"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन. चित्रपट चर्चा

Submitted by उदयन.. on 13 February, 2014 - 05:46

हंसी तो फंसी.....

तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..

चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. Happy

मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?

या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........

विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...

चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...

सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......

अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे Wink )

इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..

मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे

चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..

थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बघितला आणि आवडलाही.
झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते..>>>++१
इतर लोकांमधे.. नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..>>>तुम्ही मनोज जोशींना विसरलात का?:अओ:

हम्म, देखना पडेगा.
ते लेडीज विरुद्ध रिकी का मिकी बहेल वगैरे मधे पण हिच है ना बया? चबर-चबर खाणारी खाणे आणी डोकेही.
बघुया.

मी बघितला दोन दिवसांपुर्वी पण अजिबातच आवडला नाही. खरतरं सारखं 'असे का?' हाच प्रश्न पडत होता. >>> yesss इथली चित्रपट चर्चा वाचून कालच पिक्चर पाहीला पण एवढा खास नाही वाटला. पण खरच परिणीतीने खूपच छान काम केले आहे.

.

सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......>>> नाही हो. एक दृश्य आहे ज्यामध्ये सिध्दार्थ परिणीतीला रूममध्ये डांबून ठेवतो आणि नंतर विसरून जातो. काही वेळानंतर लक्षात आल्यावर जेव्हा रूम मध्ये जातो तेव्हा परिणीतीचे हाल बघून इमोशनल होतो. खरच मस्त अभिनय केलाय त्यावेळी

स्पॉयलर मोड ऑन>> पण चित्रपट रिलीज होउन दोन आठवडे झाले आहेत.

मला आवडला. तिचे काका खूप मीन दाखवले आहेत. तिला मारतात ते आजिबात आवडले नाही. घरातल्या मुलींचे ऐकूनही घेतले जात नाही त्या आधीच त्यांना गप्प केले जाते असे बरोबर चित्रण केले आहे. लग्न घरातले
चित्र विचित्र पाव्हणे, चहा घेउन आल्यावर लोक्स ग्रीन टी, ब्लॅक टी आहे का ते विचारतात ते अगदी बरोब्बर. दोघांचे काम छान आहे.

तिची आणि वडिलांची रिलेशन शिप छान दाखवली आहे. वडील पण अगदी कूल दाख्वले आहेत. पार्टी च्या
रिहर्सल चा सीनही मजेशीर आहे. एकूणच मजेशीर सिनेमा. उरलेले ऑप्शन्स वँपायर डायरी गुंडे, रोबोकॉप फँड्री त्या मानानी हेच बघणेबल वाट्ते आहे.

हार चोरीचा सीन गंमतदार आहे. कुछ कुछ होता है प्रमाणेच हिरोनी पहिले टॉम बॉईश आणि मग सात वर्षांनी
घागरा घालून नाचते मगच हिरोला तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होते असे प्लॉट पॉइंट्स आहेत. पण इथे ते वेगळ्या ट्रीट मेंट मुळे सह्य होतात. परिणीती चे काम खूप छान आहे. ही नवी जोडी अजून पुढे जाईल. म्हातारे खान बघून आता खरेच कंटाळा आला आहे.

जेहनसीब जेहनसीब तुझे चालू बेतहाशा झेहनसीब Happy

ठिकठाक वाटला पण अगदीच त्रागा व्हावा असाही नाही आणि अगदीच डोक्यावर उचलावा असाही नाही.
आत्ता स्माईल देत पहावा आणि काही दिवसांनी विसरून जावा असा सिनेमा आहे.
एकदा पाहिला हरकत नाही. एकदाही पाहिला नाही तरी काही बिघडत नाही Happy

रिया +१.

सिनेमा ओके वाटला, काही संवाद एकदम मस्त, जमून आलेत. पण तितकंच ते.

परिणीतीपेक्षाही सिद्धार्थ मल्होत्राचे काम आवडले Happy

रीया +१

परीणीती बरी आहे. अगदी काय डोक्यावर घेण्याइतका अभुनय नाही.
चित्रपटात, एकंदरीत तिचे इतकं तर्‍हेवाईक वागणं(गोळ्या खाणं, एक हुशार मुलगी पण असे पळून जाणं वडील पैसे नाही देत म्हणून चोरी करून , ते ही वडील कधीही हिलाच साथ देतात असे दाखवले असून सुद्धा जरा विचित्र वाटलं.)

मला सिद्धर्थ मल्होत्रा आवडला. (त्याच्या पहिल्या मूवीत बावळत वाटलेला. व वरुण धवनला जरा ज्यास्त भाव दिलेला.)

तो करण जोहर कशाला मध्येच आपलं थोबाड दाखवून गेला(त्याला पण सुभाष घाईची सवय लागली का?)

गाणी- बकवास. एकही लक्षात नाही थेटरातून बाहेर पडेपर्यंत. जहनशीब बरं होतं.

झंपी Uhoh
बरं नाही गं ऑसम गाणं आहे ते Happy
जेहनसीब आणि ड्रामाक्विनसाठीच फक्त सिनेमा पाहिला. पण गाण्यांची जागा चुकलीये असं वाटुन गेलं Happy
त्या दोघांचं ट्रेन मधलं गाणंही ठिकेय पण आठवत नाहीये. तेंव्हा ऐकायला छान वाटलेलं.
मी रडण्यात बिझी असल्याने गाणं विसरले असावे बहुदा Proud

काल पाहिला,

पहिल्यांदा असली गीक्, अ‍ॅडीक्ट, फटाफटा सायन्सबद्दल बोलणारी मुलगी हिंदी कमर्शीअल सिनेमामध्ये दिसली असेल. तिचं चालणं, बोलणं, चायनीज बोलणं सगळं भारी जमून आलंय.. नुसत्या लूकवर नाही तर एकंदरीतच अभिनयावर विचार करनारी एक तरी अभिनेत्री आहे म्हणायचं. लेडीज व्हर्सेस रिकी बहलपासूनच तिची संवादफेक मला आवडली होती. इथे तर फुलझडियां उडवल्यासारखी बोलते.

सिद्धार्थ मल्होत्रा मलापण आवडला. त्याचं कॅरेक्टरायझेशन एकदम रीअल लाईफमधलं घेतलं आहे. आणी त्याने काम पण चांगलं केलंय. स्टुडन्टमध्ये अजिबात आवडला नव्हता, या पिक्चरमध्ये खूप प्रयत्न घेतले आहेत.

पण सर्वात जास्त आवडला तो मनोज जोशी. अगदी पहिल्या सीनपासूनच त्याचं काम अफाट आहे. छोट्या छोट्या प्रसम्गामध्ये त्याने धमाल उडवून दिली आहे. (खास करून टेरेसवर निखिल त्याला उगाचच घुमवत असतो आणि अचानक त्याचं लक्ष खाली जातं त्या प्रसंगात त्याचे एक्स्प्रेशन सही आहेत) लग्नातून निखिल पळाल्यावर "वापस घूम फिरके इसी मंडप मे आयेंगे" वाला संवाद हहपुवा!!!! (तेव्हा शरत सक्सेनाचे एक्स्प्रेशन भारी आहेत).

सी आय डीचा प्रसंग तर कहर आहे. सॉल्लिड पंचवाले संवाद आहेत.!!!

मला आवडला !
परिणीती- सिध्द्दार्थ-मनोज जोशी -शरत सक्सेना अणि तो इंडीयन आयडॉल सगळ्यांचं अ‍ॅक्टिंग भारीये Happy
डॉयलॉग्ज आणि वर नंदिनीने मेन्शन केलेले सीन्स धमाल आहेत !