३७७ च्या निमित्ताने

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 25 February, 2014 - 03:40

३७७ च्या निमित्ताने

सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय डावलून डिसेंबर २०१३ मध्ये आपला निकाल देताना
: LGBT समाज नव्हे पण त्यांचे वर्तन गुन्हेगारीत मोडते असं म्हणून टाकलं,
९९गुन्हेगार सोडून द्यावे लागले तरी चालेल, पण एका निरपरध्याचा बळी द्यायचा नाही असं म्हणणार्या कोर्टांनी या सार्या निरपराध लोकांना आयुष्याभर संशयित - अपराधी म्हणून जगण्याची शिक्षा ठोठावली.
: बाकी सार्या अल्प संख्यांक समाजांवर अन्याय होऊ नये म्हणून वेळेला बहुसंख्यांकांना बाजूला ठेवून त्यांचं हित बघणारा आमचा कायदा आमच्याच LGBT समाजाला अल्पसंख्यांक म्हणून मानवाधिकार नाकारत आहे!
LGBT चा न्याय मिळवण्यासाठीचा हा लढा जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर चाललेला आहे.
आणि आपण! समाजात डोळसपणे वावरताना असं वाटतं, आपण आपली सन्वेदनशिलताच हरवून बसलो आहोत का?
माझ्या आसपास घडताना ऐकलेली व पाहिलेली ही घटना:
मेर्थ हा तुर्कस्तानी मुलगा.अंतरराष्ट्रीय शाळेत हायस्कूलमध्ये शिकणारा.अभ्यासाबरोबर पियानो वाजवणं हा त्याचा छंद . त्याच्या पियानो वादनात एक वेगळंच माधुर्य आहे. पलक गाणं छान म्हणते. त्यामुळे दोघांची मैत्री जमून गेली. music concert मध्ये दोघांचाही सहभाग असे त्यामुळे भेटी वरचेवर होत.
पलक पुढच्या शिक्षणासाठी लंडनला निघाली, तेव्हा तिच्या बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या प्रमाणे मेर्थच्याही डोळ्यात पाणी आलं. इतके दिवस आपण पलकला बोललो नाही, पण आता तिला सांगितलंच पाहिजे असं वाटून मेर्थनि तिला मेसेज पाठवला 'पलक, मी गे आहे.'
पलक चमकली. पण मनातून खरंतर तिलाही हे जाणवलं होतंच! तिने लगेच reply केला .
'Cool . Call me when you feel like talking .'
' मेर्थचा त्यावर कॅपिटल लेटर्स मधला thanks आणि एक smily असं उत्तर पाहून पलकलाही बरं वाटलं.
यानंतर पाचच महिन्यांनी पियानो वादनासाठी मेर्थला लंडनला जायचं होतं.
पलकलाही आनंद झाला.पलकने त्या चार दिवसांसाठी planning ही बरंच केलेलं होतं. shopping , indian रेस्तौरन्त मध्ये जेवण, नव्या friends ची इंट्रो आणि संध्याकाळी कॉफीबरोबर भरपूर गप्पा !
मेर्थ आल्या दिवशी संध्याकाळी कॉफी घेताना पलकला म्हणाला, 'thanks पलक, मला समजून घेतलस तू! यापूर्वी एकही straight व्यक्तीशी मी स्वतः बद्दल काहीही बोललो नाहीये.
पलकला आठवलं. international school मध्ये finance साठी admission घेतली,तेव्हा वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या होती १५. शाळा सुरु झाल्यानंतर ५-६ दिवसांनी join झालेला Patrick जरi वेगळ्याच चालीत तिच्याजवळ आला आणि 'hi I am Patrick ' असे म्हणाला,तेव्हा ती अवघडूनच गेली होती एकदम! 'Hi .पलक. ' ती गडबडून म्हणाली. नंतर ग्रुप मध्ये एकमेकांशी गप्पा होत होत्या , तरीहि हे अवघडलेपण राहिलंच होत काही दिवस! नंतर मात्र ती रुळली.
"खरं तर कुणालाच हे माहित नाही. मी लपवतो सर्वांपासून मला. कितीही कठीण असलं तरीही.
१२ वर्षांचा असताना एका क्षणी मला जेव्हा कळलं कि आपण वेगळे आहोत इतर मुलांपेक्षा, तेव्हा शॉक बसला होता केवढा मोठा! आधी भीती, स्वतः विषयी एक विचित्र परकेपणाची भावना!
मग तेव्हापासून स्वतःचाच स्वतःशी झगडा चालू झाला रात्रंदिवस.
का? मीच का वेगळा इतरांपेक्षा? माझ्यातच काही कमी आहे का? का मी वाईट मुलगा आहे? आणि बाकीचे सगळे चांगले आहेत? मीच - मीच वाईट आहे बहुतेक! पण मला चांगलं बनायचंय .
सगळ्यांसारखं बनायचंय मला. सगळ्यांसारखं बनायला हवंय , पण ते व्हावं कसं? कारण पलक, मी माझ्यासारखाच होतो. मी इतरांसारखा कसा बरं होणार?
स्वतःला हे असं accept करायला खूप ......खूप वेळ लागला. आणि समाज!
जेव्हा कळलं, की मी gay आहे, त्या क्षणीच , इतक्या छोट्या वयातच 'समाज काय म्हणेल '
चं न पेलवणारं ओझं माझ्या खांद्यावर येउन पडलं . अगदी एकट्याच्या! कारण त्याच क्षणी लक्षात आलं होतं ,की असं वेगळेपण समाजाला मान्य नाही . त्यामुळे आपली कुचेष्टा तर होईलच, परंतु शाळेतले इतर विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि समाज आपल्याला वाळीत टाकेल . आपल्याशी कुणी बोलणारही नाही. सगळे आपला तिरस्कार करतील .आपण वेगळे आहोत असं कळलं, तर आपल्याला शाळेतूनही काढून टाकतील का? आपली
ही चिंता , काळजी, भीती कुणाशी तरी बोलून मन मोकळं केल की कमी होते .कुणाशी बोलणार पण?आपल्याला जन्मल्या पासून सगळ्यात जवळची असते, ती आई ! तिला हे मी कसं सांगणार? आणि माझं छोटंसं कुटुंब .बाबा, छोटा भाऊ आणि धाकटी बहिण .त्यांनाच मी हे सांगू शकत नव्हतो . लाज, त्यांच्या, आपल्या अगदी जवळच्यांच्या - नजरेतून आपण उतरू -हि आशंका.डोक भणाणून जायचं. कश्या - कशात लक्ष लागायचं नाही . गुन्हेगारा सारख जगायचं आपण आपल्याशीच .या सगळ्यातून आलेला एकलकोंडेपणा! मग या टेन्शननी स्वभाव मूडी बनत गेला. साध्या -साध्या गोष्टींवरून रागावणं , चिड-चिड करण अशा गोष्टी होऊ लागल्या. मन हळव बनलं. साधे- सहज बोललेले शब्दही जिव्हारी लागू लागले. असह्य सगळंच!
आणि त्याही पेक्षा अवघड म्हणजे सर्व शक्तीनिशी आपण वेगळे नाही आहोत, सामान्य मुलगाच आहोत हे भासवण्या साठी स्वतःच्या खोली बाहेर आल्या बरोबर -एक नवiच मुखवटा- नवाच कोट- अंगावर चढवायचा. सामान्य मुलांप्रमाणे वागायचं - बोलायचं. स्वतःच मन आणि शरीर काबूत ठेवायचं. थकून जातो अगदी आयुष्याच्या या झगड्यात.
आमच्या धर्माला मान्य नाही ग homosexuality , त्यामुळे आयुष्यभर कुचंबणाच होणार माझी. समाजाचं सोड- माझ्या घरच्यांना- माझ्या वडिलांना जर हे कळलं न, तर मला घराबाहेर काढतील . माझ्याशी कधीही कुणीही कशाही प्रकारचा संबंध ठेवणार नाही! सहन होत नाही हे दडपण !
बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.पलक माझी लाडकी भाची .त्यामुळे भेटली कि गळ्यात पडून मावशी ग ..माहिताय का असं म्हणत मनातल्या सगळ्या गोष्टी एखाद्या मैत्रिणी प्रमाणे शेअर करते. यावेळीही तिने मेर्थबद्दल मला सारं सांगितल .म्हणाली, रितूला जेव्हा भारतात फोन करून सांगितलं ,तेव्हा ती म्हणाली " इ ! गे! मला तर अजिबात आवडणार नाही अशा लोकांच्यात वावरायला. आणि मला भीती पण वाटेल. त्याचं वागण , बोलण किती वेगळ असत ! मी अशा लोकांपासून चार हात दूरच असते. त्यांच्याशी मी कधीच नाही बोलू शकणार! "
"अग असं काय बोलतेस! " पलक ने रागावून म्हटलं होत ," ती देखील माणसेच आहेत न! त्यांनाही आपल्यासारख मन, भावना आहेत. आपला जर कोणी तिरस्कार केला, आपल्याला वेगळं म्हणून समाजाबाहेर टाकल, तर आपल्याला कस वाटेल? तेवढच आणि तसच दुक्ख त्यानाही होईल न? बघ, विचार कर!"
मला सुरेश भटांच्या ओळी आठवल्या
' जगताच्या सिमांतून
आहे मी हद्दपार !
ज्याने त्याने केले
मज बघून बंद दार!

मावशी, मेर्थ म्हणाला, " हा समाज जर आम्हाला स्वीकारत नसेल, तर कुठे जायचं आम्ही? कुठे
राहायचं?-
मावशी, अग त्याला स्वतःला स्वतः सारख वागता येत नाही! त्याला आपल व्यक्तिमत्वच जर लपवून ठेवाव लागत असेल, तर त्याला स्वतःला शोधण कस शक्य होणार? त्यानं स्वतःला ओळखायचं तरी कस? वेग वेगळ्या परिस्थितींमध्ये आपण जसे वागतो, प्रतिक्रिया देतो, त्याच्या मधुनच आपण स्वतःला ओळखत असतो, शोधत असतो. आणि त्यातूनच आपल्याला समजत जात, आपण कोण आहोत ,किव्वा काय होऊ शकतो .
स्वाभाविक वागणंच जर लपवायचं, तर मग स्वतःला ओळखूनच घ्यायच नाही का? हि केवढी मोठी शिक्षा आहे! 'मी कोण आहे यावर कायमचंच प्रश्नचिन्ह का?
समाजातल्या काही व्यक्तींनी आपल्या सहज, उपजत प्रवृत्तीन्प्रमाणे वागयचच नाही का? तस वागणं हा गुन्हा होतो का ?त्यांना पाहून आपल्या पैकी अनेक जन त्यांना टाळतात , त्यांना हसतात, वेडे वाकडे शब्द उच्चारतात . हि आपली प्रतिक्रिया असते.इथे कळतो शिक्षण घेण आणि सुशिक्षितपणा यातला फरक ! हे बदलायला हवय मावशी!"
मला वाटलं, किती पूर्वग्रह दुषित , पक्षपाती वागणूक असते आपली! आपण त्यांना व्यक्ती म्हणून ओळखण्यiआधीच त्यांच्याशी पक्षपाती व्यवहार करतो .अर्थात, पूर्वग्रह बनणे हि स्वाभाविक प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर आपली आवड आणि नावड त्यातूनच निपजते. पक्षपाती वागणूक दिली जाते. एखाद्या व्यक्तीची एखादी सवय किव्वा त्याचा वेगळेपणा आपल्याला खटकला तर आपली वागणूक पक्षपाती होते .आणि पूर्वग्रह दुषित वागणूक मिळण हे नैराश्याच प्रमुख कारण आहे. अशा अकारण पक्षपाताला बळी पडलेल्यांना जीवना विषयाच्या निराशेने ग्रासून टाकणं किती घातक आहे! माणसांचे विचार, भावना ,आणि वागणूक यांचा प्रभाव इतरांवरही पडतो. जगाकडे एक तर चांगल किव्वा वाईट अशा ताठर भूमिकेतून पाहून नाही चालणार. जेव्हा आपल्या या नावडीची कक्षा ओलांडून त्याच रुपांतर तिरस्कारात होतं, आणि त्यानंतर सगळ्या सीमा ओलांडून आपण हिंसेच्या मार्गाला लागतो.
मग जमेका मध्ये चार मित्र जेवत बसले असताना घराचा दरवाजा तोडून हिंसक जमाव त्यांना तुम्ही समलिंगी असे म्हणत मारपीट करतो. भारतामध्ये आपल्याच गे नातेवाइकवर आपण दगडफेक करतो, आणि त्याची घरची माणसे त्याला दरवाजे बंद करतात. कुणी समलिंगींना नुसता पाठींबा जरी दर्शवला, तरी रात्री बुखारेस्त च्या रस्त्यांवर तो मृतावस्थेत आढळतो. गे प्राईड परेड मध्ये भाग घेणार्यांवर रशियात प्राणघातक हल्ला होतो . कुणी आपल्या मित्राला(!) सहज गे आहे असे फेसबुक वर म्हटल्यावर मला आणि माझ्या कुटुंबाला समाज जगण नकोस करेल या भीतीने तो स्वतःच याजगाचा निरोप घेतो....किती उदाहरण द्यायची! त्या आपल्या वागणुकीला काय म्हणायचं?आपल्याला या माणुसकीहीन वागणुकीची लाज वाटायला हवी.
समलैंगिक असणं हा काही एखादा रोग नव्हे , न कोणता मानसिक आजार.वेळोवेळी शास्त्रीय दृष्टीकोनातून या विषयीचा अभ्यास होऊन science journels मधून हे प्रसिद्ध झालेले आहे, कि भिन्नलिंगी प्रमाणेच समलिंगी असणं हे हि नैसर्गिक आहे .
जगात १५०० प्राण्यामध्ये समलैङ्गिकता आढळते.अगदी फुलापाखरांपासून ते हत्तिन्पर्यन्त ! यापैकी काही प्राण्यांच्या या संबंधांचे कधी आपणही साक्षीदार असतो.
प्राचीन काळापासून इतिहासात वेगवेगळ्या देशान मधील रहिवाश्यांच्या समलैंगिक संबंधांचे पुरावे- उल्लेख त्यांच्या साहित्यात व चित्र-शिल्प कृतींमध्ये आढळतात . चीनी भाषेतील dream of the red chamber हिअभिजात साहित्यकृती, आफ्रिकन इजिप्शिअन ख्नुम्होतेप व नियान्ख्नुम या पुरुष जोडप्याचा इतिहासातील उल्लेख ,मनुस्म्रुतिमधिल हिजड्यांचा उल्लेख,खजुराहो तील शिल्पकृती , याच विषयावर आधारलेली मिहाइल कुझनिक ची प्रसिद्ध रशियन कादंबरी wings , सोफिया पर्नोक आणि मरीन स्वेतिहा यांच्या लेस्बियन कविता आणि मैत्री, सोक्रेतिस, लॉर्ड बायरन , दुसरा एडवर्ड यांनी जाहीरपणे केलेला स्वतःचा गे किव्वा बाय सेक्षुअल असा उल्लेख..ग्रीस आणि रोम मध्ये समलैङ्गिकतेलi समाज मान्यता होती.कित्येक जण देशाची लोकसंख्या मर्यादित राहते या दृष्टीने या संबंधान कडे पाहत असत.
पण जसजसा ख्रिश्चन आणि पश्चिम आशियायी किव्वा अब्राहमिक धर्मांचा प्रसार होत गेला, तसतसा या धर्मांवर आधारलेल्या संस्कृतींनी समाजात समलिंगींना बेकायदेशीर घोषित केले. त्यांना मृत्युदंड आणि कारावासाच्या शिक्षा दिल्या .
रोमानिया :
नेला नावाच्या रोमानियन executive ऑफिसर शी गप्पा मारत असताना समलिंगी संबंधान बद्दल बोलणं स्वाभाविकपणे झालंच. "३७७ कलमाप्रमाणे भारतामध्ये समलिंगी संबंध बेकायदेशीर आहेत. पण रोमानियात असे संबंध असण हा कायद्याने गुन्हा नाही . गेल्या दशकात रोमानियाने याबाबत बरीच मजल मारली आहे. लैङ्गिक्तेवर आधारित भेद भाव करणार्यांना कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. समलिंगी व्यक्तींचा तिरस्कार करणार्या व्यक्तींना कायद्याने शिक्षा ठोठावली आहे.राजधानी बुखारेस्त मध्ये वार्षिक ' गे फेस्त प्राईड परेड ' व ' गे फिल्म नाईट्स फेस्टिवल्स ' आयोजित केल्या जातात. १९९६ पासून ऑपरेशन द्वारे लैंगिकता बदलणे, आणि त्याप्रमाणे official documents मध्ये कायदेशीर बदल करण्यास परवानगी आहे.
२००५ मध्ये तरोम या राष्ट्रीय विमान कंपनीने वलेन्ताइन च्या दिवशी जोडप्यांसाठी सवलतीचे दर घोषित केले होते. गे जोडप्यासाठी हा सवलतीचा दर तरोमने नाकारल्या बद्दल त्यांना दंड ठोकण्यात आला आणि हि चूक दुरुस्त करण्याबद्दल तंबी देण्यात आली होती.
परंतु २०१३ च्या काळात शाळेत LGBT month च्या निमित्ताने त्यांच्या प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांशी बोलल्याने आणि या निमित्ताने असलेल्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आवाहन केल्याने त्याचा तीव्र निषेध पालकांनी केला, धर्मगुरूंनी केला आणि आता कोर्टात या संबंधी केस चालू आहे.
USA, UK आणि बर्याच देशान प्रमाणे रोमनियातहि STI (sexually transmitted infections.) च्या वाढत्या शक्यतेमुळे गे व्यक्तींना रक्तदान मात्र करता येत नाही. त्यांच्या लग्नालाही कित्येक देशांप्रमाणे रोमानियात परवानगी नाही.परंतु कायद्याची तरतूद असूनही समाज मात्र गे व्यक्तींना आपलेसे करत नाही. त्यांच्याशी भेदभावानेच वागतो. नेला म्हणते ,' परेडस करण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही तुमच्या घरी काय करता याच्याशी आम्हाला काय करायचंय ?आमच्या धर्मात असे संबंध अनैसर्गिक मानले जातात. त्यामुळे अशा संबंधांबद्दल समाजात काहीही बोलले जात नाही.'
मी मनात म्हटलं ,"त्यांना हवेत त्यांचे मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य .समाजाने नाकारलेल्या या व्यक्तींना स्वतःच छोटंसं घरकुल हव आहे. त्यांना हव आहे आपापसात लग्न करण्याच स्वातंत्र्य . दत्तक घेण आणि मुलाचं पालकत्व .नोकरी आणि access to health care . अल्पवयीन गे मुलांना समाजाने त्रास देऊ नये म्हणून त्याविरुद्ध कायदा . त्यांना हवंय स्थैर्य . अखेर समाजातील प्रत्येक व्यक्तीला तरी काय हव असत ? स्थैर्यासाठी कुटुंब आणि समाजमान्यता! स्वतःची एक ओळख.त्यांना जगण्यासाठी support हवा आहे! आपल्याला तर मृत्यू नंतरही support हवा असतो! म्हणून तर मुलगा हवा, नातेवाईक हवेत.जीव नसलेल्या शरीराला सुद्धा सन्मानाने वागवाव अशी अपेक्षा आहे! आणि तशी तरतूद करण्याचा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो!

" आणि त्यांनी आमच्या लहान मुलांना नादाला लावले वा त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ऐकून घेणार नाही!'
नेलाने अगदी कडक शब्दात सांगितले," सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे रोमानियात orthodox चर्च मध्ये काम करण्यासाठी लग्न झालेले असणे जरुरी आहे. "रोमानियात ९९ टक्के लोक orthodox आहेत.हि माणसे धर्मभिरु आहेत. आणि त्यांच्या चर्च मध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत नाहीत,कारण orthodox चर्च मध्ये काम करण्याची शैक्षणिक पात्रता जरी तुम्ही मिळवलीत, तरी चर्च मध्ये काम सुरु करण्यापूर्वी लग्न करण्याची संधी प्रत्येकाला मिळते! याउलट कॅथोलिक चर्च मध्ये काम करण्यासाठी अविवाहित असणे बंधन कारक आहे. चर्च मध्ये काम करणार्यांचा बाह्य जगाशी संबंध अगदीच कमी होतो.
समलैंगिकता नव्हे, अत्याचार :
कॅथोलिक चर्च मध्ये काम करणार्यांना लग्न करता येत नाही .याकारणाने त्यांचे आयुष्य नॉर्मल नाही. व याचा परिणाम म्हणजे त्यांचे अत्याचार! संपूर्ण जगातील कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू, नन्स, आणि चर्चशी निगडीत इतर व्यक्तींवर अजाण मुलांवरील अत्याचाराच्या असंख्य केसेस आहेत . या शोषणामुळे कित्येक मुलांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत.. साहजिकच नेला सारख्या पालकांना मुलांची काळजी वाटते.
याच्याच सारख्या घटना सैन्यातही घडतात. रशियन सैन्यात अशा प्रकारची समलैङ्गिकता हा चिंतेचा विषय आहे. सैनिकांना वर्षानुवर्षे घरी न जायला मिळाल्याचा परिणाम. यात किती तरी नव्याने भरती झालेल्या सैनिकांना आपल्या इच्छे विरुद्ध अशा अत्याचारांना बळी जावे लागते. अर्थात इतर राष्ट्रांतही सैन्यात आणि तुरुंगात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याच्या बातम्या आपण वाचतो.
( प्राचीन ग्रीस मध्ये जो समलैङ्गिकतेचा प्रभाव समाजावर आढळतो, ती नैसर्गिक समलैङ्गिकता नव्हे. ग्रीक लोकांना असलेला स्वतहाच्या सौंदर्याचा अभिमान .बुद्धीचा अहंकार! आणि प्रेम करण्यासाठी आपल्या बरोबरीची - जिच्याशी बौद्धिक चर्चा हि करता येईल अशी -व्यक्ती हवी. म्हणून १२-१३ वर्षांच्या मुलांना अशा मार्गाला लावणे व त्यांना शिक्षित करणे. कारण स्त्रिया म्हणजे फक्त मुले व घर सांभाळणार्या! तेवढीच त्यांची योग्यता! हे संबंध मध्यमवर्गीय पुरुष आणि पौगन्दावस्थेतिल मुले यांच्यात असत .)
पण हि काही समलैङ्गिकता नव्हे! हे अत्त्याचार आहेत. प्राचीन काळी रेप ची व्याख्या होती मुलगा, स्त्री वi कोणावरही केलेली जबरदस्ती.स्वताहाच्या हक्कांची मर्यादा जर दुसर्याच्या हक्कांचे उल्लंघन करू लागली , तर असे अत्त्याचार होऊ लागतात . आणि याचा संबंध लैंगिकतेशी नाही.
१९६७ मध्ये ब्रिटन मध्ये समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली .साधारणत. १९९० पासून जगात वेगवेगळ्या देशात गे कार्यकर्त्यांनी मानवधिकरान्साठी चालवली सुरु केल्या . अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया , दक्षिण अमेरिकेतील काही राष्ट्रे यांनी समलिंगी संबंधांना हळू हळू मान्यता दिली. व इतरही काही अधिकार उदा. मुल दत्तक घेणे, समलिंगी व्यक्तींचा तिरस्कार करणार्यांना कायद्याने शिक्षा , शिक्षण क्षेत्र , नोकर्यांच्या जागी पक्षपात होऊ नये यासाठी पक्षपाता विरुद्ध कायदा. आज अमेरिकेतील काही राज्यात व युरोपमधील काही राष्ट्रात समलिंगींना लग्न करण्यास कायद्याने परवानगी आहे.परंतु बरीचशी आफ्रिकी राष्ट्रे,अनेक आशियायी राष्ट्रे, रशिया यांनी कायद्याने या संबंधांना मान्यता दिलेली नाही.

मेर्थ ला लंडन मध्ये चार दिवस का होईना, मनाप्रमाणे राहण्या वागण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पलक च्या friends बरोबर शॉपिंग करताना त्याने सर्वात प्रथम मस्कारा, nail polishes , आणि इतर make - up चे समान खरेदी केले. दुसर्या दिवशी तिच्या मैत्रिणींनी tyaala मेकप करून , नटवून, लंडन मध्ये फिरवले. त्याचे ( मुलीन्प्रामाणे असणारे ) मूड स्विङ्ग्स , सहज हळवे होणे, अतिकाळजीपूर्वक ड्रेस अप होणे, आणि इतर आवडी निवडी पलकने पहिल्या. ज्या मेर्थला ती ओळखत होती, तो हा मेर्थ नव्हताच ! हि कोणी दुसरीच व्यक्ती होती !
पलक मला म्हणाली, मावशी भावना प्रत्येकाला असतात . पुरुष बर्याचदा त्या बाहेरून दिसून देत नाहीत आणि मेर्थ च्या वागण्या बोलण्यातून त्या चटकन दिसून येत असतील तर तो माणूस नाही का?
चार दिवसांनी परत निघताना खरेदी केलेली सारी ज्वेलरी , nail polishes , मेर्थ ने पलक जवळ दिली. 'मेर्थ, कधी ना कधी तुला तुझ्या कुटुंबाला हे सांगायला हव. कुणास ठाऊक, कदाचित तुझ्या भावना ते समजूनही घेतील!'
'हो. हे चार दिवस स्वतः सारखे जगून घेतi आल्यामुळे माझे टेन्शन कमी झाले आहे. घरी भावंडांशी किव्वा आईशी बोलणे शक्य नाही, कारण पलक, पहिल्या पासूनच मला अशी सतत भीती वाटत आलेली आहे कि माझे वास्तव कळले तर आई ला hart attack येईल . मला माझ्या वडिलांशी याबाबत बोलायचे आहे. पण त्याआधी मी छोटीशी का होईना , नोकरी शोधणार आहे. स्वतःच्या पायांवर उभा राहून मग परिणामांना समोर जायची माझी जेव्हा तयारी होईल, तेव्हा मी वडिलांशी बोलीन.'
मेर्थ च्या आवाजातला आत्मविश्वास पलकला त्याच्यातल्या बदलाची नांदीच वाटला.समाजाने आपल्याला स्वीकारला, तर जगण्याची उभारी येते, नाही का ?

आमची पवित्र लग्न संस्था असली समलिंगी लग्ने मान्यच करू शकत नाही असा धर्म रक्षकांचा ओरडा जगभर ऐकू येतो आहे. आणि समज पुढारतो आहे ,बदलतो आहे म्हणून live इन रिलेशन शिप ला त्यांचा कायदा मान्यता देतो आहे न? मग निसर्गतःच समलिंगी असलेल्यांना तो का स्वीकारत नाही?
सर्व धर्मन्हुन श्रेष्ठ धर्म आहे माणुसकीचा.सर्वप्रथम आपल्याला या धर्माच पालन करायला हव माणसान माणसाशी माणुसकीन वागायला हवंय. आपण एकमेकांना स्वीकारणं हि पहिली पायरी आहे. कायद्याने समलिंगी असूनही, समाज स्वीकारत नसल्याने पालकांच्या जबरदस्ती मुळे आज मुलांना भिन्नलिंगी मुलींशी लग्न कराव लागतं, त्या मुलींची आणि त्यांच्या कुटुंबांची अशी फसवणूक हा अपराध आहे.पण या अपराधाला जबाबदार कोण? समलिंगी मुला मुलींचं नैसर्गिक आचरण हाच गुन्हा मनाला गेला तर वाढते black mailing चे प्रकार harassment आणि त्यातून गुन्हेगारी कृत्ये , विघातक कृत्ये ....यासर्वांना जबाबदार कोण? समलिंगी मुलाचं frustration ,depression , त्यातून त्यांनी केलेल्या आत्महत्या , अविचरनि illegal drugs घेण, unprotected लैंगिक व्यवहार करणं, त्यातून होणारे रोग, या सगळ्या दुर्दैवी गोष्टींच मूळ नेमकं कशात आहे? हा प्रश्न आपण आपल्यालाच करण्याची वेळ आली आहे. समाजातल्या काही घटकांना आपण आपल्यासारख जगण नाकारण ,त्यांना नोकर्या नाकारण हि खरीच गटबाजी नाही का? समाज व्यवस्था व तिचे नियम 'जगा आणि जगू द्या 'पेक्षा वेगळे नाहीत.
आज कायद्याने या संबंधांना काही देशांनी मान्यता दिली आहे, पण या सगळ्या देशांतल्या समाजाने त्यांना स्वीकारले आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे.
मेर्थला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्क बसला, कारण त्याच्या वडिलांनी त्याला समजून घेतल, पण त्यांनी व्यथित स्वरात असा हि म्हटल ,' बाळ, तरीदेखील या समाजात राहून मी तुला पाठिंबा नाही देऊ शकत. तुला परदेशातच जाऊन राहावे लागेल, अशा ठिकाणी, जिथला समाज तुला समजून घेईल '

आज कायद्याने या संबंधांना मान्यता दिली, व त्यामुळे स्वैराचार वाढला तर? fashion , fad , time-pass यासाठी समलिंगी संबंध हा आणखी एक पर्याय झाला तर ? आणि अशा संबंधांना मान्यता मिळाल्यावर त्याचा अति- आचार इतरांच्या वैयक्तिक हक्कांवर गदा आणीत सुरु झाला तर? किशोरवस्थेतुन तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलांना चुकीच्या मार्गाला लावले गेले तर? देशाच्या लोकसंख्येवर परिणाम झाला तर ? एका अर्थी समाजव्यवस्थेला धक्का लागेल का?
आपले आचार व विचार संयत असतील तरच आपण खर्या अर्थाने सुंदर आयुष्य जगू शकतो. पण संयम सुटायला हे आणखी एक कारण झाले, तर? हि भीती समाज व्यवस्थपकान्ना वाटत असेल का?
पण या प्रश्नांची उत्तरे समलिंगी व्यक्तींचे अस्तित्व नाकारण्यात आहेत का? आणि इतर बर्याच देशांप्रमाणे भारतातहि आज ज्यांना आपण नाकारत आहोत, त्यांनी कुठे जायचं ? त्यांनी सुद्धा पश्चिमी राष्ट्रांकडे निर्वासित म्हणून जायचा हा एकाच पर्याय आपण त्यांना शिल्लक ठेवला आहे का?
२०११ मध्ये युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कौन्सिल नि LGBT व्यक्तींच्या मानवीय अधिकारांना मान्यता दिली. कौन्सिल नि म्हटलंय, कि STI रोग होऊ नयेत म्हणून काळजी घेत येईल, रोगांना आटोक्यात आणता येईल, पण लैंगिक orientation बदलता नाही येणार! आज गरज आहे आपणच स्वतःला प्रश्न विचारण्याची, कि मी सुशिक्षित कधी होणार? मी सहिष्णू कधी होणार?

समाजातील सर्व घटकांनी एकमेकांना स्वीकारल्यावर कायदा सुद्धा नवे बदल स्वीकारून नव्या रुपात पुढे येईल ...

उज्ज्वला अन्नछत्रे,
रोमानिया .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विस्तारित पण मुद्देसूद लिखाण. खूप पटलं. या विषयावर इथे आधी खूप चर्चा झाली अहे. पण आपला समाज जवळ जवळ ९०% हा समलैंगिकतेला धोका/गुन्हा मानतो त्यामूळे जोवर लोकांचा सोशल इंटेलिजन्स वाढत नाही तोवर हे असंच चालणार, दुर्दैवाने.

दक्षिणा, अस वाटत, या विषयावर सातत्याने लिहीलं गेलं, वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून, तर लोक थोडेसे विचार प्रवृत्त होतील . निदान आसपास वावरणार्या गेन्विषयी 'हे कोण ' अशी तिर्हाईत किव्वा तिरस्कारयुक्त प्रतिक्रिया येणार नाही आणि त्या नंतर त्यांना स्वीकारणं एवढं अवघड होणार नाही.

उज्ज्वला
लेख वाचला, परंतु...
आपण लोकांचे वर्गिकरण गे-विरोधक वा गे-समर्थक असे केले आहे ते बरोबर नाही. बर्याच समाजात गे व्यक्तिंना अधिकार ज्या प्रकारे मिळावेत याबाबत वेगवेगळी मते आहेत. त्यांच्या मते हे अधिकार देताना भिन्नलैंगिक व्यक्तिंच्या स्वातंत्र्याचे वा समाजाच्या रचनेचे उल्लंघन होउ नये.

१) काहीजणांचा विशेषतः धार्मिक संघटनांचा गे लोकांना लग्नाचे सर्व कायदेशीर वा सामाजिक अधिकार मिळण्यास विरोध नाही पण या संस्थेला विवाह संस्था नाव देण्यास त्यांचा विरोध आहे.
२) UNLV मध्ये माझी एक मैत्रिण समाज्शास्त्रात या विषयावरच शिकवते. स्वतः एकेकाळी ती अशा संबंधात राहुन मग त्यानंतर तिने आता बरीच वर्ष एका पुरुषाशी लग्न केले आहे. ती गे समर्थक असुन गे व्यक्तिंना
दत्तक घेण्याचा अधिकार असावा याची ती समर्थक आहे. तिच्या अभ्यासानुसार गे नसलेल्या समाजात
दत्तक मुलांपैकी जितके टक्के मुले समलैंगिक असतात त्याच्या दुप्पट टक्केवारी गे समाजात दत्तक गेलेल्या मुलांमध्ये भिन्नलैगिक संबंध ठेवणारी असते.
म्हणजे सामान्य समाजात दत्तक गेलेल्यांपैकी जर ०.०३ टक्के मुले समलैंगिक असतील तर
गे समाजात जवळ जवळ ०.०६ टक्के मुले भिन्नलैंगिक आवड दर्शवणारी असतील.

आता तिच्या विरोधकांचे असे म्हणणे आहे की यावरुन संस्कारामुळे प्रव्रुत्ती वा कल ठरवला जातो हे सिद्ध होते म्हणुन गे लोकांनी दत्तक घेउ नये. त्यांचे म्हणणे असे की यामुळे गे प्रव्रुत्ती समाजात वाढुन हा प्रश्ण सामाजिक होतो. तर तिचे म्हणणे असे की जर समाजात एखाद्या वर्णाचे लोक वाढ्ले वा कमी झाले हे कायदेशीर नियमन करुन ठरविणे हे चुकीचे आहे त्याप्रंआणे गे व्यक्तिंची संख्या अशाप्रकारे नियमित करणे हे कायदेशीर हक्कंचे उल्लंघन आहे.

इथे मी जास्त लिहित नाही पण मला गे अधिकार विरोधक पण अशा व्यक्ति माहित आहे की ज्यांच्या कुटुंबातच गे व्यक्ति आहे आणि त्यांचे नैसर्गिक अधिकार कधीच त्यांनी दडपु दिले आहेत असे जाणवत नाही. म्हणजे विरोध हा नेहेमी सर्व बाबतीत सर्वांचा असतो असे नाही.

वरील मते सर्व माझी स्वतःची नसुन बरेचदा चर्चेत मला दोन्ही बाजुंची मते तितकीच जोरदार मांडणे आवश्यक वाटते. (kind of devil's advocate). कलम ३७७ समलैंगिकतेला गुन्हेगार ठरविण्यास माझा विरोध आहेच.

निलिमाजी,
तुमची प्रतिक्रिया वाचली. गे समर्थक किंवा विरोधक असे दोन भाग होऊ शकत नाहीत. काही गोष्टींना समर्थन अाणि काहींना विरोध असलेली माणसे सुध्दा अाहेतच. परंतु नैसर्गिकरीत्याच गे sexual orientation असलेल्यांना अाम्ही काही अधिकार देतो अाणि काही अधिकार नाकारतो असे म्हणणे म्हणजे त्यांना वेगळे मानणे च अाहे. भिन्नलिंगी व्यक्ती जाास्त , म्हणून त्यांना सर्व मानवी अधिकार अाणि त्यांपेक्षा वेगळे असलेल्यांना कमी अधिकार द्यावेत किंवा देअूच नयेत असे म्हणणे म्हणजे त्यांना अापल्यापैकी न मानणे. त्यांना त्यांचे अायुश्य त्यांच्या पध्दतीने जगण्याचा अधिकार नैसर्गिक रीत्या अाहेच! तो त्यांना देणारे किंवा नाकारणारे अाम्ही कोण?
समाजव्यवस्थेसाठी काही नियम, काही बन्धने असणे अावश्यक असते, ते सर्वांच्या हितासाठी. समाजव्यावस्था म्हणजे जसे पुरुशांना स्त्रियांपेक्शा जास्त अधिकार अाहेत असे म्हणणे होत नाही, तसेच गे व्यक्तिंना नाकारणेही होत नाही.
समाजातिल प्रत्येक व्यक्तीला कुटुंब ,त्याचे फायदे मिळालेच पाहिजेत. कुटुंब म्हणजे तरी काय, अेकमेकांबरोबर राहणं, अेकमेकांना समजुन घेणं,अेकमेकांना प्रेम देणं. अायुश्यात सुखदुःखाच्या प्रसंगात अेकमेकांना मदतीचा हात देत जीवनाचा प्रवास सुसह्य अाणी सुखकर करणं. कुटुंब म्हणजे माणसामाणसातील सुंदर नात्यांची अशी संपन्न गोषट अाहे, ज्यातुन अापण प्रेम अाणि विश्वास मिळवतो, अाणि मग अापल्या अासपासच्या लोकांशी, जगाशी प्रेमाने वागायला शिकतो.
परंतु गेंचा तिरस्कार करणार्यांच्या मानाने त्यांना काहि अधिकार द्यावेत म्हणणार्या व्यक्तिंनी थोदिशी सहनशीलता दाखवुन त्यांना अापल्यात सामावुन घेण्याच्या द्रुशटीने अेक पाऊल पुधे टाकले अाहे असे नक्कीच महणता येईल!

मला या वादात/प्रश्नात "अभ्यास कमी असल्याने" सध्या तरी पडायचे नाही, पण nilimaa yanchyaa posTamadhil puDhil majakur vaachalyaavar an ekandaritach तत्काळ दोन मुद्दे सुचले ते मान्डतो.

Nilima yanchi posT
>>>>>> बर्याच समाजात गे व्यक्तिंना अधिकार ज्या प्रकारे मिळावेत याबाबत वेगवेगळी मते आहेत. त्यांच्या मते हे अधिकार देताना भिन्नलैंगिक व्यक्तिंच्या स्वातंत्र्याचे वा समाजाच्या रचनेचे उल्लंघन होउ नये. <<<<<<

muL lekhaatil vaakya.
>>>>> म्हणून त्यांना सर्व मानवी अधिकार अाणि त्यांपेक्षा वेगळे असलेल्यांना कमी अधिकार द्यावेत किंवा देअूच नयेत <<<<

"मानवी अधिकार" यामधे काय काय मोजता येईल?
रोजचे खाणेपिणे उठणे वावरणे बोलणे व याद्वारे सुयोग्य जगणे हे मूलभुत मानवी अधिकारात धरायला हवे.
पण विवाहसंस्था ही "मानवांनी सक्षम मानवांकरता सुयोग्य पुनरुत्पत्तीकरता/मानवीवंशवृद्धिकरता निर्माण" केलेली एक रचना आहे. तिला "मानवी अधिकारात" मोजणे कितपत योग्य ठरेल्?

त्याच्यबरोबर, देशोदेशीच्या/धर्मपंथांच्या "विशिष्ट हेतून्ना धरुन केलेल्या जगण्याच्या नियमबद्ध पद्धतीन्ना" त्या हेतुन्ना साजेसे शारिरिक/मानसिक अक्षमता असलेल्यान्ना सरसकट "मानवी अधिकार" म्हणून त्याच्यात घुसडता कसे काय येईल? २६ जानेवारीच्या सैन्याच्या परेडमधे "आम्हाला पण घुसायचय" म्हणून बाहेरच्या प्रेक्षकांनी घुसल्यावर जे होईल, तसेच काहीसे हे आहे. सैन्याची परेड विशिष्ट नियमाने होते, व जे त्याचा भाग नाहीत ते वेगळेच रहाणार व रहायला हवेत हे जितके खरे तितकेच, मानवी वंशवृद्धिच्या नियमात /परेडमधे न बसणार्‍यांना वेगळेच रहावे लागेल, त्यान्चे नियमही वेगळे असतील जसे परेडमधिल सैनिक व बाजुचे प्रेक्षक यान्ना निरनिराळे असतात. इथे एकच कायदा करण्याचा / "सामावुन वगैरे घेण्याचा" मुद्दा/आग्रह कळत नाही.

मी पूर्वीही प्रश्न विचारला होता कुठेतरी आत्ताही विचारतो, दारूचे व्यसन हे जर "रोग/आजार" मानुन त्यावर उपचार केला जातो, तर यच्चयावत सर्व "गे" / इथे समलिन्गी केवळ शारिरीक दृष्ट्याच अक्षम आहेत असे कसे काय मानले जाते? शारिरीक दृष्ट्या सक्षम, पण मानसिक दृष्ट्या आजारी असा प्रकार असतो की नाही?

दुसरा महाभयानक प्रश्न्/उत्पत्ती माझे नजरेसमोर येते ती अशी की सध्याचे मतदारांचि वा लोकसंख्येची आकडेवारी नजरेसमोरुन घातली तर दर हजारी पुरुषांमागे केवळ आठशे ते साडेआठशे स्त्रीया हे प्रमाण दिसते आहे. कित्येक ठिकाणि ते त्याहुनही कमी असेल. तर मुद्दा असा की या दर हजारी दीडशेच्या आसपास "अविवाहित/वैवाहिक-लैन्गिक सुखापासुन वंचित" रहाणार्‍यांच्या सोईकरता तर समलैन्गिकतेचा मुद्दा तापवला जात नाही ना? म्हणजे मूळ स्त्रीजन्माचे प्रमाण वाढविण्याचे उपाय सोडून सर्रास समलैन्गिकतेला कायदेशीर बनवुन त्यास उत्तेजन देण्याची उपपत्ती तयार होणार नाही याची खात्री कुणी द्यायची?

समाजात जिकडेतिकडे दिसणारे/ व खास काही राज्यात उपजिविकेकरता "बनविले" जाणारे तृतियपंथी यासारख्या गोष्टींची वाढ समलैंगिकता कायदेशीर केल्यावर होणार नाही कशावरुन?

आत्ताच सर्रास सर्व देशभर कॉलेजमधे रॅगिन्गच्या केसेस अपरिमित होत आहेत, समलैन्गिकता जर कायदेशीर झाली तर अधिकृतपणे त्यात सुंदर दिसणार्‍या मुलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण एका वेगळ्याच पातळीवर जाऊन पोचणार नाही कशावरुन?

तुम्ही विकृतीला भले ती शारिरीक असेल वा मानसिक, विकृतीच म्हणायला हवे, व ती विकृती प्रमाणित करायची तर स्वतंत्ररित्याच करायला हवी, मूळ प्रवाहात तिचे मिसळणे सर्वच बाबतीत घातक ठरेल असे वाटते.

अरे हा विषय परत आलेला दिसतो.
उज्वलाजी, तुम्ही खुपच विविध पैलूंवर सविस्तर लिहिले आहे.
कृपया ही चर्चा पुर्ण वाचून पहा जमल्यास.

http://www.maayboli.com/node/9629

युनायटेड नेशन्स च्या ह्यूमन राइट्स आर्टिकल १६ प्रमाणे सर्व अडल्ट्स ना लग्न करण्याचा व कुटुंब निर्माण करण्याचा हक्क आहे. फक्ता दोन्हीही अडल्ट्स ची संपूर्ण परवानगी / होकार हवा. कुटुंब हा समाजातील नैसर्गिक आणि फंडमेंटल ग्रूप आहे. आणि समाज व राष्ट्रा कडून त्यांना - कुटुंबातील व्यक्तींना संरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
कुटुंब लग्नाशिवाय प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यायोगे कायद्याने / समाज व्यवस्थेने नवरा बायको आणि सर्व कुटुंबासाठी काही हक्क देऊ केले आहेत.
उदा. नवरा वा बायकोच्या अकाली निधना नंतर सर्व संपत्ती - स्थावर / जंगम दुसर्याच्या नावावर ट्रांस्फर होणे.
आई वडिलांच्या मागे त्यांच्या नावावर असलेली संपत्ती मुलांच्या नावावर ट्रांस्फर होणे.
परंपरेने काही संपत्ती / स्थावर वगैरे असल्यास पुढच्या पिढीला ती वारसा हक्काने मिळणे (वारसा म्हणून ही संपत्ती कुणाच्याच नावावर झाली नाही तर ती बॅंकेकडेच रहाते.)
म्हणजे ज्या घटकांमुळे अापण कुटम्बाचे सूख मिळवतो, त्यांना कुटुंब म्हणून न संबोधता अाल्याने या सार्व गोश्टी त्यांना हक्काने मिळू शकणार नाहीत.
कित्येक / बहुतेक नोकरदारांना कुटुंबातिल व्यक्तिंसाठी केलेल्या अाजारपणातील खर्चाच्या काही भागाचा वा सर्व भागाचा परतावा कंपनीकडून मिळतो.
मुलांच्या / मुलींच्या शिक्षणाचा खर्च, शिष्यव्रुत्ती मिळते… कंपनी वा सरकार कडून…
या अाणि अशा कितितरी सुविधा…
मानवी हक्कांवर अाणखी खूप काही बोलता ये अिल.
गे व्यक्ती मानसिक वा शारीरिक रीत्या अक्षम नाहीत, हे medically सिद्ध झालेले अाहे.
कुणाला जबरदस्तीने गे "बनवणे", कशाही प्रकारची जबरदस्ती करणे, सुंदर मुलांवरील अत्याचार वा सुंदर मुलींवर होणारे अत्याचार हे गे या कॅटॅगरीत येत नाहीत. ते निव्वळ अत्याचार अाहेत अाणि मानवी हक्कांचा व अत्याचारांचा संबंध असू शकत नाही. अुलट तो अेखाद्याच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर घातलेला घाला अाहे. याचा संपूर्ण समाजाने प्रतिकार केला पाहिजे.