अस्थमा/बालदमा बरा होतो का?

Submitted by dhanashri on 6 February, 2014 - 21:42

मला अस्थमा अथवा बालदमा या विषयी कृपया माहीती हवीय.
१)बालदमा किती वयापर्यन्त बालदमा म्हणुन ओळखतात?
२)अस्थमा कायमचा बरा होतो का?
३)माझ्या मुलाला अस्थमा आहे .दर वेळी nebulaization देऊन आणावे लागते.डॉक्टर चेही consulation सुरु आहे.
पण काळजी वाट्ते.त्याने लहान असताना screw गिळला होता.तो lungsमध्ये गेला होता.तेव्हा बरेच complication झाले होते.डॉक्टर म्हणतात की हे त्यामुळे नाही.पण नंतरच हे सर्व सुरु झाले.मी योग्य
treatmentchyaa शोधात आहे.आयुर्विद्क/homeopathic हे ही झाले.सध्या तो आठ वर्षाचा आहे.

क्रुपया मार्गदशन हवेय.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> त्याने लहान असताना screw गिळला होता.तो lungsमध्ये गेला होता.तेव्हा बरेच complication झाले होते.डॉक्टर म्हणतात की हे त्यामुळे नाही.पण नंतरच हे सर्व सुरु झ.... <<<< अरे बापरे. मग काढला कसा?

योग्य उपचार/आहार/व्यायाम-सुयोग्य शारिरीक हालचाली यामुळे बालदमा सहसा बरा होतो असे म्हणतात. जन्मानंतर वयाच्या चार/पाच वर्षापर्यन्त बालदम्याची उपस्थिती जाणवते. बघणेदेखिल फार त्रासदायक प्रकार असतो.

शक्यतो, तत्काल आरामाकरता अ‍ॅलोप्याथी, अन दुखणे मुळापासुन घालविण्या करता दीर्घकालिक आयुर्वेदिक उपचार/पथ्ये/आहार करावेत असे माझे मत. याबाबत पूर्वीच्या काळच्या बालगुटी / आजीचा बटवा देखिल उपयुक्त ठरतो असा अनुभव आहे. मात्र शक्यतो हे आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ल्याने करावे.

बालदमा (खरे तर {बाल वा प्रौढवयातील] दमाच) अनुवंशिक देखिल असू शकतो.
त्याचबरोबर वाढत्या वयात (साताठ वर्षानम्तर) मानसिक ताणतणाव/चिन्ता याने देखिल दमा उद्भवतो. शाळकरी वयात काय की पुढे अजुन मोठ्या वयात काय, त्या त्या वयाला अनुसरुन चिन्ता विवन्चना असतातच. औषधोपचाराबरोबरच चिन्ता/विवन्चना दूर सारण्याबद्दलचे, मानसिक कणखरता वाढविण्याबद्दलचे समुपदेशन उपयुक्त ठरते. (हल्ली मला दमा लागला की लिम्बी सरळ सरळ विचारते की कसली चिन्ता/काळजी करतो आहेस! उगाच चिन्ता करत बसू नकोस.)

माझ्या माहितीप्रमाणे बालदमा "कायमचा बरा" होऊ शकतो.
मात्र वाढिव वयातिल दमा "कायमचा बरा" होणे अशी कन्सेप्ट अस्तित्वात नसावी, मात्र, हे देखिल महत्वाचे की सुयोग्य आहार/विहार/व्यायाम व आयुर्वेदिक औषधौपायाद्वारे, दम्याचे अस्तित्व दूर ठेवण्यास मदत करते.

मायबोलिवर दम्याबाबत पूर्वीदेखिल काही धाग्यांवर उपयुक्त चर्चा झाली आहे असे आठवते, मला ति शोधता येत नाही, पण ती शोधल्यास अधिक उपयुक्त ठरेल.

याव्यतिरिक्त, कुंडलीमधे अशा दीर्घकालिक "विकारांचे" निरीक्षण करता येते.

दमा हा अतिशय त्रासदायक प्रकार असला तरी फार घाबरण्यासारखा "विकार-व्याधी" नाहीच, शिवाय सुयोग्य आहार/ विहार/पथ्ये पाळून दम्यावर मात करता येते हा स्वानुभव आहे.

[विशेष सूचना: वरील पोस्ट पूर्ण गाम्भिर्याने लिहीलेली असून, स्वानुभवाचा आधार असे, कुणाला त्यात टवाळी वाटल्यास त्यास माझा इलाज नाही व वरील मजकुर तात्पुरत्या स्वरुपात सिंहगड रोड या धाग्यावर पेस्ट करुन ठेवला आहे]

धन्यवाद लिम्बुटिम्बुजी...तो screw - bronchoscopy ने काढला.पण मग पुढे metal infection होऊन एम्पायमा
झाला होता.महिनाभर सुरु होते उपचार.

मला अस्थमा अथवा बालदमा या विषयी कृपया माहीती हवीय.<<<
मला बराच काळ पर्यंत हा त्रास होता, लहानपणी खुपच जास्त त्रास होयचा, खाण्यापिण्यावर खुप बंधने होती

माझी स्वतःबद्दलची निरिक्षणे -

३ र्या इयत्तेत जाई पर्यंत मैदानी खेळात माझा सहभाग आजीबात नव्ह्ता, शाळेला मैदान नव्हते आणि प्रत्तेक वर्षी ऋतू बदलाच्या वेळेस फार त्रास होयचा. घराजवळ एक व्यायामशाळॅचे मैदान होते तिथे सायंकाळी रोज एक तास आई सोडत असे, फुटबॉल - खोखो - कब्बडी असे खेळ घेतले जात असत, इथुन मला दमा कमी झाला आहे असे आठवते, मैदानी खेळ बंद झाल्याच्या ३ वर्षाच्या काळात परत हा त्रास वाढु लागला. मग परत संघामधे सामील झालो तिथे मैदानी खेळांबरोबर योगासने करून घेतली जात व अन्य व्यायाम जसे जोर-बैठका आणि सुर्यनमस्कार घातले जात. प्रकृती मधे बर्‍यापैकी सुधारणा झाली तरी पण मनात कायम भिती असायचीच

या नंतरच्या कालावधीत किल्ल्यांशी / संह्याद्री शी ओळख झाली तेव्हापासून हा दम्याचा प्रकार कधी झाल्याचे आठवतही नाही.

नमस्कार!
माझ्या अनुभवातील एक अश्शीच गोष्ट येथे वाचा, हिस्टरी रिपिट्स !!
मराठी रुपांतर माबोवर टाकतोय !

"एक हृदयस्पर्शी स्क्रू !"

https://www.dropbox.com/s/gt6p4ctr8yqvuo4/screw.pdf

मला पण हवी आहे माहिती. पुण्यात कुणी आयुर्वेदीक/ होमिओपाथी डॉक्टर सुचवला तर अजून उत्तम. स्वानुभव असेल तर बरेच. मुलगा २ वर्शाचा आहे. शिकागोवरुन इथे आल्यापासून सुरु झालय. मोजून १५ दिवस जातात मधे आनी लगेच सर्दी सुरु होते मग, दम लागय्ला लागतो. खूप काळजी वाटते.
विद्या.

माझ्या मुलालासुद्धा हा त्रास आहे, नवर्‍याला सुद्धा वयाच्या १२ वर्षापर्यंत होता. nebulaization करावचं लागतं, मी मशीनच घेउन ठेवलय, नेहमी डॉक्टरकडे न्यायला नको म्हणून.

धनश्रि, भारीच अवघड प्रसंग होता हो तो. नशिब थोर आहे मुलाचे, या दम्याबिम्यातुन तो बाहेर निश्चितपणे येईल.
ससा, अगदी माझाहि तुझ्यासारखाच अनुभव रे. काय होते ना की घरचे फार कालजी करणारे असले तर ते मुलास घरातच बसवुन ठेवतात, आमच्याकडे तसे नव्हते, काय धाड भरत नाही असे म्हणायचे, त्यामुळे बिनधास्त जायचो. माझा दमा सम्पला नाही, पण मी दम्याच्या वेठिस धरलो गेलो नाही हे ही खरे. आजही औषधे जवळ बाळगावी लागतातच सातत्याने. अन तरीही गडडोन्गर चढणे/कष्टाची कामे वगैरे करतो. तेव्हा दम्याची भिती बाळगू नये हेच खरे. योग्य उपचार करत रहावे.

लहान पोरान्चे काहीबाही गिळणे/नाकात घालुन घेणे ह्या कॉमन बाबी आहेत (अनेक उदाहरणे आहेत इन्क्ल्युडिन्ग आमच्या पोरी). ज्योतिषशास्त्राचे दृष्टीने यास 'गन्डान्तरे' असे संबोधले जाते.

माझ्या भावाला बाळदम्याचा त्रास होता ११-१२ वर्षांचा होईपर्यंत. रात्रीच्या रात्री तो आणि आई जागून काढत असतं. त्यामुळे शाळेला खूप दांड्या होत असत. त्याची अवस्था बघवत नसे. आजही त्या आठवणी नको वाटतात. तेव्हा मला आठवतंय त्याप्रमाणे 'टेड्रॉल' की 'थेड्रॉल' नावाच्या गोळ्या त्याला लागू पडत असत. पण एखादा दिवस घेतली गेली नाही की हालत खराब. खूप अशक्त झाला होता त्यामुळे चालायलाही उशीरा लागला होता. तो आमच्याबरोबर खाली अंगणात खेळू शकत नसे त्यामुळे माझा अर्धा खेळ खाली अंगणात आणि अर्धा खेळ त्याच्याबरोबर घरी त्याच्या कला कलाने असे. उसळी त्याला चालत नसत.

नंतर तो गिरगावात ब्राह्मण सभेत व्यायामशाळे जाऊ लागला आणि आईने त्याला रोज १ खारीक, १ बदाम आणि ५ मनुका असं द्यायला सुरुवात केली. ते त्याला उत्तम लागू पडलं. ११-१२ व्या वर्षी त्याचा दमा गेला आणि तब्बेत सुधारली.

>>>> त्याला रोज १ खारीक, १ बदाम आणि ५ मनुका असं <<<<
अगदी अगदी.
आमच्याकडे मला "लेन्डीपिम्पळी" म्हणुन जे मिलते त्याचा दुधातील काढा रोज एकेक वाढवत पन्धरा की वीस लेन्दीपिम्पळी होईस्तोवर नी मग सन्ख्ये ने उतरवत असा दिला होता. उष्ण असते, वैद्याचे सल्यानेच करावे.

<<आमच्याकडे मला "लेन्डीपिम्पळी" म्हणुन जे मिलते त्याचा दुधातील काढा रोज एकेक वाढवत पन्धरा की वीस लेन्दीपिम्पळी होईस्तोवर नी मग सन्ख्ये ने उतरवत असा दिला होता. उष्ण असते, वैद्याचे सल्यानेच करावे.<<
लिंबुदा, आम्ही हा उपाय आमच्या आईच्या दम्यासाठीही केला होता.

प्राणायाम कोणत्या वयात शिकवतात ते माहीत नाही, पण आमच्या ओळखीत एका ताईन्ची तक्रार याने बरीच कमी झाली. नाहीतर महिन्यातुन २ वेळा हॉस्पिटल असायचेच, ते आता वर्शातुन २ दा असे झाले.

माझ्या भाच्याला आणि मुलाला दोघांना बाळदम्याचा भरपूर त्रास झाला आहे. साधारण पाच वर्षांचा झाल्यापासून त्रास जवळजवळ बंद झाला. ओळखीत एका मुलाचा त्रास आठव्या वर्षी बंद झाला.

कृपया तुमच्या मुलाची तब्येत प्रत्यक्ष तपासून निदान केलेल्या डॉक्टरने सांगितलेलीच औषधं त्याला द्या. इतर कुठलीही औषधं देऊ नका. शंका असल्यास डॉक्टर बदला. पण हे असे ऑनलाइन सल्ले मागून पोराच्या तब्येतीशी खेळ करू नका.

कृपया तुमच्या मुलाची तब्येत प्रत्यक्ष तपासून निदान केलेल्या डॉक्टरने सांगितलेलीच औषधं त्याला द्या. इतर कुठलीही औषधं देऊ नका. शंका असल्यास डॉक्टर बदला. पण हे असे ऑनलाइन सल्ले मागून पोराच्या तब्येतीशी खेळ करू नका. >> +१००००००००००००. One attack is one too many हे लक्षात ठेवा.

वारंवार नेब्यूलायझेन द्यावे लागत असेल तर डॉक्टरांनी सजेस्ट केलेले ड्रग कोणता आहे ह्याची माहिती गुगलून पाहावी. सलाईन वॉटरची वाफ सेफ असते तसेच इन्हालेक्स (ॲब्राक्सॉल हायड्रोक्लोराइ) ही सेफ असते. पण कित्येक वेळा ड्रगमध्ये स्टेरॉइड असते.
माझ्या जवळच्या नात्यातील दोन वर्षाच्या मुलाची जेव्हा छाती उडू लागली तेव्हा एका ख्यातनाम एम्‌. डी चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉक्टराने त्याला जी औषधे पोटात घेण्यासाठी प्रिक्राइब केलेली होती ती आम्ही गुगलून पाहिले असता ती स्टेरॉइडयुक्‍त आहेत हे लक्षात आले. मग आम्ही लगेच अन्य एम्‌. डी चिल्ड्रन स्पेशालिस्टचे सेकंड ओपिनियन घेतले. त्यांनी आजची रात्र काढू, उद्या पाहू असा सल्ला दिला. तोपर्यंत आम्ही इन्हालेक्स (ॲब्राक्सॉल हायड्रोक्लोराइ) ची वाफ दिली. नंतर घरीच वाफेचे मशिन आणून ठेवले. पुढ अधून मधून वाफ द्यावी लागे. तथापि ट्रिगरची लक्षणे दिसू लागताच वाफ दिली गेल्यामुळे तो आटोक्यात राहिला व नंतर नंतर तो कमी कमी होत जाऊन पूर्ण नाहीसा झाला.
स्टेरॉइड घेणे अगदीच अपरिहार्य असेल तर ते नेब्यूलायझेन द्वारे दिले गेले तर कमीतकमी साइड इफेक्ट होतात व ॲडिक्शनही कमी होते. अर्थात यासंदर्भात डॉक्टरी सल्ला महत्त्वाचा. पण आपल्याकडे नेब्यूलायझर असेल तर आपण डॉक्टरांच्या पुढे पर्याय ठेवू शकतो. दिवसातून तीन वेळा वाफ देण्यासाठी दवाखान्यात जाणे शक्य होत नसल्यामुळे अर्थातच पोटातून स्टेरॉइड देण्याखेरीज डॉक्टरांच्या कडेदेखील पर्याय नसावा. (रचक्याने वारंवार दवाखान्यात येण्याच्या ऐवजी घरीच नेब्यूलायझर घ्या असे डॉक्टर का सांगत नाही हे मला पडलेले एक कोडे आहे.)

मला बालदमा ९ व्या वर्षि झाला. १० व्या वर्षि मि मोठि सायकल चालवणे सुरु केले. खुप दम लागत असे. पण मि सायकल चालवणे सोडले नाहि. मि कुठेतरि वाचले होते, फुप्फुसे मजबुत होतात. खरे खोटे देव तजाणे, १३ व्या वर्षि दमा गेला. Doctor म्हणे puberty मुळे मुलिंचा दमा जातो. मला वाटते माझ्या सायकलमुळे, इच्छशक्तिमुळे गेला. व्यायामाने, आहाराने सर्वांगिण आरोग्य सुधारणे महत्त्वाचे असे मला वाटते.
आता माझा मुलगा चार व॑र्षाचा आहे त्याला wheezing चा त्रास होतो. nebulizer वापरावे लागते. दोन वर्षाचा असल्यापासुन हे सुरु आहे. मि त्याचा आहार सकस असेल असे बघते, स्वभाव मस्तिखोर असल्याने तो सतत उड्या मारतो, पळापळि करतो. मि करु देते. खुप दमला, जास्त wheezing झाले तर nebulizer देते.
दर दोन महिन्यांनि तो आजारि पडतो. सुरुवातिचे दोन दिवस सर्दिखोकला नंतर wheezing, fast breathing. nebulizer दोन दिवस चार चार तासांनि दिले कि फरक पडतो. pedi म्हणते, बालदमा आहे कि नाहि हे कळत नाहि. कारण त्याला food allergies सुद्धा आहेत. भरपुर खेळ आणि योग्य आहार महत्त्वाचा. दोन वर्षात हे प्रमाण कमि झाले आहे. Intensity कमि आहे. वजन, वाढिवर काहि विपरित परिणाम नाहि.
मुलाला खेळु द्यावे, दमा आहे म्हणुन सारखे बंधन आणु नये. pedi चा सल्ला घ्या. Internet द्वारे माहिति वाढवा. दमा जाइल हि सदिच्छा.

घरी nebulizer आहे पण बर्याच वेळा येथे त्याला saturation < 90 असते. मग डॉक्टर nebulization with oxigen
द्यायला सांगतात.ते हॉस्पिटल मध्येच द्यावे लागते.
उपचार /doctor consultation आहेच.पण त्याला history असल्याने असे वाटते की काही वेगळा दृरुश्तिकोन
कळेल...चर्चेतुन.
आभार सगळयान्चे!!!

बाळ्दमा बरा होतो. माझ्या माहितीतल्या एका मुलाचा बाळ्दमा १३व्या वर्शी दूर झाला होता. त्याला इतका त्रास होत असे की तो समोर असताना घरत केर काढला की त्याला दम लागत असे, रात्र रात्र जागणे, नेब्युलयझेशन इत्यादी तर अगदी रेग्युलर असे.

डॉक्टरी उपायांसोबत त्यालाही ८/९व्या वर्षी व्यायाम शिकायला पाठवले. ते सर त्याला घरी शिकवत असत. अनेक योगासने, अगदी मल्लखांब चढणे आणि प्राणायाम यामुळे तो पूर्ण बरा झाला.

बाळ्दम्यावर मुलांना भरपूर खेळू देणे, जमल्यास योगासने सूर्यनमस्कार प्राणायाम शिकवणे, चालायला धावायला डाँगर चढायला नेणे, भरपूर सायकल चालवू देणे असे शारिरीक दमणूकीचे खेळ खूप फायदेशीर आहेत. खेळत राहिल्याने त्यांची फुफ्फुसांची कॅपॅसिटी आणि स्ट्रेंथ वाढते आणि त्यातूनच दमा बरा होतो.

इतकेच नव्हे तर मोठ्यांचाही दम्याचा त्रास शारिरीक दमणूकीच्या खेळांमुळे कमी होतो. अर्थात टप्प्याटप्याने करावे. प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य.

हरिहर, वाफ देणे आणि नेब्युलायझरची कृपया तुलना करू नका.
दम्याच्या बहुतेक औषधांमधे स्टेरॉईड्सच असतात आणि म्हणूनच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली द्यायची असतात. वाफेमुळे श्वासनलिका, वायुकोष मोकळे होऊ शकत नाहीत, त्यासाठी स्टेरॉईड्सचीच गरज असते. मात्र नेब्युलायझर/इन्हेलरमुळे शरीरात जाणारी स्टेरॉईड्स फक्त फुफ्फुसांपुरती मर्यादित रहातात, इतरत्र भागात जात नाहीत. त्यामुळे शरीराला अपाय होत नाही. नेब्युलायझर्/इन्हेलर वापरल्यानंतर थुंकी न गिळता खुळखुळून चूळ भरायची असं म्हणूनच डॉक्टर सांगतात (चुभू असल्यास इथल्या डॉक्टरांनी दुरुस्त करावे)

दम्यासाठी शारिरिक क्षमता सुधारत रहाणे हा एक अनिवार्य पर्याय आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही होमिओपॅथिक, आयुर्वेदिक औषध देऊ नका. इतर रोगांसाठी ती उपयुक्त असतील्/नसतील. त्या वादात मी जात नाही. पण दम्यासाठीच्या औषधात अ‍ॅलोपॅथिक प्रकारात आपल्याला केमिकल कॉम्पोझिशन माहित असतं. इतर उपचार पद्धतींमधे ते कुठेही स्पष्टपणे लिहिलेलं नसतं तेव्हा काय प्रकारची काय प्रमाणातली स्टेरॉईड्स किंवा तत्सम पदार्थ आपण घेतोय ते कळणं अवघड आहे. (ही असली चुकीची औषधं घेऊन कैच्याकै कॉम्प्लिकेशन्स झालेल्या केसेस मी बघितल्या आहेत म्हणून लिहिते आहे)

धनश्री, तुमची काळजी समजण्यासारखी आहे पण तुमच्या मुलाचा बालदमा तीव्र स्वरूपाचा आहे असं दिसतंय. तेव्हा पूर्णपणे डॉक्टरच्या सल्ल्यांप्रमाणे वागणे. अजिबात इतरांचे असे सल्ले मागू नका. दम्यासाठी घरगुती औषधं, आजीबाईचे बटवे सहसा लागू पडतच नाहीत.

बरोबर वरदा. त्यामुळेच व्यायाम सोडला तर ( तो पण तज्ञ मार्गदर्शकान्च्या देखरेखीने) बाकी काही मनाने घेऊ नये. अतीशय तळमळीने आणी सुन्दर लिहीले आहे. धन्यवाद.

@ विद्या भुतकर :
पुण्यात माधवी देशपांडे या एक ऊत्तम वैद्य आहेत. मोडेल कोलोनी मधे होटेल ललित माहाल च्या वर. मी लहान पणा पसून त्यान्ची treatment ghete aahe. मला Allergy induced asthama साठी खूप उप्योग झाला.

वरदा, उत्तम पोस्ट.

ही लिंक वाचून घ्या. सबवेच्या ब्रेड मध्ये घातक केमिकल असते असे ह्या बाई म्हणतात.
http://foodbabe.com/
On Tuesday, February 4th, I launched a petition for the removal of a dangerous plastic chemical called azodicarbonamide from Subway sandwich bread – the same stuff used in yoga mats, shoe rubber and synthetic leather. This was after repeated attempts to reach out to Subway since June of 2012 to learn more about why they are using this (asthma inducing and potentially carcinogenic) chemical here in North America and not in any other countries. They never responded until now.

मुलाला एखाद्या केमिकल ची अ‍ॅलर्जी आहे का ते तपासून घेता आले तर ते ट्रिगर दूर ठेवता येतील. धीर सोडू
नका.

मलापण बालदमा होता. ख़ुप उपचार केले, आयुर्‍वेदिक आलोपाथी उपचार केले पण फरक पडला नाही. डॉक्टरांनी ब्रॅडी द्यायला लावली. रोज २ चमचे झोपतना. नंतर सतत सर्दी होवुन नाकात पोलीप झाले. ऑपरेशन करावे लागले. माझा हा त्रास माझ्या मुलिच्या जन्मानंतर बरा झाला.

वरदा आणि सगळयांचे आभार.खरे तर हा त्रास आधी अगदीच mild होता त्याला.नेहमीच doctor/pumanologist naa दाखवतो/treatment घेतो.पण गेल्या सहा महीन्यात frequency फारच वाढ्ली.so i want to know specialisst/exact theropist in these regards.इथे लिहिल्याने आपण काही अजुन करु शकतो का हे तरी कळते.

मला लहानपणी दमा होता... वयानुसार intensity कमी झाली पण अजुनही अधुन्-मधून त्रास होत असतो.
माझं बाळ १० महीन्यांच आहे. त्यालाही कायम सर्दी असते. wheezing होत असत सारख्.... त्यासाठी मी काय करू शकते?? कोणी मला मदत करू शकेल का याबाबत प्लीज..?

(note: पुढील पोस्ट आधी च्या छानुली यांच्या पोस्टला उत्तर म्हणून नाहीये Sad कृपया गैरसमज नको)

दोन दिवसांपूर्वी आमच्या किराणादुकारनदाराने मला खारावलेले/भाजलेले आळशी/जवस दिले. मला बनवणारी कंपनी आठवत नाही, पण बोर्नव्हिताच्या बरणीसार ख्या बरणीतून दिले.
आळजी/जवसाचे नियमित (प्रमाणशील) सेवन कफ प्रवृत्तीला अटकाव करते.

Pages