मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोत्साहन दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. खरंच खुप आनंदाची, ताजंतवानं करून टाकणारी राईड झाली. पुढच्या वेळेस ज्यांना जसे जमेल तसे नक्की जॉइन व्हा.

अभिनंदन लोक्स. तुमच्या उत्साहाला आणि निर्धाराला सलाम. सगळ्यांचे वृ मस्त .हे सगळ केदारने यशस्वीरित्या आयोजित केल्याने केदारचे विशेष अभिनंदन.
मी पुढच्या वेळेस नक्की. ह्या वेळी काही कारणास्तव जमल नाही. पण म्हणून सायकलवीरांना मोहिमेसाठी शुभेछा द्यायला सायकलवर आले होते. Happy केदार,हर्पेन्,आशुचँप्,केपी, पराग, हिम्स्कुल प्राजक्ता , सई वगैरे दिग्गज मंडळींनाही भेटायची इच्छा होती. पैकी सई ,केदार आणि प्राजक्ताची भेट झाली. बाकी पहाटेच्या अंधारात केदार आणि हिम्सकुल सोडता शिरस्त्राणघारी सायकलस्वारांना ओळखल नाही Proud एका स्वाराच्या हातात क्यामेरा होता त्यावरुन तो केपी असावा असा अंदाज बांधला. एकंदरीत वातावरण फारच उत्साहवर्धक होत.
पुढच गटग पण लवकर ठरवा. Happy

सगळ्यान्चे अभिनन्दन, अन सन्योजकान्चेही Happy
केदार, तु कुठे रहातोस? परवाच्या रविवारी मला आधीच्या कार्यक्रमामुळे शक्यच नव्हते, अन तसेही निगडीहून २२/२५ किमी चालवित येणे हे जरा कठीण वाटत होते. असो. नेक्स्ट टाईम प्रयत्न करे न.
ते अ‍ॅप कोणते आहे? एक्झॅक्ट नाव सान्ग बरे. डाऊनलोड करुन घेतो. Happy

>>>> मग केदारला फोन केल्यावर सगळे आल्याचे कळल्यावर रिक्षात घालून आणली <<<<<
हा केदार जाधव, ये हुई ना बात! इस्को बोल्ते है स्पिरीट! जिओ मेरे लाल.....

||जय सायकलदेवी ||

आली लहर केला कहर.. समस्त माबो सायकलस्वारांचे हार्दिक अभिनंदन

होऊ दे खर्च. चर्चा तर होणारच

शुभेच्छुक.. अखिल मायबोली सायकल संघटना
प्रेरणास्थान : लान्सभाऊ भुजबळ

एका स्वाराच्या हातात क्यामेरा होता त्यावरुन तो केपी असावा>> :D:D
तो आशुचँप होता. मी टोपी घातली होती शिरस्त्राण नाही. हिम्याने पण नाही. लोकहो, आपण खरच परंपरेला धरुन ओळख परेड घ्यायला हवी होती. Proud

आपण खरे तर '7ती 8ती का?' 'पहा पण प्रेमाणे' अशा मडफ्लॅप बसवायला हव्या होत्या. Happy

खतरा आहे वृतांत Happy
प्राजक्ता_शिरीन . रिक्षावाल्याचा फु स Happy

आपण खरे तर '7ती 8ती का?' 'पहा पण प्रेमाणे' अशा मडफ्लॅप बसवायला हव्या होत्या. >> '7ती 8ती का?' म्हणजे?? Happy
'पहा पण प्रेमाणे', 'सायकल सोडून बोला'... पुढच्या वेळी असं काय काय करायला पाहिजे Happy

मस्त मजा आली या सायकल राईडला....
मी प्रथमच कुठल्या ग्रुपबरोबर राईड केली त्यामुळे माझा थोडा गोंधळ उडाला होता....पण सगळीच मंडळी धमाल असल्याने उत्साह वाटला....
विशेष कौतुक सईचे....पहिल्यांदा राईडला आलीये असे वाटत नव्हते तिच्याकडे बघून...स्लो बट स्टेडी वेगाने तीने मस्त पल्ला गाठला...
जंबो आयडीचे काका पण दमादमाने सायकल चालवत होते..मध्ये थोडा त्रास दिला सायकलने तरी त्यांनी दाद दिली नाही...एक सायकल मेकॅनिक गाठून त्याच्याकडून ब्रेक दुरुस्त करून त्यांनी पुढची मजल मारली...
हॅट्स ऑफ....
पहिल्याच राईडला ३५किमी सोपी गोष्ट नाही...त्यामुळे सगळ्यांचेच कौतुक

केपी, पराग आणि केदार मस्त सुसाट होते...आता पुढचा पेपर जरा अवघड असावा अशी अपेक्षा आहे...
नविन सायकल घेऊ इच्छिणार्यांनी हे धागे डोळ्याखालून घालावेत...
अजून काही शंका उद्भवली तर मी निरसन करायला कधीपण तयार आहे..
सायकल कम्युनिटी वाढतीये...मस्त वाटतेय

http://www.maayboli.com/node/42915
सायकलविषयी सर्व काही....१

http://www.maayboli.com/node/42919
सायकलविषयी सर्व काही....२

http://www.maayboli.com/node/42971
सायकलविषयी सर्व काही...३ (सायकल घेण्यापूर्वी)

http://www.maayboli.com/node/43034
सायकलविषयी सर्व काही.... ४ (सायकल चालवताना आणि देखभाल)

जबरी वृत्तांत. मी भारतात आले की प्लीज एक सायकल गटग करा. मी इकडे प्रॅक्टिस करून ठेवते Happy

तुमचे वृतांत वाचून काल फार इच्छा झाली होती एक छोटीशी तरी चक्कर मारायची. पण अजून रस्त्यांवर भरपूर स्नो आहे. स्नो पेक्षा ब्लॅक आइस आहे कुठे कुठे Sad

शिंव्हगड रोडावर सायकली चालविल्याती पोरान्नी. शिव्हंगड रोडाचे राजे आस्लेल्या लिंबाजीरावांनी किमान कुटंतरी वडगाव, किरकट्वाडी दरम्यान लिंबू सर्बत तरी स्पान्सर कराया हवं हुतं आसं वाट्टंया Wink साकर आमी धाडली अस्ती कारखान्याहून Proud

अर्रे वा! मस्त झालं की गट्ग...

मी नसताना, माझी सायकल आणि हेल्मेट येणार होते आणि त्यांच्यामधे (म्हणजे सायकली-वर आणी हेल्मेट्च्या-खाली) टण्या असणार होता; पण त्याने कलटी मारली आणि आमच्यापैकी (मी सायकल आणि हेल्मेट यांच्यापैकी कोणीच आले नाही Happy

केदार, आता पुढच्या वेळेसचे मला येता येईल अशा तारखेला ठरव. कृपया. धन्यवाद. Happy

हर्पेन आणि इतर सर्व २२ किंवा २३ फेब कशी आहे?

मला दोन्ही दिवस चालतील. ह्यावेळी थोडा(साच) अवघड पेपर ठेवू Happy तो पर्यंत (२ आठवड्यात) प्रॅक्टीसही होईल.

धन्यवाद केदार, आता उद्याच ते प्ले स्टोअर मधुन घेतो Happy खुप उपयोगी पडेल असे वाटते.
मी निगडीमधे रहातो रे Happy पण काही हरकत नाही, बर्‍यापैकी सायकलची सोय, अन मोकळा रविवार असेल तर मी नक्की येणार Happy सायकलची सोय आत्तापासूनच करुन ठेवतो. लिम्बोटल्याची आहे, पण टायर ट्युब बाद आहेत.

ओ शीट...............................
आज १ महिन्यानंतर माबोवर आलो आणि हे वाचले ( अरे लेकाच्यांनो मला एखादा फोन तरी टाकायचा मिस केल राव तुम्हाला आणि सायकल गटगला)

खर तर माझे पेपर चालू होते (एम टेक -सिव्हील लास्ट सेम) म्हणून माबोवर दांडी टाकली होती ,पण या गटगला नक्कीच आलो असतो , तसे रोजचे ८-१० किमी सायकलींग असतेच.

वृत्तांत छान आहे.आवडला नेक्ट टाईम आपला बी नंबर नक्की.

Pages