मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय छान!!! कोणी हरवले का? मागे पुढे झालात तर कसे सांभाळले? म्हणजे रस्ता चुकु नये ह्यासाठी काय आयोजन होते?

रस्ता अगदी सरळ होता.. कोणी जर बरच मागे पडलं तर केदार किंवा आशू जाऊन चेक करून येत होते.. शिवाय किमान एकाचा फोन नंबर प्रत्येकाजवळ होता.. त्यामुळे फार चुकाचुकी झाली नाही.

केदार आणि इतरांच्या टीप्सच्या क्रुपेने आज सकाळी उठल्यावरही कुठलाही अवयव थोडाही दुखत नाहीये , उलट जास्त फ्रेश वाटतय Happy

साधारण २० वर्षापूर्वी बाजीराव रोड ते पुणे विद्यापीठ, बाजीराव रोड ते कोंढवा, डेक्कन ते अ.ब.चोक (दोन भरलेल्या कागदी पिशव्या लावुन) व एकदा ट्रीपला हाफत हाफत पुणे-शिवनेरी असा प्रवास केला असल्याने सायकल गटगला नाव नोंदवले होते. Happy

फुटीर गटाला मुख्य प्रश्न असा होता की जर सिंहगड रोडनेच जायचे तर कर्वेनगरच्या साईडला जमायचेच का? Proud

तर मंडळी, सकाळी ६.२५ ला मी व प्राजक्ता राजाराम पुलापाशी पोचलो होतो. सगळे जमा होईपर्यंत साधारण ३०-४० सायकलींचा एक गट तिथे जमा झाला होता. १० च जणांनी नोंदणी केली होती पण प्रत्येकाने सोबत दहा आणले होते असे वाटत होते.

असो तर सगळे जमुन निघाला आणी अचानाक सगळे निघुनच गेले. म्हणजे बरोबर जायचे ठरले होते तर ५-३-२ झाले. प्राजक्ता जरा निवांत होती त्यामुळे अगदीच सोबत कुणी नसेल म्हणुन मी तिच्या वेगाने सायकल चालवत होतो. साधारण संतोष हॉललाच हाफत होती. हे सगळे पुढे का गेले सोबत जायचे होते ना असा विचार करत असतानाच आशुचँप मागे आला. थोडंच राहीले आहे असा धीर देत आम्ही आणखी पुढे गेलो मग केदारही आला. धायरीच्या जवळ पोचल्यावर केदार व आशुचँप आहेत म्हणल्यावर मी पुढे निघालो व बाकीच्या लोकांना गाठले. मागे प्राजक्ताने कॅनॉल क्रॉसकरुन घरी परत जायचा निर्णय घेतला व केदार व आशुचँप परज सामील झाले. पुढे सगळेच एकत्र खडकवासल्याला पोचलो.

तिथे पोचल्यावर एका चहावाल्याच्या अपेक्षा व आनंदाला विरजण घालुन आम्ही त्याच्याकडे चहा न पिता पुढे डोणज्यापर्यंत जाऊया असे ठरवले. सईने कुर्मगतीने पण कुठेही न थांबता खडकवासला पर्यंत सायकल चालवली होती. पुढे गियर व साधी सायकल याचा अंदाच घेण्याकरता मी माझी सायकल तिला देऊ केली व २-३ किमी अंतर पार करुन पुढे पक्षीनिरीक्षं केले व परत माझी सायकल घेतली.

नंतर नाश्ता चहा गप्पा व भाषीक अडचणींमुळे ब.वड्याऐवजी मेदुवडा चापुन परतीचा प्रवास केला.

बाकी वृत्तांत आहेतच.

घरी पोचल्यावर ऊफ मेरी कमर ऊफ माझे गुडघे असे थोडे झाले पण फार नाही. माकड हाड मात्र सायकलच्या सीटमुळे दुखले. कसली बंड्ल असतात नविन सीट. ते बद्दकन बदणेच मस्त.

मी तर पहील्यांदाचं रस्त्यावर सायकल चालवली. कांदापोहे आणि नंतर आशुचँपला माझ्यामुळे खूप थांबत थांबत जावं लागलं , आता जरा प्रॅक्टिस करून पुढच्या वेळी पूर्ण अंतर पार करणार Happy

कॅनॉलच्या इथे मला सिक्स सीटर रिक्षा मिळाली त्यात सायकल घालून घरी गेले, रिक्षावल्याचा फु.स. - रोज थोडी थोडी सायकल चालवत जा मॅडम, मग जमेल एवढा मोठा पल्ला Happy

अरे भारी!! सगळ्यांना मोठी शाबासकी Happy

म्या बी एनार (कधीतरी!)..
(तेव्हा) पुणेकरांनी माझ्यासाठी सायकलची सोय करा.

मला तो वडगावच्या इथला फ्लाय ओव्हर आठवला आणि विचार केला की वाटेत जिथे कुठे रिक्षा मिळेल तिथे करावी, त्या चढ असलेल्या वळणाच्या थोडी पुढे मिळाली - जिथे केदारला मी बाय केलं.

सई, हिम्या, विरेन व केदार जाधव यांच्या गियरच्या नव्हत्या. बाकीच्यांपैकी भारीतल्या केदार, आशुचँप व परागच्या होत्या. आमच्या आपल्या साध्याच. परागची सायकल ही सगळ्यात हिरवीण होती. Happy तर केदारचे हेल्मेट ते हेल्मेट असले तरी हिरो. Wink

नाव नोंदवूनही मला ऐन वेळी जमलं नाही म्हणून काल दिवसभर हळहळत होते ... पण तुम्ही हे गटग ठरवलंत त्याचा न येऊनही फायदा झाला मला!
हौसेने घेतलेली सायकल कित्येक महिने जवळजवळ पडूनच होती. आमच्या घराला येतांना सॉल्लीड चढ आहे, तो काही मला अजून तितकासा झेपत नाही. त्यामुळे जेमेतेम १ - २ किमी चालवत होते मी. (परत जातांना चढ!) काल गटगला जायचं म्हणून शनिवारी चार - पाच किमी चालवली सायकल. सगळीकडे असा चढ नसतो, आणि सपाट रस्त्यावर चालवतांना आपण एकदम शूर असतो असा शोध लागला मला तेंव्हा. त्यामुळे आता त्या चढाचा बाऊ न करता मी सायकल बिनधास्त बाहेर काढणार.
पुढच्या गटगला मी नक्की!

गौरी.. माझ्या घराच्या इथे सुरु केल्या केल्याच चढ आहे.. त्यामुळे कशाला जायचं सायकल वर असेच वाटत रहाते..

आमच्या इथेही बराच चढ आहे. माझे पळणे फार कमी झाले त्या चढामुळे.. पण आधी चढावर पळल्याने सायकलवर फार सुखकर वाटते.. Happy

खूप वर्षांनी इतकी लांब सायकल चालवली. खरं तर खडकवासल्यापासून पुढे जाऊ या का असा प्रश्न आल्यावर मला जरा भीती वाटली होती (तेवढंच अंतर परत पण यावं लागणार होतं ना) पण तसं न दाखवता मी गेले पुढे आणि जमले की सहज! मस्त वाटलं.
खरं तर सीटची उंची योग्य न ठेवल्याने मला त्रास होत होता हे खूप उशिरा कळाले (पण कळाले एकदाचे!). त्याचा पुढच्या वेळीक्खूप फायदा होईल.

केदार आणि इतरांच्या टीप्सच्या क्रुपेने आज सकाळी उठल्यावरही कुठलाही अवयव थोडाही दुखत नाहीये , उलट जास्त फ्रेश वाटतंय >>> खूप अनुमोदन आणि त्या सल्लागारांचे आभार!

हा वृत्तांत आहे माझ्या नजरेतून ..

गटग करू असा बाफ काढला खरा पण राईड साठी एक दोन लोकं सोडून प्रतिसाद देतील की नाही? ही भिती खरंच होती. आणि एकाच दिवसात ती भिती किती निराधार आहे हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिले. खूप लोकांनी जुन्या आठवणी काढल्या, खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व ह्या राईड साठी कामी आल्या. तर लोकहो खरचं धन्यवाद. तुम्हा सर्वांमुळे फर्स्ट टायमर्सना मोटिव्हेशन मिळाले असणार ह्यात वादच नाही.

शनवारी क्रिकेट मॅच एकदम एक्सायटिंग झाली होती. पुजारा अन धवण खेळत होते. धवण ४९ वर तर पुजार " द न्यु वॉल" नुकताच त्याला जॉईन झाला त्यामुळे दुसरे दिवशी राईड असली तरी पहिल्या बॉल पासून निदान जाईपर्यंत मॅच पाहून म्हणून ३ चा गजर लावला. निघे पर्यंत कोहलीचे ४६ झाले होते त्यामुळे अजून १० मिनिटे थांबावे की काय? असे वाटत होते पण सकाळी ५:२० ला निघालोच. आणि गटग असल्याच्या जोशात जोरात सायकल चालवत १४ एक किमी पार करून मी जेंव्हा नळस्टॉप पाशी पोचलो तर तेंव्हा फक्त अर्धा तास संपला होता. म्हणजे मी खूपच आधी पोचलो, मग तिथे मस्त पैकी चहा घेतला अन २० मिनिटे काढली. गंमत म्हणजे राईड झाल्यावर मला स्टराव्हा अ‍ॅपचे दोन मेडल्स मिळाले आहेत. हे एक नविनच! आणि ह्या स्पिडचे रहस्य होते गटगची उत्सूकता. राजारामपुलापाशी तिथे अजून मायबोलीवर नसलेले ( जम्बो आयडी अजून अ‍ॅक्टिव्ह नाही असे त्यांनी सांगीतले) ते विरेन्द्र हे रोमातले माबोकर भेटले. ते पण त्यांच्या नव्या कोर्‍या धन्नो वर येणार होते.

थोड्यावेळात सई आणि परागही आले. तिकडून प्राजक्ता समस करत होती, मग के पी, हिम्या आणि प्राजक्ता तिकडेच थांबणार होते कारण पूल ओलांडून यायला दोन थेंब रक्ताचे आणि तीन धामाचे वाया जाणार होते मग त्यांना मी फुटीर गट हे नाव दिले. आम्ही त्यांना जाऊन मिळालो तर मायबोली गटगची वार्ता आख्ख्या पूण्यात पोचली होती, तिथे २० एक रायडर्स वाट पाहत ऊभे होते.

केदार जाधवचा ही फोन आला आणि आम्ही निघालो. आशू आणि मी दोघे सो कॉल्ड एक्सपिरिएंस्ड रायडर्स असल्यामुळे एक पुढे अन एक पाठीमागे असे ठरले, तो पुढे गेला अन मी थांबलो. पण रिमेम्बर, मी आज खूप जोरात चालवत होतो म्हणून मी नकळत परत पुढे गेलो दोन एक किमी गेल्यावर मी परत वापस यायला सुरू केले, तो पर्यंत के पी अन प्राजक्ता पाठी होते. मग आशू मी अन पराग जिथे थांबलो होतो तिथून आशूने मागे जावे असे ठरवले आणि मी इतर ग्रूप सोबत पुढे गेलो पण मला राहवेना , मी परत मागे आलो तो पर्यंत आशू, अन प्राजक्ता धायरीकडे येत होते. के पी अन आशूला पुढे पाठवले. प्राजक्ता आणि मी कॅनॉलपाशी असताना अजून पुढचे चढ तिला जड जातील असे लक्षात आले शिवाय खडकवासल्याला अंतरही होते. आणि तिला मग उगाच त्रास होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की तिने पाणी वगैरे पिऊन थोडे थांबून परतीच्या प्रवास लागावे. मग तिला बाय करून मी पुढे येऊन सर्वांना परत गाठले.

सई, सहेली, विरेन हळू हळू योग्य स्पिडने पुढे जात होते. केदार जाधव, केपी, हिम्या हे पुढे मागे होत होते आशू आणि पराग नंतर पुढे होते. मजल दरमजल करत खडकवासला आले,

तिथे सर्व एकदम फ्रेश होते. चला यारहो, अजून पुढे जाऊ अन तिथेच नाश्ता करू असे म्हणल्यावर सर्वच अगदी आनंदाने हो म्हणाले. (पण मी थोडा साशंक होतो कारण पुढे सारखा चढच होता.) पण ग्रूपने धमाल केली आणि हळू हळू सर्वच पोचले, मग मी माझ्या वेगालाही नियत्रिंत केले नाही, डोणजेच्या दिशेने पुढे गेलो आणि मग परत मागे खडकवासल्याच्या दिशेने निघालो कारण पाठीमागे अजून सई, केपी अन सहेली होते. अर्ध्यारस्त्यात मला सहेली दिसली, तिला वाटले मी निघालो परत Happy मग सई / केपी ला गाठले आणि परत चला, थोडेसेच असे काहीसे म्हणून परत मी समोर आलो. हळू हळू सर्वच येऊन पोचले आणि मग नाश्ता उरकण्यात आला. तिथे त्यांचे थोडे सांस्कृतीक अत्याचार आम्ही सहन केले. ( उदा वडा सँपल मध्ये उडीद वडा!! ) तिथे मग अनेक चर्चा रंगल्या. आणि निघायची वेळ झाली.

आम्ही परत निघालो मग सर्वच तसे जोरातच आले. खडकवासल्याला फोटोसेशन उरकले आणि गटग परंपरा चालू ठेवण्यासाठी पाण्याऐवजी सायकली पाडल्या. मध्येच मी आशूचा कॅमेरा घेऊन पॅनिंग फोटोग्राफी कशी करतात ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले. फोटो कसे निघाले काय माहित आणि ती पॅनिंगची योग्य जागा नव्हती. आणि हवी तेवढी स्पिडही नव्हती. सेशन नंतर परत निघालो. आणि नांदेड सिटी गाठली. तिथे सर्व हळू हळू येऊन पोचले. सर्वांना थोडे अनुभवाचे ज्ञान ( माहिती!) पाजळली आणि इथून पुढे जो तो , जसे होईल तसे जाईल असे म्हणून गटग संपवले

परत असे गटग हवे आहे असे सर्वांनी अनेकदा सांगीतलं आणि मी ही अल्टरनेट आठवड्यात असं गटग ठेवू असे म्हणून निरोप घेतला.

१० किमी वन वे ऐवजी ग्रूपने १५ किमी वन वे गाठले. त्यातील पाच चढाचे! एकुण ३० किमीची राईड झाली. एलेवेशन गेन बघितला तर तुम्हाला चढाची कल्पना येईल. (मागच्या एका पोस्ट मध्ये टाकला आहे.)

ते जे दुसरे रायडर्स होते त्यांच्याकडे चांगल्या सायकली, सायकलींग गिअर वगैरे सर्व होते ते उडजे पर्यंत म्हणजे जाऊन येऊन ३०च किमी करणार होते. गाईज फर्स्ट टायमर असूनही तुम्ही ३० पेक्षा जास्त केलेत, ते पण विना गियरच्या, विना सायकलींग गीअर वगैरे, यु आर बॉर्न रायडर्स - बी सिरियस !!

स्टराव्हा अ‍ॅप आपली रायडिंग प्रोग्रेस मोजतो. मला आजच्या राईड मध्ये दोन सो कॉल्ड मेडल मिळाली. एक युनी सर्कलचा चढ पार केल्या बद्दल ( ज्यात थर्ड बेस्ट टाईम ) आणि दुसरे चतुशृंगी ते सिम्बी (चढ उतारासहीत) चटकण पार केल्याबद्दल. (सिम्बीचा चढ पण खूप मोठा आहे. Happy ) पुण्यात सायकलिस्ट खूप आहेत आणि स्टराव्हा पण खूप वापरतात, तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल आणि तुम्ही सायकल चालवणार असला तर जरूर वापरा.

माझी स्वतःची राईड एकुण ६५-६६ किमी पेक्षा जास्त झाली. पैकी ६२ ची माझ्या अ‍ॅपवर मोजली पण मी अनेकदा मागे-पुढे करताना मात्र माझे अ‍ॅप बंद करून मागे पुढे करणे मोजले नाही आणि काही वेळेस उशीरा काउंट सुरू केले. तो डेटो इथे देतो.

Ride_1.png

थँक्यु तुम्ही आलात म्हणून मजा आली. आता पुढचेही गटग लवकरच असणार आहे. तारखा ठरवायला घ्या. आणि ज्यांना यायचे आहे पण जे अजूनही झेपेल की नाही ह्या काळजीत आहेत, त्यांनी सर्व बाफ परत वाचावा.

फोटो थोड्या वेळात येतीलच आशू टाकतोय.

वृत्तांत वाचून जळजळ झाली आहे. दुसर्‍या प्लानमुळे सायकलस्वारीला येता आले नाही.

पुढच्या खेपेस दिवस राखून ठेवेन आणि तयारीनिशी येईन..

Pages