्रा सांगतो ,तर्जनी अनामिका मधले बोट यांना मिटून मूठ बनवायची व राहीलेल्या दोन बोटांनी जेवण करायचे...करुन बघा बरं!

अवांतर तरीही......Extreme Anorexic Speaks Out About the Eating Disorder
कालच Valeria Levitin ची वरच्या विषयावरची याहूवर क्लिप पहा.

डॉ शिन्दे.....मस्त माहिति आहे ..
सगळ कळ्त पण वळत नाही अशी स्थिति बर्याच जणाची असते त्यामुळे त्याना आहारतज्ञ , ओपरेशन वगैरे सारखे फन्डे सुचतात आणी करतात.....

साती नीधप ग्रेटथिन्कर चे सल्ले , मुद्रा सगळ्यात बेश्ट ...... सवय केलि कि नक्की जमते ...स्वानुभवाचे बोल ... Happy

>>>> फक्त प्राणायामाने वजन कमी होते का? << नाही
नुस्त्या व्यायामानेही वजन कमी होणार नाही. तशात तुम्हाला व्यायाम वर्ज्य सांगितलाय.
तेव्हा त्याकरता आहारावरच मर्यादा आली पाहिजे.

इब्लिसा, कित्ती ते पाल्हाळ लावतो रे कधी कधी तू? मी बघ! कसे तिन वाक्यात सान्गितले? Wink

बायदिवे, माझ्या नशिबाने आयुष्याच्या एका भल्या थोरल्या वळणावर अशी वेळ आणली होती की रस्त्याकडेच्या हातगाडीवर सकाळी वडापाव स्याम्पल एक प्लेट व चहा, रात्रीही तसेच काहीतरी वा तुळशीबागेतील दवेस्वीटमार्टचा ढोकळा वा नुस्ता पावचहा इतकेच परवडू शकत होते. कित्येकदा ते ही नाही.
तेव्हा आपोआपच, अन कदाचित तो स्थायीभावही असेल माझा, पण समोर जे अन जितके आलय तेवढे मनापासून खायचे, व या ऊप्पर जास्त काही मिळणार नाही हे मनाला बजावायचे अन उठुन कामाला लागायचे, भरपुर पाणी प्यायचे (त्यामुळे भूक मरते) असे दिवस काढल्यावर नन्तर समोर एकदा एका डीश मधे जितके आले असेल तितकेच खाऊन भूक भागल्याची भावना वाढीस लागल्याने आपोआपच आवडतय तर अधाशासारखे खात सुटण्यावर ताबा मिळवता आला .
या व्यतिरिक्त वडीलांची करडी शिस्त, जेवताना भान्ड्यात पाणी तसेच राहिले तर ते देखिल न चालणे, व घेतानाच समजुन पाहिजे तेवढेच का घेतले नाही ही उलटतपासणी, पहिले वाढप संपवलेच पाहिजे, पानात काहीही टाकायचे नाही..... वगैरे.... शिवाय ते अभिमानाने सांगायचे की ते त्यांनी जितके ठरवले तितकाच आहार वर्षानुवर्षे घेत आलेत, त्यात कोणत्याही कारणाने वाढ होऊ देत नाहीत.

आहारविषयक सवईंकरता मला वरील दोन्ही कारणे उपयुक्त ठरली. आजही, समोर कितीही आवडीची वस्तु/खाण्याचा जिन्नस असला, तरी अन्नाच्या ठराविक सेवनानंतर त्यापेक्षा जास्त चुकूनही घेत नाही. अगदी परवा रविवारी आपटे रोडवर स्वप्नशिल्पमधे जेवण घ्यायचा योग आला, इतके अप्रतिम जेवण आजवर अनुभवले नव्हते कुठे, तरी ताटात पहिल्यान्दा सवईने थोडे थोडे जे घेतले तेवढ्यावरच थांबलो! इच्छा होत होती अजुन घ्यायची, पण आवर घातला.
बरीच वर्षे खायचा आनंद लुटायचा असेल, तर आज आत्ता थोडे कमीच खाल्ले पाहिजे. आजी व आई तर म्हणायचीच, किन्वा तो संस्काराचाच एक भाग असायचा की जितकी भूक लागलीये, त्यापेक्षा दोन घास कमीच जेवा! Happy अन असे केले तरच धडधाकट जगता येईल, नैतर आजच भरपुर हादडून घेतले, जोडीला कष्टही केले नाहित तर अवघड असेल.

नशिबाने आयुष्यातील सध्याच्या म्हणजे २००८ पासुनच्या वळणावर् अशी गत् करुन् ठेवली आहे की खालच्या वरच्या दोन्ही बाजुच्या दाढा एकतर् तुकडे पडून् वर् हिरड्या ओढुन् बसल्यात् किन्वा काढून् टाकल्यात्, अन् चारी बाजु जरा काही कडक् खाण्यात् आले तर् मरणाच्या दुखतात तेव्हा अतिशय काळजीपूर्वक मऊ तेवढेच हळूवार पणे चघळत/ दुखया हिरड्या व त्यात् लपलेल्या दाढांच्या कणान्नी चावायचा प्रयत्न करीत भरपुर लाळेमधे विरघळवित् एकेक् घास् बत्तिसवेळा काय् शम्भरवेळा चावित् मगच् गिळावा लागतो. अर्थातच् जेवायला वेळ् जास्त् लागत् असल्याने शेवटी कण्टाळा येऊन मी जेवणावरुन (पण् काही ही न टाकता) उठतो, अर्थातच् आहार मर्यादित सन्क्येत रहातो हे सान्गणे न लगे. शिवाय् लाळही भरपुर मिसळत असल्याने पचनाचे प्रश्न अजिबात् नाहीत्, जे अन् जेवढे खाऊ तेवधे नीटपणे अन्गी लागते.
पुढच्या पन्चवार्षिक योजनेमधे कदाचित कवळी वगैरे करुन् घेईन्, पण् तोवर वासनेवर ताबा मिळविण्याचा अध्यात्मातील जरुरीचा कार्यानुभव निदान् खाद्यपदार्थांबाबत तरी यशस्वीपणे नशिब् अमलात् आणून् घेतय्. Happy
असो.
तर इब्लिसा, पाल्हाळ लावायचे तर ते असे लावावे..........! काढावी लागली का कुणाची अक्कल इथे? Wink

वरदा, चालायला बन्दी नसावी बहुतेक.

पण काय होते ना, की माणूस व्यायाम वगैरे करतो, तेवढ्याश्या "कष्टानेही" त्याला जबरदस्त भूक लागते, अन तो अधिकच जास्त खातो, तर व्यायाम करुनही आहार मात्र कमी करत न्यायचा तर "भुकेच्या भावनेला" फसवाव लागत, अन तिथे वर उल्लेखिलेला थोड्या थोड्या वेळाने थोड थोडच खाण्याचा उपाय कामी येतो.
माझा अनुभव असा की मी जेव्हा लिम्बीच्या शेतावर वगैरे जाउन किन्वा अन्य कष्टाचि कामे करतो तेव्हा सडकुन भुक लागते, एरवी आपली शरिरधर्माला साजेशी. मात्र मी एक कटाक्षाने पाळतो की जास्त कष्ट केले तरच थोडा फार रेशनचा कोटा वाढवायचा, अन्यथा नाही.

माझ्याकडे आत्ता एक उदाहरण आहे विशीबाविशीतला मुलगा, गेले वर्षभर व्यायाम करतोय, नोकरीच्या जागी भरपुर खायला उपलब्ध आहे, त्यामुळे सडकुन केलेल्या व्यायामाचा दु:ष्परिणाम काही नाही, तब्येत सुधारलिये, पण गेले दोन महिने नविन नोकरीत खाण्याचि आबाळ, सबब तब्येत उतरलिये, मग याला सान्गुन व्यायामाची सन्ख्या/मेहनत देखिल तुलनेत कमी करायला लावली! आता स्टेबल आहे. धडधाकट सौष्ठवपूर्ण माणसाची ही कथा, तर जाड अथवा बारीक व्यक्तिंचे कसे होत असेल?

वजन कमी करण्यासाठी आहार कोणता व किती करावा , चपाती उत्तम कि भाकरी चांगली , भाताचे प्रमाण किती असावे , शाकाहार कि मांसाहर , कडधान्य कि पालेभाज्या........ नक्की खायचं तरी काय व किती ?

Pages