आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..

Submitted by बोबो निलेश on 22 February, 2014 - 14:00

आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..

आतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.

का कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.

गोट्या - ना धो ताम्हणकर. दि. राजदत्त यांनी मालिका काढली होती.

श्यामची आई- साने गुरुजी

फास्टर फेणे - भा रा भागवत. हिंदी मलिका निघाली होती. पण पुस्तक जास्त आवडलं.

एक होता कार्व्हर - ( प्रेरणादायक, भारावून टाकणारं ) वीणा गवाणकर

कॅन्सर माझा सांगाती - ( प्रेरणादायक, भारावून टाकणारं. कॅन्सरशी दिलेली झुंज. यशस्वी की अयशस्वी ते सांगून मी वाचकांचा रसभंग करणार नाही. ) डॉं. बावडेकर.

रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा

विनोद गाथा - आचार्य अत्रे

एम टी आयवा मारू - (धक्कादायक. एका वेगळ्या विश्वाची - जहाजावरच्या विश्वाची - ओळख )अनंत सामंत
फेलुदा - सत्यजित राय यांच्या रहस्यकथा
वपुंची जवळजवळ सर्व पुस्तकं (पार्टनर -शेवट नाही आवडला. आपण सारे अर्जुन - निराशावादी वाटलं)
व्यक्ती आणि वल्ली - पुल
शिरीष कणेकरांची काही पुस्तकं
रमेश मंत्र्यांची पुस्तकं
ययाती - वि स खांडेकर
माझी जन्मठेप - सावरकर
सत्याचे प्रयोग - गांधीजी
गांधी हत्या आणि मी - गोपाल गोडसे
चिं वि जोश्यांची पुस्तकं
मृत्युंजय - शिवाजी सावंत
स्वामी - ना सं इनामदार
दुनियादारी - सुहास शिरवळकर
शाळा - मिलिंद बोकील
बनगर वाडी - व्यंकटेश माडगुळकर
जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथा
माणसं -अरभाट आणि चिल्लर - जी ए कुलकर्णी
कोसला - (शेवट नाही आवडला ) भालचंद्र नेमाडे
शंकर पाटलांच्या कथा
द मा मिरासदारांच्या कथा
बाबा कदमांच्या काही कादंबऱ्या
एका योग्याची आत्मकथा ? (ऑंटो बायोग्राफी ऑफ अ योगी) - स्वामी परमहंस योगानंद
कुणा एकाची भ्रमणगाथा - गो नी दांडेकर
सुधा मूर्तींची पुस्तकं (विशेषतः डॉलर बहु - आय टी मध्ये काम करणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखं )
श्रीमान योगी - रणजीत देसाई
शन्नाडे - शं ना नवरे
सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी
रामनगरी - राम नगरकर

सध्या तरी एवढीच आठवली. आणखी आठवली तर पुन्हा पोष्टीत टाकेनच….

तर माबोकरांनो तुमची आठवणीतली पुस्तकं कोणती?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीधा-- साधना आमटे
अनुबंध -- कमल पाध्ये
नदीकाठी- वासंती मुजुमदार
पु. लं ची सगळी
आहे मनोहर तरी - सुनीताबाई देशपांडे

मला आवडलेले काही पुस्तकं

​सुहास शिरवळकर - दुनियादारी, गोल्ड-हेवन, ट्रेलर गर्ल, भयानक, झलक, निमित्तमात्र, कथा-पोर्णिमा
व. पु. काळे - पार्टनर, वन फॉर द रोड
पु. ल. देशपांडे - बटाट्याची चाळ
सुधा मूर्ती - बकुळा, थैलीभर गोष्टी
मिलिंद बोकिल - शाळा
गो. नी. दांडेकर - पडघवली
वि. स. खांडेकर - प्रसाद
साने गुरुजी - शामची आई
वीणा गवाणकर - एक होता कार्व्हर
शिव खेरा - यश तुमच्या हातात
वसंत खारकर - सोली, हा हन्त हन्त
लेखकांचे नाव आठवत नाही - अज्ञात
Chetan Bhagat - Five Point Someone, The 3 Mistakes of My Life, One Night @ The Call Center, 2 States

Sachin Garg - Never Let Me Go
Durjoy Datta & Maanvi Ahuja - Now That You’re Rich… Lets Fall In Love!

मी वाचलेली पुस्तके

महेश,
"सध्या काय वाचताय" नावाचा धागा माहित होता. पण आठवणीतली किंवा आवडलेली पुस्तकं नावाचा धागा माझ्या तरी पाहण्यात आला नव्हता. अर्थात माबोवर मी नवा असल्याने जुना एखादा धागा असल्यास ते मला ठाऊक नाही.