Submitted by अमेय२८०८०७ on 21 February, 2014 - 22:44
दिसते त्याहून खोल काही चालते भोवताली
स्तरा-स्तरांतील जीवनाची गूढता वेगळाली
बरा भावनेला पुरता पारखा होतो कलंदर
संग घडला तुझा नाहक पापणीला ओल आली
फोल क्षणाचे हसणे माझे दुभंगून मालवते
वाहुनही अमर म्हणवती तुझे अश्रू भाग्यशाली
काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली
तशी सावरुन आता ती जगण्याला रुळते आहे
कधीमधी आक्रोशुन रडते पाहत कमरेखाली
-- अमेय
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१, ३, ४ आणि ५ - ह्या शेरांचा
१, ३, ४ आणि ५ - ह्या शेरांचा आशय फार आवडला. पाचवा फारच भेदक शेर! लय मात्र समजली नाही.
(कमर व कंबर - कमर हिंदी व कंबर मराठी)
काही बेभान खगांना केवळ उडायचे
काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली >>>> क्या बात है....
अमेयराव, अतिशय सुंदर रचना ......
पहिला आणि 'मशाली' सर्वात
पहिला आणि 'मशाली' सर्वात विशेष वाटले.
लयीबाबत बेफींशी सहमत. मलाही समजली नाही.
बेफीजी +१ लय समजावून सांगशील
बेफीजी +१
लय समजावून सांगशील का अमेय .. लक्षात येत नाहीयेय अजिबातच मलातरी
काही बेभान खगांना केवळ उडायचे
काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली
व्वा. अनेक विचार आवडले.
लय पहालच.