Submitted by सांज मन on 14 February, 2014 - 01:26
आज प्रेम दिवसाला ती आठवली
अन त्याने विस्की मागवली
बर्फ टाकला आठवणींचा
अन पहिल्या भेटीची साक्ष रिचवली
ग्लास फिरवला गोल जरा
अन तिची हसरी मुद्रा तरंगली
कुत्सित हसला स्वताशीच
अन एका घुटात उरलेली संपवली
अजून दे म्हणाला ३० ml
अन ती परत अवतरली
अश्रू पडला एक ग्लासात
त्यान विस्की ६० ml वाढवली
प्रेमाची भरली ती बॉटल
तिने "जा तू" म्हणत दोनच शब्दात संपवली...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजच्या दिवशी हे असे का विचार
आजच्या दिवशी हे असे का विचार ??
पन छान आहे .....
शब्दांचा खेळ मला आवडतो ...
शब्दांचा खेळ मला आवडतो ... आणि आज हा नवीन खेळ सुचला इतकच.
अभिप्रायाबद्दल आभार "रे" .../\...
चीअर्स..
चीअर्स..
___/\___ रमा...
___/\___ रमा...